गाजलेले चित्रपट

पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे सिनेमे

Submitted by ती पुन्हा गाईल on 10 September, 2023 - 00:05

एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"

तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"

तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.

असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.

विषय: 
Subscribe to RSS - गाजलेले चित्रपट