<<कारण पुढे जाऊन हीना आई व्हायचे नाकारणार होती हे निश्चित. फक्त स्त्रियांनीच का बरे आई व्हायचे आणि त्यांची हंगेरी मुतेरी करायची?>> नो . तिला सात वर्षाची मुलगी आहे. A Woman experiences a strong desire, a strong craving to have her own child. It is common to have a maternal instincts in women. त्यामुळे त्यांची शी शू काढणे यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. Many women have sacrificed their budding careers to raise their children.
Submitted by Revati1980 on 1 September, 2023 - 06:33
नायिका, अॅबुसिव नात्यातून बाहेर पडली हे चांगले झाले पण या कथेत किंवा लेखीकेच्या प्रतिसादात सार्वत्रीकरण आहे ते नाही आवडले.
>> पावडर कुंकू करणाऱ्या बायका त्यांच्या शरीराचं भांडवल करतात कारण तीच एक ताकत असते त्यांच्याकडे.>>
हे विधान मला डेरोगेटरी वाटले. मला स्वतःला मेकअपची आवड नाही तरीही वाटले. हिमांशूचे वागणे चुकीचे आहे पण हीनाचे मेकअप करणार्या स्त्रीयांबद्दलचे मतही चुकीचेच आहे. मेकअपची आवड/नावड ही प्रत्येकाची स्वतःची असते. पुरुषाच्या पलीकडे स्वतःसाठी म्हणून स्त्रीया मेकअप करतात. आणि अगदी रुढार्थाने पुरुष नटत नाहीत असे म्हटले तरी पुरुषांचे स्वतःचे असे आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न असतात. केशरचना, दाढी- मिशा, वस्त्र, देहबोली यातून ते दर्शवायचा प्रयत्न होतो. कुंकवाच्या बाबतीत बोलायचे तर अगदी मागल्या शतकात पुरुष देखील कपाळावर गंध रेखत होते की!
अवांतर -
स्त्री काय नी पुरुष काय कर्तुत्व असले तरीही एक इमेज राखणे- आकर्षक दिसणे हे वेगवगळ्या पातळीवर करत असतात. किंबहूना सामान्यांपेक्षा थोडे जास्तच करतात. कारण पॉवर प्ले मध्ये आख्खे पॅकेज येते. साडीचा रंग-काठ, स्कर्टची उंची, पुरुषांचा पेहराव, टायचा रंग, चश्म्याची फ्रेम, केशरचना, इतकेच काय यात मुद्दाम 'न केलेला मेकअप' देखील एक प्रकारचा मेकअप असतो.
>>>>पुरुषाच्या पलीकडे स्वतःसाठी म्हणून स्त्रीया मेकअप करतात.
करेक्ट. स्त्रिया या अन्य स्त्रियांकरताही मेक अप करतात. आम्हाला एकमेकींना न्याहाळणे म्हणजे पेहेराव, लुक्स, दागिने, कपडे, नेलपेंटस - हे सर्व function at() { [native code] }ओनात आवडते.
रस्त्यावरुन एक देखणा पुरुष व एक सुंदर स्त्री चालत असतील तर स्त्रिया आधी स्त्रीकडे पहातात आणि मग पुरुषाकडे. (हे जरा जास्तच होतय जाऊ देत देखणा असेल तर ऑर्डर बदलू यात :p)
>>पण आताची स्त्री छान दिसण्याकडे फारसे लक्ष देत नाही कारण आता स्त्री जुन्या बंधनातून बाहेर आली आहे. >>
लॅक्मे लिव्हरचा २०२३ चा रेव्हेन्यू ३२८ कोटी रुपये आणि इअर ओव्हर इअर ग्रोथ १९.३% आहे.
लॉरिएचा १० बिलिअन डॉलर आणि ग्रोथ १२% आहे. सो आता ठरवा आजची स्त्री काय करत्येय आणि लोपमुद्रा काय करायची. बाकी लोपामुद्रा, गार्गी आणि उभया भारती मेकप करत न्हवत्या हे कसं समजलं?
आधीची स्त्री पुरुषांना आकर्षित करायला मेकअप करायची.
आताची स्त्री छान दिसायला आणि छान छान फोटो काढायला मेकअप करते.
हे विधान खोटे असेल तर त्या बाईच्या घरातून मूठभर तांदूळ घेऊन या जिने आजवर एक सुद्धा सेल्फी काढली नाही
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 09:47
रस्त्यावरुन एक देखणा पुरुष व एक सुंदर स्त्री चालत असतील तर स्त्रिया आधी स्त्रीकडे पहातात आणि मग पुरुषाकडे. (हे जरा जास्तच होतय Wink जाऊ देत देखणा असेल तर ऑर्डर बदलू यात :p)>>>>>
मध्ये एक वाक्य अजून टाकावेसे वाटते, मग ती तिच्या नवर्याकडे, तिथपर्यंत देखणा पुरुष पुढे निघून गेलेला असतो.
"बाकी बायका बायकांकडे जितक्या बारकाईने बघतात तितके पुण्याचे पेंशनरही नाही हो" आठवण झाली
खूपच विषयांतर झालं.. sorry
Submitted by छन्दिफन्दि on 1 September, 2023 - 09:48
माझे एक नात्यातले काका मेल्यावर समजले की त्यांच्या बायकोने कसा त्यांचा छळ मांडला होता. तिचा भाऊ देखील कसा त्यांना मारहाण करायचा. तिचे बाहेर देखील एक अफेअर होते हे देखील नंतरच उघड झाले.
त्या आधी तो काका दारूडा होता आणि त्यामुळे त्यांच्या संसारात सुख नव्हते इतकेच जगाला माहीत होते. जगाचे सोडा. त्यांचे सख्खे भाऊ सुद्धा कधी मदतीला आले नाहीत. आणि मदतही सोडा. कुटुंबातून सहानुभूती सुद्धा त्या काकीना मिळायची आणि काकाला दारू सोडायचे उपदेश..
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 0>>> मग त्यानेही तक्रार करायला हवी होती.
Submitted by छन्दिफन्दि on 1 September, 2023 - 09:51
एवढे सोपे असते तर कुठली समस्याच शिल्लक राहिली नसती आणि आपण आज या विषयावर चर्चा देखील करत नसतो.
उद्या तुम्हाला रस्त्यावर कोणी नवरा बायकोला एक थप्पड मारताना दिसला आणि तुम्ही त्या बाईला वाचवायला म्हणून नवऱ्याची गचांडी धरलीत तर ती बाई नवऱ्याची बाजू न घेता तुमच्या बाजूला उभी राहील याची शंभर टक्के खात्री कोण देऊ शकते का..
लेखात सुजलेला गाल असा उल्लेख आला आहे.
जर गाल सुजलेला दिसला नसता तर... कदाचित आईने सुद्धा पोरीला परत पाठवले असते.
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 10:22
>>पण आताची स्त्री छान दिसण्याकडे फारसे लक्ष देत नाही कारण आता स्त्री जुन्या बंधनातून बाहेर आली आहे. >> हे वाक्य २०११-१२ साली म्हंटले आहे. तुमचं पुढचं वाक्य, <<लॅक्मे लिव्हरचा २०२३ चा रेव्हेन्यू ३२८ कोटी रुपये>> वर्ष २०२३चा .२०११ ते २०२३ पर्यन्त अख्खी पिढी बदलते. लोकसंख्या वाढते. बायकांची संख्या वाढते. आपण छान दिसावे असे वाटणाऱ्या बायकांची संख्या वाढते.
<< इअर ओव्हर इअर ग्रोथ १९.३% आहे.>>लॅक्मेचे प्रॉफिट फक्त आय लायनर आणि लिपस्टिक मुळेच होते. त्यांचे इतर ब्युटी प्रोडक्ट विशेष विकले जात नाहीत.
<<<लॉरिएचा १० बिलिअन डॉलर आणि ग्रोथ १२% आहे. >>>लॉरिए चे मार्केट कॅप २०११ ला लॉस मध्ये गेले होते. चेक द फिगर.
<<बाकी लोपामुद्रा, गार्गी आणि उभया भारती मेकप करत न्हवत्या हे कसं समजलं?>> त्या करत होत्या हे तुम्हाला कसं कळलं असाही युक्तिवाद होउ शकतो. त्या वेळी लॅक्मे आणि लॉरिए नव्हते, so let us give them a benefit of doubt.
हॉलिवूडच्या एका तारकेने, मला नाव आठवत नाही, अँटी मेकअप मुवमेंट सुरु केली होती. आपल्याकडे पण नंदिता दास, स्वरा भास्कर, कंगना राणावत अशा अनेक तारका मेकअप करत नाहीत. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन नी मेकअप केलेलं कधी दिसलं नाही. चार दिवसांपूर्वी चेस ग्रँड मास्टर प्रज्ञानानंदच्या आईचा फोटो अनेक वृत्तपत्रात छापला होता. तिने मेकअप केलेला दिसला नाही.
चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग झाले तेंव्हा इस्रो मधल्या शास्त्रज्ञ महिला मेकअप केलेल्या दिसल्या नाहीत.
...
Submitted by Revati1980 on 1 September, 2023 - 11:28
>>>>>>> इस्रो मधल्या शास्त्रज्ञ महिला मेकअप केलेल्या दिसल्या नाहीत.
केवढी युवा पिढी टिव्हीवरती दिसत होती त्यातझी महीलांची उपस्थिती जाणवण्याइतकी सख्याबलाने प्रबळ होती. किती जणींनी साडी नेसलेली होती. मेक अप केलेला होता. मोदी सकाळी सकाळी ७:३० ला बोलले त्यांच्याशी तेव्हाही काय मस्त आवरुन, फ्रेश क्राऊड आलेला होता. मला तरी कौतुक वाटले.
हे वाक्य २०११-१२ साली म्हंटले आहे>> मग २०११ आणि २०१२ चे आकडे शोधुन हवेत का तुम्हाला? तर ते देतो. बाकी हे २०११ गोष्टीत तर नाही कुठे? हे कुठुन आलं? एक ऑब्जेक्शन घेतलं की नवी डीटेल्स द्यायची ही पूर्वी एका आयडीची शैली होती. तुमचा काही संबंध नाही ना?
>> २०११ ते २०२३ पर्यन्त अख्खी पिढी बदलते. लोकसंख्या वाढते. बायकांची संख्या वाढते. आपण छान दिसावे असे वाटणाऱ्या बायकांची संख्या वाढते. >> नाव आय एम टोटली कन्फ्युज्ड! ताई तुम्ही दोन वाक्यांत परस्पर टोकाची विरोधी मत लिहिताय लक्षात येतंय का तुमच्या?
>>लॅक्मेचे प्रॉफिट फक्त आय लायनर आणि लिपस्टिक मुळेच होते. त्यांचे इतर ब्युटी प्रोडक्ट विशेष विकले जात नाहीत.>> अहो एकतर मी प्रॉफिट नाही रेव्हेन्यू बद्दल बोलतोय. आणि रेव्हेन्यू (आणि तुम्हाला प्रॉफिट काढायचा असेल तर तो) कशातून येतो हे महत्त्वाचं आहे का??? अॅमेझॉनचा क्लाऊड बिझनेस सोडला तर त्यांचे सगळे इतर उद्योग तोट्यात आहेत, मायक्रोसॉफ्टचं असंच काही आहे, आपल्या रिलायन्सचं ही फार वेगळं नसेल... पण म्हणून अॅमॅझॉनला डब्यातच टाकायचं का? आता प्लीज अॅमेझॉन कसं ग्लोबल वॉर्मिंग करतंय आणि आपणं त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे असं काही टॅन्जंट लिहू नका.
२०११ ला लॉरिए गेला असेल लॉस मध्ये. २०२३ ला समजा प्रॉफिट मध्ये आला असेल. तर तुमची २०११ ची मेकप बद्दलची मत २०२३ ला बदलली असं मी समजू का? तुम्ही लेख २०२३ ला पब्लिश केलात तर तुमच्या बदललेल्या मतांचा प्लीज उल्लेख करता का?
लोपामुद्रा बद्दलचा दावा तुम्ही केलाय मी नाही. त्यांच्या बद्दलचं तुमचं वाचन तोकडं पडत असेल तर ते तुम्ही करायचं मी नाही. आणि तेव्हा लॅक्मे आणि लॉरिए न्हवते म्हणून त्या मेकप करत न्हवत्या असा बेनिफिट ऑफ डाऊट देऊ असं विधान तुम्ही विनोदाने करताय का कसं कल्पना नाही. पण तसं नसेल आणि तुम्ही खरंच तसं म्हणत असाल तर आय रेस्ट माय केस!
कंगना मेकप करत नाही आणि इस्त्रो मधलं कोणी मेकप करत नाही... हे अर्थात परत तुम्हाला कसं कळलं विचारणं वेडवळपणाचं आहे तरी मी ते विचारणारच आहे... असं मानून चाललं तरी त्यातुन नक्की काय सिद्ध होतं?
तुमचे प्रतिसाद बघता तुमचा प्रॉब्लेम स्त्रियांनी मेकप करणे (त्यातही लॅक्मे आणि लॉरिएचा मेकप करणे) हे मागास लक्षण आहे ह्याची प्रसिद्धी आहे असं आता मला वाटू लागलंय. नवर्याचे अत्याचार हा मूळ मुद्दा असेल तर त्याच्यावरचा फोकस प्लीज ढळू देऊ नका. तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मेकप करणे न करणे या बद्दलची तुमची मतं प्रोर ग्राऊंडला येऊन मूळ मुद्दा मागची खुर्ची घेत आहे. हे लक्षात घ्या.
I am really sorry रेवती पण तुमचा कथा नायक मेकअप न करणाऱ्या स्त्री ला जज करतोय आणि तुम्ही/ नायिका मेकअप करणाऱ्या.
जर तो चुकीचा असेल तर ती ही तितकी च चुकीची आहे.
मेकअप करणारी प्रत्येक व्यक्ती कोणा ना कोणाला आकर्षित करण्या साठी च मेकअप करते असं म्हणायचं आहे का? तसं म्हणायचं असेल तर मी म्हणेन समाज व्यवस्थेचा थोडा अभ्यास करा आणि आपला परीघ वाढवा.
राहिली गोष्ट एखाद्याला एखादी गोष्ट आवडणे आणि न आवडणे तर काही गोष्टींची उदाहरणार्थ ढेकर, पाद, नाक शिंकरणे इत्यादी गोष्टींची किळस वाटू शकते आणि हे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे एखाद्याला अशी किळस वाटा असेल तर त्याने त्या माणसासमोर हे करू नये अशी आपल्या पार्टनर कडून अपेक्षा ठेवणे अतिशय च नॉर्मल आहे. त्याला किळस वाटते तरी मी त्याच्या समोर च करणार हे त्या बिचाऱ्यासाठी अब्युज झालं
जर हीचा नवरा तिच्यासमोर नाकात बोट घालत , छाती वरचे केस कराकरा खाजवत पाय पसरून बसला असता तर तिने ' असं नको रे करुस, मला आवडत नाही, बदल तुझी सवय' म्हणलं नसतं का?
बाकी अब्युसिव रेलेशनशीप मधून बाहेर पडलेच पाहिजे हे सगळेच म्हणत आहेत आणि ते खरेच आहे.
काही गोष्टींची उदाहरणार्थ ढेकर, पाद, नाक शिंकरणे इत्यादी गोष्टींची किळस वाटू शकते आणि हे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे एखाद्याला अशी किळस वाटा असेल तर त्याने त्या माणसासमोर हे करू नये अशी आपल्या पार्टनर कडून अपेक्षा ठेवणे अतिशय च नॉर्मल आहे. त्याला किळस वाटते तरी मी त्याच्या समोर च करणार हे त्या बिचाऱ्यासाठी अब्युज झालं

>> रीया +1
मला हेच सांगायचे होते... रीया ने छान समजावून सांगितले आहे...
बाकी अब्युसिव रेलेशनशीप मधून बाहेर पडलेच पाहिजे हे सगळेच म्हणत आहेत आणि ते खरेच आहे.+१
रीया आणि स्वातीताईंचे प्रतिसाद पर्फेक्ट आहेत. या कथेचं शीर्षकही 'थप्पड' हवं होतं, लॉरिएल नाही. मला अमितचंही पटलं. कथेचा आणि प्रतिसादांचा टोन शोषणाविरुद्ध असण्याऐवजी मेकपविरुद्ध आहे. जे झेपत नाहीये.
Submitted by अस्मिता. on 1 September, 2023 - 17:03
>>काही गोष्टींची उदाहरणार्थ ढेकर, पाद, नाक शिंकरणे इत्यादी गोष्टींची किळस वाटू शकते आणि हे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे एखाद्याला अशी किळस वाटा असेल तर त्याने त्या माणसासमोर हे करू नये अशी आपल्या पार्टनर कडून अपेक्षा ठेवणे अतिशय च नॉर्मल आहे. त्याला किळस वाटते तरी मी त्याच्या समोर च करणार हे त्या बिचाऱ्यासाठी अब्युज झालं
जर हीचा नवरा तिच्यासमोर नाकात बोट घालत , छाती वरचे केस कराकरा खाजवत पाय पसरून बसला असता तर तिने ' असं नको रे करुस, मला आवडत नाही, बदल तुझी सवय' म्हणलं नसतं का?
>>
रीया, छान शब्दात मुद्दा मांडलास. मला हे असे लिहायला जमत नव्हते.
चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग झाले तेंव्हा इस्रो मधल्या शास्त्रज्ञ महिला मेकअप केलेल्या दिसल्या नाहीत. >> तो त्यांचा चॉईस असेल ना! कदाचित तिथला ड्रेसकोडही असू शकतो.
अॅब्युझ बद्दल बोलायचे तर पत्नी मेकअप करते म्हणून तिच्यावर संशय घेणारे , अॅब्युझिव नवरे असतात की! इथे स्त्री छळ टाळायला म्हणून मेकअप करणे थांबवते. थोडक्यात ती मेकअप करत नाही कारण ती पिडीत आहे.
अजून एक मेकअप म्हणजे फिजीकल अॅब्युझच्या खूणा मिटवायला केलेला मेकअप. हा मेकअप भीती आणि लाज या कारणास्तव केला जातो. इथेही स्त्री पिडीत आहे.
मेकअप करणे काय किंवा मेकअप न करणे हा त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असावा. मेकअप न करणे म्हणजे काहीतरी होलीअर दॅन दाऊ असा अॅप्रोच कशासाठी?
असिस्टेड लिविंग फॅसिलीटी , नर्सिंग होम इथे रहाणार्यां स्त्रीयांसाठी मेकअप थेरपीचा भाग म्हणून वापरतात. इतर दुर्धर आजारांशी सामना करणार्या स्त्रीयांसाठीही त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी, आनंदी वाटावे म्हणून मेकअपसह खास पँपरिंग सेशन्स असतात. मेकअप कडे प्लीज इतक्या तुच्छतेने नका बघू.
मी स्वतः काजळ घालूनच झोपते आणि २४ तास काजळ लावते. तसे केले नाही तर चेहरा माझा मला बघवत नाही. लिटरली आय कॅनॉट फेस वर्ल्ड विदाऊट माय 'आय लायनर'' आंघोळ केली की मॉइश्चरायझर व काजळ हे रिच्युअल आहे. असो.
बाई दवे,
कथेतील नायिका इच्छा नसताना मेकअप करावे लागत असल्याने त्रस्त आहे. त्यामुळे तिचा मेकअप वर राग असणे स्वाभाविक आहे.
कथेच्या दृष्टीने हे पटनेबल आहे
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 16:10
अजून एक म्हणजे पुरुषाला आकर्षित करायला मेकअप हे आपण वर्षानुवर्षे चित्रपटात बघत आलोय.
KKHH मध्ये अंजली मेक अप करत नव्हती तर शाहरूख ढुंकूनही बघत नव्हता. जेव्हा करू लागली तेव्हा आपली त्याच नावाची पोरगी आहे हे विसरून बघू लागला.
मैं हु ना चित्रपटात सुद्धा सेम असाच सीन झायेद खान आणि अमृता राव मध्ये दाखवला आहे..
मेकओवर करायला मेकअप गरजेचा आहे आणि तो केल्यावर आपल्या स्वप्नातील राजकुमार मिळतो हे चित्रपटात दाखवलेले आपल्याला प्रेक्षक म्हणून लगेच पटते..
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 16:20
ऋन्मेष, त्याकाळचे चित्रपट महा मूर्ख कॅटेगरी मधे होते हे आम्ही मान्य करतोच आहोत. ते सिनेमे होते, बरोबर होते का नाही हा वेगळा मुद्दा.
Darlings चा दाखला देऊन प्रेमाने केलेली मारहाण बरोबर असं म्हणू शकतो का आपण?
त्याकाळचे चित्रपट महा मूर्ख कॅटेगरी मधे होते
>>>
चित्रपट समाजाचा आरसा असतात.
जर हिरोने गुंडांना मारून हिरोईन पटवली हे तेव्हा लोकांना पटायचे तर लोकांचे विचार तसेच होते हे मान्य करायला हरकत नसावी.

>>>>
गल्लत होत आहे.
darling मध्ये त्याचे समर्थन केले नव्हते.
त्याचे समर्थन केले असते आणि पब्लिकला ते पटले असते तर असे म्हणता आले असते.
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 17:22
घ्या! आमच्या लहानपणी बॅट ज्याची असेल त्याला दोनदा आऊट असं असायचं. ऋन्म्या बॅट बॉल कोणाची का असेना आपल्याच धापवट्टीवर रनप घेत आपल्यालाच बॉल टाकतो आणि आपणचं अंपायर बनून सिक्सर देतो आणि वर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊन चार अनुभवाचे बोल पण सांगतो. रिया आता भोआकफ! आम्हाला वाटलं जरा पॉपकॉर्न मिळतील तर कस्चंकाय!
अरे पण मेकअप वरची मते हा या ष्टोरीतील मेन प्रॉब्लेम नाही. "गाल सुजवून" हा आहे आणि तिने त्याच्याबरोबर न राहायला तेवढे बास आहे. वास्तविक तिच्या घरची चर्चा सुद्धा त्याबद्दल न होता मेकअप बद्दल झाली हे मला विनोदी वाटले. तिने मेकअप केव्हा करावा व त्याने कोठे बॅड हायजिन कंट्रोल करावे वगैरे असले मतभेद शेकडो घरांमधे होत असतील. पण असल्या फुटकळ वादातून गाल बिल सुजत असेल तर तिने जमल्यास एकतर त्याचा विशिष्ठ अवयव सुजवावा नाहीतर स्वतंत्र व्हावे
वास्तविक तिच्या घरची चर्चा सुद्धा त्याबद्दल न होता मेकअप बद्दल झाली हे मला विनोदी वाटले.
>>
या कारणाने आणि लेखिकेच्या प्रतिसादामुळे हेच सांगायचं आहे असं वाटलं मला तरी
<<कारण पुढे जाऊन हीना आई
<<कारण पुढे जाऊन हीना आई व्हायचे नाकारणार होती हे निश्चित. फक्त स्त्रियांनीच का बरे आई व्हायचे आणि त्यांची हंगेरी मुतेरी करायची?>> नो . तिला सात वर्षाची मुलगी आहे. A Woman experiences a strong desire, a strong craving to have her own child. It is common to have a maternal instincts in women. त्यामुळे त्यांची शी शू काढणे यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. Many women have sacrificed their budding careers to raise their children.
नायिका, अॅबुसिव नात्यातून
नायिका, अॅबुसिव नात्यातून बाहेर पडली हे चांगले झाले पण या कथेत किंवा लेखीकेच्या प्रतिसादात सार्वत्रीकरण आहे ते नाही आवडले.
>> पावडर कुंकू करणाऱ्या बायका त्यांच्या शरीराचं भांडवल करतात कारण तीच एक ताकत असते त्यांच्याकडे.>>
हे विधान मला डेरोगेटरी वाटले. मला स्वतःला मेकअपची आवड नाही तरीही वाटले. हिमांशूचे वागणे चुकीचे आहे पण हीनाचे मेकअप करणार्या स्त्रीयांबद्दलचे मतही चुकीचेच आहे. मेकअपची आवड/नावड ही प्रत्येकाची स्वतःची असते. पुरुषाच्या पलीकडे स्वतःसाठी म्हणून स्त्रीया मेकअप करतात. आणि अगदी रुढार्थाने पुरुष नटत नाहीत असे म्हटले तरी पुरुषांचे स्वतःचे असे आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न असतात. केशरचना, दाढी- मिशा, वस्त्र, देहबोली यातून ते दर्शवायचा प्रयत्न होतो. कुंकवाच्या बाबतीत बोलायचे तर अगदी मागल्या शतकात पुरुष देखील कपाळावर गंध रेखत होते की!
अवांतर -
स्त्री काय नी पुरुष काय कर्तुत्व असले तरीही एक इमेज राखणे- आकर्षक दिसणे हे वेगवगळ्या पातळीवर करत असतात. किंबहूना सामान्यांपेक्षा थोडे जास्तच करतात. कारण पॉवर प्ले मध्ये आख्खे पॅकेज येते. साडीचा रंग-काठ, स्कर्टची उंची, पुरुषांचा पेहराव, टायचा रंग, चश्म्याची फ्रेम, केशरचना, इतकेच काय यात मुद्दाम 'न केलेला मेकअप' देखील एक प्रकारचा मेकअप असतो.
>>>>पुरुषाच्या पलीकडे
>>>>पुरुषाच्या पलीकडे स्वतःसाठी म्हणून स्त्रीया मेकअप करतात.
करेक्ट. स्त्रिया या अन्य स्त्रियांकरताही मेक अप करतात. आम्हाला एकमेकींना न्याहाळणे म्हणजे पेहेराव, लुक्स, दागिने, कपडे, नेलपेंटस - हे सर्व function at() { [native code] }ओनात आवडते.
रस्त्यावरुन एक देखणा पुरुष व एक सुंदर स्त्री चालत असतील तर स्त्रिया आधी स्त्रीकडे पहातात आणि मग पुरुषाकडे. (हे जरा जास्तच होतय जाऊ देत देखणा असेल तर ऑर्डर बदलू यात :p)
>>पण आताची स्त्री छान
>>पण आताची स्त्री छान दिसण्याकडे फारसे लक्ष देत नाही कारण आता स्त्री जुन्या बंधनातून बाहेर आली आहे. >>
लॅक्मे लिव्हरचा २०२३ चा रेव्हेन्यू ३२८ कोटी रुपये आणि इअर ओव्हर इअर ग्रोथ १९.३% आहे.
लॉरिएचा १० बिलिअन डॉलर आणि ग्रोथ १२% आहे. सो आता ठरवा आजची स्त्री काय करत्येय आणि लोपमुद्रा काय करायची. बाकी लोपामुद्रा, गार्गी आणि उभया भारती मेकप करत न्हवत्या हे कसं समजलं?
अगेन, अब्युझ मधुन बाहेर पडणे सगळ्यात महत्त्वाचे.
आधीची स्त्री पुरुषांना
आधीची स्त्री पुरुषांना आकर्षित करायला मेकअप करायची.
आताची स्त्री छान दिसायला आणि छान छान फोटो काढायला मेकअप करते.
हे विधान खोटे असेल तर त्या बाईच्या घरातून मूठभर तांदूळ घेऊन या जिने आजवर एक सुद्धा सेल्फी काढली नाही
रस्त्यावरुन एक देखणा पुरुष व
रस्त्यावरुन एक देखणा पुरुष व एक सुंदर स्त्री चालत असतील तर स्त्रिया आधी स्त्रीकडे पहातात आणि मग पुरुषाकडे. (हे जरा जास्तच होतय Wink जाऊ देत देखणा असेल तर ऑर्डर बदलू यात :p)>>>>>
मध्ये एक वाक्य अजून टाकावेसे वाटते, मग ती तिच्या नवर्याकडे, तिथपर्यंत देखणा पुरुष पुढे निघून गेलेला असतो.
"बाकी बायका बायकांकडे जितक्या बारकाईने बघतात तितके पुण्याचे पेंशनरही नाही हो" आठवण झाली
खूपच विषयांतर झालं.. sorry
माझे एक नात्यातले काका
माझे एक नात्यातले काका मेल्यावर समजले की त्यांच्या बायकोने कसा त्यांचा छळ मांडला होता. तिचा भाऊ देखील कसा त्यांना मारहाण करायचा. तिचे बाहेर देखील एक अफेअर होते हे देखील नंतरच उघड झाले.
त्या आधी तो काका दारूडा होता आणि त्यामुळे त्यांच्या संसारात सुख नव्हते इतकेच जगाला माहीत होते. जगाचे सोडा. त्यांचे सख्खे भाऊ सुद्धा कधी मदतीला आले नाहीत. आणि मदतही सोडा. कुटुंबातून सहानुभूती सुद्धा त्या काकीना मिळायची आणि काकाला दारू सोडायचे उपदेश..
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 0>>> मग त्यानेही तक्रार करायला हवी होती.
मग त्यानेही तक्रार करायला हवी
मग त्यानेही तक्रार करायला हवी होती.
>>>
एवढे सोपे असते तर कुठली समस्याच शिल्लक राहिली नसती आणि आपण आज या विषयावर चर्चा देखील करत नसतो.
उद्या तुम्हाला रस्त्यावर कोणी नवरा बायकोला एक थप्पड मारताना दिसला आणि तुम्ही त्या बाईला वाचवायला म्हणून नवऱ्याची गचांडी धरलीत तर ती बाई नवऱ्याची बाजू न घेता तुमच्या बाजूला उभी राहील याची शंभर टक्के खात्री कोण देऊ शकते का..
लेखात सुजलेला गाल असा उल्लेख आला आहे.
जर गाल सुजलेला दिसला नसता तर... कदाचित आईने सुद्धा पोरीला परत पाठवले असते.
>>पण आताची स्त्री छान
>>पण आताची स्त्री छान दिसण्याकडे फारसे लक्ष देत नाही कारण आता स्त्री जुन्या बंधनातून बाहेर आली आहे. >> हे वाक्य २०११-१२ साली म्हंटले आहे. तुमचं पुढचं वाक्य, <<लॅक्मे लिव्हरचा २०२३ चा रेव्हेन्यू ३२८ कोटी रुपये>> वर्ष २०२३चा .२०११ ते २०२३ पर्यन्त अख्खी पिढी बदलते. लोकसंख्या वाढते. बायकांची संख्या वाढते. आपण छान दिसावे असे वाटणाऱ्या बायकांची संख्या वाढते.
<< इअर ओव्हर इअर ग्रोथ १९.३% आहे.>>लॅक्मेचे प्रॉफिट फक्त आय लायनर आणि लिपस्टिक मुळेच होते. त्यांचे इतर ब्युटी प्रोडक्ट विशेष विकले जात नाहीत.
<<<लॉरिएचा १० बिलिअन डॉलर आणि ग्रोथ १२% आहे. >>>लॉरिए चे मार्केट कॅप २०११ ला लॉस मध्ये गेले होते. चेक द फिगर.
<<बाकी लोपामुद्रा, गार्गी आणि उभया भारती मेकप करत न्हवत्या हे कसं समजलं?>> त्या करत होत्या हे तुम्हाला कसं कळलं असाही युक्तिवाद होउ शकतो. त्या वेळी लॅक्मे आणि लॉरिए नव्हते, so let us give them a benefit of doubt.
हॉलिवूडच्या एका तारकेने, मला नाव आठवत नाही, अँटी मेकअप मुवमेंट सुरु केली होती. आपल्याकडे पण नंदिता दास, स्वरा भास्कर, कंगना राणावत अशा अनेक तारका मेकअप करत नाहीत. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन नी मेकअप केलेलं कधी दिसलं नाही. चार दिवसांपूर्वी चेस ग्रँड मास्टर प्रज्ञानानंदच्या आईचा फोटो अनेक वृत्तपत्रात छापला होता. तिने मेकअप केलेला दिसला नाही.
चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग झाले तेंव्हा इस्रो मधल्या शास्त्रज्ञ महिला मेकअप केलेल्या दिसल्या नाहीत.
...
>>>>>>> इस्रो मधल्या
>>>>>>> इस्रो मधल्या शास्त्रज्ञ महिला मेकअप केलेल्या दिसल्या नाहीत.
केवढी युवा पिढी टिव्हीवरती दिसत होती त्यातझी महीलांची उपस्थिती जाणवण्याइतकी सख्याबलाने प्रबळ होती. किती जणींनी साडी नेसलेली होती. मेक अप केलेला होता. मोदी सकाळी सकाळी ७:३० ला बोलले त्यांच्याशी तेव्हाही काय मस्त आवरुन, फ्रेश क्राऊड आलेला होता. मला तरी कौतुक वाटले.
हे वाक्य २०११-१२ साली म्हंटले
हे वाक्य २०११-१२ साली म्हंटले आहे>> मग २०११ आणि २०१२ चे आकडे शोधुन हवेत का तुम्हाला? तर ते देतो. बाकी हे २०११ गोष्टीत तर नाही कुठे? हे कुठुन आलं? एक ऑब्जेक्शन घेतलं की नवी डीटेल्स द्यायची ही पूर्वी एका आयडीची शैली होती. तुमचा काही संबंध नाही ना?
>> २०११ ते २०२३ पर्यन्त अख्खी पिढी बदलते. लोकसंख्या वाढते. बायकांची संख्या वाढते. आपण छान दिसावे असे वाटणाऱ्या बायकांची संख्या वाढते. >> नाव आय एम टोटली कन्फ्युज्ड! ताई तुम्ही दोन वाक्यांत परस्पर टोकाची विरोधी मत लिहिताय लक्षात येतंय का तुमच्या?
>>लॅक्मेचे प्रॉफिट फक्त आय लायनर आणि लिपस्टिक मुळेच होते. त्यांचे इतर ब्युटी प्रोडक्ट विशेष विकले जात नाहीत.>> अहो एकतर मी प्रॉफिट नाही रेव्हेन्यू बद्दल बोलतोय. आणि रेव्हेन्यू (आणि तुम्हाला प्रॉफिट काढायचा असेल तर तो) कशातून येतो हे महत्त्वाचं आहे का??? अॅमेझॉनचा क्लाऊड बिझनेस सोडला तर त्यांचे सगळे इतर उद्योग तोट्यात आहेत, मायक्रोसॉफ्टचं असंच काही आहे, आपल्या रिलायन्सचं ही फार वेगळं नसेल... पण म्हणून अॅमॅझॉनला डब्यातच टाकायचं का? आता प्लीज अॅमेझॉन कसं ग्लोबल वॉर्मिंग करतंय आणि आपणं त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे असं काही टॅन्जंट लिहू नका.
२०११ ला लॉरिए गेला असेल लॉस मध्ये. २०२३ ला समजा प्रॉफिट मध्ये आला असेल. तर तुमची २०११ ची मेकप बद्दलची मत २०२३ ला बदलली असं मी समजू का? तुम्ही लेख २०२३ ला पब्लिश केलात तर तुमच्या बदललेल्या मतांचा प्लीज उल्लेख करता का?
लोपामुद्रा बद्दलचा दावा तुम्ही केलाय मी नाही. त्यांच्या बद्दलचं तुमचं वाचन तोकडं पडत असेल तर ते तुम्ही करायचं मी नाही. आणि तेव्हा लॅक्मे आणि लॉरिए न्हवते म्हणून त्या मेकप करत न्हवत्या असा बेनिफिट ऑफ डाऊट देऊ असं विधान तुम्ही विनोदाने करताय का कसं कल्पना नाही. पण तसं नसेल आणि तुम्ही खरंच तसं म्हणत असाल तर आय रेस्ट माय केस!
कंगना मेकप करत नाही आणि इस्त्रो मधलं कोणी मेकप करत नाही... हे अर्थात परत तुम्हाला कसं कळलं विचारणं वेडवळपणाचं आहे तरी मी ते विचारणारच आहे... असं मानून चाललं तरी त्यातुन नक्की काय सिद्ध होतं?
तुमचे प्रतिसाद बघता तुमचा प्रॉब्लेम स्त्रियांनी मेकप करणे (त्यातही लॅक्मे आणि लॉरिएचा मेकप करणे) हे मागास लक्षण आहे ह्याची प्रसिद्धी आहे असं आता मला वाटू लागलंय. नवर्याचे अत्याचार हा मूळ मुद्दा असेल तर त्याच्यावरचा फोकस प्लीज ढळू देऊ नका. तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मेकप करणे न करणे या बद्दलची तुमची मतं प्रोर ग्राऊंडला येऊन मूळ मुद्दा मागची खुर्ची घेत आहे. हे लक्षात घ्या.
I am really sorry रेवती पण
I am really sorry रेवती पण तुमचा कथा नायक मेकअप न करणाऱ्या स्त्री ला जज करतोय आणि तुम्ही/ नायिका मेकअप करणाऱ्या.
जर तो चुकीचा असेल तर ती ही तितकी च चुकीची आहे.
मेकअप करणारी प्रत्येक व्यक्ती कोणा ना कोणाला आकर्षित करण्या साठी च मेकअप करते असं म्हणायचं आहे का? तसं म्हणायचं असेल तर मी म्हणेन समाज व्यवस्थेचा थोडा अभ्यास करा आणि आपला परीघ वाढवा.
राहिली गोष्ट एखाद्याला एखादी गोष्ट आवडणे आणि न आवडणे तर काही गोष्टींची उदाहरणार्थ ढेकर, पाद, नाक शिंकरणे इत्यादी गोष्टींची किळस वाटू शकते आणि हे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे एखाद्याला अशी किळस वाटा असेल तर त्याने त्या माणसासमोर हे करू नये अशी आपल्या पार्टनर कडून अपेक्षा ठेवणे अतिशय च नॉर्मल आहे. त्याला किळस वाटते तरी मी त्याच्या समोर च करणार हे त्या बिचाऱ्यासाठी अब्युज झालं
जर हीचा नवरा तिच्यासमोर नाकात बोट घालत , छाती वरचे केस कराकरा खाजवत पाय पसरून बसला असता तर तिने ' असं नको रे करुस, मला आवडत नाही, बदल तुझी सवय' म्हणलं नसतं का?
बाकी अब्युसिव रेलेशनशीप मधून बाहेर पडलेच पाहिजे हे सगळेच म्हणत आहेत आणि ते खरेच आहे.
काही गोष्टींची उदाहरणार्थ
काही गोष्टींची उदाहरणार्थ ढेकर, पाद, नाक शिंकरणे इत्यादी गोष्टींची किळस वाटू शकते आणि हे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे एखाद्याला अशी किळस वाटा असेल तर त्याने त्या माणसासमोर हे करू नये अशी आपल्या पार्टनर कडून अपेक्षा ठेवणे अतिशय च नॉर्मल आहे. त्याला किळस वाटते तरी मी त्याच्या समोर च करणार हे त्या बिचाऱ्यासाठी अब्युज झालं
जर हीचा नवरा तिच्यासमोर नाकात बोट घालत , छाती वरचे केस कराकरा खाजवत पाय पसरून बसला असता तर तिने ' असं नको रे करुस, मला आवडत नाही, बदल तुझी सवय' म्हणलं नसतं का?
>> रीया +1
मला हेच सांगायचे होते... रीया ने छान समजावून सांगितले आहे...
त्यांना बघितलं की सोनागाछीतून
बाकी अब्युसिव रेलेशनशीप मधून बाहेर पडलेच पाहिजे हे सगळेच म्हणत आहेत आणि ते खरेच आहे.+१
रीया आणि स्वातीताईंचे प्रतिसाद पर्फेक्ट आहेत. या कथेचं शीर्षकही 'थप्पड' हवं होतं, लॉरिएल नाही. मला अमितचंही पटलं. कथेचा आणि प्रतिसादांचा टोन शोषणाविरुद्ध असण्याऐवजी मेकपविरुद्ध आहे. जे झेपत नाहीये.
हिमांशू एकमूर्ख असेल तर हीना
हिमांशू एकमूर्ख असेल तर हीना दशमूर्ख आहे.
बाकी अब्युसिव रेलेशनशीप मधून बाहेर पडलेच पाहिजे हे सगळेच म्हणत आहेत
>>+ 1
सुटला बिचारा हिमांशु...
>>>>>>>पंडित, पुरोहित,
>>>>>>>पंडित, पुरोहित, शास्त्री, दीक्षित, भागवत, जोशी, उपाध्ये, व्यास, दोशी,दास, लाहिरी , सन्याल, गर्ग, श्रीमाळी, महापात्रा, सत्पथी, सामंत्ता, पांडे, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, दुबे, मिश्रा,पाठक,गोस्वामी, बारूआ, सर्मा, आचारीगळू, अय्यर, अय्यंगार, भट, हेगडे,राव, नंबुद्री, उन्नी आणि तथाकथित पँन इंडिया हाय कास्ट हाय क्लास मंडळीना इतकी आवडली की बुरखाच काय, बायकांना घरातच कोंडून ठेवायला सुरुवात केली त्यांनी.
आणि ही आडनावे नसलेले लोक चणे खात बघत राहीले? की चणे खात ब्रेक विंड करत राहीले
माफ करा रेवती, पण या आडनावांचा संदर्भ कळला नाही
>>काही गोष्टींची उदाहरणार्थ
>>काही गोष्टींची उदाहरणार्थ ढेकर, पाद, नाक शिंकरणे इत्यादी गोष्टींची किळस वाटू शकते आणि हे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे एखाद्याला अशी किळस वाटा असेल तर त्याने त्या माणसासमोर हे करू नये अशी आपल्या पार्टनर कडून अपेक्षा ठेवणे अतिशय च नॉर्मल आहे. त्याला किळस वाटते तरी मी त्याच्या समोर च करणार हे त्या बिचाऱ्यासाठी अब्युज झालं
जर हीचा नवरा तिच्यासमोर नाकात बोट घालत , छाती वरचे केस कराकरा खाजवत पाय पसरून बसला असता तर तिने ' असं नको रे करुस, मला आवडत नाही, बदल तुझी सवय' म्हणलं नसतं का?
>>
रीया, छान शब्दात मुद्दा मांडलास. मला हे असे लिहायला जमत नव्हते.
चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग झाले तेंव्हा इस्रो मधल्या शास्त्रज्ञ महिला मेकअप केलेल्या दिसल्या नाहीत. >> तो त्यांचा चॉईस असेल ना! कदाचित तिथला ड्रेसकोडही असू शकतो.
अॅब्युझ बद्दल बोलायचे तर पत्नी मेकअप करते म्हणून तिच्यावर संशय घेणारे , अॅब्युझिव नवरे असतात की! इथे स्त्री छळ टाळायला म्हणून मेकअप करणे थांबवते. थोडक्यात ती मेकअप करत नाही कारण ती पिडीत आहे.
अजून एक मेकअप म्हणजे फिजीकल अॅब्युझच्या खूणा मिटवायला केलेला मेकअप. हा मेकअप भीती आणि लाज या कारणास्तव केला जातो. इथेही स्त्री पिडीत आहे.
मेकअप करणे काय किंवा मेकअप न करणे हा त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असावा. मेकअप न करणे म्हणजे काहीतरी होलीअर दॅन दाऊ असा अॅप्रोच कशासाठी?
असिस्टेड लिविंग फॅसिलीटी , नर्सिंग होम इथे रहाणार्यां स्त्रीयांसाठी मेकअप थेरपीचा भाग म्हणून वापरतात. इतर दुर्धर आजारांशी सामना करणार्या स्त्रीयांसाठीही त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी, आनंदी वाटावे म्हणून मेकअपसह खास पँपरिंग सेशन्स असतात. मेकअप कडे प्लीज इतक्या तुच्छतेने नका बघू.
मी स्वतः काजळ घालूनच झोपते
मी स्वतः काजळ घालूनच झोपते आणि २४ तास काजळ लावते. तसे केले नाही तर चेहरा माझा मला बघवत नाही. लिटरली आय कॅनॉट फेस वर्ल्ड विदाऊट माय 'आय लायनर'' आंघोळ केली की मॉइश्चरायझर व काजळ हे रिच्युअल आहे. असो.
रीया छान प्रतिसाद
रीया छान प्रतिसाद
बाई दवे,
कथेतील नायिका इच्छा नसताना मेकअप करावे लागत असल्याने त्रस्त आहे. त्यामुळे तिचा मेकअप वर राग असणे स्वाभाविक आहे.
कथेच्या दृष्टीने हे पटनेबल आहे
अजून एक म्हणजे पुरुषाला
अजून एक म्हणजे पुरुषाला आकर्षित करायला मेकअप हे आपण वर्षानुवर्षे चित्रपटात बघत आलोय.
KKHH मध्ये अंजली मेक अप करत नव्हती तर शाहरूख ढुंकूनही बघत नव्हता. जेव्हा करू लागली तेव्हा आपली त्याच नावाची पोरगी आहे हे विसरून बघू लागला.
मैं हु ना चित्रपटात सुद्धा सेम असाच सीन झायेद खान आणि अमृता राव मध्ये दाखवला आहे..
मेकओवर करायला मेकअप गरजेचा आहे आणि तो केल्यावर आपल्या स्वप्नातील राजकुमार मिळतो हे चित्रपटात दाखवलेले आपल्याला प्रेक्षक म्हणून लगेच पटते..
झोपत जा रे.. तब्येतीला बरे
झोपत जा रे.. तब्येतीला बरे असते...
धाग्यात शाहरुख ला घुसवायला वेळ तरी बघा...
ऋन्मेष, त्याकाळचे चित्रपट महा
ऋन्मेष, त्याकाळचे चित्रपट महा मूर्ख कॅटेगरी मधे होते हे आम्ही मान्य करतोच आहोत. ते सिनेमे होते, बरोबर होते का नाही हा वेगळा मुद्दा.
Darlings चा दाखला देऊन प्रेमाने केलेली मारहाण बरोबर असं म्हणू शकतो का आपण?
त्याकाळचे चित्रपट महा मूर्ख
त्याकाळचे चित्रपट महा मूर्ख कॅटेगरी मधे होते
>>>
चित्रपट समाजाचा आरसा असतात.
जर हिरोने गुंडांना मारून हिरोईन पटवली हे तेव्हा लोकांना पटायचे तर लोकांचे विचार तसेच होते हे मान्य करायला हरकत नसावी.
Darlings चा दाखला देऊन प्रेमाने केलेली मारहाण बरोबर असं म्हणू शकतो का आपण?
>>>>
गल्लत होत आहे.
darling मध्ये त्याचे समर्थन केले नव्हते.
त्याचे समर्थन केले असते आणि पब्लिकला ते पटले असते तर असे म्हणता आले असते.
झोपत जा रे.. तब्येतीला बरे
झोपत जा रे.. तब्येतीला बरे असते...
>>
हो, झोपायला जात आहे. त्या आधी जरा डोक्यातले विचार इथे टाकून डोके हलके करतोय. झोप छान लागते.
धाग्यात शाहरुख ला घुसवायला वेळ तरी बघा...
>>>
शाहरूख मनात आहे. तो स्थळ काळ वेळ बघून बाहेर येतं नाही.
सरसकटीकरण दोन्ही बाजूने होऊ नये इतकेच वर म्हणायचे होते. बाकी मुद्दे पटले आहेतच.
शुभरात्री
घ्या! आमच्या लहानपणी बॅट
घ्या! आमच्या लहानपणी बॅट ज्याची असेल त्याला दोनदा आऊट असं असायचं. ऋन्म्या बॅट बॉल कोणाची का असेना आपल्याच धापवट्टीवर रनप घेत आपल्यालाच बॉल टाकतो आणि आपणचं अंपायर बनून सिक्सर देतो आणि वर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊन चार अनुभवाचे बोल पण सांगतो. रिया आता भोआकफ! आम्हाला वाटलं जरा पॉपकॉर्न मिळतील तर कस्चंकाय!
रीया यांचा प्रतिसाद पटला.
रीया यांचा प्रतिसाद पटला.
अमित, मी नाही बाबा वाटेला
अमित, मी नाही बाबा वाटेला जाणार. मला कामं पण असतात आणि झोप पण येते रात्री
तर लोकांचे विचार तसेच होते हे
तर लोकांचे विचार तसेच होते हे मान्य करायला हरकत नसावी.
>
ओके, तुझं बरोबर!
अरे पण मेकअप वरची मते हा या
अरे पण मेकअप वरची मते हा या ष्टोरीतील मेन प्रॉब्लेम नाही. "गाल सुजवून" हा आहे आणि तिने त्याच्याबरोबर न राहायला तेवढे बास आहे. वास्तविक तिच्या घरची चर्चा सुद्धा त्याबद्दल न होता मेकअप बद्दल झाली हे मला विनोदी वाटले. तिने मेकअप केव्हा करावा व त्याने कोठे बॅड हायजिन कंट्रोल करावे वगैरे असले मतभेद शेकडो घरांमधे होत असतील. पण असल्या फुटकळ वादातून गाल बिल सुजत असेल तर तिने जमल्यास एकतर त्याचा विशिष्ठ अवयव सुजवावा नाहीतर स्वतंत्र व्हावे
बाकी मेकअप बद्दलही जनरलायझेशन झाले आहे हे बरोबर.
वास्तविक तिच्या घरची चर्चा

Pages