Submitted by च्रप्स on 20 August, 2023 - 10:15
फॉल सुरु म्हणजे शाळा सुरु... रोज रोज मुलांना डब्यात काय देताय आणि काय देता येईल हा मोठा प्रश्न पडतोय...
इथे चर्चा करूया? असा मुलांच्या लंच बॉक्स साठी डेडिकेटेड धागा आधीच असेल तर हा उडवूया...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता बॅक टु स्कुल भागात भरपूर
आता बॅक टु स्कुल भागात भरपूर मिळतील अन्न गार, गरम रहाणारे डबे. काही लन्च बॅग्सखाली एक चपटा झिपर पॉकेट असतो, त्यात तो रीयुजेबल आइस स्लॅब ठेवला तरी पुरे होतं.
बाकी, आमच्या इथल्या पब्लिक स्कुल्समध्ये खूप उकडतं अशी नेहमीची तक्रार आहे त्यामुळे शाळेतल्या नसलेल्या एसीवर अजिबात भरवसा ठेवता येत नाही डबा देताना.
आभा, छोट्या मेम्ब्राला दही आवडत असेल तर योगर्ट पार्फे करून देऊ शकता स्नॅक डब्यात.
गवारी,मेथी ची भाजी, चवळी, माट
गवारी,मेथी ची भाजी, चवळी, माट ह्या पालेभाज्या, .
फ्रेश beans, , विविध डाळी, कड धान्य, .
दोडका,तोंडली, दुधी भोपळा, भेंडी, .इत्यादी
ज्वारी,बाजरी,ची भाकरी .
विविध फळ
सर्व पोष्टिक पदार्थ मुलांच्या आहारातून हद्द पार च केले आहेत
आधुनिक पालकांनी.
सायोतै, दही आवडतं ना. रेसिपी
सायोतै, दही आवडतं ना. रेसिपी द्या. शिवाय त्याची लस्सी ना होता ते त्याच फॉर्म मध्ये कसा राहील त्याची युक्ती पण
आभा, मी नाही, सिंडरेलाने
आभा, मी नाही, सिंडरेलाने लिहिलंय दही पोस्ट.
आभा, ग्रीक योगर्ट वापरले तर
आभा, ग्रीक योगर्ट वापरले तर लस्सी नाही होणार किंवा आपले दही जरा कॉफी फिल्टरवर पाणी निथळून घेवून वापरायचे. खाली दही आणि वरच्या भागात टॉपिंग्ज ठेवता येइल असे डबे मिळतात.
डब्यात चिकन घेऊन जाण्याच्या
डब्यात चिकन घेऊन जाण्याच्या टीप्स साठी thank you सगळ्यांना.
फ्रीझिंग पॅकेट्स मुल लहान असताना वापरलियेत, फळ देताना.
आता जेमतेम एक छोट पॅकेट घेऊन जातात..
तरी आता मला साधारण अंदाज आलाय. Thank
U
मस्त विषय आणि पोस्ट्स.
मस्त विषय आणि पोस्ट्स. अस्मिता यांनी दिलेले डबे नेत्रसुखद तर आहेच पण चविष्ट आणि बऱ्यापैकी हेल्दी देखील दिसताहेत. माबो च्या डबादेवी म्हाळसा यांची अनुपस्थिती इथे जाणवत आहे.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
काल डबाच दिला नाही. कॅफेटेरिआत खा म्हटलं.
आज भाज्या व चिकन घातलेला व्हाईट सॉस पास्ता, दोन गुलाबजाम, चिप्स आणि स्ट्रॉबेरी व ब्लूबेरीज.
ट्यूलिप, सॅलड सादळत असेलच पण ती खाते.
चिकनचे शिजवलेले तुकडे देते.
विकतच्या छोट्या डब्या/ट्यूब दिल्या फ्लेवर्ड दह्याच्या तर काम होईल का आभा? योप्ले किंवा ग्रीक योगर्ट वगैरे.
ब्रेड टोस्ट करुन मेयो + एखादे
ब्रेड टोस्ट करुन मेयो + एखादे डिपिंग सॉस + मस्टर्ड पावडर लाउन, मधे साल्मन, हॅम वगैरे मस्त फिलिंग.
अगदी सोप्पे व पौष्टिक
सो सॉरी सायो, ओह, चष्मा न
सो सॉरी सायो, ओह, चष्मा न लावल्याचा परिणाम.
सिंड्रेला, तु लिही प्लिज कस करतेस ते.
अस्मिता, दह्याच्या छोट्या डब्या मिळतात इकडे पण एकदा ती डबी फुटली आणि राडा झाला पिशवीत तेंव्हापासुन त्या डब्यांना नको म्हणते लेक.
स्वाती2, तो ते डबे विसरले होते आता परत विचारुन बघते एकदा.
शाळेत दर वेळेला क्लासरूम बदलायची असते सो तिला खुप बॅग्स / डबे पण नको असतात.
तरी ह्या चर्चेमधुन थोडा उत्साह आल्याने काल छोट्या डब्यासाठी केक केलाय. मखाणे पण तरी करेन उद्या एफ्रा मध्ये. बघुयात.
Hemant 313 - बरेच मुद्दे आहेत म्हणुन डबा तुझ्या आवडीचा आणि जेवण मी करीन ते असा सुवर्णमध्य काढला आहे. जो अजुन तरी टिकलाय. पुढचं पुढे.
आप्पे चटणी
आप्पे, खोबरे चटणी
चणा उसळ
डाळ भात
सफरचंद
आजचा लंच - बथुआ (चंदनबटवा)
आजचा लंच - बथुआ (चंदनबटवा) पराठे, संत्रे, मनुका
Hemant 313>>>
एकतर भारताबाहेर राहणार्या सर्वांना या भाज्या मिळतात असे नाही. भारतातही नेहमी मिळत असल्या तरी मला डब्यात दोडकं/गवार/माठाची भाजी दे असं म्हणणारी मुलं माझ्या दृष्टीक्षेपात नाहीत अगदी माझ्या पिढीतलीही.
घरात असताना आपण थोडे तरी एन्करेज/एन्फोर्स करू शकतो पण पूर्ण डबाच न खाण्याचा प्रश्न येतो तेव्हा आभा म्हणतात तसा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला जातो. पालेभाज्या आवडीने न खाणारी मुलं लेट्युस/रॉकेट वगैरे सॅलडस् खातात तर त्यात वाईट काय?
बाकी हा लंच शेअर करण्याचा उद्देशच मुळात इतरांच्या चांगल्या गोष्टी पाहून मुलांचे आहारघटक वाढवणे हाच आहे ना?
अहो च्रप्स, ह्या सर्व भाज्या
अहो च्रप्स, ह्या सर्व भाज्या चांगल्या प्रीपेयरेशन पद्धतींनी बनवून घरी खाऊ घालतो आम्ही आधुनिक माता. काही काळजी करू नका. डब्यात मुलांना स्वत:हून रस वाटेल असे पौष्टिक पदार्थ देणे अपेक्षित आहे ना? मग त्याचीच चर्चा सुरू आहे.
तुम्ही उगाच सगळ्यांत नाखूष असलेले फुफा/ताऊजी बनू नका
हेमंत३३३ हे च्रप्स आहेत हे
हेमंत३३३ हे च्रप्स आहेत हे आजच समजले
घरी खाऊ घालतो आम्ही आधुनिक
घरी खाऊ घालतो आम्ही आधुनिक माता
>>>>
मुलांना खाऊ घालणें ही मातांची मक्तेदारी नाहीये. पिता सुद्धा त्यात सामील असतात...
अगदीच रहावले नाही म्हणून.. विषयांतर नको
आज व्हेज पुलाव. भरपूर भाज्या
आज व्हेज पुलाव. भरपूर भाज्या फ्लावर गाजर बीन्स, बुंदी रायता. आम्रखंड दोन तीन चमचे. एक केळे एक पेरू द्राक्षे. चरायला लाह्या व ताक.
हेमंत३३३ हे च्रप्स आहेत हे
हेमंत३३३ हे च्रप्स आहेत हे आजच समजले
>>>आवरा ...
आजचा मेन्यू-
नूडल्स + ब्रोकोली ,कॅरेट स्टर फ्राई करून,
गार्लिक ब्रेड
सफरचंद
दूध ( horizon चे छोटे पॅक मिळतात- फ्रुटी साईझ)
स्नॅक्स- चीज टॅको छोटा.
शेवटचा बस स्टॉप असल्याने
शेवटचा बस स्टॉप असल्याने भरपूर वेळ मिळतोय... तोच रिलीफ... 7.20 / 7.25 ला बस येते...
पाच घरे सोडून एक स्टॉप साइन आहे- त्यापलीकडे बस एलिजिबल नाही- आम्हाला आहे - भारी ना
काही खूप खूप जुने फोटो
काही खूप खूप जुने फोटो
आजचा डबा - राजमा चावल, ड्रॅगन
आजचा डबा - राजमा चावल, ड्रॅगन फ्रुट
सर्वांचे डबे पाहून मस्त वाटलं
सर्वांचे डबे पाहून मस्त वाटलं.
Sneha तुमचं अगदी कौतुकच
Sneha तुमचं अगदी कौतुकच म्हणायला लागेल, सकाळी घाईच्या वेळेत इतकी कलाकुसर करून डबे देता म्हणजे...
की फक्त फोटो पुरत.. छान दिसतायत पण
छानच कलाकुसर आहे. पण हे
छानच कलाकुसर आहे. पण हे पोटभरीचे होते का बाळा ला? भूक भागली नाहीतर चिड चिड करतात बारके.
मी आज भेंडीची भाजी, काकडी कोशिंबीर, दोन पोळी. पोळी करतानाच उरलेली कोथिंबीर थोडा ओवा घातला. दोन गुलाब जांबू साखर लावलेले.
फळे एक पेरू , द्राक्षे, एक बारके अॅपल.
चरायला आलू भुजिया/ ताक.
स्नेहा कौतुक आहे.
स्नेहा कौतुक आहे.
किती गोड आहेत पदार्थ डब्यातले
किती गोड आहेत पदार्थ डब्यातले.. स्नेहा
स्नेहा फारच छान खाऊ
स्नेहा फारच छान खाऊ
आज
आज
चिकन स्लायडर
पेन्ने पास्ता
स्ट्रॉबेरी
ग्रेप्स
मिल्क
स्नॅक्स- चिकन नगेट्स....
स्नेहाचे डबे बघून म्हाळसा चे
स्नेहाचे डबे बघून म्हाळसा चे डबे आठवले. हल्ली दिसली नाही बरेच दिसात.
स्नेहा, तुला खूप thanks.
स्नेहा, तुला खूप thanks.
मी वापरेन या आयडीया आता.
अमांचा प्रश्न माझ्याकडून ही. पुरतं का मुलांना एवढं? मला quantity किती द्यायची ते कळत नाहीये अजिबात.
पिल्लं छोटी असतील, 3 तासाच्या
पिल्लं छोटी असतील, 3 तासाच्या खेळ शाळेत तर पुरेल की. मग घरी येऊन जेवतात मुलं. त्या शाळेत डबा खाणे ह्यापेक्षा स्वतःच्या हाताने खाणे, चोरस आहार खाणे, सगळं संपविणे हे शिक्षण आहे. त्यासाठी असे गोंडस पण चौरस डबे एक नंबर आहेत.
रिया माझा सल्ला, आधी थोडा जास्त डबा दे. उरला तर का ते एकदा बोलून घे आणि मग ठरव किती क्वांटिटी द्यायची ते . शिवाय शाळा किती वेळ आहे, P E किंवा एक्सट्रा खेळ आहे का? स्टे बॅक आहे का? ह्यावर पण आमची डब्याची क्वांटिटी आणि प्रोटीन पोर्शन ठरतो. खेळांच्या दिवशी डब्यात प्रोटीन नक्की असतं.
एक प्रकारे काईझेन मेथडच वापारायची आहे.
आभा,
आभा,
शिवाय शाळा किती वेळ आहे, P E किंवा एक्सट्रा खेळ आहे का? स्टे बॅक आहे का?
>>
सकाळी ९ ते ११ extra hours आहेत. ११ ते १२ लंच ब्रेक आणि मग १२ ते ३.३० शाळा. म्हणजे ८.३० ला निघून ४ ला परत येणार.
(अतिशय अवांतर पण साडे चार वर्षाला हे तास जास्त वाटतायेत का?)
मी ब्रेकफास्ट करून पाठवेन आणि २ डबे देईन. लंच box आणि स्नॅक्स चा डबा. आल्यावर पुन्हा छोटं मोठं snacks / fruit असं काही देईन.
माझा सल्ला आहे कि दोन डबे
माझा सल्ला आहे कि दोन डबे द्या. एक खाऊचा आणि एक लंच. लंचमध्ये शक्यतो कार्ब्स, भाज्या आणि प्रोटिन्सचा बॅलन्स, जस मेथी पराठा दिला तर दही / चीज / हमस, व्हेज पुलाव / भात दिला नगेट्स / सोया चंक्स / टोफू / पनीर असं दे. आवडत असेल तर अंड दे आमच्याकडे अंड ब्रेफाला असतं बरेचदा त्यामुळे मी डब्यात रिपीट नाही करत शक्यतो.
घरी आल्यानंतर आयदर स्नॅक्स किंवा जेवण. पोळी भाजी आधी आणि भात आपल्याबरोबर असा काहीतरी. मुलं थोडी मोठी झाली कि स्नॅक्सच मागतात शाळेतून आल्यानंतर मग कधी अप्पे, डोसे, इडली, धिरडी, थालीपीठ, सँडविच, केक, कॉर्नफ्लॉक्स, मॅगी असं काहीतरी देते मी.
वेळ + आवड + उत्साह असेल तर जपानी बेन्टोचे विडिओ बघ. जेवणात 5 रंग असावेत अस त्याचं प्रिन्सिपल आहे. खुप सोपी, गोड आणि बॅलन्सड मील्स असतात. शेवटी लहान वयात आवडीने सगळं खायची सवय लागण महत्वाचं. थोडं मुलांच्या कलाने घेउन गाडी पुढे सरकावयाची. बाकी 19/20तो होता है. हे दिवस परत येत नाहीत सो आत्ता जमेल तितकं मुलांबरोबर एन्जॉय कर!
आणि हो मी म्हणाले आहे आधी थोडं जास्त दे, पण अगदी ओव्हरव्हेलम होईल इतकं जास्त पण नको देऊस. मुलांवर / शाळेच्या नियमांवरवर पण क्वांटिटी ठरवावी लागेल. पण येईल 1/2 आठवड्यात अंदाज. डोन्ट वरी.
प्रेमळ माता मोड ऑफ.
मटर-पनीर बटर मसाला , कॉईन
मटर-पनीर बटर मसाला , कॉईन परोटा.
पुदिना मुरूक्कू (चकली)
यम, यम डबा, मृ .
यम, यम डबा, मृ .
छान तपशीलवार पोस्ट, आभा.
रास्पबेरीज, कोकोनट फेरेरो रोशे (चॉकलेट), चिकन वॉलनट रेझिन ग्रीन सॅलड, हल्दीराम शेंगदाणे आणि क्रुटॉन्स.
तुमचे डबे भन्नाट आहेत
तुमचे डबे भन्नाट आहेत
आमचा डबा विशेष फोटो योग्य नसतो
घाईत जे 3 डबे सापडतील त्यात घाईत पोळीभाजी, एक स्नॅक्स कोंबून घाईत पिशवीत कोंबणे.
थॅन्क्स सगळ्यांना.
थॅन्क्स सगळ्यांना.
मी आधी म्हटले तसे खूप जुने फोटो आहेत, लेक एलिमेंटरी मधे असतानाचे. तेव्हा ती डबा न खाता आणायची, चांगलीच पिकी असल्याने. तिने खावे म्हणून असल्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि फार काही कठीण नाही ते. मायकेल्स मधे १०० कुकी कटर्स चा सेट मिळाला होता, त्यानेच सॅन्डविच करायचे किंवा पराठा. नवर्याला तोच पराठा डब्यामधे न कापता द्यायचा
ह्या कुकी कटर्स ने बाकी पण प्रकार करता येतात, जसे मऊ उपमा करायचा आणि मग त्याला हार्ट वगैरेचा आकार द्यायचा.
लहान मुलांना पुरेसे होईल. तसेही माझी लेक खात नसल्यामुळे something is better than nothing असे व्हायचे.
छ्न्दीफंदी, फक्त फोटोपुरते नव्हते हो हे!
अजून काही:
अजून काही:
अनु घाईघाई
अनु घाईघाई
थँक्स अस्मिता..
स्नेहा क्रिएटिव्ह स्नैक्स.. माझ्या लेकिला तर फार आवडेल असं काही केलेलं..
इतरांचे मेनू छान वाटतात वाचायला पण काही कळत नाही कोणता पदार्थ असावा तो..
हे पण फोटो मस्त आहेत. लोक्स
हे पण फोटो मस्त आहेत. लोक्स अजय चोप्रा, अनुराधा तांबोळकर, मधुराज रेसीपी ह्या चॅनेल्स वर ह्यांनी मुलांच्या डब्यासाठी सीरीज केलेल्या आहेत बघुन घ्या. मला पण उपयोग होतो. चांगले पदार्थ आहेत. मधुराचे तर इतर टिप्स पण छान आहेत. तिचा उत्साह बघोन मस्त वाटते. काही भागात चिल्ली पिल्ली पण आहेत. व आठ दिवसांचे डब्याचे प्लानिन्ग पण आहे. विश्णू मनोहर चॅनेल वर पण आहेत टिफिन; रेसीपीज पण दोज आर मोअर फॉर ऑफिस पीप्स.
काल मजा झाली. मी नेहमी बंगल्यात माझ्या ऑफिसात जायच्या आधी. आमचे एक कार्पोरेट चहा पाणी स्टेशन आहे तिथून पाणी भरून नेते.
तर तिथे पाणी भरून घ्यायला गेले. चार लोक्स पण भेटतात. पाणी भरु लागले तर तरुण बालके म्हटली पाणी हे घेउ नका त्यात पार्टिकुलेट मॅटर आहे!!! ( केमिकल कंपनी हाय सायन्स टाइप्स) बघितले तर होते खरे. ( मी ड्युक्स नोज च्या ट्रेकमध्ये एकेकाळी डोंगरावरचे खड्ड्यातले पावसाचे पाणी पण प्यायले आहे पण ते ह्या बालकांना कुठे सांगा!) तर त्यांनी आपुलकीने सांगितले की हे पाणी घेउ नका आमी तो कं टेनरच रिप्लेस करायला सांगतो. लिहायचे तात्पर्य की खाण्या बरोबरच मुलांना भरपूर व स्वच्छ प्यायचे पाणी लागेल. ज्युस ताक दूध टेट्रा पॅक व लीक न होणारी चांगली वॉटरबॅग पण गर्जेची आहे.
ह्यापी वीकेंड. आज घरीच ब्रंचः चीज आमले ट, एक पाव, फ्रूट्स, एक पटेटो रोस्टेड, ऑरेंज ज्युस. ( खाताना ऑफिसतून फोन आलाच.)
भारतातही नेहमी मिळत असल्या
भारतातही नेहमी मिळत असल्या तरी मला डब्यात दोडकं/गवार/माठाची भाजी दे असं म्हणणारी मुलं माझ्या दृष्टीक्षेपात नाहीत अगदी माझ्या पिढीतलीही.>> मुलं म्हणत नाहीत "पोळी भाजी द्या" असं, पण त्यांना ह्या भाज्या खाण्याचं महत्व नीट समजावून सांगितलं तर ती अठवड्यातले २-३ दिवस तरी पोळी भाजी डब्यात नेतात आणि खातात. माझी मुलगी अठवड्याचे ५ ही दिवस डब्यात पोळी भाजी नेते. 'रोज डबा काय करू?' या साठी मला माझी कल्पनाशक्ती वापरावी लागत नाही. पोळी भाजी गार झाली तरी खाणेबल असते असं माझं observation आहे. त्यामुळे मुलीचं overall junk food intake सुद्धा control मधे रहातो.
तिच्या ह्या समजूतदार पणाचे reward म्हणून रात्रीच्या जेवणाला तिच्या आवडीचे पदार्थ करते. ते तिला गरम गरम वाढता येतात. पावभाजी, पास्ता, डोसे, थालीपीठ, भाताचे प्रकार, सूप्स असे पदार्थ रात्री करता येतात.
Soha, काही पब्लिक उलटं करत
Soha, काही पब्लिक उलटं करत असेल. लंच ला मुलांना आवडेल ते आणि घरी गरजेचे आहे ते. तसंही रात्री unhealthy खाणं अजिबात चांगलं नाही.
असो, मुद्दा भरकटवु नका. आयडियाज द्या.
आज -
आज -
साबुदाणा खिचडी
स्टोबेरी
ग्रेप्स
अप्पल ज्यूस
स्नॅक्स- व्हेजी स्ट्रॉ
नेहमी मिळत असल्या तरी मला
नेहमी मिळत असल्या तरी मला डब्यात दोडकं/गवार/माठाची भाजी दे असं म्हणणारी मुलं माझ्या दृष्टीक्षेपात नाहीत अगदी माझ्या पिढीतलीही>>>आहेत,असतात
माझा मुलगा ( साडेपाच वर्ष)उद्या डब्यात भोपळा दे,बरेच दिवसात तोंडली नाही दिली ,आई कारली काय मस्त झालेली असं म्हणतो,आता या काय आवडीने खायच्या भाज्या आहेत का
बाहेरच खाणं पण जास्त मागत नाही,पण तरी सतत आजारी
Wow .. तोंडली कारली ...लकी
Wow .. तोंडली कारली ...लकी आहात... आमची मुले फक्त भेंडी किंवा ब्रोकोली खातात... इतर कोणतीही भाजी कधीच खात नाहीत.. पराठे वगैरे केले भाज्या घालून तेही खात नाहीत...
माझा मुलगा लहान होता तेव्हा
माझा मुलगा लहान होता तेव्हा आजारी पडला की सायन मध्ये प्रसिद्ध बालरोग तज्ञ होते त्यांच्या कडे आम्ही जायचो.
तिथे गेल्यावर डॉक्टर पहिले पालकांना लेक्चर देत, त्यांना वेळ नसेल तर .
रेकॉर्डेड कॅसेट ऐकवली जात असे.
त्यांचे दोन पॉइंट अजून पण लक्षात आहेत..
१) थोडी सर्दी झाली,थोडा ताप आला की लगेच मुलाना औषध देवू नका.
एक दिवस तरी वाट बघा .
शरीर स्वतचं त्या वर मात करेल.
२), मुलाना जेवणासाठी जबरदस्ती करू नका.
हेच दिले तर खाईन, मला हे आवडत नाही
असल्या मुलांच्या धमकोना भीक घालू नका.
एक दिवस उपाशी राहतील दुसऱ्या दिवशी बरोबर जेवतील.
माझ्या मुलांना भाजी आवडत नाही फास्ट फूड आवडते म्हणून आम्ही ते देतो.
ह्याला काही अर्थ नाही.
आहाराच्या चांगल्या सवयी लहान पना पासून असायलाच पाहिजेत.
पास्ता.
पास्ता.
गवार चपाती
पीअर (मराठीत काय म्हणतात)
Pear ला नाशपाती म्हणतात.
Pear ला नाशपाती म्हणतात.
माझ्याही मुलांना लंचसाठी रोज
माझ्याही मुलांना लंचसाठी रोज भाजीपोळीच देते.
नाश्त्यासाठीच्या डब्यात डोसा, इडली, उत्तप्पा, उपमा, शिरा, पॅनकेक, ब्रेडचा चिवडा, मेथी/पालक/आलू पराठा, दलिया उपमा असं काही तरी.
भाज्या दुधीभोपळा, तांबडा भोपळा, दोडके, गवार, पापडी, भेंडी, भोपळी मिरची, तोंडली काचऱ्या, वांगी-बटाटा इत्यादी. अधूनमधून उसळी.
आहेत,असतात
आहेत,असतात
माझा मुलगा ( साडेपाच वर्ष)उद्या डब्यात भोपळा दे,बरेच दिवसात तोंडली नाही दिली ,आई कारली काय मस्त झालेली असं म्हणतो,
>>> टच वूड…
आजचा लंच - बटाट्याच्या काचर्या, चपाती, सफरचंद
माझा मुलगा शाळेत अगदी बारावी
माझा मुलगा शाळेत अगदी बारावी पर्यंत boiled egg, egg omelet, grilled chicken, chicken salami Sandwich, cheese sandwich, आलु पराठा, पनीर पराठा, बीट रुट पुरी, छोले पुरी, केळ ह्यापैकीच डब्यात नेत होता. यात unhealthy काय आहे? पोळी भाजी तर कधीही नेली नाही. पण घरी खायचा. आता होस्टेलला आहे जे मिळत ते खातो आता सो मुलांना आवडेल ते द्या डब्यात. तसेही थोडी मोठी झाली की आपल्याला पाहीजे ते मित्रांच्या डब्यातल किंवा cafeteria तल खातील.
Pages