शाळा सुरु- आज मुलांच्या डब्यात काय आहे

Submitted by च्रप्स on 20 August, 2023 - 10:15

फॉल सुरु म्हणजे शाळा सुरु... रोज रोज मुलांना डब्यात काय देताय आणि काय देता येईल हा मोठा प्रश्न पडतोय...
इथे चर्चा करूया? असा मुलांच्या लंच बॉक्स साठी डेडिकेटेड धागा आधीच असेल तर हा उडवूया...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज राजमा चावल, पेरू व ड्राय फ्रुटस्

डबा दप्तरात भरताना-
बाल कलाकारः राजमा चावल कशाला?
मीः काल कुणाला हवा होता राजमा?
बा. कः पण टीचर अलाव नाही करत.
थक्क मीः टीचर राजमा चावल अलाव नाही करत? पण गेल्या वेळी तर नेला होतास?
बाकः म्हणजे डबा संपला नाही तर टीचर ओरडतात. राजमा चपाती दिली असतीस.

आजचा धडाः घरी व दारी आवडीची कॉंबिनेशन वेगळी असतात. नावडीच्या शक्यता क्वांटम फिजीक्सप्रमाणे बदलतात.

बघू काय होतंय डब्याचं आज…

आजचा अक्खा डबा परत आला.. स्कूल लंच मध्ये बर्गर होता म्हणे मग होम लंच नाहीच उघडला...
घरी आल्यानंतर स्नॅक्स म्हणून संपवण्यात आला मग...

अरे देवा राजमा इथे पण!! मी आज तोंडल्याची भन्नाट भाजी व पोळी, एक राजभोग, अक्रोड अंजीर चाक्या, वेफर्स.

आज ट्रेन मध्ये एक फालतू जोडपे दिसले.
हसावे की रडावे ,की राग व्यक्त करावा तेच कळतं नव्हते
नवरा बायको .त्यांचा दहा वर्षाचा मुलगा.
तो बाप त्या मुलाला ह्या सीट वरून दुसऱ्या सीट वर पण हाताला धरून नेत होता( जसे दोन वर्षाचे लहान मुल आहे)..तंदुरुस्त मुलगा आजारी असण्याची काही लक्षण नाहीत.
बिकानेरी भुजिया तो मूर्ख बाप त्या मुलाला भरवत होता आणि त्या बरोबर कोकाकोला.
हे असले बकवास आई वडील असतील तर तंदुरुस्त पिढी निर्माण च होणार नाही.
तीसी मध्ये च राम नाम सत्य आहे असे ह्या पोरांचे होणार.
आणि त्याला जबाबदार हे बकवास आई वडील च असतात.
चीझ,बटर, डाळी, कड धान्य, मासे,मांस ,फळ, भाज्या सर्व आपल्या पुढच्या पिढी च्या आहारात असले पाहिजे.
रोज नियमित व्यायाम,खेळ, हे पण असेलच पाहिजे.
हल्ली एक च मुल असल्या मुळे पालकांचे प्रेम जास्त च उतू जाते
बकवास लाड करून तुम्ही त्यांचे नुकसान च करत असता

@हेमंत >>> फारच एकांगी विचार नाही का होत आहेत हे? एकदा तुमच्यासमोर फरसाण व सॉफ्ट ड्रिंक दिले म्हणजे आईवडील नेहमीच अनहेल्दी फूड देत असतील कशावरून? त्यांच्याकडचं खाणं संपलं असू शकतं, खराब झालं असू शकतं, घराबाहेर पडल्यावर थोडी मजा करू द्यावी असा विचार असेल.

सर्व रेसिपी उत्तम आहेत ज्या इथे दिल्या आहेत.
माझी कॉमेंट इतक्या रेसिपी शी संबंधित नाही.

पण मी असे अनेक पालक बघितले आहेत जे मुलांचे नुकसान करतात प्रेमाच्या नावा खाली.
मी दहावी गावी गेली.
बोर्ड exam.
आमचे परीक्षा केंद्र आम्हीच शोधले ,आमची बसण्याची जागा आम्हीच शोधली .
पालक कुठेच नव्हते.
११ पुढे मुंबई मध्ये.
१२ वित मुंबई मध्ये बघितले मुलांना कोणते परीक्षा स्थळ मिळाले आहे ते बघायला पालक.
त्यांचे सीट नंबर कोणत्या वर्गात आहे ते शोधायला पालक.
मी तर ते असेच सहज शोधले होते.
मुलाना परीक्षा केंद्रावर सोडायला पालक ,घेवून जायला पालकर.
१२ वी ची पोर .
आपण आपल्याच पोरांना अपंग बनवत आहे ह्याची बिलकुल ह्यांना जाणीव नव्हती.
सुशिक्षित पालक.
पोषण मूल्य अतिशय कमी असणारा आहार मुलाना देण्यात पालक च पुढाकार घेतात.
प्रतेक ठिकाणी असे पालक दिसतात.
माझा नोकरी मधील सोबती १९ वर्ष मुलाचा रेल्वे पास स्वतः काढायचा, त्याचे कॉलेज मधील प्रवेशाला हा उभा, सर्व गोष्टी हा बाप च करणार
व्हयाचा तोच परिणाम झाला मुलगा शिकला पण दुनियादारी,व्यवहारिक ज्ञान झीरो
म्हणून माझी तशी मत आहेत..इथल्या रेसिपी चा माझ्या मताशी काही संबंध नाही.
येथील सर्व breakfast अती उत्तम आहे

Craps, परवाच इथे एका भारतीय पार्टी मध्ये वय वर्ष दीड, वय वर्ष तीन आणि वय वर्ष 7 सोडा (कोक) पीत होते.
हमारे छोक्रा को बिना सोडा खाना हजम नै होता ने म्हणाली त्यांची आई.
असो ते माझं मुल नाही, मला कमेंट करायचा हक्क नाही.

शाळेतून नट दिलेले चालतील म्हणून मेसेज आला.
आज
ब्रेफा - डोसा , दूध
Snacks चे डब्बे द्यायला विसरले आहे हे आत्ता मेन्यू लिहिताना लक्षात आलं. खाईल शाळेत काही तरी
लंच - पालक पुरी, २ बदाम, शेव, फलेरो, काकडी

घरी आल्यावर समोसा देईन दुधा सोबत

चपाती मध रोल
वेज पुलाव
सफरचंद, ड्राय फ्रुट्स.

>>>>>>असो ते माझं मुल नाही, मला कमेंट करायचा हक्क नाही.
अगदी अगदी.
आय हॅव्ह लर्न्ट इट हार्ड वे. जाच्याशी आपला दूरान्वयानेही संबंध नाही त्याबाबतीत, नाक खुपसू नये हे कळण्याकरता, मी जबरदस्त किंमत मोजलेली आहे. दोन वेळा.
एकदा तर इथेच. एकदा बाहेर अन्यत्र.

माझेमन थँक्स..
मुलांना पैक्ड फुड मी शक्यतो देत नाही.. सॉस, जैम वगैरे नको वाटते द्यायला म्हणून मध..
मध मला यावेळी नेमके ओरिजिनल मिळाले..आमच्या सोसायटीतली मोठ्ठाली तीन मधाची पोळी काढली होती तेव्हा दिड किलो घेऊन ठेवलेले...

चोकिंग हजार्ड हे कारण लक्षात आलं नाही माझ्या पण तरी विचारून घेईन की चालेल ना नट्स दिलेले. >>> अहो शाळेनं परवानगी दिली म्हणून चोकिंगचा धोका कमी होत नाही. शाळेला काय विचारायचं आहे, आपणच जरा कॉमन सेन्स वापरावा की.

>>> असो ते माझं मुल नाही, मला कमेंट करायचा हक्क नाही.
असं कॉमेन्ट करून झाल्यावर म्हणायचं म्हणजे… Proud

फोटो टाकायचा कंटाळा
स्नॅक्स : पॅनकेक बाइट्स
द्राक्ष
काकडी + रेड पेपर
लंच : पास्ता
द्राक्ष

सिंडरेला, माझा मुलगा व्यवस्थित नट्स खाऊ शकतो. नाही तर चोकींग काय गोल्ड फिश खाऊन पण होऊ शकतंच. आणि तो वयाने फार लहान ही नाहीये. भारतात मुलं वर्षाची होण्याआधी गाजर हिर्ड्यानी चावून खातात. So I guess parents really knows what their kids can eat. शाळेला विचारायचं कारण म्हणजे मला इथले रुल्स माहीत नाहीत म्हणून. असो!

स्वाती, Proud मी त्या मुलांच्या पालकांना काही म्हणलं नाही असं म्हणते आहे मी. इथे पण बोलायचं नसेल तर पार्टीज ना जायचा उपयोग काय?

माफ करा, मला ते दाण्याच्या कुटाने choking hazard चा धोका कसा असतो कुणी सांगेल का? माझा मुलगा ५ वर्षांचा आहे, मला माहिती नाही म्हणून विचारते आहे

ते मी लिहिले होते बहुतेक. दाण्याच्या कुटाने नव्ह्ते तर आख्ख्या दाण्याने चोकिंग ची भीती. ( खाता येत नाही म्हणून नाही तर कुणाचे लक्ष नसताना चुकून घश्यात अडकल्यामुळे)

शाळेतून नट दिलेले चालतील म्हणून मेसेज आला-- हे वाचून माझ्या डोळ्यासमोर nut bolt वाला नट आणि अभिनेता /नट हे दोन्ही आले.
Next comment वाचल्यावर समजलं अरेच्चा हे तर ते खायचं नट Lol

इडली चटणी
स्वीटकॉर्न उकडून
फ्लावर रस्सा भात
सफरचंद, खजूर.

किल्ली Lol

डोसा चटणी
उकडलेल्या भुईमूग शेंगा
राजमा राईस
पॉपकॉर्न

अहो शाळेनं परवानगी दिली म्हणून चोकिंगचा धोका कमी होत नाही. >>> जरा जनरलायजेशन झालं की. जी मुलं पोळी भाजी खाऊ शकतात त्यांना नट्स ने चोकींग कशाला होईल?

नट्स चोकीन्ग मलाही समजले नाही.. आमच्या इथे असा काही रुल नाहीय... बादवे - मुले mnm किंवा कॅंडी खातात ते पीनट पेक्षा जास्त डेंजर चोकीन्ग हझार्ड असायला पाहिजे मग...

आम्ही तर बुवा आमच्या पंधरा वर्षांच्या मुलालासुद्धा डब्यात द्राक्षं कापून देतो. उगीच एखाद्या पोरीकडे बघता बघता गपकन द्राक्ष गिळायचा आणि नसती आफत ओढवायची!
सुपर एनलायटन्ड पेरंट आहोत आम्ही!

मृ, choking कोणाला ही होऊ शकतं ना. काहीही खाऊन कुठेही होऊ शकतं पण इथे बऱ्याच गोष्टी प्रोसेस वाईज सोप्या नाहीयेत म्हणून काळजी घेतलेली बरी असं मत असतं अनेकांचं. ते चुकीचं ही नाही Happy
मला माझा मुलगा नीट खाईल हे माहीत आहे पण चुकून त्याच्या डब्यातून खावून इतर कोणाला काही झालं तर काय म्हणून मी विचारुन घेतलं. शाळेतून no sharing policy आहे याचं confirmation पण मिळालं आणि तुम्हाला हवं ते द्या याचं पण त्यामुळे I will do what I feel is right to do!

चला पुढे आता लोकांनो Happy बास तो विषय.

आज डब्यात
ब्रेकफास्ट दूध
स्नॅक्स १ - वेफर बिस्कीट
लंच - पोळी वर चटणी लावून चीज टाकून jaraa कुरकुरीत करून दिली. लेक म्हणाला healthy pizza so मी पण तेच नाव देते आहे. गाजर, बदाम, फलेरो
Snacks २- माखना
घरी आला की बटाट्याची भजी
डिनर पोळी भाजी

चोकिंग हॅझर्ड हे प्रीस्कूलमधल्या मुलांसाठी लिहिलं आहे. माझ्या मुलांच्या प्रीस्कूललाही तो नियम होता. चोकिंग म्हणजे फक्त खाताना घशात अडकणे याच अर्थी नव्हे. या वयाची मुलं चुकून आपल्या किंवा दुसर्‍याच्या नाकाबिकातही लहान आकाराच्या वस्तू/पदार्थ घालू शकतात. तुमचं मूल नीट चावून खात असेल दाणे, पण खाताना एखादा दाणा घरंगळणार नाही आणि दुसरं मूल तो नाकात घालणार नाही याची काय गॅरेन्टी?
खाऊच का, खेळण्यांच्या पार्ट्सचे साइजही वयानुरूप बदलतात. तुम्ही खेळण्यांच्या बॉक्सवर तशा वॉर्निंग्ज पाहिल्या असतील ना?

रिया..कळलं गं...
पण इथं असं शाळेत नियमात वगैरे सांगत नाहीत .. घशात अडकू शकतो तसा खाऊ लहान मुलांना पालक तसंही शाळेत देतच नाहीत ना जनरली असं मला म्हणायचं होतं...
लेकीच्या शाळेत वेळापत्रकानुसार गाजर चे तुकडे, कडधान्यं उसळी, सुका मेवा वगैरे देतो..प्रीकेजी म्हणजे अडिच वर्षाचं मुल.. तिकडचे नट काही वेगळे असतात म्हणून नियम असतात का तिकडे? असं विचारयचं होतं..

आप्पे चटणी
एल्लाकी केळ
आज टोमॅटो चिंच डाळ भात
सुकं अंजीर,काजू, बदाम

माझ्या दोन स्नैक्समधे मोस्टली फळं आणि सुका मेवा, शेंगा,कॉर्न हेच असतं..
काल संध्याकाळी लेक आल्यावर मग गरमागरम अंडा डोसा बनवून दिला.. आधी तव्यावर डोसा बैटर त्यावर एक अंडं फोडून, पसरवून, जरा पेप्पर पावडर आणि त्यावर एक चीज क्युब किसून दिलं..
कधी स्प्राऊट्स, फरसाण, मुरमुरे भेळ...
कधीतरी नुडल्स गरमगरम..
असा खाऊ साडेपाचला घरी आल्यावर बनवते..
रात्री जेवणात रोज चपाती-भाजी

आज purple day होता शाळेत
Purple द्या म्हणे डब्यात काहीतरी
मी बीटरूट चा पराठा दिला
गुलाबी जांभळा जो असेल तो रंग गोड मानून घ्या म्हटलं

गुलाबी जांभळा जो असेल तो रंग गोड मानून घ्या म्हटलं >>>
Lol Lol
हे शाळेतले डे प्रकरण जनरली वैतागवाणे असते. हा पूर्ण आठवडा आमच्या शाळेत हेल्दी फूड वीक असणार होता. फळे नी सुका मेवा दिवसाच्या आधी व्यवस्थित सांगितलेन घरी. तिसऱ्या दिवशी डबा दप्तरात भरत असताना सांगितले कि 'आज ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणायच्या होत्या'. म्हटले 'लवकर सांगितलेस'. मग डब्याकडे बघून स्वतःच 'हे पण हेल्दीच आहे ना' हुश्श. आज काय न्यायचे होते कोणास ठाऊक.

इकडं केळ्यांचे चार-पाच प्रकार मिळतात.
आकाराने लहान दोन प्रकारची.. एक हि एल्लाकी.. गोड असतात..चवीला छान लागतात.
दुसरी जरा आंबटगोड असतात..त्याचं नाव माहीत नाही.. ती खात नाहीत मुलं..मलापण विशेष आवडली नव्हती.
एक आपली नेहमीची मोठी केळी
एक ती लाल केरळी केळी आणि अजून एक लांबुळकी शेवटाला जरा टोकदार असतात ती..हि दोन्ही टेस्ट नाही केली..
पुढच्या वेळी फळं आणायला गेले कि फोटो काढून आणीन सगळ्या केळ्यांचे...

ह्या टाईप केळी मिळतात इथे, वेलची म्हणून सांगतात विकणारे पण अ‍ॅक्चुअली खरी वेलची खूप लहान आकाराची, स्लिम आणि पातळ सालीची जास्त चांगली असतात.

किंवा वेलचीचे दोन प्रकार असतील तर माहीती नाही पण मी वर उल्लेख केल्याप्रमाणे तशी वेलची केळी आणते.

मृ, pre K म्हणजे इकडे ४ ते ५ वर्षाची मुलं. Atleast रिदित च्या वर्गात तरी सगळी ४ च्या पुढे ५ च्या आतली मुलं आहेत. मी ही अजून इथले शाळांचे नियम समजून घेते आहे. पुढच्या वर्षी शाळा बदलेल तर कदाचित नियम पण बदललेले असतील. साध्या मुलं कमी स्टाफ जास्त आहे त्यामुळे बहुतेक चालत असावं.

आज
Snacks १ - पापडी
लंच - पास्ता, काकडी, गाजर, बदाम, फलेरो, वेफर बिस्कीट.

आता शाळेतलं snack खायला लागला आहे त्यामुळे snack२ देत नाहीये आज.

जी मुल चावून खाऊ शकत नाही त त्यांच्या पासून शेंगदाणा पासून बदाम ज्या लहान बिया आहेत त्या दूर च ठेवल्या पाहिजेत.
घश्यात किंवा नाकात ह्या बिया अडकल्या मुळे गंभीर स्थीती निर्माण झाल्याची खूप उदाहरणे आहेत.
पालकांनी सावध च असायला हवं.
नर्सरी मधील मुलांना नट्स (बिया) न देणे अती उत्तम.
ज्यांनी नट्स (बिया) न विषयी पोस्ट टाकली आहे ती योग्य आहे .
Aargument करण्यात अर्थ नाही

Pages