शाळा सुरु- आज मुलांच्या डब्यात काय आहे

Submitted by च्रप्स on 20 August, 2023 - 10:15

फॉल सुरु म्हणजे शाळा सुरु... रोज रोज मुलांना डब्यात काय देताय आणि काय देता येईल हा मोठा प्रश्न पडतोय...
इथे चर्चा करूया? असा मुलांच्या लंच बॉक्स साठी डेडिकेटेड धागा आधीच असेल तर हा उडवूया...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा मुलगा ( साडेपाच वर्ष)उद्या डब्यात भोपळा दे,बरेच दिवसात तोंडली नाही दिली ,आई कारली काय मस्त झालेली असं म्हणतो,आता या काय आवडीने खायच्या भाज्या आहेत का Uhoh
>>>>

मला तर त्याच्या बिचाऱ्या मित्रांचे वाईट वाटतेय. ज्यांना याच्याशी तुलना करून घरी ओरडा मिळत असेल Happy

Pear ला नाशपाती म्हणतात

नाशपती नाही हा अशुद्ध शब्द आहे
नासपती हा योग्य शब्द आहे.

पहिले हिंदी वाले शब्दांची वाट लावतात त्या नंतर गूगल भाषेची वाट लावते

मुलांना खाऊ घालणें ही मातांची मक्तेदारी नाहीये. पिता सुद्धा त्यात सामील असतात...
अगदीच रहावले नाही म्हणून>>>> बरं! नुसतं म्हणू नका, अ‍ॅक्शन ही करा मग Happy

डब्यासाठी आप्पे हा मस्त प्रकार आहे.

आमची केसच उलटी , मुलगा वय १२ आता आता पर्यंत सगळ्या भाज्या खायचा , कारले सोडून पण आता फक्त चमचमीत ग्रेव्ही वाले पाहिजे भाजी पोळी परत येतीय. मला म्हणतो तू वेगळ्या भाज्या कर वाटण असते , कधी दाण्याचे कूट किंवा टॅमोटो कांदा वगैरे पण दुधी , कोबी वगैरे (थोडक्यात म्हणजे ब्लँड भाज्या नाहीच म्हणतो ) नाहीतर १ पोळी कशीबशी खातो आणि फुटाणे , चणे वगैरे खात बसतो . माहित नाही काय करावे , माझा तर काँडिफेन्स गेलाय

दुधी , कोबी वगैरे (थोडक्यात म्हणजे ब्लँड भाज्या नाहीच म्हणतो ) नाहीतर १ पोळी कशीबशी खातो>>> पराठे करा याचे आमच्याकडे कशाचेही पराठे केले की खाल्ले जातात बरोबर योगर्ट , साजुक तुप असल की झाल.
थर्मास लन्चचा डबा कसा द्यायचा माहिती आहे का कूणाला? लेकिच्या वेळेस आणले होते पण १-२दा दिले आणी मॅडम डबाच हरवुन आल्या तिला ते प्रकरण काय गरम राहातय अस वाटल नाही..त्यामुळे परत आणला पण नाही....माझ काहितरी चुकत असणार म्हणून म्हटल इथे विचारुन घेवु..

thermos चा लंच बॉक्स असेल तर ह्यात अन्न गरम राहत. वाफाळता फ्राईड राईस, इडली वैगरे असेल तर अगदी तशीच गरम राहते.
डबा भरायच्या आधी ५-१० मिनिटे गरम उकळत पाणी भरायच. मग ते ओतुन डबा भरायचा, एकदम छान गरम राहतो.

साबुदाणा खिचडी
उकडलेले स्वीट कॉर्न
वालाची शेंग भाजी, भात
ड्रायफ्रूट्स-खजूर, काजू,बदाम.

आज धनवन्तीच्या रेसिपीने शेंगदाणा कूट पराठा… एकदम फर्मास चव. लोकहो जरूर ट्राय करा.
सोबत मोसंबे

डब्यात सफरचंद कसं द्यायचं? अख्खं आमच्याकडे खाता येत नाही. साल अडकते. सोलुन फोडी कराव्यात तर काळ्या पडतात.

सफरचंद फोडीवर जरासं मीठ भुरभरलं कि काळं पडत नाही..

चवळीची उसळ भात
भुईमूग शेंगा उकडून
एल्लाकी केळ

आज फोडणीची पोळी , 2 प्लम. खजुर आणी दाण्याचा छोटा लाडू.
घरी आल्यावर पोळी आणी घोसावळे भाजी.

मी साल काढत नाही. मोठ्या फोडी करते आणि त्या एकमेकांची ओपन साईड झाकतील अश्या बसवते डब्यात. मग नाही काळ्या पडत. एका युट्यूब शॉर्ट/इन्स्टा रीळमध्ये वरून रबर बँड लावायला सुचवले होते. पण मला गरज पडली नाही अजूनतरी.

साल काढायची असेल तर लिंबाची एक फाक फिरवा साल काढल्यावर सगळ्या फोडींवरून. पण लिंबाची थोडी तरी चव येईल. ती चालेल का?

बाय द वे, काल आमच्याकडे स्प्रिंग अनियन सांगून फरसबीची भाजी खाल्ली घरी. आता स्प्रिं अ ला काय नाव देऊ या विचारात आहे.

IMG_1947.jpeg
चिकन गोझ्या, मिनि डोनट्,अनियन पेस्ट्रि शिट रोल्,ब्लु बेरी,फ्रोजन गोगर्ट
IMG_1952.jpeg
पालक पराठे(घाईत फार खस्ता झाले),गोल्ड फिश्,स्ट्रॉबेरी,गोगर्ट
IMG_1963.jpeg
पनिर पराठे,ओरिओ,अक्रोड्,ब्लुबेरी,गोगर्ट

वा मस्तंच.
आज डब्यात कढी, भात, भेंडी हि.मि. फ्राय, लेट्युस पाने, लिंबू लोणचे Happy
पोळी चा आज कंटाळा आला.

<<<आज धनवन्तीच्या रेसिपीने शेंगदाणा कूट पराठा… एकदम फर्मास चव. लोकहो जरूर ट्राय करा.
सोबत मोसंबे

Submitted by MazeMan >>

अगदी माझ्या मनातील बोललीस हो.. Wink

आज मॅकरोनी-चिझ्,चिझ-इट्, स्नॅकसाइझ अ‍ॅपल्,कॅप्रिसन
थर्मोस मधे दिलय, बघुयात जमलय का ते

नाष्टा: उकडलेले अंडं, लेमन राईस
दोस्साकाय करी भात
उकडलेले स्वीटकॉर्न
फुटाणे, काजू,खजूर

प्राजक्ता, फारच सुरेख आणि पौष्टिक डब्बे आहेत.

ते मोमो सारखं दिसतंय ते काय आहे?..त्याची रेसिपी सांगणार का ?

आणि गोल्ड फिश काय असतं?

आमच्याकडे लेकाला गोल्ड फिश, चीज इट इत्यादी अजिबात आवडलेले नाहीत. मला वाटलं इतर मुलांचं बघून खाईल तर ते पण नाही.

आज ब्रेक फास्ट ला डोसा सांबार
१ ला स्नॅक्स पापडी
लंच पालक पराठे आणि दही
२ रा स्नॅक्स माखाना तुपावर भाजून मीठ भुरभुरवून

आम्हाला लंच ला काय देऊ पेक्षा स्नॅक्स ला काय देऊ याचं टेन्शन जास्त आलंय सध्या कारण शाळा (बस टाईमिंग धरून ) ८+ तास होतेय त्यामुळे एक तरी स्नॅक्स खा रे बाबा असं होतंय.

शाळेने ' तुम्हाला चालणार असेल तर रिदित ला देता ते स्नॅक्स इतर मुलांना टेस्ट करायला पण द्याल का ' असं विचारलं आहे

स्नेहा, फारच क्युट आहेत सगळे पदार्थ.

प्राजक्ता, त्या थर्मसच्या डब्यात उकळतं पाणी भरून ठेवायचं १०-१५ मिनिटं.

योगर्ट पार्फेची रेसिपी अशी नाही, कम्पायलेशन आहे ३ घटकांचं- https://www.foodnetwork.com/recipes/rachael-ray/yogurt-and-fruit-parfait...

दही घट्ट रहावे म्हणून मी १ चमचा काजूची पूड मिसळायचे आणि दही, ग्रनोला, फळाचे तुकडे याचे २-२ लेयर्स केले की ते दही तसं पण दबून गप्प रहातं. फळाच्य लेयरमध्ये आंब्याच्या फोडी, दह्यात वेलदोडा पूड + केशराची काडी कालवलेलं असं आम्रखंड फ्लेवरचं पार्फे माझ्या मुलाला अजूनही आवडतं. आपण जसं लहानपणीचा आवडता खाऊ घोडवयात पण आवर्जून खातो तसा हा एक खाऊ आहे त्याचा.

आज
ब्रेकफास्ट - बेसन का चीला
Snacks १ -खाकारा
लंच -पास्ता, समोसा, काकडी, गाजर, फलेरो candy, शेंगदाणे
स्नॅक्स २- बॉबी/फ्रायम तळून

इतका छान छान डबा ऐकून आनंदी होऊ नका, एक ही घास n संपता तो जसाच्या तसा परत येतो

अंजु ताई, हो पण दिल्यावर आवडतय का ते कळेल

आवडेल रिया.

Btw सर्वांचे डबे सुरेख नेत्रसुखद.

आज
एकाचाच डबा असतो मुलाचा.
एक केळ
पनीर सब्जी, परोटा.
खजूर, अक्रोड, बदाम.

आज लेक इथून ऑफिसल गेली.
डब्यात चिकन जंगली सँडविच तिचे तिने बनवून घेतले. प्लस सुके अंजीर चाके दोन व अक्रोड तीन चार. सुका मेवा किती महाग आहे. पण आवडतो म्हणून मी थोडा मागव्ला. अक्रोड तर किती वर्शांनी खाल्ले. मजा आली. मी आमंड मिल्क चा पॅक व झिप लॉक मध्ये थोडे वेफर्स ठेवले होते पण नेत नाही म्हटली.

माझ्या डब्यात दोशा व बटाटा भाजी, ताक दोन गुलाब जाम.

आज
ब्रेफा चीज sandwich
Snacks १ ice cream चे कोरडे कोन
लंच बेसनाचे धिरडे, काकडी, वेफर बिस्कीट, फलेरो, शेंगदाणे
Snacks २ खाकरा
घरी आलं की शेवयांची खीर
डिनर पालक पनीर, पोळी

आमच्या इथेही allow करतात... ऍलर्जी असणाऱ्यांसाठी वेगळे टेबल असतात... तिथे तेच बसतात...

फलेरो म्हणजे काय?
आमच्याकडे कॅन्डी/चॉकलेट्स अलाउड नाहीत.

आमच्याकडे कॅन्डी/चॉकलेट्स अलाउड नाहीत.
>> स्वाती- तुमची प्रायव्हेट किंवा चार्टर स्कुल आहे का? पब्लिक स्कुल मध्ये असे कधी ऐकले नाही...

नाही हो, पब्लिकच.
वाढदिवस, व्हॅलेन्टाइन डे, हॅलोवीन वगैरेलासुद्धा नाही अलाउड आमच्याकडे.
पोस्ट-कोविड शाळा सुरू झाल्या तेव्हा डबा डेस्कवरच खावा लागत असे. आता कॅफेटेरियात गटाने बसून खातात, पण शेअरिंग अलाउड नाही.

हो शेंगदाणे वाचून मलाही आश्चर्य वाटले. मुले जरा मोठी झाली की त्यांना समजते त्यामुळे मग मिडल स्कूल/ हायस्कूल ला नट्स चालत असतील कदाचित पण प्रिस्कुल ला नसते परवानगी सहसा. कधी कधी एक क्लास पूर्ण नट फ्री आणि बाकीच्या क्लासेस ला अलाउ करतात तसे काहीतरी असेल तर माहित नाही.
नट अ‍ॅलर्जी मुळे हे एक कारण, पण लहान मुलांना चोकिंग हझार्ड म्हणून पण असले काही देऊ नका असे सांगतात. ग्रेप्स पण अर्धी कट करायला सांगायचे आम्हाला प्रिस्कूल मधे. रीया नक्की खात्री करून घे तू पण.

Somehow बहुदा माझ्या मुलाच्या वर्गात (१६ मुलं) कोणालाच कसलीच अलर्जी दिसत नाहीये. मी त्याच्या शाळेत perticulary शेंगदाणे, बदाम, सोया, दूध, चीज, पनीर हे दिलं तर चालेल का असं स्पष्ट विचारलं होतं आणि माझ्या काही पदार्थांमध्ये दाण्याचा कुट असू शकतो हे सांगितलं होतं तेंव्हा त्यांनी don't worry, give what ever you want म्हणून सांगितलं. I was surprised too.

चोकिंग हजार्ड हे कारण लक्षात आलं नाही माझ्या पण तरी विचारून घेईन की चालेल ना नट्स दिलेले. तसे त्यांचे teacher चेक करतात मुलांचे डबे रोज बहुदा पण अजून काही बोलले नाहीत तर ठीक असावं असं वाटतंय पण उद्या नाही देत डब्यात आणि एकदा विचारून घेते. Thanks !

फलेरो एक प्रकारची जेली कँडी आहे. शाळेत allowed आहे.
त्यांना खरंतर स्नॅक्स शाळेतून देत असतात तर आज किटकॅट दिले होते म्हणे Lol

Ridit ची शाळा फक्त pre school च आहे. त्यात मोठे वर्ग नाहीत. पुढच्या वर्षी शाळा बदलेल तेंव्हा कदाचित नियम बदलतील.

Pages