दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मावी हवाई- my heart goes out to all those folks. …
दोन आठवड्यापूर्वीच जाऊन आलो होतो आम्ही.. आता तिथले फोटोज बघवत नाहीत... Sad

>> एक ग्रेसफुल जोडपे
+१
रमेश देव म्हटलं कि सीमा देव आठवंत. आणि सीमा देव म्हटलं कि रमेश देव आठवंत. आणि दोघे आठवंत तेंव्हा 'सांग कधी कळणार तुला' आठवणारच! एक सुंदर कहाणी संपली.

मागची अडीच तीन वर्षे अल्झायमरशी लढत होत्या. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

सीमा देव - अतिशय सोज्वळ सौंदर्य व अभिनय. श्रद्धांजली

हे जोडपं शेवटपर्यंत आपला आब सांभाळून होते.
मला त्यांचं एकवार पंखावरूनी फार आवडतं.

सीमा देव - अतिशय सोज्वळ सौंदर्य व अभिनय. श्रद्धांजली

हे जोडपं शेवटपर्यंत आपला आब सांभाळून होते.
मला त्यांचं एकवार पंखावरूनी फार आवडतं.>>> मम

रमेश आणि सीमा देव यांच्या सुंदर सुंदर मराठी चित्रपटांमुळे आमचे बालपण रम्य झाले हे खरे आहे. सीमा देव यांना श्रद्धांजली.

अतिशय लाघवी , प्रगल्भ व हसरे कपल.
हे जोडपं शेवटपर्यंत आपला आब सांभाळून होते.+१ या क्षेत्रात ते खूप अवघड आहे.
अतुल+१
श्रद्धांजली !

अभिनेता मिलिंद सफई _/\_
नाटक आणि मालिका बघितल्या आहेत. औरंगाबादवरून आले होते ते माहित नव्हते (जिगीषा मंडळी बरोबर). आजच्या लोकसत्ताला बातमी आहे.

ओह! Sad

ओह्ह!!! Sad
फार आवडायचा त्यांचा आवाज, अग्रेशन आणि स्वरांवरची पकड आणि फिरत.
त्यांची पेटंट भैरवी लाल वाला जोबन आणि मग तोच प्रसिद्ध तदानि तानी तोम तन तनत देरेना तराणा! बातमी वाचुनच ते स्वर आणि स्वच्छ आवाज कानात रुंजी घालू लागले. श्रद्धांजली!

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, कथालेखक आणि पटकथाकार , संवाद लेखक प्रयाग राज.
अनेक अमिताभपटांची पटकथा त्यांनी लिहिली. अमर अकबर अँथनी, परवरिश, सुहाग, नसीब, देशप्रेमी, कूली , गिर्फ्तार, मर्द, गंगा जमना सरस्वती. यातले बरेचसे मनमोहन देसाईंचे दिसताहेत. देसाईंचेच चाचा भतीजा , धरमवीर हे धरमपट.

शम्मी कपूरच्या चाहे कोई मुझे जंगली कहे या गाण्यातील याऽऽऽऽहू या आरोळीचा आवाज प्रयाग राज यांचा आहे.

Pages