( शब्द हा शब्द लिहायचा राहून गेला होता धाग्याच्या नावात)
तुम्हालाही हा अनुभव आला असेलच, पण मला फारवेळा येतो. तरी हल्ली सावध झाले आहे, तरी अधुनमधुन ‘ते’ दगा देतंच.
‘ते’ म्हणजे.... शब्द, ऑटोकरेक्ट...
म्हणजे काय होतं, मी मेसेज लिहिते.. इंग्लीशमधुन, मिंग्लीशमधुन. लिहिताना कळतं की ‘हे शाब्बास, बरोब्बर‘ लिहीलंय‘. आणि ‘सेंड’ वर टिचकी मारली रे मारली की .... मेले डोळ्यादेखत शब्द बदलतात आणि हताशपणे पहाण्यावाचुन उपाय उरत नाही. आणि नंतर तो उडवता येत नाही कारण अख्ख जग व्हाटसपवर नजरा लाऊन बसलेलं असल्याकारणाने सर्वांनी ते वाचलेलंही असतं आणि मग सुरु होतो फिदफिदण्याचा काळ.
आता परवाच ऑफीसमधला एक म्हणाला, ‘मला रोटीमॅटिकचा पोळी करतानाचा व्हिडिओ पाठव‘. मग काय उत्साहाने घरी येऊन पसारा आवरुन मस्त व्हिडिओ काढला व मेसेज लिहुन तो पाठवला, ‘ Prabhu, sending you Rotimatic video per your request’. आमची टीम हसरीखेळकर आहे म्हणुन आमचा व्हातसप गॄप आहे. तर सगळ्यांनाच पाठवला. तर ऑटोकरेक्ट सायबांनी तो ‘Prabhu, sending you romantic video per your request’ असं झोकात बदलुन पाठवले. कळले तोवर उशीर झाला होता.. टीममधल्या एका शांत मुलाने मी लिहिल्याप्रमाणे ‘रोमँटिक व्हिडिओ दिसत नसल्याची’ तक्रार सौम्यपणे केली तेव्हा झाला प्रकार कळला.
दुसर्या एका गॄपमधे एक व्यक्ती भयंकर गंभीरतेने एक मत मांडत होती तर तिला ‘you are right’ लिहिले तर ते ‘you are tight’ झाले. तिच्याशी प्रथम संभाषण व त्याची अशी सुरुवात?
असे असंख्य प्रकार झालेत हातुन. स्वतःचे कौतुक किती करायचे म्हणुन गब्बस्ते.
तर येऊ द्यात तुमच्याही ऑटोकरेक्ट या शत्रुमुळे झालेल्या गंमतीजंमती वा फजिती.
लिहू की नको असा प्रश्न पडतोय.
लिहू की नको असा प्रश्न पडतोय. पण पाडून हा शब्द लिहिताना नेहमी वेगळा शब्द उमटतो जो मी कधीही वापरला नाही आहे. मग तो मोबाईलच्या शब्दासाठयात कसा काय घुसला कोण जाणे!
छान लिहीलेले आहे.
छान लिहीलेले आहे.
मी आधी Indic prime keyboard
मी आधी Indic prime keyboard वापरायचो.
त्यात पडले लिहिताना paDale असे लिहावे लागायचे. मोठा D लिहीला की ड व्हायचा. त्यात बरेचदा मोठा D करायला शिफ्ट ऐवजी वरचा a दाबला जायचा आणि paadale असे टाईप होऊन पादले लिहीले जायचे
लक्षात आले तर ठिक, नाहीतर गेले तसेच
प्रिडेक्टीव्ह टेक्स्टिंग ही
प्रिडेक्टीव्ह टेक्स्टिंग ही फीचर धमाल आहे.
एकदा तुम्ही काही मेसेज पाठवले असणार तर ते तुमच्या सेल च्या मेमरी मध्ये असते .
उदा : Anil, why aren't you not responding
मग दुसर्यांदा परत जेव्हा तुम्ही Anil, लिहिता तेव्हा सेला फोन प्रिडिक्ट करते why aren't you not responding
तुमच्या स्मार्ट फोन ला पण कळतं Anil कसला माणुस आहे ते.
हे मी Anil ला ही सांगितलंय, Even my phone knows what kinda person you are
आणि गुगल मेल कंपोझ करताना पण
आणि गुगल मेल कंपोझ करताना पण ते ऑटो सजेशन देते. चांगलं असलं वाक्य सजेशन तरी मी हट्टाने पेटून ते डिलीट करून स्वतःचं वेगळ्या व्याकरण आणि शब्दांतलं वाक्य लिहिते.गुगल ला जिंकू देता कामा नये.
गुगल ला जिंकू देता कामा नये.
गुगल ला जिंकू देता कामा नये. >> सहमत. तसंच गूगलने केलेलं मराठी त्रान्स्लेशन कितीही बट्ट्याबोळ असलं तरी मी ते आनंदाने स्वीकारतो. त्याच्या चुका काढल्या तर त्याला सुधारायची संधी मिळेल. गूगलला आपल्यापेक्षा चांगली मराठी कधी येऊ नये अशी मनोमन इच्छा आहे.
तुम्ही लोक महान आहात
तुम्ही लोक महान आहात
<<<तुम्ही लोक महान आहात>>>
<<<तुम्ही लोक महान आहात>>>
अगदी अगदी
अनु आणि हपा
अनु आणि हपा
हपा, हाही विचार पुरेसा धोरणी
हपा, हाही विचार पुरेसा धोरणी आणि मुत्सद्दीपणाचा आहे स्वीकारला आहे.
त्रान्स्लेशन हे अगदी योग्य
त्रान्स्लेशन हे अगदी योग्य देवनागरी करण केल्याबद्दल हपांना पुष्गुच्छ. (त्रासचा कोकणी उच्चार त्रान्स)
(No subject)
गुगल ला जिंकू देता कामा नये.
गुगल ला जिंकू देता कामा नये. >>>
गूगलला आपल्यापेक्षा चांगली मराठी कधी येऊ नये अशी मनोमन इच्छा आहे. >>>
हर्पा
हर्पा
असाच विचार ईस्ट इंडिया कंपनी
असाच विचार ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा केला गेला असता तर भारत कधी पारतंत्र्यात नसता..
: हहगलो:
भन्नाट..
होणाऱ्या सासर्याला होणारा जावई लिहितो
मला red ford endeavour लग्नात भेट द्यावी.
सासरा लिहितो तुमची मागणी हटके आहे. पुर्ण करु.
लग्न लागल्यावर चार तांबड्या रंगांच्या अंडरवेअर जावयाच्या हातात ठेवतो.
red four underwear.
ऐकीव व्हायरल विनोद..
तुम्हालाही हा अनुभव आला असेलच
तुम्हालाही हा अनुभव आला असेलच, पण मला फारवेळा येतो. तरी हल्ली सावध झाले आहे, तरी अधुनमधुन ‘ते’ दगा देतंच.
‘ते’ म्हणजे.... शब्द, ऑटोकरेक्ट...
म्हणजे काय होतं, मी मेसेज लिहिते.. इंग्लीशमधुन, मिंग्लीशमधुन. लिहिताना कळतं की ‘हे शाब्बास, बरोब्बर‘ लिहीलंय‘. आणि ‘सेंड’ वर टिचकी मारली रे मारली की .... मेले डोळ्यादेखत शब्द बदलतात आणि हताशपणे पहाण्यावाचुन उपाय उरत नाही. >>>>>
आता परवाच ऑफीसमधला एक म्हणाला, ‘मला रोटीमॅटिकचा पोळी करतानाचा व्हिडिओ पाठव‘. मग काय उत्साहाने घरी येऊन पसारा आवरुन मस्त व्हिडिओ काढला व मेसेज लिहुन तो पाठवला, ‘ Prabhu, sending you Rotimatic video per your request’. आमची टीम हसरीखेळकर आहे म्हणुन आमचा व्हातसप गॄप आहे. तर सगळ्यांनाच पाठवला. तर ऑटोकरेक्ट सायबांनी तो ‘Prabhu, sending you romantic video per your request’ असं झोकात बदलुन पाठवले. कळले तोवर उशीर झाला होता.. टीममधल्या एका शांत मुलाने मी लिहिल्याप्रमाणे ‘रोमँटिक व्हिडिओ दिसत नसल्याची’ तक्रार सौम्यपणे केली तेव्हा झाला प्रकार कळला.>>>> :
इतकी मजेशीर नाही . पण autocorrect मुळे गडबडी होतात हे खर आहे!
मजा आली वाचायला.
बिचारं गुगल
बिचारं गुगल
बोलताना पण होतं बरं का ऑटोकरेक्ट.
शहाबाझ नावाचा आमच्या टीममधे मुलगा होता. त्याला भल्यामोठ्या मिटिंगमधे ‘शारुख’ म्हणुन हाक मारली. सगळे हसुन मेले. हा सगळा मायबोलीवरच्या शारुकच्या चर्चेचा परिणाम.
मायबोलीवरच्या शारुकच्या
मायबोलीवरच्या शारुकच्या चर्चेचा परिणाम >>> ऋन्मेष जबाबदार आहे यासाठी. पकडा त्याला
>>>>>>बोलताना पण होतं बरं का
>>>>>>बोलताना पण होतं बरं का ऑटोकरेक्ट.
आई ग्ग!!! हसून मेले.
गूगलला आपल्यापेक्षा चांगली
गूगलला आपल्यापेक्षा चांगली मराठी कधी येऊ नये अशी मनोमन इच्छा आहे. >>>
Pages