पल्याड

Submitted by अभिषेक_ on 17 August, 2023 - 03:53

एक धुंद सकाळ
प्रकाशाने सजलेली
अंधार मागे सारता सारता
दवबिंदुंनी भिजलेली..

एक तप्त दुपार
उन्हामध्ये विरलेली
झाडाखालील सावलीच्या
शोधामध्ये सरलेली..

एक हळवी संध्याकाळ
अस्ताकडे झुकलेली,
अंधाराची सोबत करण्या
प्रकाशास मूकलेली..

एक अकेली रात्र
काळोख विणण्यात जूंपलेली,
उजेडाची वाट बघत
अंधारातच संपलेली..

एक सूखी माणूस
हसताना दिसलेला,
अन् एकांतात डोळ्यांचे
काठ पुसत बसलेला..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

एक सुंदर कविता
सहज सोपी लिहिलेली
वाचता वाचता हळूच
मनाला स्पर्शून गेलेली..

फारच आवडली कविता. आणखीन येऊ देत.

स्वान्तसुखाय, हरचंद पालव आणि सामो खूप आभार!
हरचंदजी, काव्यात्मक प्रतिसाद आवडला! तुमच्यासारख्या जाणकारांच्या अशा प्रतिसादातूनच प्रोत्साहन मिळतं.