बॉलीवूडचा बाप येतोय.. गदर २.० ! सन्नी देओल इज बॅक.

Submitted by ढंपस टंपू on 10 February, 2023 - 04:18

गदर २.०
सन्नी पाजींच्या फिल्मचं शूटींग संपत आलेलं आहे. आता ही फिल्म रिलीज व्हायच्या वाटेवर आहे.
गदरने भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली फिल्म हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. लगान पेक्षा अर्ध्या बजेट मधे बनलेल्या (३० करोड) या फिल्मने लगान पेक्षा जास्त बिझनेस केला. लगान सुद्धा चालली. पण तितका बिझनेस करायला लगानला दीड वर्षे लागलं. त्या वेळच्या ३० करोड मधे म्हणजे आजच्या दीडशे करोडच्या बजेट मधे बनलेल्या या फिल्मचा त्या वेळचा बिझनेस आजच्या जमान्यात पाचशे कोटी (फक्त तिकीट बारीवर) आहे.
Gadar_2_film_poster.jpg
गदर २.० ला घेऊन जबरदस्त उत्सुकता आहे. सनीची जादू आजही कायम आहे हे चुप च्या यशावरून समजलेच आहे.
आजही " ये ढाई किलो का हाथ जब पडता है ना " सारखे असंख्य डायलॉग्ज लोकांच्या स्मरणात आहेत. गदर मधले डायलॉगज तर सनीपाजी पडद्यावर असल्यानेच खरे वाटू शकतात.

त्या वेळी गदरने वेड लावलं होतं.
तुम्हारा पाकिस्तान जिंदाबाद, लेकीन हमारा हिंदुस्तान जिंदाबार था, है और रहेगा सारखे ढांसू लायलॉग्ज, सनी पाजीचं हँडपंप उखाडून आग ओकणार्‍या नजरेनं पाहणं हे सगळंच लोकांना पुन्हा पहायचंय.

अमिताभ बच्चनची जादू ओसरत असताना जर बॉलीवूड कुणी सावरलं असेल तर ते सनीपाजीच. अँगी यंग मॅनचा उग्र अँगी मॅन झाला. सुरूवातीचा हळवा सनी आग ओकणारा युवक झाला. अर्जुन, यतीम, डकैत, घायल, जीत, घातक सारखे असंख्य पिक्चर्स सनीच्या या इमेजने तारून नेले. सनीच्या या इमेजचा फायदा घ्यायला निर्मात्यांची रांग लागायची. पण सगळेच पिक्चर्स चांगले बनत नसत. मग सनीला फटका बसू लागला.

ज्या अनिल शर्मांनी गदर बनवली त्यांचाच सनीला घेऊन बनवलेल्या स्पाय मूव्ही "हिरो" ने सनीच्या इमेजला उतरती कळा लागली. मग सनी पाजी पण भरकटले. दिल्लगी सारखे सिनेमे बनवू लागले. भावासाठी भगतसिंग बनवला. त्यात नुकसान झाले. सनी पाजी दिग्दर्शक म्हणून कधीच चांगले नव्हते. पण त्यांना ते समजले नाही. नुकसान होत असतानाही दिल्लगी बनवला, यमला पगला दिवाना बनवला आणि अजूनच खोलात गेले. त्यातून सावरता न आल्याने मग ते बॉलीवूडपासून दूर झाले.

पण अशा मॅनली हिरोंना वय, काळाचं बंधन नसतं. धर्मेंद्र पाजी तर सत्तरीतही फौलादसिंग साकारत होते. हुकूमत सारखे सुपरहीट पिक्चर देत होते. अशा बिनडोक पिक्चरचं एकमेव अ‍ॅसेट असायचं. धरम पाजी. तीच गोष्ट सनी पाजीला सुद्धा लागू आहे.

नुकताच घायल २.० येऊन गेला. सनी पाजीचं दिग्दर्शन जरासं सुधारलेलं दिसलं. पण सफाईदार नाही. पण प्रेक्षकांचं सनीवर अजून प्रेम आहे हे घायल फिरसे ने दाखवलं. मग चुपने पण ते सिद्ध केलं.

या पार्श्वभूमीवर गदर २.० अनिल शर्माच डायरेक्ट करत असल्याने जबरदस्त उत्सुकता ताणली गेली आहे. ११ ऑगस्ट रोजी पिक्चर रिलीज होत आहे . आताच ओटीटी प्लॅटफॉर्म्स कडून चढत्या क्रमाच्या ऑफर्स गदर २.० साठी येत आहेत. या फिलमचा ओटीटी राईट बॉलीवूडमधले रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

रिलीज आधीच ब्लॉकबस्टर हिट होण्यात वर्ल्ड टीव्ही राईटस आणि ओटीटी राईट्ससाठी चाललेली स्पर्धा मोठी भूमिका बजावणार आहे. तिकीट बारीवर होणारे कलेक्शन हे फक्त पुढे मोजायचे.

आपल्यापैकी बर्‍याच जणांचे पहिले प्रेम बॉलीवूड आहे. त्यावर आक्षेप नाही. पण मराठी पिक्चर्स नक्की बघा. वर्षातून दोन पिक्चर्स जास्तीत जास्त संख्येने पहा. बॉलीवूडचे प्रेम जपत जपत मराठीही पहा.

गदरची रिलीज डेट निश्चित असल्याने त्या काळात धंदा करू शकणार्‍या मराठी पिक्चर्सनी एखादा आठवडा संयम पाळावा. मेन शोज मिळत असतील तरीही या मोठ्या सिनेमापुढे रिलीज करण्याचा धोका पत्करू नये. कारण आपले मराठी पब्लीक साऊथ सारखे कट्टर नाही. एकदा गदर पाहिल्यावर दोन तीन आठवडे थेटरकडे फिरकणे होत नाही. या गोष्टींचा विचार करावा. मराठी पिक्चरने पण आता ट्रिकी व्हावं.

अर्थात सन्नी पाजी सारख्या मॅनली हिरोजची अ‍ॅक्शन पहायला मराठी सहीत सगळेच आतुर असणार यात शंकाच नाही.
त्या वेळी हँडपंप , आता काय उखडतात सनी पाजी ही उत्सुकता आहे.

पोस्टर्सवरून बैलगाडीचं चाक उचलून सनीपाजी फेकताहेत असं दिसतंय.
तोच गुस्सा, तेच आग ओकणारे डोळे, तेच ढांसू डायलॉग्ज, तीच ती अ‍ॅक्शन आणि तीच जादू अनुभवयाला उत्सुक आहे.
तुम्ही ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सामना, मी का कळवू तुम्हाला?
तसेच अक्षयकुमारच्या या सिनेमात धर्म, देव यावरचे भाष्य यामुळे एके काळच्या भक्तांच्या फेवरेट हिरोला ट्रोल केले जात आहे.
हिथ मोदी समर्थकाना भक्त म्हतल जातेय. म्हणजे राज्यात आणि केंद्रात bjp स्त्तेत असूनही मोदींना trol केलय आणि तरीही censor ने सीन्स cut नाही केले.

तुम्ही नाही लिहिलं. पण social मीडियावर मोदी समर्थकांना भक्त/ भक्तांडे म्हतलं जातेय म्हणून माझा तसा समज झाला.

केंद्रात bjp स्त्तेत असूनही मोदींना trol केलय आणि तरीही censor ने सीन्स cut नाही केले. >>> सेन्सॉरने अनेक कट सुचवले आणि भगवान शिवच्या ऐवजी शिवदूत दाखवले तर प्रमाणपत्र देऊ असे सांगितले. माहिती घेऊन बोलायला पैसे पडत नाहीत. माहिती नसेल तर बेधडक विधाने करू नयेत.

पहिल्या दिवसाच्या hype नंतर गदर 2 साफ कोसळला आहे, सोमवारी तर आदिपुरुष सारखी परिस्थिती होईल. याउलट OMG 2 च्या business मध्ये दुसऱ्याच दिवशी तब्बल 50% वाढ झाली, खूपच चांगला आहे OMG 2. लोकानांही कळते आता

हे का कळवलं ?
तुमची कळकळ समजली.

@रात्रीचे चांदणे
तुम्ही मला उद्देशून प्रतिसाद दिलात म्हणून मी तुमच्याच प्रतिसादात सांगितलेले बदल केले कि कळवा असे म्हटलं होतं. तर तुम्ही विचारता कि मी का कळवू ? तुमचा काही प्रॉब्लेम आहे का ? कुठे दाखवलेय का ? काळजी घ्या.

ठीक आहे कळवतो तुम्हाला. तुमची कळकळ समजली. गदर 2मध्ये पाकी सैनिक भारतीय मुस्लिमबांधवांना त्रास देताना दाखवलेत, हा ही सिंग बदलायला पाहिजे. भारतीय सैनिक तो ही जाणून बुजून पूजा करताना मुस्लिमाना त्रास देतोय हे दाखवायला पाहिजे. म्हणजे आपले सेक्युलॅरिझम जपले जाईल.

Submitted by सामना on 13 August, 2023 - 08:48 +१.

मुंबई जयपूर एक्स्प्रेसमध्ये आर पी एफ कॉन्स्टेबलने तीन वेगवेगळ्या डब्यातल्या तीन मुस्लिम प्रवाशांना वेचून गोळ्या घातल्या . त्यामागे या अशा चित्रपटांद्वारे पेरला जाणारा द्वेषच आहे. हे चित्रपट काही लोकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा देत नाहीत.
ट्रेनमधले बाकीचे प्रवासी नुसतीच गंमत बघत राहिले, त्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत किंवा काही घोषणा दिल्या नाहीत, म्हणजे आणखी द्वेष पेरायला जागा आहे. गदर आणि येत्या ८-९ महिन्यांत येणारे चित्रपट ती गरज पूर्ण करतील.

उत्तर भारतात बाप्ये लोक्स ट्रॅ क्टर ट्रे लर्स अ मधून चित्रपटाला येत आहेत. बॅनर फ्लेक्स बनवले आहेत ते लावले आहेत गाड्यांना असे रील्स बघितले. लोक्स थेट रात नाचत आहेत.

भरत ह्यांचा मुद्दा ग्राह्य आहे. पण आता ह्या बद्दल बोलणे हताश वाटत आहे.

चित्रपट अतिशय वाइट आहे, सगळे reviews पण हेच सांगत आहेत, पण चित्रपट अजून तरी प्रचंड चालतो आहे, याला सनी देओल ची स्टार पॉवर कारणीभूत आहे असे वाटते. खरे तर चांगली स्क्रिप्ट आणि चांगला दिग्दर्शक असेल तर सनी देओल अजूनही कमाल करू शकतो असे दिसते.

पठाण सारखा वाईटातला वाईट चित्रपट पण चालला. सध्या बॉलिवूडचे चित्रपट चालणे गरजेचे आहे. त्यामुळ कलाकार, तंत्रज्ञ, ठेकेदार, एक्स्ट्रा कलाकार अशा कित्येकांचं पोट भरतं. सिंगल स्क्रीनच्या बाहेर धंदा करणार्‍यांचा धंदा होतो. स्टुडीओ, व्हीएक्सएफ , ट्रान्स्पोर्टस, रिक्षा टॅक्सी वाले यांना पैसे मिळतात.

त्यातून मूव्ही माफिया प्रमाणे एकट्यानेच सर्व स्क्रीन्स न अडवता धंदा करणार्‍यांचा द्वेष नको करायला. त्या ऐवजी पिक्चर पहा. पिक्चर पाहून मत द्यावे. मी ही धंदा कमी झाल्यावर जाणार आहे म्हणजे तेव्हढाच हातभार लागेल. दोन आठवडे तरी हेटर्सना सहन करावे लागणार आहे. सहानुभूती आहेच.

गदर २ ला निगेटिव्ह रिव्ह्यूज तेच देत आहेत ज्यांनी पठाण सारख्या वाईट चित्रपटाला पाच स्टार दिले होते. पठाण पेक्षा गदर जास्त एंटरटेनिंग आहे. रिव्ह्यूजचा पब्लीक ला फरक पडलेला नाही. ट्रॅक्टर ट्रोलीज घेऊन पब्लीक सकाळी सहापासून रांगा लावतंय. १५ ऑगस्टसाठी पाचशे स्क्रीन्स वाढवण्यात आल्याने आता ४००० स्क्रीन्सवर गदर २ धमाल करत आहे.

झी स्टुडीओ चीच निर्मिती असल्याने ओटीटी रिलीजच्या हक्कांची विक्री होणार नाही असा अंदाज होता. पण झी ५ आणि झी स्टुडीओ मधे २०० कोटी रूपयांचा व्यवहार होणार आहे. झी सिनेमा , झी नेटवर्क वर सिनेमा दाखवला जाणार आहे. त्याचे हक्क १५० कोटी धरले आहेत. हा व्यवहार होणार नाही. त्यामुळे पाचव्या दिवस अखेर चित्रपटाने कमावलेले २२५ कोटी रूपये ( इंडीया नेट) + ३०० कोटी = ५५० कोटी इतका धंदा झाला.

ओवरसीज कमाई मधे गदर अ‍ॅव्हरेज आहे. कारण पाकिस्तानी प्रेक्षकांनी गदर वर बहीष्कार टाकला आहे. आखातातही बहीष्कार आहे. त्याची भरपाई भारतीय प्रेक्षक करत आहेत.

ओव्हरसीजचे ३५ कोटी रूपये उत्पन्न धरून गदर सहाशे कोटीच्या जवळ गेला. हे नेट उत्पन्न आहे.
ग्रॉस टोटल साडेसातशे कोटी रूपये.

ग्रॉस उत्पन्न हे तिकीट विक्रीतून आलेले वजावटीच्या आधीचे उत्पन्न असते. पठाण ने हेच दाखवले होते.
नेट उत्पन्न म्हणजे थेटर मालकांचा शेअर, विविध कर आणि जर हिरोचा उत्पन्नात हिस्सा असेल तर तो वजा केल्यावर राहिलेले उत्पन्न. निव्वळ नफा.

Pages