बॉलीवूडचा बाप येतोय.. गदर २.० ! सन्नी देओल इज बॅक.

Submitted by ढंपस टंपू on 10 February, 2023 - 04:18

गदर २.०
सन्नी पाजींच्या फिल्मचं शूटींग संपत आलेलं आहे. आता ही फिल्म रिलीज व्हायच्या वाटेवर आहे.
गदरने भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली फिल्म हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. लगान पेक्षा अर्ध्या बजेट मधे बनलेल्या (३० करोड) या फिल्मने लगान पेक्षा जास्त बिझनेस केला. लगान सुद्धा चालली. पण तितका बिझनेस करायला लगानला दीड वर्षे लागलं. त्या वेळच्या ३० करोड मधे म्हणजे आजच्या दीडशे करोडच्या बजेट मधे बनलेल्या या फिल्मचा त्या वेळचा बिझनेस आजच्या जमान्यात पाचशे कोटी (फक्त तिकीट बारीवर) आहे.
Gadar_2_film_poster.jpg
गदर २.० ला घेऊन जबरदस्त उत्सुकता आहे. सनीची जादू आजही कायम आहे हे चुप च्या यशावरून समजलेच आहे.
आजही " ये ढाई किलो का हाथ जब पडता है ना " सारखे असंख्य डायलॉग्ज लोकांच्या स्मरणात आहेत. गदर मधले डायलॉगज तर सनीपाजी पडद्यावर असल्यानेच खरे वाटू शकतात.

त्या वेळी गदरने वेड लावलं होतं.
तुम्हारा पाकिस्तान जिंदाबाद, लेकीन हमारा हिंदुस्तान जिंदाबार था, है और रहेगा सारखे ढांसू लायलॉग्ज, सनी पाजीचं हँडपंप उखाडून आग ओकणार्‍या नजरेनं पाहणं हे सगळंच लोकांना पुन्हा पहायचंय.

अमिताभ बच्चनची जादू ओसरत असताना जर बॉलीवूड कुणी सावरलं असेल तर ते सनीपाजीच. अँगी यंग मॅनचा उग्र अँगी मॅन झाला. सुरूवातीचा हळवा सनी आग ओकणारा युवक झाला. अर्जुन, यतीम, डकैत, घायल, जीत, घातक सारखे असंख्य पिक्चर्स सनीच्या या इमेजने तारून नेले. सनीच्या या इमेजचा फायदा घ्यायला निर्मात्यांची रांग लागायची. पण सगळेच पिक्चर्स चांगले बनत नसत. मग सनीला फटका बसू लागला.

ज्या अनिल शर्मांनी गदर बनवली त्यांचाच सनीला घेऊन बनवलेल्या स्पाय मूव्ही "हिरो" ने सनीच्या इमेजला उतरती कळा लागली. मग सनी पाजी पण भरकटले. दिल्लगी सारखे सिनेमे बनवू लागले. भावासाठी भगतसिंग बनवला. त्यात नुकसान झाले. सनी पाजी दिग्दर्शक म्हणून कधीच चांगले नव्हते. पण त्यांना ते समजले नाही. नुकसान होत असतानाही दिल्लगी बनवला, यमला पगला दिवाना बनवला आणि अजूनच खोलात गेले. त्यातून सावरता न आल्याने मग ते बॉलीवूडपासून दूर झाले.

पण अशा मॅनली हिरोंना वय, काळाचं बंधन नसतं. धर्मेंद्र पाजी तर सत्तरीतही फौलादसिंग साकारत होते. हुकूमत सारखे सुपरहीट पिक्चर देत होते. अशा बिनडोक पिक्चरचं एकमेव अ‍ॅसेट असायचं. धरम पाजी. तीच गोष्ट सनी पाजीला सुद्धा लागू आहे.

नुकताच घायल २.० येऊन गेला. सनी पाजीचं दिग्दर्शन जरासं सुधारलेलं दिसलं. पण सफाईदार नाही. पण प्रेक्षकांचं सनीवर अजून प्रेम आहे हे घायल फिरसे ने दाखवलं. मग चुपने पण ते सिद्ध केलं.

या पार्श्वभूमीवर गदर २.० अनिल शर्माच डायरेक्ट करत असल्याने जबरदस्त उत्सुकता ताणली गेली आहे. ११ ऑगस्ट रोजी पिक्चर रिलीज होत आहे . आताच ओटीटी प्लॅटफॉर्म्स कडून चढत्या क्रमाच्या ऑफर्स गदर २.० साठी येत आहेत. या फिलमचा ओटीटी राईट बॉलीवूडमधले रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

रिलीज आधीच ब्लॉकबस्टर हिट होण्यात वर्ल्ड टीव्ही राईटस आणि ओटीटी राईट्ससाठी चाललेली स्पर्धा मोठी भूमिका बजावणार आहे. तिकीट बारीवर होणारे कलेक्शन हे फक्त पुढे मोजायचे.

आपल्यापैकी बर्‍याच जणांचे पहिले प्रेम बॉलीवूड आहे. त्यावर आक्षेप नाही. पण मराठी पिक्चर्स नक्की बघा. वर्षातून दोन पिक्चर्स जास्तीत जास्त संख्येने पहा. बॉलीवूडचे प्रेम जपत जपत मराठीही पहा.

गदरची रिलीज डेट निश्चित असल्याने त्या काळात धंदा करू शकणार्‍या मराठी पिक्चर्सनी एखादा आठवडा संयम पाळावा. मेन शोज मिळत असतील तरीही या मोठ्या सिनेमापुढे रिलीज करण्याचा धोका पत्करू नये. कारण आपले मराठी पब्लीक साऊथ सारखे कट्टर नाही. एकदा गदर पाहिल्यावर दोन तीन आठवडे थेटरकडे फिरकणे होत नाही. या गोष्टींचा विचार करावा. मराठी पिक्चरने पण आता ट्रिकी व्हावं.

अर्थात सन्नी पाजी सारख्या मॅनली हिरोजची अ‍ॅक्शन पहायला मराठी सहीत सगळेच आतुर असणार यात शंकाच नाही.
त्या वेळी हँडपंप , आता काय उखडतात सनी पाजी ही उत्सुकता आहे.

पोस्टर्सवरून बैलगाडीचं चाक उचलून सनीपाजी फेकताहेत असं दिसतंय.
तोच गुस्सा, तेच आग ओकणारे डोळे, तेच ढांसू डायलॉग्ज, तीच ती अ‍ॅक्शन आणि तीच जादू अनुभवयाला उत्सुक आहे.
तुम्ही ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेलर आला. >>>

हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित आहे. गदर प्रमाणेच संवाद दिसतात. पाकिस्तान - भारत ही मांडणी पण गदर १ प्रमाणेच. विशिष्ट विचारसरणीला सुखावणारी तरी पण हमखास करमणूक आहे. पडद्यावर सनी असला कि अचाट हाणामार्‍या विश्वसनीय वाटतात. यात त्याचे नाव हथोडासिंह आहे का ?

शुक्रवार ११ तारखेची रात्रीच्या शो ची तिकीटे बुक केली.
बरेच दिवस थेटरात गेलेलो नाही. घरच्यांना तिकीट बुक करून देतो पण जमतच नव्हता योग. हा मुद्दाम जुळवला.
आज बुकींग सुरू झाले, सर्वात मागच्या सीटस फिलिंग फास्ट दिसत होत्या मग फोनाफोनी करून सर्वांच्याच तिकिटा एकदम बुक केल्या. गदर आणि लगन आम्ही सहकुटुंब, सहपरिवार पाहिले होते. आज २२ वर्षांनी पुन्हा सगळेच्या सगळे एकत्र !

एक्साईटमेंट असलेल्या सिनेमांचा दुसरा भाग तितकास जमून येत नाही असा अनुभव आहे. याला काही सन्माननीय अपवाद आहेतच. कहानी, बाहुबली तसेच प्रदीर्घ काळाने आलेला घायल हे जमले नव्हते.

गदर बाबत धाकधुक आहेच. या सिनेमाची नायक आहे ती घट्ट पटकथा - संवाद. यात फाळणीचं वातावरण ब्णि फाळणीमुळे झालेली ताटातूट हे अगदी सहज घडणारं कथानक वाटतंं. युद्ध हे जमवून आणलेलं वाटतंय. युद्ध झालं हे खरं असलं तरी. तरी सांगता येत नाही.
टोणगा पण होईल किंवा गुंडा होईल... रात्री दीडला सिनेमा सुटल्यानंतर भटकायची आठवण ताजी करायचीय. ते जमणार का ?

व्हिवीआना मध्ये प्रमोशन म्हणून गदर बॅनर च्या समोर हँड पंप ठेवला आहे. उद्या जाईन तेव्हा फोटो काढेन.

अश्विनीमामी, फोटोंबद्दल धन्यवाद. या फोटोंमुळे उत्सुकता अजून वाढली.

गदरच्या बरोबरीने ओएमजी २ ( ओ माय गॉड - २) सुद्धा प्रदर्शित होतोय. त्यामुळे लगान आणि गदर सारखा सामना रंगणार का ?
पण गदरची हवा जबरदस्त आहे. आतापर्यंत पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग मधून रु. ३.३० कोटी अशी जबरदस्त स्टार्ट गदरने घेतलेली आहे. हा आकडा रु १० करोड पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

ओएमजीने आतापर्यंत रु. ६५ लाख एव्हढी स्टार्ट घेतली आहे. गदरने ओएमजी पेक्षा लाखभर तिकीटे जास्त विकली आहेत.
अक्षयकुमारला सध्या एका हिटची नितांत गरज आहे. अशा वेळी गदरच्या जोडीने ओएमजी सारखा हमखास यशस्वी फॉर्म्युला असलेला चित्रपट रिलीज करणे बरोबर आहे का ?

सन्नी देओल जेव्हां त्याच्या इमेजला साजेशा चित्रपटातून येतो तेव्हां त्याला रोखणे अशक्य असते . त्याचं वय, त्याने घेतलेली गॅप याने काही फरक पडत नाही. सनी इतकीच गदर या चित्रपटाचीही क्रेझ आहे. पुन्हा ते जळजळीत जळजळीत, सनीचे बेंबीच्या देठापासून ओरडणे, ढाई किलो का हाथ, उचल कि फेक हे सगळं पहायला लोक उत्सुक आहेत. हथोडा छाप अ‍ॅक्शन सिक्वेन्स मधे या वेळी हथोडाच आहे. त्याला गनच हवी असं काही नसतं. गेल्या वेळी हॅण्डपंप उखाडला होता.

लाहोर शून्य आणि सनीचा पाय हे दृश्य टाळ्या आणि शिट्या घेणारं आहे.

मी आधीही म्हटले होते, सध्या जी पब्लीक चित्रपट हीट करते, वय 15 ते 35, त्यांना गदर आणि सनी देओल बद्दल अजिबात ममत्व नाही, आणि अनिल शर्मा नी गेल्या कित्येक वर्षात बरा चित्रपट देखील दिग्दर्शित केला नाही, त्यामुळे गदर 2 अजिबात चालणार नाही.

२००१ मध्ये सनी देओल खरोखर पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तिथल्या लोकांना मारून आला होता. म्हणून पाकिस्तानी लोकं आता घाबरून आहेत.

साधा माणूस यांच्याशी सहमत आहे.

माझ्या वैयक्तिक मते हा सिनेमा गदर 1 च्या पॉप्युलॅरीटीला कॅश इन करून अनिल शर्मा चा आपल्या पोराला रिलाँन्च करायचा प्रयत्न आहे.

ढाई किलो का हाथ हा डायलॉग आजही लहान पोरांना सुद्धा माहिती आहे.
शोलेचे डायलॉग्ज आजच्या मुलांना माहिती आहेत.
खान सुद्धा साठीला आलेत. सनी त्यांच्या पेक्षा सात वर्षांनी मोठा आहे.
गदर - २ चं घोडामैदान जवळच आहे.
पहिल्या दिवशी ५० कोटीच्या जवळपास ओपनिंग होईल.
पाच दिवसात १५० कोटी.
हा सिनेमा झी स्टुडिओ ची निर्मिती आहे.
त्यामुळे टीव्ही आणि ओटीटी हक्काचा व्यवहार होणार नाही.

नाहीतर पहिल्या आठवड्याची कमाई ३५० ते ५०० कोटी रू दिसली असती.

एखाद्या चित्रपटाचे किंवा अभिनेत्याचे एजंट असल्याप्रमाणे बिनापगारी प्रमोशन करण्यात अर्थ नाही. गदर २ ची हवा आहे आणि माझ्यासारख्याला घरातून थेटरपर्यंत तिने खेचून नेले इतकेच. प्रत्यक्षात खूप हवा झालेला सिनेमा अपेक्षापूर्ती करू शकेल का ही भीती असतेच. कदाचित ट्रेलरमधे दाखवलेय तितकेच हायपॉइण्ट असतील, कदाचित इतक्या वर्षांनी तो फॉर्म्युला पुन्हा गसवणार नाही.

जर भट्टी पुन्हा जमली तर इतक्या दिवसांनी थेटरात जाऊन सिनेमा पाहिल्याचा पश्चात्ताप होणार नाही इतकेच. किमान पठाण, ब्रह्मास्त्र थेटरला पाहिले नाहीत हे त्यतल्या त्यात समाधान आहे. हिरानीच्या डुनकी च्या वेळी पुन्हा रिस्क घेऊ शकेन.

येक मानुस कसआ काय दुसर्या देशात तमाश करुन येईल
>>
जसा टायगर नी बागी 3 मधे अन् विद्युत नी जवळपास सगळ्या सिनेमात केला होता तसा

गदरने पठाणला मागे टाकले

गदरच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगने पठाणचं रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड बनवलाय. अजून तीन दिवस बुकींग चालू आ,,
१,८२,००० तिकीटे विकून आता गदर पहिल्या नंबरवर आहे.
https://www.ndtv.com/entertainment/the-gap-between-gadar-2-and-omg-2-adv...

पठाण , केजीएफ २, बाहुबली २ हे उतरत्या नंबरने आहेत.
https://boxofficeindia.com/report-details.php?articleid=7906

ओएमजी २ ची २५००० तिकीटेही गेलेली नाहीत. रॉकी और रानीचे शोज गदर साठी उतरवणार आहेत.

गदर २ चा अ‍ॅडव्हाण्टेज म्हणजे सिंगल स्क्रीनवर मोठ्या संख्येने शोज आहेत. तिथे अ‍ॅड. बु. नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी किमान ३० कोटी ते ५० कोटी एव्हढी ओपनिंग गदर २ घेणार हे निश्चित झाले आहे.
सिंगल स्क्रीनच्या तिकीटांचे दर कमी असतात. पहिल्या दिवशी विकली गेलेली एकूण तिकीटे याबबतीतही गडर २ नवीन रेकॉर्ड बनवणार आहे.

मा़झा आयडी नाही हा. Lol
माझ्या नावावर खपवला तरी माझी हरकत नाही, च्र सर ! Wink

ढपंस उर्फ रघु आचार्य, काहीही बोलत आहेत

नवीन Submitted by Sadha manus on 9 August, 2023 - 12:42 >> Lol

माझ्या नावावर खपवला तरी माझी हरकत नाही, च्र सर ! Lol
च्रप्स सरांचा आहे का हा आयडी ? त्यांनी माझा एक धागा विनाकारण उडवला. एका धाग्याला कुलूप लावले आणि ग्रुप ऑडियन्सपुरता केला. राजकीय नसुन. त्यानंतर ते अ‍ॅडमिन आहेत हे सांगितलं म्हणून खुन्न्स काढताहेत आता. Happy
च्रप्स हे झंपु दामलु आहेत असे काही लोक सांगतात त्या कमेण्ट्स क्षणात उडतात त्यामुळं कळलं. Happy

आता आयडी उडवायचा असेल त्यांना.

च्रप्स सरांना विनंती
जसे तुम्ही शाहरुखचे धागे चलवता तसे गदरच्या फॅन्स साठी गदरचा पण धागा काढा.
तुम्ही काढणार नसाल तर हा धागा उडवू नका. ग्रुप ऑडियन्स पुरता करू नका.
तुम्हाला पटले नाही तर धागा भरकटवू नका.
मागच्या माझ्या धाग्याचा विषय होता चित्रपट बघायचे आकर्षण कमी झाले आहे का ?
त्यात तुमच्याच ड्युआयड्यांनी गोंधळ घातला आणि तो धागा तुम्ही लॉक केला.
सर, इतरांना पण जगू द्या प्लीज.
माझ्यावर कसली खुन्नस धरताय हे मला माहिती नाही. Happy

अरेच्चा ! च्रप्स, इथेही माझे नाव का घेताय ? मी तुम्हाला अ‍ॅव्हॉईड केले आहे.
नेमका कोणत्या कारणासाठी द्वेष करताय हे समजेल का ? असो.

कालचे सगळे शोज हाऊस फुल्ल होते. पब्लिक बाहेर हॅण्डपंप शेजारी फोटो काढून घेत होते. बहुतेक मुद्दामून ठेवलेत.
सिनेमा सुरू झाल्यावर दंगा करत सीटस शोधणे, त्या गोंधळात पहिली पाच ते दहा मिनिटे स्क्रीन च्या मधे या पब्लीकचा अडथळा होत होता. पण त्यांना काही सांगितले नाही हे चांगले झाले. कारण नंतर खूप हैदोस घातला. झेंडे आणले होते. टाळ्या, शिट्ट्या ठीक पण पब्लीकचा रागरंग ठीक वाटत नव्हता. सिनेमा सुटल्यावर दारूचा भपकारा आला.

दंगा करत सीटस शोधणे, त्या गोंधळात पहिली पाच ते दहा मिनिटे स्क्रीन च्या मधे या पब्लीकचा अडथळा होत होता. पण त्यांना काही सांगितले नाही हे चांगले झाले. कारण नंतर खूप हैदोस घातला. झेंडे आणले होते. टाळ्या, शिट्ट्या ठीक पण पब्लीकचा रागरंग ठीक वाटत नव्हता. सिनेमा सुटल्यावर दारूचा भपकारा आला.
>>> फ़ुटबाँल मॅच चे वर्णन वाटतेय...... मला पण असे टेलगेटिंग करायची इच्छा आहे...

ओ एम जी ला ठरवून फ्लॉप केले जात आहे का ? सेक्स एज्युकेशन हा एका ठराविक विचारसरणीला न आवडणारा विषय आहे. तसेच अक्षयकुमारच्या या सिनेमात धर्म, देव यावरचे भाष्य यामुळे एके काळच्या भक्तांच्या फेवरेट हिरोला ट्रोल केले जात आहे.

गदर का चालतोय याची कारणे चिंताजनक आहेत. व्हॉट्स अ‍ॅप वर जी क्लिप फिरतेय, त्यामुळे काही लोकांचा हिंसक द्वेष उफाळून येतोय. त्यात एक पाक अधिकारी गीता या कुराण असे एका पंडीताला विचारतो, त्यानंतर पंडीत आपल्या छोट्या मुलीला गीतेवर ठेवतो. तो पाक अधिकारी तलवार चालवतो आणि रक्त उडते. त्यानंतर सनी देओल च्या हातात त्या अधिकार्‍याचे लहान मूल आहे, सनीने ते हातात आडवे धरले आहे आणि दुसर्‍या हाताने डोकं धरून ते पिरगाळण्याचा अविर्भाव आहे. या अशा सीन्सने काही लोकांचे पित्त खवळले आणी दंगली झाल्या तर ?

गदर १ च्या वेळीही जखमेवरच्या खपल्या काढण्याचा प्रकार अशी टीका झाली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सेन्सॉर बोर्डाने एकही संवाद न हटवता रिलीज केला. त्या वेळी भाजपची सत्ता होती. निवडणुकीला वर्षभर अवधी होता . या पिक्चरचा फायदा होईल असा कयास होता.
आताही भाजप सरकार आहे. निवडणुकीला सात आठ महीने आहेत.

२००४ चा इतिहास रिपीट होणार का ?

सामना तुमच्या मताशी सहमत. पाकिस्तानी लोकांनी १९४७ ला हिंदूंना मारले असेल तर ते दाखवायची काय गरज होती. उलट पाकिस्तानी लोकांनी हिंदूंना वाचवलं कस हेच दाखवायला पाहिजे. म्हणजे हिदू मुस्लिम ऐक्य वाढल असत. सनीच्या पोराला पाकिस्तानी अधिकाऱ्याने पकडलं तर सणी ने उपोषणाचं करायला पाहिजे होत. किती हा मुस्लिम द्वेष. मी तर म्हणतो पाकिस्तानी अधिकारी हा हिंदूच दाखवायला पाहिजे होता तो ही एकदम चांगला. आणि सनी देओल ला एक भारतीय हिंदू अधिकारी कसा त्रास देतोय हे दाखवायला पाहिजे. आणि त्याला मदत करायला मात्र भारतीय मुस्लिम अधिकारी पाहिजे होता. फळणीही हिंदू मुळेच झाली हे पण दाखवायला हवे.

Pages