तिच्या आवडीचं...!

Submitted by छन्दिफन्दि on 20 July, 2023 - 02:53

आज कपाट आवरताना जुन्या फोटोंचा अल्बम सापडला. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना अत्यंत लाडका फोटो समोर आलाच, सोळा वर्षांपूर्वीचा. मांडीत घेतलेला सव्वा महिन्याचा सुदृढ हसरा कान्हा, हिरवीगार पैठणी, डायमंडचे कानातले आणि फुललेल्या चेहर्यावरचे कृतार्थ भाव. पहिल्या मुलाच्या बारशाला तिने हौसेने ठरवलेला हॉल, उत्तम कॅटरिंग, कान्ह्याला आईकडे सोपवून एका तासात घाईघाईने एकटीने केलेली पैठणी खरेदी.. किती तरी दिवसांनी होत होतं अगदी तिच्या मनासारखं!
***
चौविसावं लागलं तेव्हाच तीचं लग्न ठरलं. घरातलं पहिलच कार्य. आज्या, मावश्या, आत्या , काका , काकू सगळ्यांच्या उपस्थितीत साखरपुड्याची, लग्नाची तारीख ठरली. महिन्याभरात साखरपुडा पुढच्या दोन महिन्यांनी लग्न.
“अगं ह्या रविवारी सकाळी साखरपुड्याची साडी घ्यायला जा तुम्ही दोघं. तुझ्या आवडीची घे छान!”
”उत्सव मध्ये जावू?”
“हो जा ना!” तिची कळी खुलली. दागदागिन्यांची, कपड्यालत्तायाची तिला फार हौस होती असं नाही. पण ती चिकित्सक मात्र होती.
आई-आजी सुद्धा, “वा वा! मंडळी हौशी आहेत, साखरपुड्याची साडी ती काय? पण तरीही मुलीच्या आवडीचा विचार.
”रविवारी सकाळी दोघांनी जावून छान मरून रंगाची वल्कलम् घेतली. दुपारी सासूबाईंच्या फोन
“अगं, ताई आलिये तर जरा संध्याकाळी दुकानातच भेट.”
दुकानात, “मरून रंगाचा ना जनरली शालू घेतात लग्नात !”
” बघू हो जरा अजुन साड्या” हो नाही करत मरुन वल्कलम् कॅन्सल होऊन शेवटी मोरपिशी रंगाची साडी फायनल झाली. म्हणा तशी ही पण चांगली होती.
“पुढच्या रविवारी अंगठी आणि दागिने करायला टाकूयात, छगनलाल & सन्स मधे भेटूया. तुझ्याच पसंतीने करु सगळं”
”संस्कृतीमध्ये का नाही? तिकडे किती छान डिझाईन्स असतात. छगनलाल काय पकाऊ,” घरी आल्यावर तिची कुरकुर सुरू झाली.
“अगं सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी सगळे आपल्या विश्वासू सोनाराकडेच करतात. समजून घे ना जरा” आईची दटावणी.
छगनलाल आणि सन्स मधे सगळी जुनी ढबोळी डिझाईन्स, काय आणि कसं सिलेक्ट करावं?
” मंगळसूत्र चांगल घसघशीत घे नाही तर नाजूक डिझाईनचं अडकून वाढवतं.” ताई उवाच
लंगेच त्यातल्या त्यात आवडलेलं झिरो साइझ मण्यांचं साधसं मंगळसूत्र तिला नाईलाजाने ठेवून द्याव लागलं.
”बांगड्या सहा तोळ्यांच्या करुन टाका” हिशोबाल्या पक्क्या सासूबाईंची सोनाराला सुचना.
”डायमंड, स्टोन्स लाभतं नाही लाभत नकोच ते. तू आपली सोन्याचीच अंगठी घे.” तिला अजून एक सूचना.
”‘किती ते नाजुक डिझाईन, चांगली घसघशीत करा हं अंगठी” ही सूचना सोनाराला.
शेवटी तीन तासांनी सगळ्यांच्या सोयीनुरुप (ठसठशीत, घसघशीत आणि बोजड) दागिने खरेदी आटोपल्यावर,” काय खुश ना?” ” वा! वा! छान मनासारखी झाली ना खरेदी? ” ह्या सासू-नणंदेच्या अवघड प्रश्नांना “कोणाच्या?” हा (खोचक) प्रतिप्रश्न गिळून टाकताना तिची झालेली तारांबळ . आठवणींने सुद्धा हसू आल चेहर्यावर.
***
आता मुख्य खरेदी साड्यांची!
मस्त हिरवीगार पैठणी, आंबा कलरचे काठ, पदरावर नाचरा मोर मनात चित्र पक्कं होतं.
”उत्सव मधेच जायचं ना?” तिचा उत्साही प्रश्न.
“छे छे. मस्त दादरला जाऊयात. ताईचं स्पेशल दुकान आहे मोठं नेहमीचं. तुला पण आवडतील बघ तिकडे साड्या.”
ती, सासूबाई, ताई, चुलतताई आणि एक-दोघी पोहोचल्या दादरच्या त्या तीन मजली दुकानात. धीर करून तिने सुतोवाच्य केले, “मला शालू नकोय, पैठणी घ्यायचीय.”
” अगं पैठणी काय कधीही घेशील, खूप निमित्तं मिळतील नंतर. आत्ता मस्त शालूच घे.”” नंतर कधीतरी कारण काढून घेण्यापेक्षा आता माझ्या लग्नात माझ्या आवडीचं घेऊ देत ना मला…”वगैरे वगैरे मनातील वाक्य ओठावर काही पटकन आली नाहीत.
तोपर्यंत ताईच्या सांगण्यावर हुकूम दुकानदाराने शालू दाखवायला सुरुवात केली. ते भरजरी मोठे काठ, मोठे बुट्टे काहीच पसंतीस येईनात. कंटाळून जरा बाजूला नजर टाकली तर बाजूच्या गिऱ्हाईकाला दाखवत असलेला एक हिरवागार शालू त्याचे अगदी नाजूक छोटे काठ आणि अंगभर विखुरलेल्या छोट्या चांदण्या अगदीच मनात भरल्या. हळूच किंमत बघितली, अरे बापरे आता बघत असलेल्या साड्यांच्या दुप्पट किंमत आहे. “कोणाकडे काही मागायचे नाही, उगाच हावरटपणा करायचा नाही” हेच बाळकडू मिळाल्याने ती पटकन वळून परत ह्या घोळक्यात सामिल झाली. मग उगाच आपला त्यातल्या त्यात बरा निळा जर्द शालू घेतला. इतर खरेदी ही अशीच आटोपली.
***
दोन वर्षांनी झालेल्या कान्हाच्या बारशाला मात्र तिने आधीच छान तयारी (अगदी आर्थिकही) केली होती.
एक एक तास काढून आई-सासूबाईंना सुंदर साड्या घेतल्या, कधीची मनात भरलेली हिरवीगार पैठणी घेतली. तिला पसंत असलेला, उत्कृष्ट कॅटरींग असणारा हॉल बुक केला. नवर्याने, तिने दोघांनी कधीतरी विंडो शॉपिंग करताना आधीच बघून ठेवलेले डायमंडचे इअरींग गिफ्ट करून अजुनच रंगत आणली.
कितीतरी दिवसांनी खरचं सगळं तिच्या मनासारखं जुळून आलं होतं.
सर्वार्थाने लाडक्या त्या फोटो मध्ये ती हरवून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं , ज्यांना आवडतील कथा त्यांना देऊ देत प्रतिसाद / कथा आवडेल तेव्हा देऊच जरूर प्रतिसाद असा विचार वाचकांकडून होण्याची शक्यता आहे .>>> हा मुद्दा ही बरोबर आहे.
बर्याच वेळेला आवडल नाही म्हणून मुद्दाम तसे सान्गावेसे वाटत नाही, आणि तेच जास्त योग्य वाटते.

कधी कधी एखादा विषय / गोष्ट कोणाला रिलेट होत नाही तोही एक मुद्दा महत्वाचा !

@रघू आचार्य - खरंतर हा वाचकांच्या मर्जीचा प्रश्न आहे, हे मलाही समजतं पण भावनेच्या भरात माझ्या मनात जे आलं ते लिहीलं. मात्र त्या भावना खऱ्या होत्या. त्यांची अशी अतिशयोक्ती करून खिल्ली उडवायची गरज नव्हती.

@ छन्दिफन्दि - hahah माफ करा. तुम्ही लेडीज सुद्धा असू शकता असा विचारच मनात आला नाही.

हिंदी चित्रपट संगीत प्रवास वरच्या सुरुवातीच्या
कमेंट्स अगदी सहज , मवाळ सुरातल्या होत्या . त्यावर
लेखकाने पहिल्यांदा निष्कारण वाद उकरून
काढायचा असल्यासारख्या प्रतिक्रिया दिल्या .
त्यानंतर जी काही चर्चा झाली ती झाली. >>> अच्छा !! मी वाद उकरून काढायचा असल्यासारखी उत्तरे दिली, आणि मलाच कसं ठाऊक नाही. जरा सांगण्याचे कष्ट कराल का मॅडम माझी अशी कोणती कमेंट होती, ज्यामुळे ' वाद उकरून निघाला.' आणि हे असे वाक्प्रचार काही विशिष्ट परिस्थितीत वापरतात. उठसूट कुठेही काहीही लिहीलं की झालं असं नाही होत. आणि आपण तर कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही, मग आता माझ्यावर निष्कारण, आक्रमकपणे टीका करणाऱ्यांचं का समर्थन करताय ? मुळात नक्की लेख काय होता हे तरी माहितीये का ? की उगाचच आपलं उचलली बोटं...

प्रका - काही समजले नाही. मी तुमचे नाव सुद्धा घेतले नाही. हा धागा तुमचा नाही.
माझा अनुभव लिहायला पण तुमची परवानगी लागणार आहे का?
माझा हा तुम्हाला पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.

लेख वाचणाऱ्यांवर प्रतिक्रिया देणे बंधनकारक नाही , आधी प्रतिक्रिया दिली असेल तरच नंतर देता येईल असाही इथला नियम नाही आणि प्रतिक्रिया न देता नुसतं वाचन करणारे त्यामुळे चालू विषयाची व्यवस्थित माहिती असलेले इथे बरेच लोक आहेत याची लेखकाने नोंद करून घ्यावी , याआधी माहीत नसल्यास .

हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा मूर्खपणा मलाच करायचा होता , हे त्याचं फळ . असो . आता कानाला खडा .

असो . आता कानाला खडा. >> हो. उगाच काहीच्या काही प्रतिक्रिया देण्यापेक्षा हे बरं. आणि चालू विषयाची माहिती होतीच तर माझी अशी कुठली कमेंट होती, ज्यामुळे वाद उकरला गेला हे सांगायचं धैर्य का होत नाहीये.

@रघू आचार्य - फक्त अनुभव सांगण्याच्या उद्देशाने कमेंट केली असेल तर मग बरोबर आहे ; पण मी जे लिहीलं त्या संबंधितच अशी कमेंट दिसल्यामुळे तसा गैरसमज झाला. कुणाचाही होऊ शकतो ; पण अशा वेळी सेन्सिबली misunderstanding दूर करून नीट आपला उद्देश स्पष्ट करावा. कारण माझा गैरसमज व्हायलाही आपली कमेंटच कारणीभूत आहे. उगाच ' समोरच्याला तर वाद घालायला कारणच लागतं,' अशा अर्थाची उत्तरे कशाला द्यायची ? असो मलाही हौस नाही अनोळखी व्यक्तीशी बोलायची.

एकंदरीत दोघांचाही ' आपण फक्त आपला विचार मांडत होतो किंवा अनुभव लिहीत होतो. समोरचाच कुणीतरी वेडा किंवा भांडण्याची हौस असणारा दिसतो, ज्यामुळे कशाचाही काहीही अर्थ लावून कमेंट करतोय ' असाच सूर दिसतो ; पण मी कुणी वेडाही नाही आणि मला निष्कारण वाद घालायचीही हौस नाहीये. आपणच काय लिहीतो, लिहीताना काय शब्द वापरतो, त्यांचा काय अर्थ निघू शकतो, या गोष्टींचा विचार करून कमेंट करावी. कुणी इतरांचं उगाचच बाजू घेऊन काहीही ऐकवत आहे, तर कुणी स्वतःच गैरसमज होऊ शकेल अशी कमेंट करून त्याच्या समर्थनार्थ उद्धटपणे दुरूत्तरे करत आहे.

@छन्दिफन्दि - माफ करा मॅम. आपल्या कथेच्या कमेंट्स सेक्शन मध्ये मी अशी प्रतिक्रिया दिली आणि वेगळाच विषय सुरू झाला. वाढत्या कमेंट्स पाहून आपण उत्सुकतेने चेक करत असाल आणि आपला भ्रमनिरास होत असेल. यात माझीच चूक झाली, त्याबद्दल सॉरी ; पण आपली चूक मान्य करायची सोडून कुणी मलाच उलट उत्तरे देत असेल, काहीही ऐकवत असेल तर माझाही नाईलाज आहे.

मला वाटलं तिच्या आवडीचं मध्ये काही विशेष चर्चा पेटलीये का.. पण भ्रमनिरास झाला Lol
काहीतरी social conditioning, feminism किंवा संस्कार असं काही असतं तर मजा आली असती वाचायला. मस्त वादावादी होऊ शकली असती.
: फेसपाम:
- एक निराश झालेली माबोकर
प्रेरणा च्या धाग्याने शतक पार केले असते. पण काय आता!

@रघू आचार्य - फक्त अनुभव सांगण्याच्या उद्देशाने कमेंट केली असेल तर मग बरोबर आहे ; पण मी जे लिहीलं त्या संबंधितच अशी कमेंट दिसल्यामुळे तसा गैरसमज झाला. Happy
कुणाचाही होऊ शकतो ; पण अशा वेळी सेन्सिबली misunderstanding दूर करून नीट आपला उद्देश स्पष्ट करावा. कारण माझा गैरसमज व्हायलाही आपली कमेंटच कारणीभूत आहे. Proud
उगाच ' समोरच्याला तर वाद घालायला कारणच लागतं,' अशा अर्थाची उत्तरे कशाला द्यायची ? Lol
असो मलाही हौस नाही अनोळखी व्यक्तीशी बोलायची. Lol Proud

एकंदरीत दोघांचाही ' आपण फक्त आपला विचार मांडत होतो किंवा अनुभव लिहीत होतो. समोरचाच कुणीतरी वेडा किंवा भांडण्याची हौस असणारा दिसतो, ज्यामुळे कशाचाही काहीही अर्थ लावून कमेंट करतोय ' असाच सूर दिसतो ; Rofl
पण मी कुणी वेडाही नाही आणि मला निष्कारण वाद घालायचीही हौस नाहीये. आपणच काय लिहीतो, लिहीताना काय शब्द वापरतो, त्यांचा काय अर्थ निघू शकतो, या गोष्टींचा विचार करून कमेंट करावी. Lol Rofl Biggrin
कुणी इतरांचं उगाचच बाजू घेऊन काहीही ऐकवत आहे, तर कुणी स्वतःच गैरसमज होऊ शकेल अशी कमेंट करून त्याच्या समर्थनार्थ उद्धटपणे दुरूत्तरे करत आहे. Biggrin Lol Rofl Lol Lol Biggrin Biggrin Biggrin

Submitted by किल्ली on 9 August, 2023 - 05:1 >>>> छान वाटलं तुला कॉमेंट करताना बघून. मी गेल्या काही दिवसांपूर्वी पण बघितलेल्या पण घाईत सांगायचं राहून गेलं.

Pages

Back to top