अमेरीकेतील सर्व मराठी चित्रकारान्करता...

Submitted by छन्दिफन्दि on 22 July, 2023 - 13:38

सप्रेम नमस्कार,
पुढील वर्षी, जून २०२४ मध्ये बे एरिया, कॅलिफोर्निया, होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त निघणाऱ्या स्मरणिकेसाठी मुखपृष्ठ स्पर्धा जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. स्मरणिकेचा विषय मुखपृष्ठमधून प्रतीत व्हावा अशी अपेक्षा आहे. मुखपृष्ठाकरता फक्त चित्र अपेक्षित आहे. स्मरणिका शीर्षक आणि घोषवाक्य मुखपृष्ठावर घालण्याचे काम स्मरणिका टीम करेल.

ही स्पर्धा उत्तर अमेरिका आणि कॅनडा मध्ये रहाणाऱ्या सर्व मराठी लोकान्साठी खुली आहे. तरी आपण आपल्या ओळखीच्या चित्रकारान्पर्यन्त ही बातमी जरुर पोहोचवा.

रोख पारितोषिक - $251
स्पर्धेच्या अटी:
विषय: मराठी माणसाला अमेरिकेचा रंग; अमेरिकेला मराठी माणसाचा रंग
स्मरणिका शीर्षक: झेप
स्मरणिका घोष वाक्य: गाठलय थेट गोल्डन गेट
प्रतिमा परिमाण (image requirements) :
Dimensions: 8.75 inches x 11.5 inches
Resolution: 300dpi
Format: standard image formats – tiff, jpg, etc.
Max file size: 100MB
स्पर्धेचा कालावधी: जुलै ०१, २०२३ – ऑगस्ट १५, २०२३

अधिक महितीसाठी खालील पत्त्यावर सम्पर्क करावा.
smaranika@bmm2024.org

or
visit: https://bmm2024.org/mukhaprushta-spardha/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users