Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशुतोषला पहिल्यापासून पुस्तकी
आशुतोषला पहिल्यापासून पुस्तकी संवाद आहेत आणि तो बोलतो मी तसेच.
नवीन संवादलेखक तर तत्वज्ञान, उपमा यांचा भडिमार करतोय.
ईशा अनिशवर बोलताना अरुंधतीने तुमच्या पिढीला पेशन्स नाही असं जनरलायझेशन केलं . बाई, तू अन्घाच्या डोहाळजेवणात राडा केलास, तेव्हा कुठे होता पेशन्स? सारखं हेच करतात.
अनिरुद्धला statue केल्यासारखे मध्येच उभं करून ठेवलं होतं. कठड्याशी तरी उभं करायचं
अमांसाठी आजच्या भागाचा
अमांसाठी आजच्या भागाचा वृत्तान्त.
सकाळी अनिश सोफ्यावर झोपलेला. आधी अरुंधती येते. त्याला पांघरुण घालते. मग आजीबाई = सुलेखाताई. अरुंधतीला साक्षात्कार होतो की मुलं खूप जबाबदारीने वागताहेत. आपले आधीचे मत चुकीचे होते. याचा मला जो अर्थ जाणवला तेच तिला म्हणायचे होते का माहीत नाही. ईशाला त्या रूममध्ये कम्फर्टेबल वाटावं म्हणून हा इथे झोपला असं ती पुढे म्हणाली. मग आशुबाळ येतो आणि तिघांची सोफ्याशी कॉन्फर्न्स. सुलेखाताईंना हे सगळं अनिशच्या आईवडिलांना कसं सांगायचं याचं टेन्शन. आशुबाळ म्हणतो, मी सांगितलंय. काल त्याचा फोन आला होता. मग मी त्याला फोन केला. (म्हणजे त्यांनी मिस्ड कॉल दिला होता का? बॅल न्स संपला होता का? बिझिनेसमन प्रिपेड सिम वापरतो का?)
तो सांगतो की अनिशच्या बाबांनी नवपरिणित जोडप्याला लगेच इंदूरला बोलावले आहे. हे वाक्य ऐकताच अनिशचे डोळे खाडकन उघडतात. त्याला इथेच करियर करायचं आहे (दुसरा अरुण दातेच की नाही?) यशबरोबर काम मिळतंय (बरं!)
तेवढ्यात ईशा येते आणि हे सगळे तिच्याकडे भूत दिसल्यासारखं बघत राहतात. आशुबाळाच्या चष्म्याचा नंबर वाढला असणार. तो चष्म्यातून पण डोळे बारीक करून बघतो. कारण ईशा साडी नेसली आहे. मग ईशा दुसरा बाँब टाकते. ती चहा करणार आहे. अरुंधती विचारते तुला चहासाखरेचे डबे माहीत नसतील. तर ईशा म्हणे माहीत आहे. मी अनेक वेळा इथे आले आहे. केव्हा? घरी अनिश शिवाय कोणी नसताना? इथे माझ्या डोक्यात जो प्रश्न आला तो अरुंधतीच्या डोक्यात आला नाही. खरं तर अरुंधतीने सुद्धा त्या घरात पहिल्यांदा आली तेव्हा चहा केला होता हे प्रेक्षकांच्या आणि विशेषतः मायबोलीकरांच्या लक्षात असेल. पण खुद्द अरुंधतीच्या लक्षात नाही. मग कॅमेरा किचनकडे जातो तर ईशा गॅसवर पॅनमध्ये पोहे परतताना दिसते. आणि प्लेट्स मध्ये घेऊन येते. रोज अंथरुणातून चहा कॉफीची ऑर्डर आणि नाश्त्याची फर्माइश करणारी मुलगी स्वतः चहा करणार म्हणून अरुंधती आधीच थक्क झाली आहे. त्यात ही पोहे करायला कधी शिकली? तर आत्ताच , यु ट्यूबवर (मधुराज रेसिपीची
प्रॉडक्ट प्लेसमेंट करायची संधी का सोडली?) आशुबाळ आणि सुलेखाताई (ही ईशाने सुलेखाताई न म्ह णता आजी म्हणाल्याने आधीच मोहरली आहे - अरुंधती - शीक जरा मुलीकडून. सासूला ताई म्हणते आणि सुनेकडून ताई म्हणवून घेते. अनीश काकी कम सासूला मॅम म्हणतो). लगेच छान झाले म्हणून सांगतात. पण अरुंधती आधी फूटेज खाते मग पोहे खाते. अनीश कोमात गेल्यासारखा बसला आहे.
त्याला इंदूरला जायचं नाहीए ( तिथे कोणाला लग्नाचं वचन दिलं असेल का? की असंच गुपचूप लग्न करून मुंबईला पळून आला असेल? पुढे जाऊन ट्विस्टची आणि वेगळ्या ट्रॅकची सोय) त्यामुळे ईशा जरा खट्टू आहे. त्यात काल अनीशने वडिलोपार्जित संपत्ती मी घेणार नाही म्हणून धक्का दिला आहे). आशुतोष अनीशला तू अजून तुझ्या आईवडिलांना लग्न केल्याचं कळवलं नाहीस याची आठवण करून देतो. काल घरात शिरताच हे सांगितलं होतं ना? हवं तर त्यांना इंदूरला जाऊन समजाव. पण अनीशला भीती की इंदूरला गेलं की ते परत पाठवणार नाहीत. मला वाटतं त्याला इंदुरी पद्धतीचे पोहे आवडत नसावेत किंवा पोहेच आवडत नसावेत आणि ईशाने पहिल्याच दिवशी पोहे केले.
तिकडे देशमुखांकडे अप्पांच्या अंगात ईशाला द्यायचा आशीर्वाद आला आहे. त्यासाठी कांचनही सोबत हवी आहे. अनिरुद्ध शेजारच्या घरात वाजणारं गाणं ऐकून ईशा ईशा अशा हाका मारत सुटतो. पण ईशाला माफ करायचं नाही यावर तो ठाम आहे.
कांचन म्हणते इनफ इज इनफ . आता मी सगळी सूत्रं हाती घेते. दरवर्षी टिटॅनसचा डोस घ्यावा तसं घरात थोड्या थोड्या महिन्यांनी काहीतरी मंगल / धार्मिक कार्य केलं पाहिजे असं कांचनला वाटतं. म्हणून श्रावणातली पूजा घालायची आहे. अन्घा पूजेला अनीश ईशाला बसवा म्हणून आगाऊपणा करते. पण त्यांचं रीतसर लग्न झालेलं नाही. म्हणून अभि अन्घाच फायनल.
प्रोमो - केळकरांकडे पण अनीश ईशाचं नीट लग्न लावून द्यायचा बेत शिजतोय. ईशा खुष . मला मस्त भारी दागिने करायचेत. मिरवायचंय. समजूतदरापणा एकाच एपिसोडपुरता होता. अरुंधती आम्ही म्हणू तसंच लग्न होईल असं तिला अनिरुद्धच्या आवाजात सांगते. हिच्या लग्नाच्या खरेदीसाठी पीएन्जी मध्ये गेले होते ना?
अप्पांच्या अंगात ईशाला
अप्पांच्या अंगात ईशाला द्यायचा आशीर्वाद >>>
भरत... त्याला इथेच करियर
भरत...
त्याला इथेच करियर करायचं आहे (दुसरा अरुण दातेच की नाही?). हे वाचून फारच हसू आले...!!!!!!
मस्त कमेंट.
अरुंधती ने ही इम्प्रेशन पाडायला चहा केलेला.....!!!! आणि असे न विचारताच पोहे काय? आणि तोपर्यंत हे बाकीचे लोक नुसतेच बसून होते ढिम्म...?
ती पोहे करतेय हे लक्षात नाही आलं?.. इतकं सरप्राइज व्हायला? तिथे तर होती चार हात अंतरावर ......
अनिश आधी ईशा ला सांगतो
अनिश आधी ईशा ला सांगतो बाबांचा फोन आलेला, आपल्याला जावं लागेल इंदोर ला. नंतर त्याच्या चाचू ला बोलतो मला फोन करायला भीती वाटतेंय.
नक्की काय समजायचं.
बाबांचा फोन आलेला..म्हणजे
बाबांचा फोन आलेला..म्हणजे चाचू ला फोन आलेला...
आणि अनीश ला सोफ्यावर इतकी गाढ झोप लागली?
अनीश एकूणात गोंधळलेला दिसतो..... व्हॉट आय डिड इज करेक्ट ऑर नॉट... अशा विचारात...!!
कारण ईशा अगदीच त्याच्या गळ्यात आहे व जराही इंडिपेंडंट नाही...
अरुंधतीला वाटते आहे की .....की मीच तर आत्ता आत्ता या घरात प्रवेश केला ...तर आता लगेच ही...!!
मस्त लिव्हले आहे भरत मेनी
मस्त लिव्हले आहे भरत मेनी धन्य वाद. काल म्हणजे परवा रात्रीतून घरात लाइट गेलेली. खाली मीट र रूम मध्ये पीसीबी का एम सीबी काय तो जळलेला. मग सीमेन्स कंपनीचा नवा लावला. पण तो परेन्त मी लवकर हपिसात आले. पेट्पूजा व फोन चार्जिंग च्या निमित्ताने ऑफिशिएल वेळेत आले. असले प्रश्न ह्या हिरविणींना पडत नाहीत का? का हाताखाली नवरे सासरे पोरे मित्र असतात काळजी घ्यायला. अनु पमा मध्ये पण एकदम भयंकर ड्रामा सुरू झालेला आहे. नुसते बघूनच टेन्शन आले आहे.
इशाला थाटामाटात हौसेने लग्न करायचे आहे. ह्यात नाक मुरडायसारखे काय? पोरीची हौस म्हणून अरुने केळकरांच्या वर बिल फाडावे ना पण तोंड वाकडे करून बसली. इशा चक्क आईचे कपाट उघडून दागिने साड्या बघत होती. तिची यलू साडी मस्त होती. इंदोरी मुलगा किंकर्तव्य मूढ झालेला आहे. ह्यांची पहिली रात्र कधी येणार? आई व मुलगी एकदम च हणिमोर इन मसुरी करणार का असा मला वाह्यात प्रश्न पडलेला.
आता लग्नाचे वारे परत वाहू लागले आहेत. त्या साठी अन्याने पण पैसे खर्चावेत अशी इशाची इच्छा आहे!!!! आमचं पोर नोकरी करतं आणि पैसे कमी पडले तर कधी कधी खजील होउन पैसे जी पे कर म्हणतं सत्य परिस्थिती सांगते.
देशमुखांकडे अप्पांच्या अंगात
देशमुखांकडे अप्पांच्या अंगात ईशाला द्यायचा आशीर्वाद आला आहे. >>>> सॉलिड ......। हा हा हा हा हा हा
आई व मुलगी एकदम च हणिमोर इन
आई व मुलगी एकदम च हणिमोर इन मसुरी करणार का >
अनिशला सोफ्यावर बघून बाकिच्यांना किती बरं वाटलं! लगेच पोरं किती समजुतदार आहेत वगैरे सुरू झाले.
अरूचा हनिमून म्हटले कि मला मिसेस तेंडुलकर सिरियल आठवते. त्यात देवेन भोजानी मालिका लेखक असतो आणि त्यातल्या नायिकेचा हनिमून होऊच देत नसतो. एक दिवस त्याला रस्त्यात एक माणूस भेटतो आणि सांगतो …मेरी शादी हो गई, दो बच्चें भी हो गए, अभी तो उसकी सुहागरात होने दो.
पोरीची हौस म्हणून अरुने
पोरीची हौस म्हणून अरुने केळकरांच्या वर बिल फाडावे ना पण तोंड वाकडे करून बसली. >> होना. इशाला हवे ते सहज मिळते. तिच्या आजूबाजूला अशी लोकं असतात जे तिला हवे ते द्यायला तयार असतात किंवा ती अश्याच लोकांजवळ असते जे तिला हवे ते द्यायला तयार असतात. मग अरूने उगाच तिला नाही मिळाले तर त्रास होतो, नाही ऐकायची सवय नाही असे म्हणत जिथे तिथे मोडता घालू नये. आता तिला वळण लावायची वेळ निघून गेली आहे हे अरूला समजत नाही.
कांचनने आता बास झालं म्हणत घरात पूजा करण्याचा बेत आखला आहे. म्हणजे नटूनथटून मोठा ड्रामा होणारे.
आज इशा अनीश चे भांडण झाले.
आज इशा अनीश चे भांडण झाले. खरे तर अरु आशू समृद्धीत गेल्यवर ह्यांनी जरा रोमान्स करुन घ्यायचा ना. नातू झाला की अन्या चूप बाळोती बदलायला बसेल.
आशुबाळ आणि अरुंधती
आशुबाळ आणि अरुंधती देशमुखांकडून केळकरांच्या घरी पोचेपर्यंत अप्पा आणि कांचन भटजीकडे जाऊन मुहूर्त काढून परत आले सुद्धा.
काय आधी दाखवावे, काय नंतर याचा काही ताळमेळ नाही.
अरुंधतीच्या लग्नातपण असाच घोळ घातला होता.
आशू बाळ!
आशू बाळ!
या आठवड्यात झी मराठीवर 'नवा
या आठवड्यात झी मराठीवर 'नवा गडी नवं राज्य' मध्ये एक लग्न दाखवलं. सगळं काही आई कुकाकच्या काही पट चांगलं होतं.
यांना म्हणजे..सर्व समारंभ
यांना म्हणजे..सर्व समारंभ अट्टाहासाने समृद्धी बंगल्याच्या आवारात च करावयाचे असतात...
लेखकालाच तसे ऑब्सेशन आहे पहिल्यापासून. !
अन्या ने जेव्हा विचारले की खरेच तुला ही दोघे एकमेकांना अनुरूप वाटतात का?
तर अरुंधती ने as usual पाल्हाळ लावून भलतेच काही तरी सांगितले.. व शांतपणे बोलण्याच्या आविर्भावात नेहमीप्रमाणे लेक्चर झोडले ...
सोमवारी ईशा तडतड करणार आहे.
सोमवारी ईशा तडतड करणार आहे. बरोबर आहे तिचे. समृद्धीमध्ये काय लग्न. अरु परत पडेल तोंडाने प्रचंड बोअर करणार. हे लोक घरात गाऊन वगैरे घालत नाहीत का. सदैव तयार होऊन बसलेले असतात. अरु आणि कांचन तर झोपतानाही साडी पिनप ठेवतात.
अरु आणि कांचन तर झोपतानाही
अरु आणि कांचन तर झोपतानाही साडी पिनप ठेवतात.>>>>> यांच्या केसांच्याही पिना तश्याच असतात , साडीच काय घेऊन बसलात. आणि रात्रभर झोपूनही साडीची, केसांची आणि चेहर्याची कश्शाचीही इस्त्री मोडत नाही.
सापु,लग्न,हनिमुन्,मन्गळागौर
सापु,लग्न,हनिमुन्,मन्गळागौर,डोहाळजेवण्,बारस सगळ सम्रुद्धी कार्यालयातच झाले पाहिजे अशी अट आहे बहुधा... बर त्या म्युझिक स्कुलच आणी कॉलेज अॅड्मिशनच काय झाल? अरु ताई फक्त दिड गाणी गाउन वल्ड टुर करुन आल्या लेकिला मात्र सगळ घरगुतीच कर चे डोस..
अरु ला आशुतोष चे बॅकींग आहे..
अरु ला आशुतोष चे बॅकींग आहे.....
बायदवे, ईशा नेमक काय आणि किती
बायदवे, ईशा नेमक काय आणि किती शिकली आहे? येवढं सगळ होऊन माझ लग्न ग्रँड होणार, झाल पाहिजे, bla bla आहेच तिचं.
अरुचा नक्की प्रॉब्लेम काय आहे
अरुचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? इशा बेजबाबदार आहे तर प्रॉब्लेम आणि आता जबाबदारीने वागतेय तरीही प्रॉब्लेम! माझी कॉपी करु नको म्हणे.
आजपासून चार दिवसांनी तुझं
आजपासून चार दिवसांनी तुझं लग्न आहे असं कोण सांगतं ? कॅलेंडरचा शोध लागला नाही का? येत्या गुरुवारी तुझं लग्न आहे, असं सांगेल कोणी.
भरत... .मलाही खटकलच ते .
भरत... .मलाही खटकलच ते .
आजपासून चार दिवसांनी काय...!!!!!
ते यांच्या प्लॅनिंग साठी, लेखकाला अवकाश मिळावा म्हणून, अरु आशू ला पुन्हा एकदा गोंधळल्यासारखे एकमेकांकडे पाहता यावे म्हणून, विजय विनिता का कोण ते..त्यांना येता यावे म्हणून..
मोघम ठेवले आहे....!!!!!
अरुचा नक्की प्रॉब्लेम काय आहे
अरुचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? इशा बेजबाबदार आहे तर प्रॉब्लेम आणि आता जबाबदारीने वागतेय तरीही प्रॉब्लेम! माझी कॉपी करु नको म्हणे. >> अगदी . ईशाला ती साडी नेसली/पोहे बनवले , तेन्व्हा किती लेक्चर देते ती . एकसुरी आवाजात आणि एकच एक्स्प्रेशनलेस चेहरा ठेवुन .
ईशाच वागणं उथळ आहे हे समजून ही , तिला वारंवार अरूची लेक्चर्स ऐकायला लागतात म्हणून सहान्भूती वाटते तिच्याबद्दल .
२००० पोस्टी झाल्या.. नविन
२००० पोस्टी झाल्या.. नविन धागा काढा आता !
मी सध्या बघत नाही, एकच ट्रॅक
मी सध्या बघत नाही, एकच ट्रॅक खुप ताणला की मला कंटाळा येतो. भरत ह्यांनी लिहिलेल्या वृत्तांततुन कळलं की काही च बदललं नाहीये. भरत आणि अमा प्लीज अधुनमधून वृत्तान्त लिहित जा. मुळ मालिकेत मनोरंजनाचा आणि लॉजिक चा ही १००% अभाव आहे. वृत्तांत आणि त्या निमित्ताने काढलेली पीस एवढंच काय ते मालिकेचं मनोरंजन मुल्य.
मी जी गेम खेळत असते ना मर्ज
मी जी गेम खेळत असते ना मर्ज ड्रागन त्याचा मागील आठव्ड्यात वर्किन्ग वीक मध्येच इवेंट आला. मग मी हेअ, अनुपमा साइडला लाउन गेम खेळ त बसते. त्याहोन फार मन लावुन बघितले जात नाही. वीकेंडचा इवेंट पण काल संपला. आज लग्नाची गडबड चालू आहे. इतके श्रीमंत आहे त तर हॉल घेउन लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे. पोरगी खूश होईल. अरु फारच ममव पणा करत आहे. आज परत एक बेडरूम सीन झाला जो मी ऐकला.
नवे लेखक आल्याने ( हे ऐंशीच्या घरातले असावेत. ) आम्हा बायकांना आम्ही बायका असे सतत अरू च्या तोंडात आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करून घराची उस्तवार करतो( आम्ही बायका) तिला काही पाठ दुखत आहे तर आशू बाळ हॉट वॉटर बॉटल घेउन येते. व काही विनोद वगैरे करून तिचा स्ट्रेस कमी करायचा प्रयन्त करते.
चार दिवस बँकॉक ला का नाही जात हे लोके? उगीच इशा अनीस्यच्या मध्ये येत आहेत. आता परत घरी पूजा. सर्व एकाच कलरचे कपडे घालून आहेत.
बाबापुता करणे यांचं अरुंधतीने
बाबापुता करणे यांचं अरुंधतीने बाबा पोता करून टाकलं. मध्ये व्यवस्थित गॅप.
ईशाची दया येऊ लागली आहे.
समृद्धी अमंगल कार्यालयात मंगल कार्याच्या नावाने आणखी दोन राडे होऊ घातलेत. आतापर्यंत यांचं एकतरी कार्य धड झालंय का?
थॅंक्यु अमा. पण मला एक कळलं
थॅंक्यु अमा. पण मला एक कळलं नाही साखरपुडा लगेच करुन लग्न दोन/तीन वर्षे थांबुन करायचं असं ठरलेलं होतं ना जेणेकरून इशा आणि अनिश ला करियर करता येईल. त्यांच्या साखरपुड्यात वीणा आली आणि तीच पुर्ण प्रकरण दोन/तीन महिन्यांत आटपल तर लगेच ह्यांच्या लग्नाचे पडघम वाजायला लागले. त्या करियर च काय जे इनिश करणार होते?
पर्णीका असले प्रश्न यांना
पर्णीका असले प्रश्न यांना पडत नाहीत.
आणि मला हे लॉजीक तर कळलेच नाही..की ' ईशा ज्या घरात तू जन्मलीस आणि मोठी झालीस...तिथेच तुझे लग्न व्हायला हवे!!'.... अरे...?!
कुणी जर दोन खोल्यांच्या फ्लॅट मधे राहत असेल तिचेही..आणि अगदी ईशा अंबानीचेही......आपापल्या घरातच थोडी लग्न लागले.. !!!
Pages