दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप आवडणारा लेखक. Sad श्रद्धान्जली. आता ते आपल्या आई आणि अण्णांना भेटले असतील

धक्कादायक!
भव्यदिव्य सेट असणाऱ्या मालिकांचे निर्माते दिग्दर्शक कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
https://www.loksatta.com/manoranjan/famous-art-director-nitin-desai-comm...

भावपूर्ण श्रद्धांजली....
सर्व महाराष्ट्र शोक विव्हळ झालाय...
अपरिमित हानी कलाक्षेत्राची....

शिंदेना भावपूर्ण श्रद्धांजली...
नितीन देसाईंच्या आत्महत्येचा विचार केल्यास कलाकार कलासक्त असतात ते सहज नैराश्यावर मात करतात असं वाटत होतं. पण खरतर धीर हा आपला जीवलग सखा जेव्हा आपली साथ सोडतो तेव्हा आत्महत्या होतात.

सार्थक शिंदे आणि नितीन देसाई ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आज महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली.
महाराष्ट्राचे दोन सुपुत्र महाराष्ट्र ने गमावले

नितीन देसाईंची बातमी फार धक्कादायक आहे. त्यांचे काम आवडायचे आणि एका मराठी माणसाने धाडस केले आहे हे ही..... त्यांच्यासारख्या वेलनोन माणसाला कठीण प्रसंगी आर्थिक सहाय्य मिळू नये हे दुर्दैव.
श्रद्धांजली

ओहह! Sad
पावसाळी चिंब ऋतूतच पाऊस आणि निसर्गकवी हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

कविवर्य ना.धो. महानोर यांना भावपूर्ण श्रध्दांजली....
महाराष्ट्राच्या कलाविश्वावर नियतीचा अजून एक आघात...
डोळे डबडबलेत हे टंकताना...

ना.धो. महानोर >>> अस्सल मातीतल्या कवीला श्रद्धांजली. आम्हा शहरी माणसांना मातीचे वैभव दाखवले ते अश्या लोकांनी.

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे

--ना धो महानोरांना श्रद्धांजली

नितीन देसाईंची बातमी धक्कादायक. निःशब्द.

एकापाठोपाठ एकेक काय चाललंय, श्रद्धांजली सर्वांना. इथे यायला भीती वाटते हल्ली. टाळत होते, धाडस करून आले.

^ सहमत

प्रा. नरकेना श्रद्धांजली _/\_

माझी कमेण्ट एडिट केली आहे का ? माझीच नाही इतर दोन तीन जणांच्या कमेण्ट्स पण एडीट झालेल्या दिसतात.
नको असेल तर उडवा. पण परस्पर बदलणे योग्य नाही.

Pages