वाढत्या आत्महत्या !

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 2 August, 2023 - 05:55

सिने सॄष्टी किंवा ईतरही मोठ्या क्षेत्रातील ज्याचे जवळ अमाप पैसा, सुख सोई आहे अशा व्यक्ती आत्महत्या करीत आहेत. आजच वाचनात आलेली नितीन देसाई ह्यांची आत्महत्ते बाबतची बातमी ऐकूण प्रश्न पडतो की जगात सुसंवाद हरवत चालला आहे का? लोक मोबाईल, नोकरी व्यापात गुंतल्याने एकमेकांच्या भेटीतून सुटू शकणारे प्रश्न आज कोणीच कोणाला सांगत नसल्याने असे घडत आहे, का? एवढे टोकाचे पाऊल उचलण्या आधी काहीच विचार का नाही करत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२४९ कोटी रु. कर्ज होतं ते फेडायला आवश्यक ते इनकम नव्हते. ह्यापेक्षा कमी रकमांसाठी जीव गेलेले आहेत. देसाई माझ्याच वयाचे होते. वाइट वाटले. ते कर्ज रिनिगोशिएट करणे, असे कर्ज विक त घेणारे कंपनी असतात तिथे बोलणी करणे हे करता आले अस्ते. एक विचित्र प्रकारचा एकटे पणा येतो त्यातून हे पाउल उचलले जाते. देणेकरी सतावतही असतील. काय माहीत. त्यात काही बाबी घरच्यांशी बोलता येत नाहीत. बाजारात पत व ऐपत संभा ळावी लागते त्याचे अलग टेन्शन येते.

मी त्यांची वाट चाल पेपरातुन वाचलेली आहे. भव्य कला दिग्दर्शन, त्यातून पुढे टाकलेले स्टुडीओचे मोठे पाउल. तेव्हा फार कौतूक वाटलेले. त्यामानाने आपण किती कमी महत्वाकांक्षी आहोत असेही वाटायचे. अजूनही वाटते. पण कोवीड मुळे प्रॉडक्षनच दोन वर्शे बंद होते. अश्या बाह्य अडचणी येतात.

मुंबईत व्यावसायीक जगात तग धरून राहणॅ खरंच अवघड आहे. महत्वाकांक्षा आपली लेव्हल समजून जगावे लागतात. कृर राजकारण फेस करावे लागते. मनातले पूर्ण बोलुन दाखवायला कोणी नसतेच. किंवा असले तरी त्यांना समजत नाही. समजुतदार पणा व पेशन्स नाहीसा होत चालला आहे हे कार ण मला निरीक्षणास येते कायम.

मी अनेक अनुभवांतून जाउन आता प्रत्येक श्वास श्री अर्पण लेव्हललाच जगते आहे म्हणून माझे निरीक्षण लिहिले आहे.

मी अनेक अनुभवांतून जाउन आता प्रत्येक श्वास श्री अर्पण लेव्हललाच जगते आहे म्हणून माझे निरीक्षण लिहिले आहे._/\_

एकदा जगायला लागणारा धीर हरवला की हतबलता येते. सर्वत्र टिकाव धरण्यासाठी एक पूरक यंत्रणा उभी करावी लागते. आपण तिला सपोर्ट सिस्टीम म्हणतो. ती विश्वासार्ह हवी. जशी शिवरायांची होती. प्रसंगी जीव पणाला लावणारे मावळे.
बरेच उद्योजक दिवाळखोरीतही तग धरून पुनरागमन करतात ती त्यांची सपोर्ट सिस्टीम मजबूत असावी म्हणून.
कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्य शाबूत ठेवण्यासाठी अशी विश्वासार्ह सपोर्ट सिस्टीम खूप आवश्यक आहे. अन्यथा माणूस एकटा पडतो.

कुठे थांबायचे आहे हे माणसाला कळले पाहिजे.
पुरेसा पैसा ,संपत्ती मिळाली की.
फक्त हौस म्हणून स्पर्धेत राहा...यश अपयश ह्यांना समान
समजा.

बस .
Life enjoy करा

२४९ कोटींचे कर्ज हीच अबब गोष्ट आहे. पण ह्यातील बरेचसे कर्ज हे खाजगी स्वरुपाचे असावे. बँके कडुन घेतले असते (दिले असते की ठाऊक नाही) तर किमान आत्महत्या करावी लागली नसती.

२४९ कोटींचे कर्ज हीच अबब गोष्ट आहे. >> १८० कोटी कर्ज होते. त्यासाठी तीन प्लॉट तारण ठेवलेले. पण इंटरेस्ट धरून २४९ कोटी झाले. भीतिदायक प्रकरण. मी हैद्रा बादचा धंदा बंद करून तडक म्हणजे ३१ मार्च वर्श संपते व १ एप्रिल ला जॉइन झाले. १० -१२ एप्रिल ला मुलीला शाळेत टाकले. तेव्हा फॉलो अप करायला कोणी नसल्याने सेल्स टॅक्स च्या सीफॉर्म लायबिलिटी १२ -१३ लाख होती. एच डी एफ सीचे कर्ज घेउन ती कंपनीला परत केली व नंतर नोकरी करून कर्ज फेडले. पण २०१२ - १३ हे मुंबईतील पहिले वर्श फार अवघड होते. सेल्स ची प्रोफाइल होती.
त्या मानाने टूर्स करता आल्या नाहीत. इतकी जबाबदारी दिलेली की तुम्ही फेलच होणार. आता त्यासाठी तीन वेगळी डिपार्ट मेंट्स आहेत. घरी मुलगी ९वी १० वी टीने जर ह्या अवघड फेज मध्ये होती. एकमेव सपोर्ट मावशी हैद्राबाद हून आल्या होत्या पण त्यांना इथे निभावले नाही मग सहा महिन्यात परत गेल्या. ऑफिस ला टूर प्लॅन केली की कुत्र्यांना उपवन मध्ये सोडून यायचे व आल्यावर घेउन जायचे. आईला चिंचव ड हून इथे मुलीला सोबत बोलवायचे असे करून वर्श संपवले. पण अप्रेझल घाण आले ते घाणच येणार होते. नोकरी टिकवून धरली व लॅटरल ट्रान्सफर घेतली. नशीबाने कंपनीत एस ए पी आले. ते शिकून नेटाने पुढे गेले. ९ टू फाइव झिन्दाबाद. राजकारणा त नमती व गप्प राहायची भूमिका घेतली. तेव्हा एक काव्य नजरेस पडले होते. जमीन सोडून झेप घ्यायची ठरवली तरी आभाळ दूरच असते व राहते. हे फार पटले. हे म्हणजे माझ्या मायक्रो लेव्हलला झालेले त्रासेस आहेत. देसाई तर मोठा व अजून बे भरवशाचा बिझनेस संभाळत होते. अनेक त्रास असतील जे बोलून दाखवता आले नसतील.
फारच एकटे पडल्याचे फीलिन्ग येते. त्यातून अशी स्टेप घेतलेली असावी.

अश्विनीमामी
तुमची जिद्द, चिकाटी आणि धैर्य या त्रिसूत्रीला सलाम.... खूप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास...
अशा व्यक्ती कधी हारत नसतात.

अश्विनीमामी तुम्हाला सलाम ! सीफॉर्म लायबिलिटी कर्ज घेउन लवकरात लवकर सोडवली त्यानंतर मार्गाला लागला.

२०१७ मध्ये GST आले आणि सीफॉर्म बाद झाले तरीदेखील काही व्यापारी आजुन त्यातुन सुटले नाहीत. कधी सीफॉर्म मिळाले नाहीत कधी सेल्स टेक्स ऑफीस मध्ये सबमिट करुन पण मिळाले नाहीत. कधी ऑफीसला आग लागुन कागदे जळाली. पण व्याप्यार्याचे सेल्स टेक्स असेसमेंट काही झाले नाही. त्यामुळे तुम्ही चांगला निर्णय घेतला.

अतिमहत्वाकंक्षेपोटी वाढवलेली लायबेलिटी व त्यातून निर्माण झालेला तणाव या बाबी अनेकांच्या बाबत दिसून येतात. अर्थात हे पश्चात विश्लेषण असते. अति कशाला म्हणायचं हा प्रश्न अनुत्तरित आहे.

श्रद्धांजली !
त्यांना सावरण्यासाठी पैशापेक्षाही मानसिक बळ देणारी व्यक्ती भेटायला हवी होती असे राहून राहून वाटतेय. Sad

त्यांना सावरण्यासाठी पैशापेक्षाही मानसिक बळ देणारी व्यक्ती भेटायला हवी होती असे राहून राहून वाटतेय>>>>> अगदी करेक्ट. तणाव शेअर करता येईल अशी व्यक्ती त्यांच्या एवढ्या मोठ्या गोतावळ्यात नव्हती की त्यांना शेअर करायचे धाडस झाले नाही? असा प्र्श्न पडतोच.

नितीन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कला क्षेत्राची ही अपरिमित हानीच आहे.

अमा, तुमचे धैर्य, चिकाटी आणि संयमाला नेहमीच सलाम !

नितीन देसाई यांना बरेच मोठे कर्ज होते असे वाचण्यात आले अशा बाबतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली तर ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते त्यांचे काय होते? त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांनाही प्रचंड तणावाला सामोरे जावे लागत असेल ना?

अश्विनीमामी तुम्हाला सलाम..!!

नितिन देसाई यांना श्रद्धांजली. चित्रपटक्षेत्रात एक मराठी माणूस फार मोठे काम करतो म्हणून यांचे कौतूक होते. कदाचित अतिमहत्वकांक्षा नडली असावी. प्रत्येक गोष्ट भव्य दिव्य आजकाल नको असते. OTT मुळे लोकं फॅमिली ड्रामा, सपेन्स स्टोरीज हे बघण्याकडे जास्त वळले व त्यामुळे मोठ मोठाले सेट यांची गरज कमी झाली असावी. म्हणून यांना बहुतेक हल्ली फार काम मिळत नसावे.. तसेच advanced vfx व इतर technology मुळेही यांच्या कामावर परीणाम झाला असावा. कदाचित vfx व इतर technology कडे लक्ष दिले असते तर त्यांना तग धरता आला असता.

अश्विनीमामी
तुमची जिद्द, चिकाटी आणि धैर्य या त्रिसूत्रीला सलाम.... खूप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास...
अशा व्यक्ती कधी हारत नसतात.>>>>>> +१

स्वप्न दाखवून लोक फसवतात किंवा आपण स्वतःच स्वप्न बघतो.
तुला मोठे कॉन्ट्रॅक्ट देतो ही व्यवस्था हवी अशी स्वप्न दाखवली जातात.
पैसे नसतील तर माणूस कर्ज काढतो आणि त्याला contract मिळत नाही.
असा माणूस कर्जाच्या सापळ्यात अडकतो.
सध्या ब्रिटन ,अमेरिकेत शिक्षण घेण्याचा ट्रेण्ड आहे ..
अगदी सामान्य घरातील लोक पण ५०, ते ६०, लाख कर्ज काढून उभे करतात.
पण पुढचे प्लॅन फसला,
नोकरी चांगली मिळालीच नाही तर त्या ५० लाखाचे कर्ज करोड होण्यास वेळ लागत नाही.

नितीन देसाई यांनी आत्महत्या केली म्हणजे नेमकं काय केलंय? TV वर दोरीचे धनुष्य केलेले होते आणि बाजूला त्यांचा मृतदेह मिळाला असे सांगितले जात आहे.

काय झाले असते होवून होवून स्टुडिओ जप्त झाला असता.
किंवा ज्या गोष्टी तारण ठेवल्या आहेत त्या जप्त झाल्या असत्या.
. कर्जात काही तुरुंगवास वैगेरे होत नाही. फसवणूक केलेली नसेल तर.
लोक खोट्या प्रतिष्ठेचे टेंशन घेतात.
मुंबई पुण्यात एकदा चांगल्या नोकरी ला आहे उत्तम पगार आहे.
पण अचानक नोकरी गेली आणि दुसरी त्याच दर्जा ची नोकरी मिळाली नाही लोक टेंशन मध्ये येतात.
कमी पैशात जगण्याची त्यांना भीती वाटते.
कार नी प्रवास करत असतील तर बस नी जाणे कमी पणाचे वाटते

अश्विनीमामी
तुमची जिद्द, चिकाटी आणि धैर्य या त्रिसूत्रीला सलाम.... खूप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास...
अशा व्यक्ती कधी हारत नसतात.> खरेच कौतुकास्पद आहे तुमचे धैर्य अमा !

या धाग्यावर लिहायलाही उदास वाटतं.लोक 10000 किंवा 20000 च्या कर्जासाठी आयुष्य संपवतात, एकदा त्यांनी हाक मारून पाहावी असं वाटतं.हताश आणि हेल्पलेस वाटतं.
अमा, खरोखरच जिददीच्या आहात.

नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या बातमीने वाईट वाटले. Sad

आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहेत. नैराश्य/ आर्थिक अडचणी/ बेकारी/ कामाची दगदग/ स्ट्रेस/ बुलींग/ आरोग्य... नक्की कुठल्या कारणाने त्यांना असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला हे पोलिस तपासा अंती कळेल. कारण काहीही असले तरी त्यांचा अकाली अंत मनाला चटका लावून गेला आहे.

परवा जिथे मायबोलीचा वर्षाविहार झाला तेथून काहीच मिनिटे अंतरावर त्यांचा हा भव्यदिव्य स्टुडिओ आहे. जरी माध्यमातून त्यास फक्त "फिल्म स्टुडिओ" म्हटले गेले असले तरी खूप मोठ्या परिसरात पसरलेला हा स्टुडिओचे वैभव एखाद्या भव्य राजवाड्याहुन कमी दिसत नाही. पण हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटी सारखी प्रसिद्धी या स्टुडीओस मिळाली असती तर पर्यटनातून सुद्धा बराच हातभार स्टुडिओस लागला असता असे वाटते. गुगल वर ज्या काही पर्यटकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत या स्टुडिओवर त्यावरून कल्पना येते की अलीकडच्या काळात स्टुडिओ फार चांगल्या स्थितीत नसावा.

लॉकडाऊनचा फार मोठा फटका अनेक उद्योजकाना बसला त्याचे एकेक परिणाम अतिशय कटू स्वरूपात आता बाहेर येत आहेत. जप्ती येऊ नये आणि अस्तित्व टिकण्यासाठी अखेरच्या काळात स्टुडिओचा अटीतटीचा झगडा सुरू असावा असे एकंदर प्रतिक्रिया वाचून जाणवते. अखेर पंधरा दिवसांपूर्वी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे फायनान्स कंपनीकडून स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्याबाबत परवानगी मागितल्याची बातमी एका वृत्तपत्रात आली होती.

आयुष्यभर खपून शेकडो कोटी रुपये किंमतीचा राजवाड्यासदृश्य स्टुडिओ उभा केला तो आता डोळ्यादेखत जाणार हे त्यांच्यातल्या संवेदनशील कलादिग्दर्शकास प्राणांतिक वेदना देणारे ठरले असावे Sad अर्थात हे सगळे आपले अंदाज आहेत जे माध्यमातून व्यक्त केले जात आहेत. प्रत्यक्ष काय व कसे घडले याचा तपास अद्यापही सुरू आहे.

वयाच्या पन्नाशीनंतर अमिताभ बच्चन यांना एबीसीएल कार्पोरेशन प्रकरणात आयुष्यभरात कमावलेली संपत्ती घालवावी लागली होती. इतकेच काय राहता बंगला जप्त व्हायची वेळ आली होती. त्यातूनही ते कसेबसे सावरले. देसाईंशी बोलताना त्यांचे मित्र असलेले त्या भागातले आमदार यांनी अमिताभ यांचे उदाहरण देसाई यांना अनेकवार दिले होते अशीही एक बातमी आहे. परंतू ज्याचा वेदना त्यालाच ठावूक. एकीकडे अडीचशे कोटीहून अधिक कर्ज, त्याचा सुरू असलेला तगादा. दुसरीकडे आयुष्याचे स्वप्न असलेला स्टुडिओ, त्याची खालावत चाललेली अवस्था. कामांची/प्रोजेक्टसची वानवा या सगळ्यात एक प्रतिभावंत कलादिग्दर्शक भरडला आणि आपण सर्वानी त्यास कायमचे हरवले. अतिशय दुर्दैवी!

फारच शॉकिंग बातमी नितीन देसाईबाबत
त्यांचे कुटुंब मित्र व्यावसायिक मित्र सर्वांनी सपोर्ट केलाच असेल पण माणूस गर्तेत अडकला की अडकला.
काय सुचेना काय म्हणावे ते.

अमा तुम्ही खूप फायटर आहात.

देसाईंशी बोलताना त्यांचे मित्र असलेले त्या भागातले आमदार यांनी अमिताभ यांचे उदाहरण देसाई यांना अनेकवार दिले होते अशीही एक बातमी आहे.
>>>

ते विनोद तावडे

मुळात इतक्या मोठ्या कर्जाच्या संकटातून बाहेर यायला दिग्गज राजकीय नेत्यांची मदत फार गरजेची असते असे वाटते. ती बरेचदा चांगल्या लोकांना मिळत नाही. ज्यांच्या डोक्यावर हात असतो ते पैसे बुडवून फरार होतात.

मुळात आता सिने इन्डस्ट्रीज ड्बघाईला आलेली आहे, तेव्हा सर्वच क्षेत्रात काम कमी झाले आहे, त्यांना दुसरा मार्ग निवडता आला असता

Pages