वाढत्या आत्महत्या !

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 2 August, 2023 - 05:55

सिने सॄष्टी किंवा ईतरही मोठ्या क्षेत्रातील ज्याचे जवळ अमाप पैसा, सुख सोई आहे अशा व्यक्ती आत्महत्या करीत आहेत. आजच वाचनात आलेली नितीन देसाई ह्यांची आत्महत्ते बाबतची बातमी ऐकूण प्रश्न पडतो की जगात सुसंवाद हरवत चालला आहे का? लोक मोबाईल, नोकरी व्यापात गुंतल्याने एकमेकांच्या भेटीतून सुटू शकणारे प्रश्न आज कोणीच कोणाला सांगत नसल्याने असे घडत आहे, का? एवढे टोकाचे पाऊल उचलण्या आधी काहीच विचार का नाही करत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजली !
त्यांना सावरण्यासाठी पैशापेक्षाही मानसिक बळ देणारी व्यक्ती भेटायला हवी होती असे राहून राहून वाटतेय......अगदी!
अर्थात देसाईंची वेदना त्यांनाच ठाऊक.त्यांच्याबरोबर संपली.वाईट कुटुंबीयांसाठी वाटते.

अमा,तुम्हाला मानलं!

साने गुरुजी.
बाबा आमटे ह्यांची सून.
भय्यु महाराज .
सुशांत सिंग.
आता नितीन देसाई.
अगदी हर्षद मेहता ह्यांनी आत्महत्या केली नसली तरी bmc hospital च्या बाकड्यावर त्यांचा मृत्यू झाला .खूप खूप उदाहरणे आहेत
उच्च शिक्षित ,उद्योगपती, अशी खूप उदाहरणे आहेत
जानती ,श्रीमंत ,शिक्षित लोकांनी आत्म हत्या केल्या आहेत.
आपले पूर्वज खरेच खूप हुशार होते हे ह्या घटना बघितल्या की वाटते

1) चादर बघून हातपाय पसरा.
२( देवा नी जसे ठेवले आहे त्या मध्ये च सुखी राहा.
३) कोणाला फसवू नका,मानव हत्या करू नका ,चोरी करू नका
पाप पुण्याचा हिशोब देव करतो आणि त्याची शिक्षा पण देतो.
त्या मुळे अन्याय होणारा आणि अन्याय करणारा ह्या दोघांची मानसिक स्थिती योग्य तीच राहते.
४) कोणते ही काम करायला लाजू नका.
५) ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि तो न्याय नक्की करणार आहे

ह्या अशा गोष्टी माणसाच्या मनावर बिंबवण्याचे काम पूर्वजांनी केले ..आणि ह्याचे महत्व आज समजत आहे
जेव्हा ..
फालतू गोष्टी साठी कळती सरती लोक आत्महत्या करतात तेव्हा.

पूर्वज खरे च खूप हुशार होते.
आणि भारतीय संस्कृती खरेच खुप महान होती.

Aapan त्याचा त्याग केला आणि अनंत दुःख आपल्या वाट्याला आली

काही मोजक्याच आत्महत्या ह्या दुर्दैवी जीव करतात.
त्यांची काहीच चूक नसताना त्यांच्या वर संकट ची मालिका येते .
बाकी बहुसंख्य आत्महत्या ह्या चुकीच्या निर्णयचे परिणाम असतात .
आपला इन्कम बघून च खर्च करा.
राहणार दोन माणसं आणि कर्ज काढून ५Bhk फ्लॅट हवा.
लायकी नसताना महागड्या गाड्या घेणे फक्त मोठे पना साठी..
कसली तरी गाडी गरज म्हणून असली खूप झाले..
कर्ज काढावे लागत असेल तर
पगार दहा हजार आणि मोबाईल घेणार ५० हजाराचा कर्ज काढून.
लग्नात विनाकारण फालतू खर्च करून कर्ज वाढवून घेणे.
दहा रुपये कमवत असाल तर चार रुपये हे शिल्लक राहिलेच पाहिजेत.
दिखावा सोडून ध्या..
मोठेपणा दाखवण्याचा नादात संकटात पडू नका

>> Submitted by अश्विनीमामी on 2 August, 2023 - 17:28

अनुभवातून आलेला प्रतिसाद खूप खूप प्रेरणादायी _/\_

>> देसाईंशी बोलताना त्यांचे मित्र असलेले त्या भागातले आमदार यांनी अमिताभ यांचे उदाहरण देसाई यांना अनेकवार दिले होते अशीही एक बातमी आहे.
>>>

>> ते विनोद तावडे

हो, अगदी बरोबर. शिवाय अजून एक आमदार त्यांच्या संपर्कात होते त्यांचे नाव विसरलो त्यामुळे थोडे कन्फ्युजन झाले.

"धीराचे शब्द देणारे कुणीतरी" हा अगदी साधा ढोबळ शब्दप्रयोग आहे. जे आवश्यक स्टीम्युलेशन्स त्या व्यक्तीस मनाला मिळायला हवेत ते केवळ कुणीही त्यांच्याशी धीराचे शब्द बोलून मिळत नाहीत. अवकाशात एका उंचीवर पोहोचल्यावर हवा विरळ होते पण ऑक्सिजन अजूनच विरळ होतो. श्वासातल्या हवेतून ऑक्सिजनचे एकेक कण गोळा करता शरीराची प्राणांतिक धडपड सुरू होते. ताणतणाव मधून जाणाऱ्या मनाची अवस्था अगदी तशीच असते. आसपास माणसं जरी खूप असली तरी जो आवश्यक तो ऑक्सिजन दुरापास्तच असतो. दिग्दर्शक जरी असला तरी तो कुणाला स्क्रिप्ट तर लिहून देऊ शकत नाही आणि सांगू शकत नाही कि "हे हे संवाद माझ्याशी अशा अशा टोनमध्ये बोल मग मला आधार वाटेल" फारच कृत्रिम वाटते ते. ते तसे नैसर्गिकपणे कुठून मिळणे हि गरज असते वास्तविक.

कुटुंब हे सर्वात मोठे पॉवर इंजिन असते..
त्या नंतर अगदी जवळचे मित्र.
आणि हे अगदी जवळचे मित्र , मैत्रिणी हे लहानपण पासूनचे वर्ग मित्र च
असतात.
ज्यांच्या शी बोलताना कोणताही मागचा पुढचा विचार करावा लागत नाही असे मित्र.
हीच मंडळी मानसिक आधार देवू शकतात

हे अगदी जवळचे मित्र , मैत्रिणी हे लहानपण पासूनचे वर्ग मित्र च असतात.>>> जरूरी नाही. आयुष्याच्या वाटे वर उशिरा ने भेटलेली काही व्यक्ती पण मन समजून घेतात कधी कधी, जे बालमैत्रिणी ला उमगत नसते. शक्य आहे.

Entrepreneur is lonely at the top अशी एक म्हण आहे. तो आपली टेंशन्स, दुःख कोणाशी शेअर करू शकत नाही. कुटुंबा सोबत शक्यतो शेअर केलं जातं नाही कारण त्यांना टेन्शन नको. हे मी माझ्या मराठी धंदेवाईक मित्र मंडळीच्या बाबतीत पाहिलं आहे.

देसाईच्या बाबतीत कदाचित त्याची प्रॉपर्टी हडप करण्याच्या हेतूने त्याला कॉर्नर केले असण्याची शक्यता जास्त वाटते

आर्थिक व्यवहार कुटुंब मध्ये माहीत असेलच पाहिजेत.
कुटंबतील एक सदस्य किती कर्ज काढत आहे आणि कुठे गुंतवत आहे हे कुटुंबाला का माहीत नसावे.
कुटुंबाला आर्थिक व्यवहार ते पण इतके मोठे माहीत नसतील तर त्यांच्या मध्ये संवाद नाही.
सरळ अर्थ आहे

आत्महत्या सामान्य लोकांची असू किंवा श्रीमंत.
कोणाची ही असू.
मेंदूत काही तरी रासायनिक प्रक्रिया घडते आणि तो उद्वेग काही मिनिटातच किंवा काहीच तासाचा असतो .
ती वेळ निघून गेली की आत्महत्या करायचा विचार माणूस सोडून देतो..अगदी महिनाभर अगोदर प्लॅन करून कोणी आत्महत्या करत नाही.
आणि प्रत्यक्ष मरण यातना चालू होतात तेव्हा अनेक लोकांचे विचार पण बदलतात.
मी असे ऐकले आहे की फाशी घेवून जे आत्महत्या करतात त्यांच्या पायावर नखांचे ओरखडे असतात.
मरण यातना चालू झाली की व्यक्ती मृत्यू ला भितो आणि हाताने दोरी पकडण्याचा प्रयत्न करतो .
पण फास घट्ट बसल्यावर हात वर जात नाहीत

आजरा मुळे किंवा प्रेम भंग मुळे ,आत्महत्या केली तर समजू शकतो..पण कोणीतरी अन्याय करत आहे..त्याच्या कडे प्रचंड ताकत,ओळख,पैसा आहे .
म्हणून निराश होवून आत्महत्या करायची की आत्मघात (sucide बॉम्बर )करुन घेऊन शत्रू ला संपवायचे हा खरा प्रश्न आहे..शेवटी मृत्यू ला तुम्ही कवटळणार च आहात

Pages