दारू पिणार्‍यांना डास जास्त चावतात का ?

Submitted by ढंपस टंपू on 27 July, 2023 - 01:00

दारू पिल्यावर डास जास्त चावतात का ?
दारू पिलेल्या माणसाला डास चावला तर कळतं का ? कुणा दारू पिलेल्याला हा प्रश्न विचारलाय का ? त्याला सकाळी आठवेल का ?

हा प्रश्न पडण्याचे कारण,
अमेरिकेच्या जर्नल ऑफ मॉस्क्विटो कंट्रोल असोसिएशनच्या 2002 मधील अहवालानुसार, दारू प्यायलेले असाल तर, तुम्हाला डास चावण्याची शक्यता अधिक वाढते.

डास दारू कशी ओळखतात?
बीबीसी चा रिपोर्ट सांगतो कि,
डासांना आपल्या उपस्थितीची जाणीव ही दोन रसायनांमुळं होते, हे आतापर्यंत समोर आलं आहे. त्यापैकी पहिलं म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड जे आपण श्वसनादरम्यान सोडत असतो. तर दुसरं म्हणजे ऑक्टानॉल, ज्याला मशरूम अल्कोहोलही म्हटलं जातं. कारण मशरूमची चवही याच केमिकलमुळं तयार होत असते. हे केमिकल आपल्या शरिरात अल्कोहोल म्हणजे दारू प्यायल्यानंतर तयार होतं.

आता, पुढचा प्रश्न म्हणजे, मद्यपींचं रक्त पिणाऱ्या डासांनाही नशा किंवा गुंगी येते का?

लाखो वर्षांपासून डास मानवाचं रक्त पित आलेले आहेत. मात्र मद्यपींचं रक्त प्यायल्यानं मच्छरांना गुंगी येते का? यावर मात्र फारसं संशोधन झालेलं नाही.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधील कोबी स्कॅल यांच्या मते डासावर दारू पिलेल्या माणसाचे रक्त पिऊन काही परिणाम होत नाही. ते झिंगत नाहीत कारण त्यांची रचना. त्यांच्या शरीरात रक्तातले इतर घटक वेगळे काढून वेगळे साठवण्याची व्यवस्था असते.

तुम्हाला काय वाटते ? हे खरे आहे का ?
कृपया माहिती द्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चावत असले तरी या भीतीने दारू सारखे व्यसन सुटणे शक्य नाही.
उलट या प्रयोगाच्या नादात चार मेहाफिली अजून रंगतील ते होऊ नये.

खूप वेळ आहे का आयुष्यात?
>>>>

मी जेव्हा दणादण धागे काढतो वा काढायचो तेव्हा हा प्रश्न मलाही बरेच जण विचारायचे.
त्यामुळे हा मुद्दा नोट करून ठेवतो. कधीतरी स्वतंत्र धाग्यात चर्चा करूया.

घाबरु नका
सध्या मी धागे काढणे थांबवले आहे
प्रेमभंगाच्या दुःखात आहे. डोक्यात तेच विचार. दुसरे काही सुचत नाही. किती वेळ ही स्थिती राहील माहीत नाही...

ओ पॉझिटिव्ह लोकांना जास्त करून डास चावतात असा माझा एक सिद्धांत आहे. ज्यांना डास चावतात त्यांना रक्तगट विचारा. त्यापैकी सर्वात जास्त रक्तगट ओ सापडेल याची खात्री आहे.

हपा Lol

पण सर्वात महत्वाचं म्हणजे डास कोणालाच रक्तपिपासु म्हणून चावत नाहीत. डासीण रक्त पिण्यासाठी आपल्याला चावत असते आणि हां चावट पणा नाहीये तर शास्त्राधार आहे

भारतातले डांस चंट असतात, reflex action चांगली असते, मारायला गेल्यास पटकन उडतात, हाताला लागत नाही.

कॅनडातले डांस... आकाराने थोडे मोठे असतांत. एकदा अंगावर बसले तर उडता उडत नाही. प्रत्येक वेळी कुठे हिंसाचार करत बसायचा म्हणून थोडे दुर्लक्ष करतो. पण जोपर्यंत मारत नाही ते उडत नाही... मग नाईलाजाने मारावे लागते.

डासांना त्यांचा स्वत : चा एक चॉईस असतो. मानवी शरिरातून घाम येतो, trillion प्रकारचे बॅक्टेरिया शरिरामधे / शरिरावर असतात - एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रकारचा युनिक वास / अरोमा प्रत्येकाच्या शरिरातून येतो. त्या वासाकडे डास आकर्षित होतात.

अगदी बरोबर.
विशिष्ट वास डासांना लांब पळवतो.
रक्तगट शी काही संबंध नसावा.
चावल्या शिवाय चव तर समजणार नाही.
म्हणजे पहिले चावावेच लागेल

लहानपणी मला डास चावयाचेच नाहीत. तेव्हा घरचे बोलायचे की तू काही भाज्या वगैरे खात नाही त्यामुळे तुझे रक्त अशुद्ध आहे.
पुढे जेव्हा मला डास चावायला सुरुवात झाली तेव्हा मला आनंदच झाला की आता माझे रक्त शुद्ध आणि पिण्यायोग्य झाले.

ऋन्मेऽऽष >> Lol Lol

या न्यायाने दारू पिणाऱ्या लोकांचे रक्त शुद्ध असते असा निष्कर्ष निघतो.

हपा हो पण तो न्याय लावायला आधी दारू आणि डासांचा संबंध सिद्ध व्हायला हवा ना. धाग्याच्या शीर्षकात देखील प्रश्नचिन्ह आहे. जो पर्यंत अनुभवी लोकं इथे येऊन आपले अनुभव शेअर करता नाहीत तोपर्यंत काही निष्कर्ष काढू शकत नाही.

जंगलात काही विशिष्ट वनस्पती आहेत त्यांची पानं खाल्ली तर प्राण्यांना नशा येते...डासांना शहरात ही पानं नसतात..
त्यामुळे दारु पिणारे त्यांचा गुत्ता असावेत.