एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
त्या व्हिडिओची लिंक खाली देते पण खूप दु:खद दृष्ये आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जपून पहा.
https://m.youtube.com/watch?v=7fTKVJY08FE
त्यात तो मुलगा कळवळून सांगत होता की त्याला फक्त चालायचंय. त्यानंतर तो खूप मेहनत करुन काम करेल वगैरे वगैरे... व उपचाराचा खर्च तिनेक लाख आहे असही त्याच्या मातेने सांगितले. तर काही लोकांनी त्याला मदत केली ज्यात मीही एक होते व तितके पैसे गोळा झाले.
मी त्या मुलाला सहज मेसेज करुन ठेवला होता की सर्जरी झाली की कळव.
तर काल तो दवाखान्यात सर्जरीसाठी गेला. त्याने मला मेसेज केला की आंटी मै जा रहा हून वगैरे.
पण तेथील डॉक्टरांनी सांगितले की ते ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे व ते करु शकणारे एकच डॉक्टर भारतात आहेत व ते म्हणजे कोईमतुरच्या गंगा हॉस्पिटलचे डॉ. राजाशेखरन. व त्याचा खर्च किमान १० लाख येईल.
तर आज सकाळी घरी परत जाताना त्या मुलाचा व्हिडिओ मेसेज आला ज्यात त्याने हे सर्व रडतरडत सांगितले व त्याने मला ४-४ दा विनंती केली की 'आंटी मुझे मदद करो, मुझे ठीक होना है'.
१७ ते २२ अशा पुर्ण वाढीच्या वयात तो कायम पलंगाला खिळून आहे. आता जरा आशा निर्माण झाली होती तर ती ही संपली. यापुढचे पुर्ण आयुष्य कदाचित असेच झोपुन जायची शक्यता आहे हा विचार किती भयानक आहे याचा विचारही करवत नाही.
मला मणक्याच्या दुखापतीच्या कमीजास्त प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्याने अक्षरशः याचना केलीये माझ्याकडे पण मी काय करु? अजुन ७ लाख कुठून आणायचे? भारतात ते एकच डॉक्टर आहेत का जे हे व्यवस्थीत करु शकतात? त्यात कायकाय अडथळे आहेत? त्याला चालता येईल का? दुसरे कोणीच ही सर्जरी करु शकत नाही का? जरा कमी पैशात होऊ शकेल का? हे आणि असंख्य प्रश्न आता मला पडलेत.
अज्ञानात सुख असतं ते खोटं नाही. कारण असे असंख्य. दुर्दैवी जीव असतील जे बरे होऊ शकतात पण केवळ पैसा नसल्याने कधीच बरे होऊ शकत नाहीत. पण आपल्याला ते माहिती नसतं म्हणून सगळं छान चाललंय असं वाटतं. आता कोणीतरी कळवळीने मदत मागतंय आणि मला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाहीये. ही भावना फार भयानक आहे. काहीही कळत नाही काय करावे. प्लीज सुचवा काहीतरी. दुसरे कोणी डॉक्टर, दुसरा काही उपाय, किंवा अजुन काही त्याच्याबद्दल माहिती हवी आहे का ते सांगा, मी त्याला विचारेन.
भरत यांना अनुमोदन.
भरत यांना अनुमोदन.
प्राऊड ऑफ यु सुनिधी, कवीन.
भरत यांना अनुमोदन. +१
भरत यांना अनुमोदन. +१
सुनिधी आणि कविन, तुमचं खूप
सुनिधी आणि कविन, तुमचं खूप कौतुक आहे. सलाम!!
त्या मुलाचं पुढचं आयुष्य चांगलं जावं हीच शुभेच्छा!
खूप कौतुक आहे. सलाम!!
खूप कौतुक आहे. सलाम!!
त्या मुलाचं पुढचं आयुष्य चांगलं जावं हीच शुभेच्छा! + १
या संदर्भात आज पुन्हा अपडेट
या संदर्भात आज पुन्हा अपडेट लिहायला धागा वर आणत आहे
विस्कोची घ्यायचे जवळपास नक्की झाले हे इथे आधी लिहिले होते. पण मधल्या काळात त्याला परत इतर व्याधी उफाळून आल्या. बेड सोअर्स परत त्रास द्यायला लागले. त्यावर उपचार होऊन ते बरे झाल्यानंतरच खुर्ची घेणे उचीत ठरेल असे वाटून आधी त्यावर उपचार सुरु करायला त्याला सांगितले.
आता ते सगळे बरे झाल्यानंतर गेल्या आठवड्यात परत खुर्ची संदर्भात चौकशी सुरु केली. यावेळी अजून एका कंपनी संबधी माहिती मिळाली. परत एकदा डॉ चे मत घेऊन त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हि व्हीलचेअर घ्यायचे पक्के झाले.
डिस्काउंट मिळून रक्कम ८१०००/- (including GST) झाली. त्याच्याकडे जमा झालेल्या फंड मधूनच ती घेतली गेली. काल त्याच्या घरी व्हीलचेअर पोहोचली.
आता जी रक्कम उरली आहे त्यातून थोडा फिजिओथेरपीचा खर्च भागेल. काही भाग त्याला उत्पन्नाचे साधन म्हणून एखादा स्टॉल / छोटे दुकान उभारण्यासाठी सुरवात म्हणून वापरता येईल (यासाठी आहे तो फंड नक्कीच पुरेसा नाही आहे. पण सुरवात होईल. असेच अजून काही हात या कामात पुढे जोडले जातील. कुठे चांगला सल्ला आणि मेंटॉरिंग प्रकाराने मदत पुढे येईल असे आत्ता वाटत आहे. तुर्तास तो किमान आयुष्यभर अंथरुणाला खिळून रहाणार नाही. हि गोष्टही त्याची उमेद वाढवायला महत्वाची आहे)
(No subject)
ग्रेट, दंडवत तुम्हाला.
ग्रेट, दंडवत तुम्हाला.
कवे सुप्पक काम !!
कवे सुप्पक काम !!
Gr8 !
Gr8 !
कविन आणि सुनिधी, ग्रेट!
कविन आणि सुनिधी, ग्रेट!
कविन आणि सुनिधी, ग्रेट! >>
कविन आणि सुनिधी, ग्रेट! >> खरंच महान कार्य !_/\_
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . सोशल मीडिया चा इतका चांगला उपयोग पहिल्यांदाच पाहिला . आवर्जून तुम्ही updates देत राहिलात हे विशेष !! त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक !!
कविन आणि सुनिधी, खूपच
कविन आणि सुनिधी, खूपच प्रेरणादायी!
कविन आणि सुनिधी, ग्रेट! _/\_
कविन आणि सुनिधी, ग्रेट! _/\_
<<<कविन आणि सुनिधी , दंडवत
<<<कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . सोशल मीडिया चा इतका चांगला उपयोग पहिल्यांदाच पाहिला . आवर्जून तुम्ही updates देत राहिलात हे विशेष !! त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक !!
नवीन Submitted by अश्विनी११>>
पूर्णपणे सहमत
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . सोशल मीडिया चा इतका चांगला उपयोग पहिल्यांदाच पाहिला .>>>> +१
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . सोशल मीडिया चा इतका चांगला उपयोग पहिल्यांदाच पाहिला .>>>> +१
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . सोशल मीडिया चा इतका चांगला उपयोग पहिल्यांदाच पाहिला .>>>> +१
कविन आणि सुनिधी ,
कविन आणि सुनिधी ,
ताजा अपडेट वाचून खरेच खूप छान वाटले . तुमचे मनापासून कौतुक .
कविन आणि सुनिधी ,
कविन आणि सुनिधी ,
ताजा अपडेट वाचून खरेच खूप छान वाटले . तुमचे मनापासून कौतुक . --- ++१११
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . .>>>> +१
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . .>>>> +१
कविन आणि सुनिधी , दंडवत
कविन आणि सुनिधी , दंडवत तुम्हाला !!! तुमचे काम बघून खरेच खूप छान वाटले . .>> +++++१
सर्वांचे मनापासुन आभार. दंडवत
सर्वांचे मनापासुन आभार. दंडवत वगैरे लिहून लाजवु नका.
एक टप्पा पार पडला. त्याला आता चक्कर न येता खुर्चीवर जास्तवेळ बसता येऊ लागले व स्वतः खुर्ची चालवायला येऊ लागली की अजुन एक टप्पा पार होईल. गेले अनेक वर्षे सतत झोपुन राहिल्यामुळे व गरिबीमुळे खाण्यापिण्याची आबाळ झालेली असल्याने कदाचित चक्कर येत असेल असे आम्हाला वाटते आहे.
त्यानंतर त्याला कमाई कशी करता येईल यावर काम करावे लागेल. फिजीओथेरपी पण करता आली तर उत्तम होईल पण तो विचार हळुहळु करावा लागेल कारण आम्हाला त्याच्याजवळचे डॉक्टर व इतर लागणार्या गोष्टी याची अजुनतरी काहीच माहिती नाही.
पुन्हा एकदा मनापासुन आभार.
हा धागा आता पाहिला. त्याला
हा धागा आता पाहिला. त्याला उपचारांसाठी अजुन काही पैशांंची मदत लागली तर सांगा.
कविन, सुनिधी: तुमची धडपड,
कविन, सुनिधी: तुमची धडपड, पाठपुरावा, सातत्य याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
कविन, सुनिधी: तुमची धडपड,
कविन, सुनिधी: तुमची धडपड, पाठपुरावा, सातत्य याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. >> +१
धन्यवाद. तुमच्या प्रेमळ
धन्यवाद. तुमच्या प्रेमळ कौतुकाबद्दल आभार. पण प्रामाणिकपणे सांगते आवाक्याबाहेर जाऊन काही केले नाहीये मी तरी. सगळीकडून सगळ्या प्रकारे मदत मिळत गेली म्हणून केवळ हे शक्य झाले.
धन्यवाद पेरु. एक एक टप्पा पार होत जाईल तसे पुढचे अडथळे आणि त्यावर उपायही दिसत जातील. त्यावेळी नक्कीच संपर्क करेन काही लागल्यास.
ग्रेट काम कविन आणि सुनिधी!
ग्रेट काम कविन आणि सुनिधी!
तुम्ही जबाबदारी घेऊन हे सगळं केलंत आणि करताय याचं कौतुक करावं तितकं कमी!
हो ना! नुसती पैशाची मदत करणं
हो ना! नुसती पैशाची मदत करणं सोपं आहे. पण पुढाकार घेऊन माहिती काढून वेगवेगळ्या लोकांशी, त्या मुलाशी बोलून , तेही इतक्या लांबून हे करणं खरंच कौतुकास्पद आहे. कोणी एन जी ओ सुद्धा इतकं सगळं करत नसेल.
Pages