Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 15:00
संवाद झाकलेले
हे शब्द मापलेले,
अन अंतरी मनाच्या
हे भाव गोठलेले
दडपून भावनांना
उरती सवाल अंती,
का बंद ही कवाडे?
उभ्या कशास भिंती?
अडवू शकेल गाणे
ऐसी ही भिंत नाही,
आलाप देण्या परंतु
कोणा ऊसंत नाही
चक्रात जीवनाच्या
अडकून श्वास मेले,
स्वर छेडिताच ओठी
का हुंदकेच आले?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर.
सुंदर.
चक्रात जीवनाच्या
चक्रात जीवनाच्या
अडकून श्वास मेले,
स्वर छेडिताच ओठी
का हुंदकेच आले?
सुंदर
सुंदर !
सुंदर !
सामो, दत्तात्रय आणि कुमार,
सामो, दत्तात्रय आणि कुमार, खूप आभार!
सुंदर!!
सुंदर!!
आभार संजना!
आभार संजना!