आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवॉर्ड ट्रॉफी पाहिली का? प्लास्टिक.

वीणाचं म्हणणं बरोबर आहे. अरुंधतीने नक्की काय केलं अभिषेकसाठी जे दुसरं कोणी, पक्षि अनघा करू शकत नव्हती?

नितीनकडे यशचा नंबर आहे. अरुंधती फोन उचलत नाही म्हटल्यावर त्याला विचारू शकत होता.

यावेळी अभिषेकला मारहाण व्हायची राहिली. अरुंधतीला दिलेले संवाद महान आहेत. डॉक्टरकीचा अभ्यास करतानासुद्धा अभि पेशंटची विचार करायचा. तिचे उसासे परत आले.

आशुला अवॉर्ड मिळालं ते बाकी सगळ्याना कळलं , टीव्हीवर आणि पेपर्मध्ये सगळीकडे त्याचा फोटो झळकत होता , त्याला कोणी एक अभिनंदनाचा फोन किंवा मेसेज ही करू नये??? त्रिकुटाने येउन सांगितल्यावरच कळलं .
ती जानकी गाढ झोपलेली , तिला वाढदिवसाला घेउन गेली अनघा ???
वीणाचे डोळे खरच पूर्वीच्या काळी मिळणार्या बाहुल्यांच्या डोळ्यांसरखे दिसतात - मोठ्ठे , चिकटवल्यासारखे .
आशुचे ते ब्राउन शूज वीणाच्या साडीला जास्त मॅचिन्ग होत होते.
आशूच्या सूटचा कलर आवडला. पण त्याच्यापेक्शा नितीनच छान दिसत होता.
अरूची साडी , आप्पांचा सदरा , अभिचा शर्ट , यशच टीशर्ट सगळं हिरवं हिरवं .

नितीनकडे यशचा नंबर आहे. अरुंधती फोन उचलत नाही म्हटल्यावर त्याला विचारू शकत होता. >>>
किन्वा अनिश ईशाला / वीणा अनिरुद्धला / आशु यश ला / आशु अभिला /

काल जी व्यक्ती सिरीयस आहे ती पहिल्यांदा मुलगी होती , नंतर काही वेळाने दोन मुलींची आई झाली आणि आज तर चक्क सद्गृहस्थ झाली. आहे की नाही कमाल !

काल जी व्यक्ती सिरीयस आहे ती पहिल्यांदा मुलगी होती , नंतर काही वेळाने दोन मुलींची आई झाली आणि आज तर चक्क सद्गृहस्थ झाली. आहे की नाही कमाल ! >>>>>> अगदी अगदी. काल तो पेशण्ट गेला असेही बोलत होता. नक्की कोण मेलय? वडिल की आई?

मुळात ऑपरेशन चालू असताना अ‍ॅनास्थेशिस्टला तू आता जा असं सांगणं अशक्य आहे. पेशंटचे व्हायटल्स मॉनिटर करणं आणि ऑपरेशन होईतो त्याला गुंगीत ठेवणं. तसंच डोस प्रमाणात ठेवणं हे त्याचं काम. त्याच्याशिवाय ऑपरेशन अशक्य.

हो ना आणि ऑपरेशन झाल्यावर पेशंटला हळू हळू करेक्ट मेथ डने भूल मधून बाहेर आणणे पण त्याचेच कर्तव्य असते. भोपळ्या नुस्ती लफडी करत बसला आहे. काम पे ध्यान दे दो ना भाई. मी पण ऑफिसात गेम खेळते पण आज गरज होती म्हणून शनिवरी पण आले आहे. आणी इमेल ला उत्तर देणे आपले प्रथम कर्तव्य आहे अश्या भावनेने गॅप मध्येच खेळते.

आज अर्धा वेळ अभीचे दु:स्वप्न. मग अनघाचे समजावणे ह्यात गेला. मग आशू रुसून बसला आहे. सासू बोलत नाही.
अरु च्या चेहर्‍यावर टेस्ट फेल गेल्याचे भाव आहेत. दुसर्‍या सासरी लगेच मन मानी करू लागली ही. तिथे बरी आजेने
धाकात ठेवलेली( असे अन्या म्हणेल.) आशूचा राग लगेच उतर्ला दोन मिनिटात. परत बावळ्या नजरेने बायकोकडे बघत होतं यडं

आशु च्या चेहेर्‍यावर खरेच फार बावळट भाव असतात. तसेच तो बर्‍यापैकी काळा दिसतो.... का नाही फेअर करीत मेकअप ने?
दोघे अंतर ठेवून मिठी मारतात... !! अगदी ऑड दिसते ते.......... त्यापेक्षा सरळ नुसते हातात हात घ्यावेत...आशु अरु च्या मवाळ प्रकृतीला तेव्हढेच झेपेलही... !! ताई दादा टाईप्स वागतात दोघे!

नितीनची वर्षा एकदा तरी दाखवा म्हणा सिरीयल संपण्या पूर्वी... (अथवा आम्ही बघायची बंद करण्यापूर्वी!! )

अमा, आंबट गोड मस्त लिहिलय.

नितीन च कॅरॅक्टर मला असराणी ची आठवण करून देतो. हिंदी पिक्चर मध्ये हिरो चा मित्र असायचा तो.
Btw नितीन च पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्याचा अभिनय मला आवडतोय हल्ली.

नितीन च पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्याचा अभिनय मला आवडतोय हल्ली.>> तो ने हमी नॉर्मल अभिनय करतो. जास्त काहीच करत नाही. आटोपशीर व्यक्तिम त्व. बाकी सगळ्यांचे कलरिन्ग लायनीच्या बाहेर सांडते. तो दिसायला ही गोड आहे गोरा गोमटा व व्यवस्थित कपडे असतात. मुंबईत दिसतात असे लोक्स. व आशू फारच आदर्शवादी आहे त्याला हा प्रॅक्टिकल रेंज मध्ये राहायला मदत करीत असावा.

आशुतोषने तो अवॉर्ड नितीनकडे सोपवायला हवा. आभाराच्या भाषणात त्याचं नाव तरी घेणार होता का?
अरुंधती आशुतोषला गृहीत धरते आणि तो नितीनला.

मुळात लग्न होऊन काही महीने झालेले असताना भाषण फक्त अरुबद्दल ?

न येण्याचं कारण काय आहे ते एखादी असती तर भडाभडा सांगून मोकळी झाली असती, अजून अरु सासूला - तुम्ही रागावला आहात का, याव नी त्याव. मूळ मुद्द्यावर यायचचं नाही पटकन.

ताई दादा टाईप्स वागतात दोघे!>>> अगदी.
न येण्याचं कारण काय आहे ते एखादी असती तर भडाभडा सांगून मोकळी झाली असती,>> होना. दरवेळी पहिल्यांदा अशूला फोन करते ती… आप्पा हरवलेत, यशला अपघात झाला, ईशाने घोळ घातला, घरी पोलिस आले याव आणि त्याव.

अरे बघत नाही काय कोणी. अन्याने नव्या हपीस ची जागा स्वस्तात घेतली आहे पण त्याचे टायटल क्लीअर नाही. हे ऐकून आरु एकदम आश्चर्य चकित दाखवली आहे. आपला घरातला अर्धा भाग विकून पैसे कर णारी हीच स्त्री ना. नित्या कायम अन्याच्या केसवर असल्या सारखा वागतो. चुका शोधायला टपल्या सारखा. वीणाचा फोन अन्या कडे आहे पण तो अजून तिला देत नाही. व्हेरी सॅडिस्टीक. तिचा त्रास बघून सुखावत आहे.

वात्रट निखिल आलेला आहे. हे सर्व पब्लिक आइसक्रीम खायला जाते. आजी अजून गायब आहे.

आज आरू नणंदेला घेउन शॉपिन्ग फिरायला जाते तर एक बाई व तिचा अब्युजिव नवरा येतात व भांडू लागतात आरू फाइट करते व त्याला पोलिसाच्या हातात देते. हे बघून वीणा विरघळते व रात्री आशूच्या मांडीवव्र डोके ठेवुन ढसा ढसा रडते.

अमा..:-)
अरु ने तिला ढीगभर कपडे घेऊन दिले..
आजकाल फार श्रीमंती वागायला लागली आहे.....पंचवीस तीस हजारांची तरी असेल खरेदी !
पूर्वी हिला सांगा बरे......ईशा ला ज्ञान पाजळीत असे

वीणाचा फोन अन्या कडे आहे पण तो अजून तिला देत नाही. व्हेरी सॅडिस्टीक. तिचा त्रास बघून सुखावत आहे.
वात्रट निखिल आलेला आहे. >>> लप्वलेला फोन शोधायला का?

वात्रट निखिल आलेला आहे. >>> लप्वलेला फोन शोधायला का?>> अगदी हेच वाटले.
सगळ्या प्रायव्हेट गोष्टी फोन मधे ठेऊन तो फोन घेऊन गावभर फिरायचे Uhoh आता अन्याच्या हाती तो फोन लागला आहे आणि त्यात तो बघताना दाखवला आहे म्हणजे त्या फोनला लॅाक नाहीच. आणि असेल तर अन्याला पासवर्ड माहितेय!
आजकाल फार श्रीमंती वागायला लागली आहे....>> हा हा. मग तिला वीणाचा भूतकाळ कसा कळणार? घरी गप्पा माराव्यात तर ती घरात थांबत नाही. चांगले काही करून खायला घालावे तर ती अन्याबरोबर बाहेरच जेऊन येते. मग खरेदी हाच उपाय सुचला तिला.
आपला भाऊ मोठा बिझनेसमॅन आहे तर त्याला सांगून दुष्ट नवर्याचा बंदोबस्त वीणाने करावा ना. पण नाही. हे सगळं आता जासूस अरू निस्तरनार मग सगळे तिचे गोडवे गाणार.
मागे इशा अनघाला बोलते कि काल दादा किती खचला होता आज अगदी आशावादी वाटला तू काय केलंस त्यावर ती बोलते कि हा बदल ताईमुळे झाला मला तर काहीच सूचत नव्हतं. मला तर प्रश्न पडतो कि ही काय काऊनसेलिंग करत असेल. हिच्या क्लिनीकचे नाव नक्कीच ‘ताईचा सल्ला’ असणार.

ताईचा सल्ला Rofl डॉक्टर नवर्‍याला तूच आज मुलीला बड्डे पार्टीला घेऊन जा, माझी न बदलता येणारी अपॉइंटमेंट आहे असं सांगून मग त्याच्या स्थितीला आपणच जबाबदार असं समजणार्‍या अन्घालाच कौन्सेलिंगची गरज आहे. आता तो दीनवाणा झाला म्हणून त्याला माफ केलं आणि कध्धी कध्धी सोडून जाणार नाही.

संवाद लेखिका बाई साकारत असलेले डॉक्टर पात्र गायनॅक आहे ना? मागे एक बाई बाळंतपणात दगावून अभिषेकला मार पडला तेव्हा सगळे मिळून तीन डॉक्टर होते तिथे. अंकिता तिसरी. त्यांचं क्लिनिक अचामक मल्टि स्पेशलिटी हॉस्पिटल होऊन त्यात पुरुष पेशंट कधीपासून येऊ लागले? कोणाला काही पत्ताच लागू दिला नाही.

देशमुखांकडे फक्त ईशाला आतापर्यंत कुठे पाठवलेलं नाही. अन्य प्रत्येक पात्र कधी ना कधी गायब झालेलं आहे. कांचनचाही नंबर लागला.

कोणाचा दुष्ट नवरा, अन्या का. दोन दिवसाआड आशुतोष आणि अनिश चहा पित होते तर सुलेखा ताई फोडणीच वरण खात /पित होत्या. नक्की कुठली वेळ असेल Uhoh आधी चहा आणि मग वरणाच कौतुक झालंच. अरुने पाणी आणून दिलं तरी यांना ते अमृतासमान लागत असेल Wink

कोणाचा दुष्ट नवरा, अन्या का.>>> नाही. वीणाचा. ती आता अरूकडे गौप्यस्फोट करणार आहे.
त्यांचं क्लिनिक अचामक मल्टि स्पेशलिटी हॉस्पिटल होऊन त्यात पुरुष पेशंट कधीपासून येऊ लागले? >> Lol
काल अन्या अभीला सांगतो ‘तू दवाखाना सोडून स्वत:ची प्रॅक्टीस सूरू कर. तूझ्याकडे डोके आहे, हाताला गूण आहे. पेशंटशी चांगले संबंध आहेत. तिथे तूझ्यावर विश्वास ठेऊन येणारे कितीतरी लोक असतील. ते सगळे त्यांना गरज असेल तेव्हा तुझ्याकडेच येतील.’
आपला ठरलेला भाजीवाला असतो तसा भूलवालापण असतो का? चला आता भूलीची गरज आहे तर जाऊन भूल घेऊ म्हणायला. कि ॲापरेशन करायचे ठरल्यावर आपण डॅाक्टरला सांगतो का… माझा भूलवाला चांगली भूल देतो त्यालाच बोलवा. काहीही!

आपला ठरलेला भाजीवाला असतो तसा भूलवालापण असतो का? चला आता भूलीची गरज आहे तर जाऊन भूल घेऊ म्हणायला. कि ॲापरेशन करायचे ठरल्यावर आपण डॅाक्टरला सांगतो का… माझा भूलवाला चांगली भूल देतो त्यालाच बोलवा. काहीही!

Rofl Rofl

वीणाचं म्हणे लग्न झालं आहे, हे ऐकून सगळ्यात जास्त दु:खी कोण होईल सांगा बरे ?

वीणाचा अन्याकडे असलेला फोन बहुतेक निखिलच्या हाती लागणार. म्हणूनच त्याला आणलं आहे. कांची काही सुधरत नाही, अजूनही तिचं चालूच आहे- यशचं लग्न होऊ दे लवकरात लवकर.

अन्या मोठ्या कंपनीचा सी ई ओ आहे, पक्षी वीणाची कंपनी मोठी आहे पण तिच्याबद्दल कोणालाही काहीही माहीती नाही. ती अचानक उगवली. इथे अंबानींच्या पोराने हात वर केला तरी बातमी होते.

वीणाचा अन्याकडे असलेला फोन बहुतेक निखिलच्या हाती लागणार.
Happy लेखिकेलाही सुचत नसतील अशा आयडिया इथे सुचतात.....

वीणाचं म्हणे लग्न झालं आहे, हे ऐकून सगळ्यात जास्त दु:खी कोण होईल सांगा बरे ?... Lol
कोण? अनिरुद्ध?
की सुलेखा ताई?
वीणा डोमेस्टीक अ‍ॅब्युज ची शिकार ए!

Pages