“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”
मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.
तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.
***
स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.
“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “
“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “
“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.
“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.
मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.
चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.
इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.
ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.
“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.
“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.
***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.
इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.
तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.
तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.
मी या कथेवर प्रतिसाद देताना
मी या कथेवर प्रतिसाद देताना मला हे असे काही झेपणारे नाही हे आधीच लिहिले होते. त्यानंतरचे इतके सगळे प्रतिसाद वाचून पुन्हा सविस्तर प्रतिसाद.
मला ही कथा विनोदी वाटली नाही. रिग्रेसिव वाटली कारण ताटातले वाटीत करताना मूळ हुंडा पद्धत ही दिखाव्यासाठी का होईना पाळली गेली. यातून जनमानसात काय ठसले तर सो क्लॉल्ड रीतीभाती पाळून केले गेलेले लग्न! हुंडा मिळतो हे अधोरेखीत झाले आणि अजून काही वर पित्यांचे धैर्य वाढले.
एखाद्या कथेतील पात्रं कशी वागतील ते माझ्या हातात नाही, तो हक्क लेखीकेचा. ती लबाड असतील, साधी-भोळी असतील, पुरोगामी-प्रतिगामी विचारांची असतील, अॅब्युझिव असतील, जे काही असेल ते. पण यात लेखीकेने २ महिन्यांनी असे म्हणत जो शेवट लिहिला आहे त्याचा टोन ती कथा रिग्रेसिव करतो. कारण एक शहरात रहाणारे , उच्च शिक्षित जोडपे कायद्याने बंदी असलेल्या प्रथेपुढे मान तुकवत आपल्या परीने जे उत्तर शोधते त्याबद्दल खंत, चीड व्यक्त होत नाही. 'कसे फसवले' असा विनोदी टोन ही कथा रिग्रेसिव करते. इथे निर्णयाची किंमत हा मुद्दा आलाय तर पिनीने धैर्याने परीस्थिती हाताळली, जे काही परीणाम होते ते स्वतः स्विकारले. या कथेत निर्णयांचे परीणाम - चुकीची प्रथा घट्ट होणे - समाज भोगतो.
>>>>> बाय द वे या कथेत
>>>>> बाय द वे या कथेत लग्नसमारंभ पार पडल्यावर ही अनेक दिवस हो किंवा नाही हे नक्की सांगत नसलेली ………. असाही एक Happy
_/\_
स्वाती2 अगदी अगदी.मुद्दे चोख
स्वाती2 अगदी अगदी.मुद्दे चोख आहेत.मनात हेच आले होते.
स्वाती२
स्वाती२
मला ते निळू फुलेंचे सुप्रसिद्ध वाक्य लिहायची इच्छा नाही. "मास्तर... इत्यादी."
तसेच कथेचे विश्व निराळे आणि लेखिकेच विश्व निराळे. लेखिकेने असा डिस्क्लेमर टाकायला पाहिजेच का? जास्त डिवचल्याने लेखिका जाळ्यात फसत गेली. So sad.
फारएण्ड , छान व संतुलित
फारएण्ड , छान व संतुलित प्रतिसाद.
तसा हा धागा आता व्हर्सटाईल झालेला आहे. ज्यांना कथा वाचायची त्यांनी कथा म्हणून वाचा, ज्यांना चर्चा हवी ते चर्चा करू शकतात आणि ज्यांना कविता वाचायच्यात त्यांच्यासाठी कविताही आहेत.
माझे काही अनुभव आता याच धाग्यावर नोंदवतो.
आमच्या ९९% नाते, सोयर्यात
आमच्या ९९% नाते, सोयर्यात हुंडा ही प्रथा पा़ळत नाहीत. निम्मे लग्न साधेपणाने करतात. निम्म्यांना पीअर प्रेशर म्हणून लग्नाचा भपका करावा लागतो ( असा त्यांचा दावा आहे). त्यावरून लग्न लागल्यावर वादही होत असतात. मध्यंतरी एक लग्न हॉटेल अरोरा टॉवरला झाले. नंतर एक अशोका एक्झेक्युटीव्हला झाले. एरव्ही मला दारवानाने आतही सोडले नसते. या निमित्ताने ते पाहून झाले. दोन्ही वेळेला या भपक्यावर अनाठायी खर्च झाला असे निम्म्या लोकांचे मत होते. त्यातल्या फटकळ मावशा, काकवांनी ते मुलीच्या बापाला बोलून दाखवले. त्यात नंतर बाप्यांनी पण उडी घेतली. मुलीचा बाप आधीच खर्चाने बेजार झाला होता. त्यात हा हल्ला. अगदी मायबोलीची आठवण झालेली.
दुसरे गुजरातेतल्या अशाच एका राजेशाही ठिकाणी लग्न लागलेले. मुलगा गुजराती व्यापारी कुटुंबातला. कँपात त्याचे दुकान आणि कोंढव्याला कसला तरी कारखाना होता. २००२ किंवा त्या आसपासची गोष्ट असेल. मुलाला ५ कोटी रूपये दिल्याचे सर्वांना समजले. त्यावरून सतत धुसफूस चालू होती. आंतरजातीय विवाहाबद्दल नाराजी नव्हती. पण एव्हढा मोठा हुंडा का हा प्रश्न सर्वांच्या चेहर्यावर होता.
त्यावर हा हुंडा नसून दुसरा काही तरी शब्द वापरला. तसेच त्यांच्यात ही खूप कोरकोळ गोष्ट आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. रीतसर घरी येऊन विचारणा झाली आहे. तर त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. त्यांना २५ - ३० कोटी देणारे लोक भेटतात. अशात जर आपण तत्त्वांना कुरवाळत बसलो तर मुलीचेच नुकसान आहे असे मुलीच्या आईने सांगितले. कारण जर हे लग्न नाही झाले तर लग्नच करणार नाही असे तिने सांगितले होते. लग्न लावल्यानंतर रिवाजाप्रमाणे वादविवाद झाले. मुलीच्या बापाने सरळच सांगितले, तुम्हाला पण मुली आहेत त्या वेळी बघीन मी पण. हा बाप प्रत्यक्षात हुंडा विरोधी जागृतीचे काम करत असतो.
नंतर कल्चरल डिफरन्स मुळे लग्न मोडले ते मोडलेच.
हा सगळा एलिट क्लास. अगरवाल समाजाच्या एका लग्नाला गेलो होतो. स्वारगेटजवळ त्यांचे भले मोठे मैदान आहे. तिथे सिनेमासारखा सेट लागला होता. येणार्या प्रत्येकाला सोन्याची अंगठी दिली होती ( मला सोडून ). येणार्यांनी सुद्धा महागडी गिफ्ट्स आणली होती. प्रत्यक्ष लग्नात करोडोंचा चुराडा झाला. ज्यांना आपण चेंगट समजतो ते सण, उत्सव , समारंभात पाण्यासारखा पैसा खर्च करतात. अशांच्या लग्नात हुंडा देणे आणि घेणे हे सुद्धा प्रतिष्ठेचे लक्षण आहे. त्यावरून पत ठरते. सामाजिक कामात, व्यवसायात यापेक्षा वेगळी वागणूक झाल्यास एक रूपया दंड लागतो. जर हा दंड झाला तर समाजात कुणीही त्या कुटुंबाशी सामाजिक / आर्थिक संबंध ठेवत नाही. अक्षरशः भीकेला लागायची वेळ येते.
दृष्टीआड सृष्टी.
स्वाती ताई, पर्फेक्ट लिहिलंय.
स्वाती ताई, पर्फेक्ट लिहिलंय. अजिबात विनोदी वाटलं नव्हतं मलाही, म्हणून प्रतिसाद द्यायचा टाळत होते.
अनुशी, सहमत. पीनी यांच्या मोकळेपणाने दिलेल्या प्रतिसादाचा 'See, I told you so' साठी वापर केलेला खटकले आहे. बऱ्याच जणांचे प्रतिसाद आवडले आहेत.
कोण कुठल्या भागात रहातो, त्याप्रमाणे सहजीवनाचा मूळ आधार बदलत नाही / बदलू नये. हे लव्ह मॅरेज नाही, तिला पर्याय आहेत. इतक्या जवळच्या नात्यात लपवाछपवी करणारा मुलगा स्वतः कसा ऑथेन्टिक असेल. ( अवांतर: तरीही तिला त्याचं आकर्षण वाटत आहे म्हणून मला 'दहाड' सिरिज आठवली. त्याच्यावर पोरी कशा लगेच विश्वास ठेवायच्या, सामाजिक परिस्थितीमुळे स्वतःचे एंटिने कधी वापरलेच नाही. नंतर काय झालं. )
फा चा ट्विस्ट
छन्दिफन्दी, तुम्ही लिहीत रहा. अशा चर्चा कधीकधी घडतात आणि घडाव्याच लागतात. तुमचं इतर लेखन वाचकांना पसंत पडलंच आहे. याला पर्सनली घेऊ नका. मायबोलीकर आकस बाळगत नाहीत, तेवढ्यापुरतं/त्या विषयापुरतं असतं हे. पुलेशु
केशवकूल,
केशवकूल,
कथेतील मुलगा जो उपाय शोधतो, जी तडजोड करतो त्यातली अगतिकता काही प्रमाणात आपल्या पर्यंत पोहोचते न पोहोचते तोच शेवटाला कथेचा टोन बदलतो. आधीच्या वाईट वास्तवाशी खुदु खुदु हसणारी वधू, तिचे सुखावलेले पालक हा सगळा बदललेला टोन मेळ खात नाही हे माझे मत!
नात्यातील व्यक्तीने व्यवसायाचा भाग म्हणून अनुभवलेली भपकेबाज लग्न, वरपक्षाच्या आयत्या वेळच्या मागण्या, वरपक्षाच्या तीन दिवसाच्या तारांकित वास्तव्याची सोय करताना वधूपित्याने केलेला खर्च याचे अनेक किस्से ऐकवले आहेत . त्याच जोडील अगदी श्रीमंत क्लाएंट्सही या सगळ्यामुळे मेटाकुटीला येणे, त्यांचे 'मॅम, प्लीज तुम्हीच समजूत काढा विनवणे याचेही भरपूर किस्से ऐकवलेत. अगदी इथे अमेरीका कॅनडातही भारतीय समाजात हुंड्याची कीड बघितली आहे. बहुसंख्य समाजासाठी वास्तव आजही फार वाईट आहे आणि त्यामुळेच जेव्हा अशी कथा येते तेव्हा ती लाईटली घेणे शक्य होत नाही. मायबोलीवर विरोधाचा सूर असलेल्या प्रतिक्रीया आल्या त्यामागे कारण आहे ते सकारात्मक सामाजिक बदलाची अपेक्षा . ही कथा वाचकांना विनोदी वाटली नसल्यास ते देखील एक प्रकारे आशादायक चित्रच!
घनघोर चर्चा झालीय की.
घनघोर चर्चा झालीय की.
कथेतल्या शेवटच्या काही वाक्यामुळे सासरचे लोकं हपापलेले आणि लफंगे वाटले.
चर्चा तत्व म्हणजे तत्व ते प्रॅक्टिकल अप्रोच अशा लंबकात झुलतेय.
रघु आचार्य ह्यांच्या पोस्ट वाचून त्यांचा।प्रॅक्टिकल अप्रोच कळला, ग्रामीण भागात काही ठिकाणी काही परिस्थितीत कसा अप्रोच असतो ते कुठेतरी आठवलं.
निळूभाऊ फुले ह्यांचा एक जुना मराठी चित्रपट आठवला कथा वाचून.
त्यांना मुली असतात 3 की 4 आणि परिस्थिती बेताची.
ते जुगाड लावून लग्ने लावतात एकेक.
अर्थात चित्रपट विनोदी अंगाने होता.
इतके तत्व ज्ञान इथे अनेक आयडी
इतके तत्व ज्ञान इथे अनेक आयडी सांगत आहेत पण.
जमिनीवर कोणी च येत नाही.
अनेक बाह्य बळ इथे कार्यान्वित असतात.
तुमच्या वैयतिक् विचारणा, कुत्रा पण विचारात नाही.
मला ऐश्वर्या रॉय सारखी बायको हवी होती.
ही आशा जितकी महा फालतू आहे.
तसे प्रतेक मुला ,मुलीच्या जोडीदार विषयी कल्पना अती फालतू आहेत.
त्या कधीच प्रत्यक्षात येवू शकत नाहीत
इथे सर्व च आयडी रिॲलिटी कडे दुर्लक्ष करून मोठे समाज सुधारक होत आहेत
<< मी प्रथम पासूनच महिला
<< मी प्रथम पासूनच महिला आर्थिक सक्षमी करणा च्या बाजूने आहे. प्रेम लग्न संसार सासरचे काही ही होवो मुलगी आर्थिक बाबीं मध्ये सक्षम पाहिजेच. हे नॉन निगोशिएबल मला वाटत आले आहे. तिच्या कडे त्या साठी शिक्षण पाहिजे व शिक्षण पूर्ण झाल्यावर वर्क एक्स्पिरिअन्स पण हवा. >>
-------- सहमत. मला हा दृष्टीकोन महत्वाचा वाटतो.
स्वाती २ - वरचे दोन्ही प्रतिसाद आवडले.
इतके सोप आहे का ?
इतके सोप आहे का ?
आर्थिक बाबतीत सक्षम होण्यासाठी खूप तडजोड करावी लागते.
मास्टर डिग्री मिळवली आहे आणि नोकरी मिळेल तेव्हा आर्थिक सक्षम मी होईन अशी वृती आताच्या मुला मुलींची आहे.
नोकरी एक आणि त्याचे दावेदार लाखो.
अशी स्थिती आहे .
ह्या मास्टर डिग्री मिळवणाऱ्या मुला मुली न पेक्षा सातवी पास मुल ,मुली कोणता ही उद्योग ,व्यवसाय करून लवकर स्वतःच्या पायावर उभे राहतात.
आणि हे स्वप्नात जगणारे तिशी ओलांडली तरी आई वडिलांच्या पैशा वर च जगत असतात.
हे रिॲलिटी आहे
हुंडा प्रथा खरोखरच वाईट्ट आहे
हुंडा प्रथा खरोखरच वाईट्ट आहे असे वाटते. वरच्या कथेमधे काहीतरी चुकत आहे.
पैसा कुणाचाही असला तरी बुरसलेली "प्रथा" पाळण्याचे नाटक झाले आहे.
मुलाने खंबिर राहून आपल्या वडीलांना हुंडा प्रथा समाजासाठी कशी वाईट आहे हे समजवायचे होते. तसा काही प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. काल पर्यंत चाललेली दृष्ट प्रथा आपण पुढे सुरुच ठेवत आहोत.
प्रथा सडकी आहे. आणि अनेक मुलींचा छळ होतो/ कधी जिवपण जातो.
प्रथेचे लटके समर्थन करणारे , कानावर आलेले संवाद
"आम्ही कुठलाही हुंडा घेतला नाही... पण हो शास्त्रासाठी म्हणून वरदक्षिणा घेतली."
"आमचा हुंड्याला विरोधच आहे... पण काय आहे आजकाल समाजांत हुंडा नको म्हटल्यावर मुलामधे काही कमी आहे असे समजतात.... म्हणून आम्ही अगदी इच्छा नसतांना केवळ एक प्रथा म्हणून..."
"आम्हचा हुंड्याला विरोधी आहे, पण किती हुंडा घेतला यावरुन समाज आपली पत ( status symbol ) ठरवतो... म्हणून.. "
" आम्हाला हुंडा नकोच आहे... तुम्ही जे काही देणार आहात ते तुमच्या मुलीच्या संसारासाठीच आहे.... आमच्यासाठी नाही."
" मुलगा डॉक्टर / इंजिनियर आहे... त्याला स्वत: चा व्यावसाय थाटायचा आहे.... काही instruments विकत घ्यावी लागतील..." आधीच्या काळांत गृह उपयोगी वस्तू फ्रिज असे असायचे. आता गाडी पण मागतात... मुलीसाठीच , तिला ने- आण करायला.
उदयजी बरे झाले तुम्ही आलात.
उदयजी बरे झाले तुम्ही आलात.
या धाग्यावर योग्य नाही पण तरीही विचारावंसं वाटतं. तुम्ही कोणत्या पक्षाची बाजू मायबोलीवर घेता हे आता सर्वांना माहिती आहे. प्रत्यक्षात या पक्षाचे मंत्री, संत्री ,आमदार, खासदार, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट सोडाच ग्रापं सदस्य सुद्धा हुंडा घेतात हे लपून राहिलेले नाही. ओपन सीक्रेट आहे हे. तसेच या पक्षाच्या आमदारांच्या मुलांची लग्ने (युट्यूबरवर आहेत) पाहिली तर राजे महाराजे सुद्धा कमी पडतील.
पुरोगामी चळवळींना हे अपेक्षित नाहीच. उलट लग्नावर किंवा सार्वजनिक समारंभात श्रीमंतीचे प्रदर्शन हा कायद्याने गुन्हा आहे. २०१४ ला मोदींनी कायदा बदलला असेल तर माहिती नाही. मुंबईच्या चौपाटीवर हिरे व्यापारी शहा यांनी मुलाचे लग्न श्रीमंती थाटात केले म्हणून गुन्हा दाखल केला होता. (माबोवर उल्लेख आहेत याबद्दल).
एव्हढे होऊनही त्यांना जाब का विचारला जात नसेल ? त्यांनाच निवडून देण्यात काही चुकीचे आहे असे आजवर का वाटलेले नाही ? समस्याच संपली असती ना ! जर या मंडळींना कायद्याने शिक्षा होते तर मग सामान्यांचे काय ही जरब नसती का बसली ?
हेमंत - शिक्षण, नोकरी या
हेमंत - शिक्षण, नोकरी या अडचणी सर्वांसमोर आहे.
अर्थांजन करण्यासाठी नोकरीच करायला हवी असेही नाही. नोकरी/ व्यावसाय काही पण करा पण आर्थिक स्वावलंबन असणे महत्वाचे आहे.
<< निर्णयाची किंमत मोजली ५
<< निर्णयाची किंमत मोजली ५ वर्ष (ऐन उमेदी्तली)>> समजतंय का काय लिहिताय! कोणी पर्सनल अनुभव लिहिला असेल तर त्यावर इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट!>>>> परत तेच चुकीचं interpretation >>
------- मूळ प्रतिक्रिया वाचली... पुन्हा वाचली. त्यांचा अनुभव त्यांनी कथित केला आहे.
" मी हुंडा देणार नाही... " असे त्यांचे तत्व होते आणि सम -विचारी व्यक्तींच्या शोधामधे काही वर्षे लागली असतील तरी आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहिल्याचे समाधान त्यांना उर्वरित आयुष्यात सतत ऊर्जा देत रहाणार. असे उदाहरण क्वचित घडते पण त्याचा impact आसपासच्या २५ मुलींवर होतो. हा बदल समाजासाठी सकारात्मक आहे.
मी स्वतः हुंडा देण्या
मी स्वतः हुंडा देण्या-घेण्याच्या कट्टर विरोधात आहे.
-----
अन्यत्र एक असा मुद्दा ऐकण्यात आलेला की आईवडीलांनी जर मुलीला हुंडा दिला नाही तर नंतर ते बरेचदा मुलीला काहीच देत नाहीत / भाऊ मिळू देत नाही अशा वेळी मग लग्नात एक प्रकारे काही एक रक्कम मुलीला जाते ते बरोबर वाटते.
याचे खंडन - ती रक्कम मुलीला जातच नाही. ती मुलाकडच्या घरच्यांना जाते
सांगायचा हेतू हा की असा एक मुद्दा ऐकीवात आहे.
वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना
वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.<< ऑफिसातला सीन. म्हणजे मुलगी नोकरी करते. शिकलेली आहे.
तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत>>> लग्न कारण तिची priority नाहीं किंवा प्रेशर मध्ये नाही
आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.>>> तिच्याकडे empathy आहे. जजमेंट आहे
नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.
फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा
त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.>>> ते बोलणं यासाठी पण त्याला धीर एकवटायला लागला. तो त्याने दाखवला. मुलगा शमळू. नक्कीच नव्हता
त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस>>>> मुलाने मुलीचा रूप न बघता. तिचा स्वभाव बघितला
"जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. >> मुलाने दुसरं जग शिक्षणाच्या / नोकरीच्या निमित्ताने बघितलंय म्हणून त्याला स्वात ची ठाम मत aaliyet
पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं.
तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे">>>>>>
त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. तो त्या जुन्या जोखडातून / daldalitun बाहेर पडू इच्छितो.
वडिलांशी बहुदा या विषयावर वाफ घालून झाले असावेत..
त्यातून त्याने त्याच्या पद्धतीने काढलेला मध्या, बाबांना आपल्या शिक्षणावर केलेला खर्च परत पाहिजे ना? ठीक आहे तो त्यांना मिळेल.
संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं. >>> शे started falling for him for his odds
पण मग पुढे काय आणि कसं होईल>>>> शे इज thinking
वून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते>>> लेखिकेने घेतलेली liberty to emphasize the character.
लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला >>> आतापर्यंत. ती नायिका calculated risk taker आहे हे evident aahe.
ती त्या सासर्याची मजा घेतेय...
सासऱ्याने शिक्षणावर झालेला खर्च मिळवणं गुन्हा नाही पण तो मुलाकडून, सूनेकडून नाही.
सुनेला यात गुंफण हा गुन्हाच आहे
चागळी अद्दल घडली
आता आक्षेप बघुया
आता आक्षेप बघुया
१. मुलीने ह्या अशा मुळाशी लहान का करावे , ही रिस्क आहे.
रिस्क आहे बरोबर आहे.
एक तर वरती कोणी suggest केल्या प्रमाणे अगतिक असेल.
किंवा
बिनधास्त रिस्क taker असेल
She is a risk taker he evident aahe
पण त्यानेच तर story झाली ना.
जेव्हा एखादी गोष्ट हटके असते तिथेच कथा मिळते
२. मुलाने बापाशी भांडण करुन त्याला का नाही बदलविले?
ह्या गोष्टीचा मूळ गाभा च मुलाने त्याला योग्य वाटणारी शक्कल काढली हा आहे.
भांडण करून बापाला वठणीवर आणणार्या मुलाची गोष्ट लिहिता येईलच की. ज्यांना वाटते त्यांनी लिहावी मला वाचायला आवडेल
३. खोटे पणा, white lies वगैरे वगैरे
गोंधळ होऊ नये, परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, किंवा अन्य काही कारणासाठी सगळेच (सफेद) खोटं बोलतात हे ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांनीच मान्य केलंय.
४. हुंडा घेणे
हुंडा घेण्याचं समर्थन कोणीही करत नाहीये अगदी तो आणि ती.
त्याच विरोधच आहे पण तो मुलगा vulnerable आहे .
त्याच्यासाठी सुद्धा सोपा ऑप्शन होताच की वडिलांचं ऐकून ते सांगतील त्या मुलीबरोबर लग्न करायचं.
पण त्याला त्यातून बाहेर पडायचे आहे म्हणून तो एव्हढ्या धीराने, स्पष्ट पणे तिला सांगतो.
तिला कदाचित ते आवडलं असेल.
मुख्य मुद्दा समजातील काही घटक अजूनही (?). तिकडे च अडकलेत. आणि त्यांना फक्त चर्चा नाही karaychiye . त्यांना ती परिस्थिती हाताळायची आहे/असेल. त्यासाठी त्यांना त्यावेळी प्राप्त परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे लागत असतील.
जे पांढरपेशा / सुरक्षित/ ठराविक आयुष्य जगणाऱ्या समाजाच्या आकलन पलीकडचे असू शकतात.
पण म्हणून त्यांना लेबल लावणे मला तरी कोते पणाचे लक्षण वाटते.
पिनी च्या केस मध्ये तिने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहेच आणि खात्री आहे की तो सोपा नक्कीच नसावा.
पण प्रत्येकाची मानसिक, कौटुंबिक परिस्थिती तशी असेलच असे नाही.
येथील बऱ्याच जणांच्या comments.
स्वतः पंचपक्वानन जेवणार्यानी एकभुक्त रहावे लागणाऱ्याला पाटावर वाढत नसतील तर जेऊ नकोस सांगण्यासारखे आहे.(?)
मायबोलीवर तुम्हाला हा वरचा
मायबोलीवर तुम्हाला हा वरचा भाग शाबूत असलेला वाचक सापडला. Confirmation bias नसलेला प्लॅटफॉर्म मिळणे हे आजच्या काळात भाग्य आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲप जनता हे स्वरचित का काय म्हणताय तितका विचार नाही करत कारणं माहीत नसतील तर विचारा.>>>
इथे स्वयं घोषित विचारवंत, बुद्धिमान लोक बरेच आहेत.
बऱ्याचशा धाग्यांवरती त्यांचं बुध्दीतेज दिपवून सोडत.
फक्त ती बुद्धीची प्रखरता माझ्यासारख्या पाच एक महिन्यांपासून ॲक्टिव असणाऱ्या नवखीला अजून जाणवली नाहीये.
जे तारे मला बऱ्याचशा धाग्यांवर वेचायला मिळाले, कोलांट्या उड्या बघितल्या, सरधोपट विधाने आणि बाष्कळ चर्चा बघितल्या त्यावरून ही गोष्ट पचणे कठीण आहे.
असो प्रत्येकाने काय विचार करावा हे सांगायला मी माबो वरची
(किंवा otherwise सुद्धा) विचारवंत नाही.
एकदा fb वरती अनेक गुणवंत आहेतच. अर्थात हा माझा अनुभव.
बाकी इतर मंडळींना तुम्ही
बाकी इतर मंडळींना तुम्ही गोष्ट किंवा प्रतिसाद वाचलेत तुमच्या प्रतक्रिया नोंदवल्या ह्याबदल धन्यवाद!
@सामो पूर्वी स्त्रीधन म्हणून प्रकार असायचा, त्यावर हक्क त्या स्ती च असणे अपेक्षित होते. त्यात बहुदा सोने नाणे, एखादा जमिनीचा तुकडा इत्यादी द्यायची पद्धत होती. खूप पूर्वी वाचलेल्या 'पण लक्षात कोण घेतो ' वगैरे pustakantunhyacha उल्लेख आलेला आठवतोय.
हुंडा ही पद्धत कधीच मुलीसाठी तिच्या हितासाठी नव्हती.
कायद्याने मुलीला समसमान दिलेले अधिकार आणि जबाबदारी हीच योग्य पद्धत आहे हे माझे मत आहे.
वरती ज्या रिक्षाचालक
वरती ज्या रिक्षाचालक ह्यांच्या कॉमेंट्स आहेत त्या धाग्यवरून काढता येऊ शकतात का?
बऱ्याच प्लॅटफॉर्मवर flagged content hide kinva delete करता येते म्हणून विचारले.
उदयजी ,
उदयजी ,
तुम्ही उत्तर दिले नाहीत हे सुद्धा भाष्यच आहे. प्रश्न तुम्हाला असला तरी तो सर्वांना आहे. तुमचे नाव घेऊन करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे तुम्ही इथे नियमित एका पक्षाची बाजू सावरून धरताना दिसता आणि आता इथे हुंड्याबाबत तात्विक भूमिका घेतली आहे. ज्या पक्षाची किंवा आघाडीची बाजू घेता ती पुरोगामी आहे. जे पक्ष पुरोगामी नाहीत, ज्यांना हुंडा वगैरे प्रथां नाहीशा व्हाव्यात असे वाटत नाही, त्यांच्याकडून अपेक्षाच नाहीत. पण त्यांचे आपल्यासारखे समर्थक जर हुंड्याच्या बाबतीत तत्त्व म्हणून विरोधातली भूमिका घेत असतील तर त्यांनाही हाच प्रश्न आहे.
आपण वैयक्तिक भूमिका घेणं वेगळं. ज्यांच्यामुळे सामाजिक बदल टिकून राहतात किंवा नाहीसे होतात असे लोक निवडून देताना जर आपण आपल्या तात्विक भूमिकांना हरताळ फासत असू आणि अशा काल्पनिक कथांवर घनघोर चर्चा करत असू तर अशा आपल्या तात्विक भूमिका बिनबुडाच्या म्हणायला हव्यात.
पूर्वीचे नेते रोल मॉडेल्स होते. त्यांच्यामुळे सामाजिक बदल होत, टिकून राहत. आताचे नेते शाही विवाह करतात. कायद्याची धज्जी उडवतात. त्यामुळे लग्नावर ग्रामीण भागात चढाओढीने खर्च होतो. जमिनीचा एक काय पाच एकर विकीन पण अमक्यापेक्षा जोरदार लग्न करीन असं घडतंय. हुंडा काय चीज आहे. पुढारी जर सिरीयस नसतील तर हुंडा प्रथा नाहीशी कशी होणार ? यात गैर काही आहे असे वाटण्यासारखे आदर्श उरलेले नाहीत. हुंडा घेतल्यावर कारवाई होईल ही भीतीच राहिलेली नाही. हुंडा सोडा कोणतीही बेकायदेशीर गोष्ट असू द्या, जे राजकीय पुढारी करतात ती केल्याने कारवाई होईल हे भय राहिलेले नाही.
मी हुंडा घेणार नाही ही भूमिका घेणे ही कृती असते. पण हुंडा घेणार्यांना , हुंड्याबाबत मूग गिळून बसणार्यांना मी मत देणार नाही ही जास्त व्यापक कृती असू शकते. कुठल्याही कारणाने आपण ही भूमिका घेत नसू तर तत्त्व म्हणून आपण त्याबाबत किती गंभीर आहोत ?
आपण इथे साप साप म्हणून भुई धोपटून काय होणार ?
<< वरती ज्या रिक्षाचालक
<< वरती ज्या रिक्षाचालक ह्यांच्या कॉमेंट्स आहेत त्या धाग्यवरून काढता येऊ शकतात का?
बऱ्याच प्लॅटफॉर्मवर flagged content hide kinva delete करता येते म्हणून विचारले. >>
------ प्रतिसाद काढण्यासाठी प्रशासकांना ( admin ) विचारपूसीतून विनंती करा. ते योग्य निर्णय घेतील.
<< इथे स्वयं घोषित विचारवंत,
<< इथे स्वयं घोषित विचारवंत, बुद्धिमान लोक बरेच आहेत.
बऱ्याचशा धाग्यांवरती त्यांचं बुध्दीतेज दिपवून सोडत.
फक्त ती बुद्धीची प्रखरता माझ्यासारख्या पाच एक महिन्यांपासून ॲक्टिव असणाऱ्या नवखीला अजून जाणवली नाहीये.
जे तारे मला बऱ्याचशा धाग्यांवर वेचायला मिळाले, कोलांट्या उड्या बघितल्या, सरधोपट विधाने आणि बाष्कळ चर्चा बघितल्या त्यावरून ही गोष्ट पचणे कठीण आहे.
>>
तै, इथे आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही फारच मनाला लावून घेतल्या आहेत असं दिसतंय एकंदरीत. तुम्ही लेख लिहिला, इतरांनी प्रतिक्रिया दिल्या. विषय संपला. त्या तुमच्या मताशी, गोष्टीशी जुळ्यावातच हा अट्टाहास नको आणि त्याच्यासाठी इतके वेळा स्पष्टीकरण द्यायचीही गरज नाही.
आता पुढील गोष्टीच्या तयारीला लागा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नायक शिकलेला असेल, नोकरी
नायक शिकलेला असेल, नोकरी निमीत्तने दुसरे जग बघितले असेल पण ठाम नक्कीच नाही. हुंडा पद्धत त्याला मान्य नाही पण लोभी वडीलांना पटवून देण्यात अपयशी ठरलेला आहे.
"शिकलेली आणि स्वाभिमानी मुलगी याला तयार होणार नाही... " हे नायकाला माहित आहे. पण मग अशी विचित्र मागणी करतांना नायिकेच्या स्वाभिमानाला तो धक्का पोहोचवत नाही? तो स्वत: पैसे देत असला तरी हुंडा प्रथा पाळल्या जाण्याचे पातक त्याच्या मस्तकी रहाणारच.
पैसे कोण ( येथे नायक आहे) देत आहे हे महत्वाचे नाही आहे.... भाषेची कितीही साखरपेरणी (वर दक्षिणा) केली तरी अघोरी हुंडा प्रथा, पैशांची देवाणा घेवाण, समाजासाठी घातक आहे. शिकलेली लोक याला थांबवू शकत नसतील तर त्या शिक्षणाचा काय उपयोग?
<< लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला >>> आतापर्यंत. ती नायिका calculated risk taker आहे हे evident aahe.
ती त्या सासर्याची मजा घेतेय...
सासऱ्याने शिक्षणावर झालेला खर्च मिळवणं गुन्हा नाही पण तो मुलाकडून, सूनेकडून नाही.
सुनेला यात गुंफण हा गुन्हाच आहे >>
------ (मुलाच्या ) शिक्षणावर झालेला खर्च मिळविण्यासाठी सुनेकडूनच काय मुलाकडूनही अपेक्षा ठेवणे चुकीचे वाटते. या अपेक्षा कशासाठी? जन्म दिला, शिक्षण दिले, पालकांनी त्यांचे कर्तव्य केले. पुढे मुलाचे/ सुनेचे कर्तव्य ते पार पाडतील.
मुलगी नोकरी करत आहे. तिच्या शिक्षणावर पण अमाप पैसा खर्च झालेला आहे. तो कोण भरुन देणार आहे?
उपाशी बोका
उपाशी बोका
आपाल्या वरील प्रतिसादाशी पूर्ण सहमत. ह्या कथेने माबोवर नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
आणि हे इथे थांबणार नाहीये. धाग्याला वरची हवा लागली आहे.
----- प्रतिसाद काढण्यासाठी
----- प्रतिसाद काढण्यासाठी प्रशासकांना ( admin ) विचारपूसीतून विनंती करा. ते योग्य निर्णय घेतील.
Submitted by उदय on 18 June, 2023 - 20:01>>>>> धन्यवाद
मुलीला तिच्या भावी
मुलीला तिच्या भावी आयुष्यासाठी मदत म्हणून हुंडा.
सोने किंवा कॅश स्वरूपात.
किंवा संसार उपयोगी वस्तू .
हे मुलीचे आई वडील देतात ह्या मागे सामो बोलत आहेत तसा पण खरा अर्थ असू शकतो .
नंतर त्या मध्ये विकृती आली.
मुलगी घर सोडून जाते म्हणून तिच्या हक्काचे तिला लग्नात देणे.
हा हेतू असू शकतो हुंडा प्रथे मागे
हुंडा देणे घेणे हे भारतात बे
हुंडा देणे घेणे हे भारतात बे कायदेशीर आहे हे मुलीला माहीत नाही. त्यामुळे खुदु खुदू हस्ते आहे. हे फार पथेटिक आहे. जेल मध्ये जायची कॅलक्युलेटेड रिस्क आहे बहुतेक.
मराठीत लाळ गळते म्हणतात.
Pages