काही अर्धी पाने………
‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ असलेली व्यक्ती सगळ्यांना दिसते, पण खाली खोल खोल असलेल्या व्यक्तीकडे कुणीही बघायला येत नाही…. मी अशीच जात आहे का….? खोल खोल अंधार्या दरीत…./ कुणाशीच काही बोलता येत नाही…. बोललं तरी, विश्वास कोण ठेवणार आहे माझ्यावर? लहान…, असहाय्य… आणी मुलगी असणं हाच माझा दोष नं? कुणाशी बोलू…? माझं ऐकणारं कोण आहे? कोण जवळचं आहे माझं…? घरात आणि बाहेरही….? कुणीच नाही…?
काही बोलायचा प्रयत्न केला तरी, ‘तुझं आपलं काहीतरीच!...’ ‘मूर्खा सारखं काहीही बोलू नकोस हं.....’ हेच ऐकायला मिळणार नं...? कशी बाहेर पडू या सगळ्यातून? कसा मार्ग काढू? सगळीकडे अंधार अंधार दिसतो आहे... माझी काय चूक आहे? का मला मुलीचा जन्म मिळाला? भोवतीच्या एवढ्या गर्दीत एकही चेहरा माझ्याकरता नाही?
जाणवून घेतांना चेहरे
कोसळत आपणच
संपत जायचे!
***
‘मीच का?’, ‘मलाच का?’, ‘माझ्याच वाट्याला का हे सगळं?’ असे प्रश्न सुखाच्या राशीत लोळत असताना कधीच कुणाला पडत नाही. हो ना.. ? पण सभोवती फक्त अंधकार.. , दुःख.. , निराशा पसरलेली असतांना.. , आणी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच जेव्हा सापडत नाही.., तेव्हा हेच प्रश्न सतत पडत रहातात..... आणि या प्रश्नांची उत्तरं कुणालाच विचारता येत नाही. डोकं अखंडपणे गरगरत रहातं ह्या प्रश्नांचा फेर धरून...
बोलण्यासारखं, विचारण्यासारखं विश्वासाचं कुणी जवळपास नसतंच... किंवा जवळ असलं ना, तरीही त्यांना आपण बोललेलं.. , विचारलेलं.. काही समजेल असं वाटतच नाही. मनातलं दुःख वाटून घेतल्याने कमी होतं असं म्हणतात.. , पण आपली निराशा, आपलं दुःख कुणाला सांगावं, असही कधी कधी वाटत नाही. ते फक्त आपल आपलं एकटीचं असतं...
मग अशावेळी ही माझी डायरी, हीच माझी सखी होते. सगळं सगळं ऐकून घेते, आपल्या पानांमध्ये दडवून ठेवते. पण तिथेही मी उघडपणे खरं बोलतच नाहीय.. . कुणाच्या हातात ती पडली तर? खरं, खोटं करायला गुन्हेगारा सारखं मलाच उभं करतील. पण थोडं तरी व्यक्त होतेय ह्याचं समाधान मिळतय...
जगाच्या ह्या उलट्या रिती
कुणाची चुकी अन् कुणाला भीती |
न्यायदेवता खरीच आंधळी
सत्यालाही ती बनविते पांगळी||
***
मी तुझ्याजवळ मन मोकळं करायला येते खरी. पण ते तसं नं करताच परत जाते, इथे थोडासा विसावा घेऊन. खरी मोकळी तर मी कधीच होणार नाही. मग मनात असंबद्ध विचार येत रहातात. रोजचा दिवस उजाडतो तो काळा रंग घेऊनच. अंधाराची तर भीती वाटतेच, पण दिवसा तरी कुठे उजेड आहे?
नवा दिवस अंधाराचा
तोच अंगरखा लेवून येतो
जातांना मनाला माझ्या
परत एकदा विझवून जातो|
येणारी घडी माघारी
गुलाल विसरून येते
परतीच्या पावलांवर हसू माझे घेऊन जाते|
उगवती किरणे
कळी कळी हसवित येतात
परत वळून जातांना
बुरख्यात मला दडवून जातात|
***
आपले जगण्या मरण्याचे क्षण इतके इतके जास्त आपले असतात नं.. , ते कुठेच वाटू शकत नाही आपण, इच्छा असली तरी. खूप खूप आत दडवलेले असतात ते क्षण, आपल्या मनाच्या कोपऱ्यात. तिथून ते बाहेर काढावेसेच वाटत नाही. मधमाशीची आठवण अडीच मिनिटांची असते म्हणतात. आपलंही तसच असतं, तर किती छान झालं असतं नं.. ? निदान वाईट आठवणींकरिता तरी? रोज उठून कोऱ्या पाटीवर नवीन दिवस उत्साहाने चालू करता आला असता. पण तसं नाही नं करता येत..
रक्ताची नाती परकी झाली
मग रागावू कुणावर
कुणीच माझा अंतस्थ नाही
मग लोभाऊ तरी कुणावर ||
छाया माझी नाहीशी झाली
साथ मागू कुणाला
अंतरीची वेदना जाळीत राहिली
दाद मागू कुणाला ||
सरळ दिसणारी वाट निसरडी झाली
आधार घेऊ कुणाचा
वेदना माझी गीत झाली
सूर मागू कुणाला ||
***
इथून कुठेतरी लांब लांब निघून जावसं वाटतंय. कुठे जाऊ? कुणीच माझं नाही या जगात. माझा माझा मार्ग मीच शोधला तर? जगता येईल मला एकटीला? आपलं आपलं बसून जावं का, इथुन एखाद्या खूप लांब जाणाऱ्या गाडीत? जिथे मला कुणीच ओळखणार नाही? मी कुणाला ओळखणार नाही अशा ठिकाणी? काहीतरी काम मिळेलच ना मला? सुरक्षित आयुष्य मिळणार असेल तर, कुठलंही काम चालेल मला. अगदी घरकाम सुद्धा. कुणालाच कळू देणार नाही मी, मी कोण ते. अगदी माझं नाव गाव.. शिक्षण.. काहीच सांगणार नाही कुणालाच. देईल मला कुणी असं काम जगण्या करता? की हे असं फक्त सिनेमांमध्येच घडतं? नक्की काय करू मी? कशी निघू या अंधारातून बाहेर? येथुन बाहेर पडणं, हे माझं फक्त स्वप्नच रहाणार आहे का? नाही का मला कुठे आसरा मिळणार?
स्वप्नांच्या जगात चालत असताना
कुणीतरी बजावलं,
शुद्धीवर ये
पण वास्तवात आल्यावर,
सभोवती दिसला घनघोर अंधार |
अन अंधाराला भेडसावणारी
भीतीची सावली |
घेतल्या मनाच्या पाकळ्या
आतल्या आत मिटून |
उभ केलं माझ्याच मनाच्या जाड भिंतीच
साम्राज्य माझ्या भोवती
तरीही
काटेरी झुडपांचे ओरखडे
अंगावर उमटतच होते |
पावलं ठेचकाळत होती
तरीही का वाट पाहते मी भविष्य बदलण्याची ||
***
आज मी लेक्चरला बसले होते, कॉलेजमध्ये. लक्ष द्यायचा प्रयत्न करत होते. आणि अचानक, अचानक कोंडलेल्या अंधाराची आठवण झाली. काहीतरी सरसरुन अंगावर आल्यासारखं वाटलं. डोळे गच्च बंद केले मी आणि किंचाळले. मग मीच माझ्या आवाजाने भानावर येऊन डोळे उघडले. सरांचं शिकवणं तसंच चालू होतं. म्हणजे माझी किंचाळीही माझ्या मनातल्या मनातच होती. तीही बाहेर यायला तयार नाही.
सगळ्या जगाकडे
अलिप्तपणे पाहण्याची
सवय झाली की
माणूस स्वतःलाच इतका
परका बनून जातो
की संवेदनांची सगळी शस्त्रच
बोथट बनुन जातात |
आशा-निराशेचा एक
साधासा लपंडाव सुद्धा
तिथे राहत नाही
रहातं फक्त एक शून्य मन
अन निर्विकार चेहरा ||
***
इथे सापडतोय का मला माझा आधार? मीच मला विचारतेय. हा काढेल का, मला माझ्या अंधारकोठडीतून बाहेर? इथे मिळेल का मला माझा प्रकाश? हा होईल माझा सखा? परत परत मीच शोधतेय माझ्या प्रश्नांची उत्तरं. मला जगण्या करता आधार तर हवाच आहे.
कुठल्यातरी हळव्या क्षणी
मन आधार मागून गेलं |
मग नाजूक रेशीम उलगडताना
आतल्या आत खूप काही तरी तुटत गेलं ||
प्रवास सुखाचा असेल,
असं वाटलं होतं |
पण केव्हा सांधे बदलले कळलच नाही
सोबत घडीची होती तरी
हृदय कुठे गुंतलं जाणवलंच नाही ||
नाजूक क्षणाशी हळव्या मनाशी
नातं एक जुळत गेलं |
तेव्हा जाणवलं
इथून परतून येणे जड जात राहिलं ||
***
पण परतीचा प्रवास अटळ होता. अजून माझी मीच सांधलेली नव्हते. ज्याला स्वतःला फुलायचे माहीत नसते, तो दुसऱ्यांना काय फुलवणार? मी आनंद निर्माण करू शकणार आहे का कधी? माझा भूतकाळ कायम माझ्या बरोबरच रहाणार नं? सावलीसारखा.. ? छे! सावलीसारखा पण नाही म्हणता येत. ती निदान अंधारात तरी गायब होते. पण हा माझा, पालीसारखा किळसवाण्या स्पर्शाचा अन् रात्रीतून अंगावर फिरणारा भूतकाळ तर अंधारात जास्तच माझ्या भोवती येणार. त्यातून सुटका नाही कधी.
चेहऱ्यावरचा तुझा
दुरावा दिसू नये म्हणून
रस्ता मीच बदलला |
डोळ्यात तुझ्या
ओळखीची चिन्हे नकोत म्हणून
निद्रेच्या अधीन मीच झाले |
घरात तुझ्या
माझा कर नको म्हणून
माघार मीच घेतली |
ओठी तुझ्या
नाव माझे नको म्हणून
मुकी मीच झाले |
थोडावेळ का होईना
बांधला होता मी स्वप्नांचा महाल
पण सहन झाला नसता तुझा अंगार
म्हणून तो भस्मात मीच केला |
***
ज्याची सोबत सोडली, त्याला सांगावस वाटत नाही. आणि पुढे ज्याच्या सोबतीने जाणार आहे त्यालाही सांगावस वाटत नाही.
तुझ्या श्वासात गुंतलेले माझ्या लयींचे संदर्भ
मी अजूनही नाकारत नाहीये
फक्त मागे टाकते एक संपलेलं वळण ||
***
आता मी खूप दूर आलेय. सगळ्यापासूनच. जगण्याची नवी लढाई सुरू केली. मनातलं किळसवाणे पण अन् झालेल्या जखमा अजून तशाच आहेत. त्या राहतील तशाच भळभळत, मी असेपर्यंत...
तुझी आठवणंही एका कुपीत बंद करून ठेवलीय, कधीतरी उघडावी म्हणून..
माझ्या स्मृतींना
तुझा गंध नको म्हणून
हृदयाच्या तळाशी ठेवली कुपी |
उशिरा कळलं
तू तर आहेस पारिजात ||
कुठल्याच वळणांवर
तू भेटू नये म्हणून
माघारी वळले
तेव्हा जाणवलं
तू तर नजरेसमोरच आहेस |
लिहू नकोस
नाव तुझे म्हणून
बजावले लेखणीला
तेव्हा उमजलं
तुझे नाव तर
हृदयात कोरलेले आहे |
*************
गद्यपद्ययुक्त छान चिंतन !
गद्यपद्ययुक्त छान चिंतन !
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
जबरदस्त लिहिले आहे शर्मिला.
जबरदस्त लिहिले आहे शर्मिला.
धन्यवाद अस्मिता.
धन्यवाद अस्मिता.
खूप उत्कट लिहीले आहेस..
खूप उत्कट लिहीले आहेस..
I hope that every person in such situation gets some help to come out of it..
नितांत सुंदर, खूप तरल,
नितांत सुंदर, खूप तरल, भावस्पर्शी, उत्कट, जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच!
आणि हे अगदी अशा वेळेवर वाचलं, की जेव्हा अजिबात वाचायला नको होतं
कधीतरी तुमची परवानगी घेऊन शेवटची कविता वापरेन, अंमली मध्ये....
किती वेदना का त्या दाबून /
किती वेदना का त्या दाबून / दडवून ठेवायच्या डायरी मध्ये बंदिस्त, ,आणि त्या जुन्या जखमा भळाळत
त्याचा क्षोभ करून पेटून उठायचं आणि त्यांना अद्दल घडवून नवीन चांगल्या स्मृती बनवायच्या म्हणजे त्या जखमा सहजच भरल्या जातील!
हे वाचून असच काही वाटलं.
धन्यवाद धनवन्ती.
धन्यवाद धनवन्ती.
I hope that every person in such situation gets some help to come out of it..>> बदल होतोय हळूहळू.
नितांत सुंदर, खूप तरल,
नितांत सुंदर, खूप तरल, भावस्पर्शी, उत्कट, जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच!>> खूप खूप आभार अज्ञातवासी.
कधीतरी तुमची परवानगी घेऊन शेवटची कविता वापरेन, अंमली मध्ये....>> नक्की.
अंमली वाचतेय..
छन्दिफन्दि,
छन्दिफन्दि,
किती वेदना का त्या दाबून / दडवून ठेवायच्या डायरी मध्ये बंदिस्त, ,आणि त्या जुन्या जखमा भळाळत त्याचा क्षोभ करून पेटून उठायचं>>
‘मान्सून वेडिंग’ मधली नायिका रीया आठवली. वर्षानुवर्षे वेदना दाबून ठेवणारी.. आणी आता आणखींन एका लहान मुलीवर अत्याचार होतोय असं दिसताच पेटून उठणारी..
‘मान्सून वेडिंग’ मधलवदअनायिका
‘मान्सून वेडिंग’ मधलवदअनायिका रीया आठवली. वर्षानुवर्षे वेदना दाबून ठेवणारी.. आणी आता आणखींन एका लहान मुलीवर अत्याचार होतोय असं दिसताच पेटून उठणारी..>>> शेफाली छाया. माझी आवड ती कलाकार. मूव्ही पण आवडती.
शेफाली माझी पण आवडती.
शेफाली माझी पण आवडती.
अंगावर काटा येइल असे लिहीलेले
अंगावर काटा येइल असे लिहीलेले आहे. नायिकेला यातून लवकर बाहेर पडता यावे ही सदिच्छा.
>>>>>>नवा दिवस अंधाराचा
तोच अंगरखा लेवून येतो
जातांना मनाला माझ्या
परत एकदा विझवून जातो|
फार आवडल्या या ओळी. होय असेच होते डिप्रेशनमध्ये.
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
बऱ्याच गोष्टींवर काळ हाच इलाज असतो... पण तरी लहान वयातले ओरखडे पुसल्या जातातच असं नाही...
शर्मिला माझे आकलन सांगते -
.
प्रतिसाद काढून टाकलेला आहे. तुम्हाला व्यनि केलेला आहे. इतकं उत्कट व सेन्सिटिव्ह लिहू शकणार्या व्यक्तीशी , तुमच्याशी मैत्री करायला आवडेल.
अरे कुठंही काय अध्यात्म
अरे कुठंही काय अध्यात्म आणायचं, म्हणजे तो विषय मलाही आवडतो. या पार्श्वभूमीवर त्याचा विषय आणू नये. इथल्या शोषित मुलांच्या फॉस्टर केअर मध्ये 'God has plans for you ' म्हणतात. हे ऐकून माझी भयानक चिडचिड झाली. You do what you need to do but don't involve God in serious crimes!
लहान मुलांचं लैंगिक शोषण हे जगातील सगळ्यात भयावह गोष्टींपैकी वरची गोष्ट आहे. त्या नराधमांना शिक्षा व्हायला हवी, मुलांना थेरपी व सपोर्ट मिळायला हवा. त्यांना सुरक्षित वाटायला हवं. ह्यापैकी दुर्दैवाने काही नाही झालं तर त्यांना जे काही वाटतं ते त्यांना वाटणं साहजिक आहे.ईव्हिल शक्ती आणि अध्यात्म वगैरे आणून feelings invalidate करायला नको. न्याय मिळवून देता येत नसेल तर ते आपलं अपयश आहे. ईव्हिल शक्ती वगैरे नको प्लीजच. अंधश्रद्धा आहेत ह्या, अध्यात्म नाही. अध्यात्म शूर असतं, ते झूल पांघरूण मुद्दा झाकत नाही, उलट सगळं सत्य उघडंनागडं दाखवतं. ती बस गेली तर गेली. समाज म्हणून आपल्यात काही तेज नाही हेच खरं.
सॉरी सामो, विषय असा असेल तर मला गप्प बसता येत नाही.
फार अस्वस्थ वाटले वाचून!
फार अस्वस्थ वाटले वाचून!
>>>>>>>>>सॉरी सामो, विषय असा
>>>>>>>>>सॉरी सामो, विषय असा असेल तर मला गप्प बसता येत नाही. Happy
नो प्रॉब्लेम. आय अंडरस्टँड.
>>>>>>लहान मुलांचं लैंगिक शोषण हे जगातील सगळ्यात भयावह गोष्टींपैकी वरची गोष्ट आहे. त्या नराधमांना शिक्षा व्हायला हवी, मुलांना थेरपी व सपोर्ट मिळायला हवा. त्यांना सुरक्षित वाटायला हवं. ह्यापैकी दुर्दैवाने काही नाही झालं तर त्यांना जे काही वाटतं ते त्यांना वाटणं साहजिक आहे.ईव्हिल शक्ती आणि अध्यात्म वगैरे आणून feelings invalidate करायला नको. न्याय मिळवून देता येत नसेल तर ते आपलं अपयश आहे. ईव्हिल शक्ती वगैरे नको प्लीजच. अंधश्रद्धा आहेत ह्या, अध्यात्म नाही. अध्यात्म शूर असतं, ते झूल पांघरूण मुद्दा झाकत नाही, उलट सगळं सत्य उघडंनागडं दाखवतं. ती बस गेली तर गेली. समाज म्हणून आपल्यात काही तेज नाही हेच खरं.
प्रतिसाद आवडला.
अस्मिता, तुलाही व्यनि केलाय.
अस्मिता, तुलाही व्यनि केलाय.
-----------------------
आता काहीजणांना शंका येइल की जर व्यनि केलाय तर इथे का लिहताय? तर मेल 'जंक फोल्डर' मध्ये जाउ शकते म्हणुन इथे डबल सेक्युअर करते आहे. बरं मग ते खव तून चाललं असतं ना? हो पण त्वरित उत्तर मिळण्याच्या अभिलाषेने इथे लिहीते आहे.
असो!!! स्पष्टीकरण संपले.
तुम्हाला व्यनि केलेला आहे.
मी तुझ्या व्हाट्सॲप वर आहे की.. व्यनि मिळालेला नाही.
---------
मी प्रतिसाद राहू देणार आहे. आपल्या देशात आसाराम बापू सारखे लोक धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण करतात. तेव्हा अशा माणुसकी आणि अध्यात्म दोन्ही गोष्टींना काळीमा फासणारी माणसं बघून काही जखमा ह्या फक्त गुन्हा म्हणूनच स्विकाराव्यात असं वाटतं. नो कव्हर अप..!
-----
शर्मिला, सॉरी. आता पुरे करतेय.
>>>>>तुम्हाला व्यनि केलेला
>>>मी प्रतिसाद राहू देणार आहे. आपल्या देशात आसाराम बापू सारखे लोक धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण करतात. तेव्हा अशा माणूसकी आणि अध्यात्म दोन्ही गोष्टींना काळीमा फासणारी माणसं बघून काही जखमा ह्या फक्त गुन्हा म्हणूनच स्विकाराव्यात असं वाटतं. नो कव्हर अप..!
करेक्ट!!
>>>>.मी तुझ्या व्हाट्सॲप वर
>>>>.मी तुझ्या व्हाट्सॲप वर आहे की.
होय!!!
>>>>. व्यनि मिळालेला नाही. Happy
जाउ देत मग.
इतकं उत्कट व सेन्सिटिव्ह लिहू
इतकं उत्कट व सेन्सिटिव्ह लिहू शकणार्या व्यक्तीशी , तुमच्याशी मैत्री करायला आवडेल.>> pleasure is mine.
लहान मुलांचं लैंगिक शोषण हे
लहान मुलांचं लैंगिक शोषण हे जगातील सगळ्यात भयावह गोष्टींपैकी वरची गोष्ट आहे.>> अगदी खरं आहे अस्मिता.
आणी लैंगिक शोषण हे घराबाहेर होत असेल तर निदान घराच्या भिंती असतात लपायला. पण ते जर घरातूनच... अगदी जवळचे समजले जाणारे काका... मामा.... भाऊ... आणी कधी कधी वडील सुद्धा... तर अशा मुलांची अवस्था भयानक असते.
सिडने शेल्डन "टेल मी युअर ड्रीम्स " मधील सतत नाव गाव बदलून फिरणारी नायिका आठवली की अजूनही अंगावर काटा येतो.
हल्ली सगळ्या शाळांमध्ये "गुड टच बॅड टच " वर शिकवल्या जातं... पालक aware झाले आहेत..... आशा करूया सगळ्या मुलांना सुरक्षित बालपण मिळेल...
भिडलं..
भिडलं..
हल्ली अवेरनेस असतो हे खरे आहे. जो आधी नसायचा..
माझ्या लहानपणी मी परी हु मै, मुझे ना छुना गाणे आवडीने ऐकायचो..
मध्यंतरी मायबोली वरच्या चर्चेत समजले ते गाणे कशावर होते..
धन्यवाद ऋन्मेश
धन्यवाद ऋन्मेश