गणेश मूर्ति

Submitted by limbutimbu on 4 August, 2008 - 00:42

सन २००८ मधे मित्राच्या आग्रहाखातर लाल मातीच्या बनविलेल्या मूर्ति
मी बनविलेली
ganesh_by_Jay.jpg
मित्राने बनविलेली.
Ganesh_by_Sanjay_0.jpg
*****************
सन २०१२, मित्राच्या आग्रहाखातर एका मूळ विसर्जित मूर्तिवर साचा टाकून त्यातुन काढलेली शाडू मातीची मूर्ति (कृपया गैरसमज नसावा, मूळ मूर्ति मी बनविलेली नाही, केवळ साचा बनविला व त्यातुन ही मूर्ति काढली)
JGN Murti banavitana 1 2012 S.jpgJGN Murti banavitana 2 2012 S.jpg

गुलमोहर: 

सुंदर आहेत! साच्यातून काढल्या आहेत का? त्यांना व्हेज डाय ने रंगवणार की अशाच ठेवणार?

अरे वा! सुंदर आहेत मूर्ती..

LT, तू बनवलेली मूर्ती रेखीव आहे. सुरेख दिसतेय. किती मोठी आहे?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.

वा! मूर्त्या सुंदर आहेत!
लिंबूटिंबू, कॉइल बिल्डिंग म्हणजे एकावर एक वळ्या रचत, मग त्या हळूहळू दाबत वळ्या सांधत मूर्ती रचलीस का?

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

लिंब्या एकदम जबरी बनवली आहेस मूर्ती....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

खुपच सही बनवली आहे मुर्ती Happy
जसे वाजती नुपुर सुखाचे ...

भारीच रे लिंबूदादा. च्यायला, आम्ही किल्ला बनवायला गेलो, की त्याचा गुळगूळीत सरळसोट पिरॅमिड होतो, अन मुद्दाम्हून पिरॅमिड बनवायला घ्यावा, तर त्याचा चक्क वेडावाकडा लाडू-बिडू होतो!
हा बाप्पा रंगवून घरी बसवला, की त्याचे फोटोही पोस्ट करा..
***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

वा छान ! रंगकाम झाल्यावर अजुनच सुंदर दिसेल.

लिंबूदा, किती सुंदर. लंबोदर! अगदी लंबोदर! (लिंबोदर?)
जरूर शेंदरी रंग दे... मस्तच वाटेल.
साजिरा किल्ला तरी बनवायला घेतलात.... मी नुस्तं चित्र काढायला गेले तर एक पेन्सिल आणी चार खोडरबर अशी अवस्था...
शिल्प वगैरे स्वप्नातच Happy

गणपतीबाप्पा मोरया!

मस्त आहे रे मूर्ती.पहिल्यांदाच प्रयत्न करुनही इतकी छान जमलीये तर हात बसल्यावर किती कशी असेल?
ह्म्म, शेंदरी कलरही छान दिसेल.आमच्या एका मित्राकडची मूर्ती चंदेरी कलरची होती.म्हणजे अगदी चांदीसारखी नाही पण एक वेगळाच ग्लो असलेली. बघता क्षणीच डोळ्यात भरायची.

वा! सुंदर आहे मुर्ती.
बाप्पा मोरया Happy

लिंबु, फार सुबक आणि देखणे गणराय!
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवाच्या मुखपृष्ठावर हीच मूर्ती रंगवून बसवायला हवी! Happy

LT,
एकदम मस्त झाल्यात दोन्ही मुर्ती. दाद म्हणते तसा शेंदरी रंग छान दिसेल या मुर्तीवर.
हात शिवशिवताहेत. घरात थोडी माती पण आहे पॉटरीची, करुन बघायला हरकत नाही. Happy
अर्थातच आधी केवळ ढोबळ मान्ड्या/पाय व धडाचा आकार बनवुन मग सोन्ड, हात, कान, पावले वगैरे गोष्टी नन्तर तयार केल्या >>>
म्हणजे वेगळ्या करुन जोडल्या का आधी तयार केलेल्या शरीरावर?
अजुन छान मोठे फोटो टाकणार का? Happy

--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

मूर्ती मस्तच लिंबू. करतानाच्या वेगवेगळ्या अवस्थांमधले फोटो पण टाकायला हवेत. हितगुजच्या गणेशोत्सवाकरता छानच दिसेल ही.

LT मस्त आहेत मुर्ती...
रंगवून झाल्यावर जरा मोठे फोटो टाका... Happy

फार सही दिसत आहे ही मुर्ती.. मी कधीच प्रयत्न केला नाही, पण ही मुर्ती बघून हात शिवशिवत आहेत.. फार अप्रतिम झालीय तुमची मूर्ती!! मला पावलं खूप आवडली.. कसली छान रेखीव, नाजुक दिसतायत.. छान मस्त रंगवा, शेंदरी वगैर रंग मस्तच दिसतील.. आणि स्थापना झाली की फोटो काढून परत दाखवा इथे नक्की! खूप उत्सुकता आहे, कसा दिसेल गणपती रंगवल्यावर.. त्यामुळे नक्की दाखवा!

मस्तच आहे मुर्ती. तुमच्या पोस्टवरुन असे वाटते की याआधी पण बरेच काम केले आहे. ते कुठे मिळेल बघायला ? तुम्ही कुठे शिकलात हे करायला ?
.
रंग दिल्यावर, स्थापना केल्यावर फोटो नक्की टाका.

केवढी सुरेख झालेय. मी कॉइलचे काम खुप केले नाहीये. पण तुझे काम पाहुन करायची खुप इच्छा होतेय. माझ्याकडे पोर्सलीन आहे त्याची करुन पाहु का? विचार करते.
आणि भगवा किंवा ब्रॉन्झ रंग दे. फ्लुरोसंट नको अज्जिबात.
भट्टीत भाजलिस कारे?
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

सुरेख मूर्ती आहे लिंबूटिंबू !!

LT,

खूप सुरेख बनलीय मूर्ती.. आता रंगवून झाली की त्याचा एक फोटो टाक.. .
.
खरंच यंदाच्या मायबोली गणेशोत्सवाच्या मुखपृष्ठावर हीच मूर्ती रंगवून बसवायला हवी!

लिंबूभाऊ, मुर्ती एकदम झक्कास!!
रंगवलेला फोटो जरा मोठा टाका, म्हणजे नीट तपशीलात बघता येईल. ब्राँझपेक्षा शेंदरी रंग जास्त छान दिसेल. कारण पुजेच्या मुर्तीचा रंग जिवंत वाटला पाहिजे. शोभेच्या मुर्तींचा रंग ब्राँझ, कॉपर वगैरे चांगला दिसतो. गणपतीची पूजा केल्यावर निरनिराळ्या रंगाची फुलं, हार, पत्री वगैरे शेंदरि रंगावरच जास्त छान दिसतील, अर्थात हे माझं मत.

****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...

लिंबू, अप्रतिम !! सुरेख जमली आहे. शोनू आणि मृण्मयीच्या सुचनेला अनुमोदन. या वेळच्या गणेशोत्सवाला का नाही जमणार ? रंगवायला वेळ नसला तर तशीसुद्धा छान दिसेल.
>>> १९७८ ते १९९४ येवढ्या काळात मी बरेच काम केले मातीत! ८० ते ८७ पर्यन्त तर मातकाम हेच माझ्या उपजिविकेचे साधन होते कुठे शिकलो, कसा शिकलो हा एक स्वतन्त्र मोठ्ठया मोठ्ठ्या पोस्ट्स चा विषय हे!
हे वाचायला आवडेल. तू बर्‍याच वेळा अशा धमक्या/वचने देतोस, कधीतरी ते खरे कर की.

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal

    शेवटी बहुदा इतक्या वर्षान्नतर आता योग येईल असे वाटते >>> तुम्हाला आणि तुमच्या स्टुडिओ शुभेच्छा !!!
    झाला की मा. बो. वर नाव्-गाव्-पत्ता टाका...भेट द्यायला आवडेल Happy

    Pages