Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 June, 2023 - 02:38
बलदंड सखा तो तिचा
रांगडा तयाचा बाणा
विसावली बाहूपाशात
आश्वस्त अवखळ ललना
का कोण जाणे बिनसले
कर्णपिशाच्च काही वदले
मिठी सैल तयाची झाली
अन सागरलाट दूरावली
काडीमोडच घेते म्हणाली
थयथयाट तिनं मांडला
कातळावर विराट फुटता
वदे हा ही कठोर निघाला
मग बदलली तिनं दिशा
परी दशा बदलली नाही
मऊशार वाळू किनारीही
भक्कम आधारच नाही
जे दिसले वरकरणी तिज
कुठे भक्कम,मुलायम जरी
निराधार, खिन्न मनाने
ती परतली जुन्या घरी
तो सागर विशाल हृदयी
घेतले कुशीत तिजला
अन जोजावत म्हणाला
मी तुजला अन तू मजला
© दत्तात्रय साळुंके
(आपल्यावर निखळ प्रेमळ करणा-या माणसा पासून आपण गैरसमजातून दूर जातो. तेव्हा वरकरणी गोड वाटणारे आधार तकलादू आहेत हे जाणवल्यावर आपण पुन्हा स्वगृही परततो.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी तुजला अन तू मजला
मी तुजला अन तू मजला
हे अति आवडले.
आश्वस्त अवखळ ललना...
आश्वस्त अवखळ ललना...
आवडली. सुंदर !
अप्रतिम सुंदर!
अप्रतिम सुंदर!
छान सत्य मांडलेले आहे. रुपक
छान सत्य मांडलेले आहे. रुपक कथा आहे या कवितेत.
वाह.. आवडलीच
वाह..
आवडलीच
केशवकूल
केशवकूल
कुमार १
अज्ञातवासी
सामो...हो या प्रतिमा माणसाला गृहित धरतात.
मन्या s
खूप धन्यवाद...मी बरं लिहितो हा आत्मविश्वास दुणावला.