तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

राधनिशा ह्यांचा प्रतिसाद आवडला आणि पटला. प्रतिसादाची जागा चुकली असेल पण कंटेंट बरोबर वाटला.

असो, तर सरतेशेवटी विकेंडची सुरूवात मस्त ग्लेन्फिडिचने झालेली आहे. >>>

आमची जॅक डॅनियल च्या नव्या 12 इयर रिलीज ने. चियर्स .

“ हा स्पेशल धागा काढून दिला होता तुम्हाला, तरी इथेच का बागडायचे आहे?” - मनाचा कमकुवतपणा आणि व्यसन, दोन्ही >> अगदी अगदी. हेच माझ्याही मनात आले रे !

कोकम साईडर बीअर >> क्राफ्ट बीअर च्या पुढे मला जाता येत नाही त्यामूळे फ्लेवर्ड बीअर घेणार्‍यांचे कौतुक वाटते. मी फिरून फिरून ब्लड अँड हनी वर येणार Happy

“ फ्लेवर्ड बीअर घेणार्‍यांचे कौतुक वाटते.” - क्राफ्टमध्येच एकदा कॉफी बीअर ट्राय केली होती. ठीक होती, but I wasn’t amused.

काल मेहुनी साडू आलेले, बियर चा प्रत्येकाची आवड वेगळी
त्यामुळे कर्ल्सबर्ग, बिरा, बदवायझर, किंगफिशर असं फुल्ल कलेक्शन जमलं होतं
सगळ्यांचा एकेक घोट घेऊन चव कॅम्पेर केली आणि कर्ल्सबर्ग एलिफंट ला पर्याय नाही याच अनुमानाला आलो
तर मेहुणी म्हणाली अतिशय घाण कडवट आहे ही Happy

म्हणलं मेबी ते तुमच्या टेस्ट बड वर पण बरेचसे अवलंबून असेल
मला कॉफी सुद्धा कडक, कडू, बिना साखर, कमी दूध किंवा कोरी अशीच प्यायला आवडते

गोडसर, दुधाळ, गोरी कॉफी भिकार वाटते Happy

क्राफ्टमध्येच एकदा कॉफी बीअर ट्राय केली होती. ठीक होती >> कालच स्टॉक कॉफी बीअर ट्राय केली. मेरे बस कि बात नही एव्हढच म्हणू शकतो. एक तर कॉफी म्हणा किंवा बीअर म्हणा जी असे झालं होतं Wink

“एक तर कॉफी म्हणा किंवा बीअर म्हणा जी असे झालं होतं” - Lol सेम हिअर!

“कॉफी लिक्यर मस्त असते” - लिक्युअर चॉकलेट्स पण मस्त असतात. पण आक्खा ग्लास कॉफी बीअर नाही जात. असामी म्हणतो तसं, दोन्हीतलं एक चालेल.

ह्याच कॅटेगरीत एक आयपीए कॅस्क मधे क्युअर केलेली स्कॉच (बहुदा ग्लेन्फिडीच) मिळते. ती ठीक होती, पण दोन्ही आपआपल्या जागीच बर्या वाटतात. एक मस्त अपवाद म्हणजे पायनॅपल कॅस्कमधे क्युअर केलेली प्लँटेशन रम - ओल्ड मंकच्या अगदी जवळची चव आहे.

Engrajlele.
शून्य स्वतःची आवड आणि मत

Europian देशात शरणागत म्हणून राहणारे भारतीय परंपराच सोडून इथे .
कॉमेंट करत आहेत
हेतू फक्त हाच आम्ही युरोपियन संस्कृती स्वीकारली आहे म्हणजे आम्ही अती शहाणे आहोत

दारु ही दारू असते.
देशी विदेशी ह्या मधील फरक .
अल्कोहोल चे प्रमाण,स्वच्छता .
आणि काय फरक असतो

आम्ही युरोपियन संस्कृती स्वीकारली आहे म्हणजे आम्ही अती शहाणे आहोत>>> Rofl
ते ईन्द्राच्या दरबारात म्हणे सर्व देव मदिरापान करत तो युरोपियन ईन्द्र होता का?

ते ईन्द्राच्या दरबारात म्हणे सर्व देव मदिरापान करत तो युरोपियन ईन्द्र होता का?>>>>>> देव पितात तो सोमरास व राक्षस पितात ती दारु! Lol

दारु चे गुणगान जे गातात ,जे दारू चे प्रमोशन करतात ते राक्षस.
व्यसन ते व्यसन च .त्याचा प्रचार ,प्रसार करू नका.
स्वतः पुरतेच ते व्यसन ठेवा.

मधुर भावना द्राक्षफलांची गाळून आणली मी मदिरा
माझ्या हाताने मी प्रियतम तुजला पाजीन हा पेला
नैवेद्यार्पण तुला प्रथम मग प्रसाद देईन जगताला
तुझेच सुस्वागत प्रारंभी करिते माझी मधुशाला
*मधुशाला* या स्व. हरिवंशराय बच्चन यांच्या हिन्दी काव्यसंग्रहाचा डॉ. तारा भवाळकर यांनी साधारण पंचावन्न वर्षांपूर्वी मराठीत भावानुवाद केला होता... तो त्यानंतर प्रकाशितही करण्यात आला होता..आज या कलाकृतीकडं परत वळून पहात, पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी, त्या बोलत्या झाल्या..
तेच हे ध्वनिमुद्रण *पुन्हा मधुशाला* या सदरात क्रमशः सादर
हा भाग पहिला..
https://www.facebook.com/100006316865676/videos/2586538991566638/

आज मार्गारिटा बनवावी, स्कॉच आणावी का बर्बन असा ज्वलंत प्रश्न पडलाय. >>
ते काय सब्स्टिट्यूट आहेत का एकमेकांचे .
मार्गरिटा मोठ्या पार्टीमधे पिचर भरभरून बनवायची आणि प्यायची. सीझन आणि आवडी प्रमाणे कलिंगड , आंबे, पॅशन फ्रूट यांचा गर वापरता येईल . बरोबर भरपूर स्नॅक्स हवेतच. देशी चखणा टाइप नाहीतर नाचो चिप्स / सालसा / ग्वाक इ.

स्कॉच आणि बर्बन दोन्ही जाणकार लोकांसोबत नाहीतर चक्क एकट्या दुकट्याने प्यायची गोष्ट आहे . बरोबर रोस्टेड नट्स नाहीतर चीझ !

स्कॉच आणि बर्बन दोन्ही जाणकार लोकांसोबत नाहीतर चक्क एकट्या दुकट्याने प्यायची गोष्ट आहे . बरोबर रोस्टेड नट्स नाहीतर चीझ !>>> अगदी सहमत
आपण तर टाकी आहोत वगैरे ताईप्स लोकांसमोर तर उघडूही नये बाटली Happy

चवी चवीने मस्त एन्जॉय करत मैफल खुलवण्यासाठी आहेत या

"ते काय सब्स्टिट्यूट आहेत का एकमेकांचे ." - Lol नाही, सबस्टिट्यूट नाहीत. मला फ्रेश लिंबं आणून मार्गारिटा बनवायला आवडते (चवीला सुद्धा). पण कामाच्या रगाड्यात इतकं दमायला झालं होतं कि मार्गारिटा बनवायचे कष्ट घ्यावे कि हातासरशी असलेल्या बर्बन / स्कॉच च्या बाटलीपैकी एक पर्याय निवडावा असा, 'इक तरफ उसका घर, इक तरफ मयकदा' प्रश्न पडला होता. पण घरी बोलावलेल्या पाहुण्यांनी प्रश्न सोडवला आणि स्कॉटलंडशी मैत्रीपूर्ण संबंधांना उजळणी दिली.

"आपण तर टाकी आहोत वगैरे ताईप्स लोकांसमोर तर उघडूही नये बाटली" - अश्या लोकांबरोबर शक्यतो पिऊही नये. Happy

ह्याच कॅटेगरीत एक आयपीए कॅस्क मधे क्युअर केलेली स्कॉच (बहुदा ग्लेन्फिडीच) मिळते. ती ठीक होती >> ग्लेन्फिडीच होती पण तिथे उगाचच माझं ताजम्हालाला विटा कशाला लावा झालं होतं Wink एकूणच फारसे प्रयोग माझ्या पचनी पडत नाहीत असे मला वाटतेय.

आपण तर टाकी आहोत वगैरे ताईप्स लोकांसमोर तर उघडूही नये बाटली >> Lol

कॉकटेल्सक्स्डे मी फारसा फिरकत नाहि, करण्याचा कंटाळा. शिवाय ओरिजिनल लिकरची चव मास्क करणं मला पटंत नाहि. वाडका एक अपवाद, कारण तिला चवंच नसते. तर या विकेंडला मुलांबरोबर "लिबर्टि बेल रिंगर" आणि "ब्लु डोर" टेस्ट करण्याचा योग आला. आस्वाद घेताना इथल्या कॉनसर्सची आठवण आली, आणि आवर्जुन फोटो काढला. रेसिपी तशी सोप्पी आहे, होप यु ऑल विल ट्राय अँड एंजॉय.. चियर्स...

thumbnail_IMG_3515.jpg

Pages