रिस्क

Submitted by अजिंक्यराव पाटील on 11 May, 2023 - 06:42

"काम झालं साहेब तुमचं, एक बारीक लोच्या झाला, पण काम फत्ते"
"कसला लोच्या?"
"आम्ही त्याच्या नाकाला नीट रुमाल लावून मगच गळ्यावर सूरी फिरवत होतो, पण तेवढ्यात त्याची बायको समोर आली.. मग काय करणार.. सुंदर होती, पण धंदा आहे आपला.. कोणतीच रिस्क घेता येत नाही"
"म्हणजे? नेमकं काय केलं तुम्ही तिला?"
"हाय का आता, तिला पण पोचवला, अजून काय करणार.. पुरावा मागे राहिला तर माझ्या जीवाला धोका, आणि माझ्याहून जास्त, तुमच्या"
"अरे मा... "
शिवी पूर्ण करता करता त्याचा उजवा हात छातीवर गेला, डाव्या हातातला तिचा फोटो आणि अमेरिकेची दोन तिकिटे गळून पडली...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पण ही गोष्ट मतकरींच्या एका गोष्टीवरून घेतली आहे असे वाटते. त्यात असाच शेवट होता. एक माणूस आपल्या प्रेयसीच्या नवर्‍याला मारायची सुपारी एका गुंडाला देतो. चोरी करायला आलेल्या माणसाने मारले असे त्याला दाखवायचे असते. नंतर त्याला त्या प्रेयसीबरोबर लग्न करायचे असते. तो गुंड ते काम करून शेवटी फोनवर नवर्‍याबरोबर बायकोलाही मारले हे सांगतो.

वाचल्याचे आठवत नाही खरे तर.. पूर्ण कथा वाचायला आवडेल.

प्रत्येक कल्पना, आधीच कुणी ना कुणी लिहून ठेवलेली असते. आमची पिढीच मेली दळभद्री!

सापडली.. सुहास शिरवलकरांची कथा आहे.. काही मित्रांना पाठवली तेव्हा समजलं.. त्यांची दीर्घ आहे, पण शॉर्ट मध्ये हेच कथानक.

खोटे का बोला, हि कल्पना मला खरेतर इथल्याच अज्ञातवासींच्या मानसच्या कादंबरीतून सुचलेली, होते डोक्यात तर लिहून टाकली. असो, admin साहेबांना सांगून उडवतो धागा

भारी जमलीय
ट्रॅजेडीसोबत बरी जिरली म्हणून हसयालाही आले.. अर्थात ती बायकोही क्टात सामील असेलच..

No come backs या पुस्तकात सेम टू सेम गोष्ट आहे.. तिथे बरीच दीर्घ आहे आणी नायिकेचे नाव बहुतेक अॅजेला आहे.

ही पण लघुकथा मस्तच पण

धन्यवाद!

no come backs: सुशि: काय म्हणावं आता. मी वर म्हटलोय तसं, सर्वच रहस्य- थरार संकल्पना आधीच कुणीतरी लिहून ठेवल्या असतातच की काय अशी शंका येतेय आता! मला सुचली होती इथल्याच एका कथेवरून, पण सुशिना कुठून सुचली असेल?