अजिंक्यराव पाटील

रिस्क

Submitted by अजिंक्यराव पाटील on 11 May, 2023 - 06:42

"काम झालं साहेब तुमचं, एक बारीक लोच्या झाला, पण काम फत्ते"
"कसला लोच्या?"
"आम्ही त्याच्या नाकाला नीट रुमाल लावून मगच गळ्यावर सूरी फिरवत होतो, पण तेवढ्यात त्याची बायको समोर आली.. मग काय करणार.. सुंदर होती, पण धंदा आहे आपला.. कोणतीच रिस्क घेता येत नाही"
"म्हणजे? नेमकं काय केलं तुम्ही तिला?"
"हाय का आता, तिला पण पोचवला, अजून काय करणार.. पुरावा मागे राहिला तर माझ्या जीवाला धोका, आणि माझ्याहून जास्त, तुमच्या"
"अरे मा... "
शिवी पूर्ण करता करता त्याचा उजवा हात छातीवर गेला, डाव्या हातातला तिचा फोटो आणि अमेरिकेची दोन तिकिटे गळून पडली...

विषय: 
Subscribe to RSS - अजिंक्यराव पाटील