एक कप चणा डाळ( हरबर्याची डाळ) , अर्धा कप उडिद डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप गहू. पाव कप तांदूळ.
मसाले: दोन चमचे मोहरी, एक चमचा जिरे, तीन काळे मिरे, एक टीएस पी म्हणजे टीस्पूनच असावे - एक चमचा असे ती म्हणते - धणे, पाव टीएसपी मेथी, तीन लवंगा एक लाल मिरची सुकी. सुंठीचा तुकडा एक छोटा एक इंच, अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद मीठ चवी प्रमाणे.
गरम तूप मेतकूट भात व बरोबर साईचे दही हे माझे अल्टिमेट कंफर्ट फूड आहे. म्हणून रेसीपी शोधल्यावर मधूराज रेसीपीज मराठी चॅनेल वर तू नळी वर मिळाली. ह्याला ९.९ लाख व्युज आहेत व एकदम सोप्पी आहे. बाहेर चे मेतकूट मागवण्यापेक्षा घरीच बनवून बघू म्हणून खालील रेसीपी ने बनवले. आता डबाभर बनले आहे जे मला वर्शभर नक्की चालेल. सर्व श्रेय मधुराज रेसीपीज च्या मधुराचे आहे.
कृती खालील प्रमाणे:
सुंठ हिंग हळद मीठ काही भाजायचे नाही.
मध्यम आचे वरच सर्व डाळी, गहू तांदूळ रंग बदले परेन्त खमंग भाजून घ्या. हल्का तांबूस रंग यायला पाहिजे. डाळ थाळीत काढून घ्या व त्यावर हिंग व सुंठ पेरा. उष्णतेने हिंग व सुंठ पण भाजून निघतात हलके
उडद डाळ, गहू , मूगडाळ भाजून घ्या व त्यात बरोबरीने मोहरी पण भाजून घ्या. मग तांदू ळ भाजून घ्या. हिने बासमती तुकडा घेतले आहेत. पण साधे तांदूळ चालतात. मी सुरती कोलम वापरला आहे.
हे झाले की सर्व सुके मसाले भाजून घ्यायचे. मी एक ऐवजी दोन लाल मिरच्या वापरल्या. व मेथी कमी वापरायला हवी होती. मेतकुट भाताला थोडी मेथीची कण भर जास्त चव येते. तुमच्या जजमेंटने घ्या.
हे सर्व गार झाले की मिक्सरमधून बारीक पूड करून घ्या. परदेशात कॉफी ग्राइंडर किंवा स्पाइस ग्राइंडर वापरता येइल एकदा फिरवले की मीठ घाला.
माझ्याकडे सुंठ नव्हती म्हणून मी नाही वापरली. ही पूड नंतर चाळून घ्या. भरड वर उरते ते डांगरा सारखे वापरता येइल. कांदा दही फोडणी घालून . भाकरी बरोबर मस्त लागते.
अनुराधा तांबोळ कर बाई व मास्टर रेसीपी विश्नुजी ह्यांच्या पण मेतकुटाच्या रेसीपीज उपलब्ध आहेत. पण मधुराची परफेक्ट वाटली.
अनुराधेने खडा हिंग वापरला आहे, मोहरीची डाळ, व चण्याच्या डाळी ऐवजी डाळे वापरले आहे.
पहिल्यांदा घेताना पहिल्या वाफेचा भात( शक्यतो बासमती नको. ) इंद्रायणी/ आंबेमोहोर / सुरती कोलम बेस्ट. घरचे साजूक तूप व हे मेतकूट दोन चमचे घ्या व हाताने कालवत कालवत गरम गरम खा. आता परत घेताना बरोबर चांगले सायीचे दही दोन चमचे घ्या.
कोणी तापातून उठले असल्यास बरोबरीने एक लिंबाच्या लोणच्याची फोड द्या. जिभेला चव येइल.
साधी सोपी मस्त रेसिपी आहे..(
साधी सोपी मस्त रेसिपी आहे..( मिरे, मेथी, आणि सुंठ वगळून करून बघेन )
वाह वाह. करुन पाहीन.
वाह वाह. करुन पाहीन.
शेवटचा पॅरा वाचताना अमा़ंच्या
शेवटचा पॅरा वाचताना अमा़ंच्या डायनि़ंग टेबलाशी बसल्यासारखे वाटले.
कृतीत जिन्नस भाज्यांचे वर्णन दोनदा आले आहे व दोन्हीत थोडा फरक आहे.
पाव कप गहू कसे मिळवायचे? गहू वगळले तर बिघडेल का?
शेवटचा पॅरा वाचताना अमा़ंच्या
शेवटचा पॅरा वाचताना अमा़ंच्या डायनि़ंग टेबलाशी बसल्यासारखे वाटले.>≥ अगदी!
आईच्या रेसिपीत मूग डाळ व गहू वगळलेत. मला मेतकूट भारतापेक्षा मेतकूट तेल मीठ पोळी,फोडणीच्या भातावर व आवडता झटपट होणारा मेतकूट पराठा !
इच्छुकांनी कृतीचा लाभ घ्यावा:-
मेतकूटात तेल व मीठ घालून पोळीवर पसरवायचं ( ऐच्छिक:तीळ,ओवा,जवस हि.मी, कोथिंबीर) लच्छा पराठ्यासारखा रोल करून लाटायचा व तेल सोडून खरपूस भाजायचा.
पाव कप गहू कसे मिळवायचे? गहू
पाव कप गहू कसे मिळवायचे? गहू वगळले तर बिघडेल का?>> अहो मला तोच प्रोब्लेम आला आहे. एक किलो गहू बिग बास्केट वरुन मागवले. खरेतर नाक्यावरचा गुजराती सुटे अर्धा किलो पाव किलो देतो. मी परवा अशीच अर्धाच किलो साखर आणली व सुट्टे मिळावले पाचशेचे. आता ते गहू बघून गिल्टी वाटत आहे. उरलेल्या गव्हाचे व्हीट ग्रास बनवता येइल त्याचा ज्युस आरोग्यदायी असतो असे ऐकले आहे. त्यासाठी हपिसातील बागेतून माती आणायची आहे ते रोज विसरते. जाताना कामाची घाई असते परत येताना थकवा व कुत्र्याला बघायची घाई असते. ऑफिसातून झिपलॉक बॅग भर माती आणून लागवड केली तर थोडे गहू संपतील.
दुसरे म्हण जे गव्हाचा चीक करणे. ह्याची पण एकदम सॉलिड स्टेप बाय स्टॅप रेसीपी बघून ठेवली आहे. दोन बहिणीं चे चॅनेल आहे. एकदम घरगुती प्रॉडक्षन पण इट इज द बेस्ट रेसीपी ऑफ पांढर्या शुभ्र कुरडयां. इतकी माझी महत्वाकांक्षा नाही. चीक बरोबर बनवता आला तरी बास.
मागच्या प्रयत्नात फेल गेले. खळ झाली निव्व ळ. भयानक त्या आठवणी.
तिसरे गव्हाची खीर बनवता येइल पण घरी दूध नाहीच व गोड बनवून खायचे?! हाराकिरी मोड मध्ये का जा. म्हणून रेसीपी बघितली पण नाही अजून. गव्हाची खीर पण नॉस्टाल्जिया आयटम आहे. एकदाच पूर्वी खाल्लेली आहे. व एकदा महालक्ष्मी सरस मध्ये.
आत्ता कोक णातील गुहागर
आत्ता कोक णातील गुहागर रत्नागिरी साइडची गरम मसाल्याची आमटी बनवत आहे. मधुरामध्ये एक उपवधू नवरा आलेला आहे त्याची रेसीपी आहे. ह्यला आमच्या बिर्याणी प्रेमी मुलीचे स्थळ दाखवावे का?! जस्ट टू सी व्हाट हॅपनस....
लेकीला प्रमोशन मिळाले त्या प्रीत्यर्थ तिने आज बिर्याणी व तिरामिसू केकची पार्टी दिली. व्हिविआना मॉल मधील द बोस्टन कप केकरी मधील तिरामिसू केक जरुर मागवा. function at() { [native code] }इशय लाइट चवीचा कॉफी / तिरा मिसू फ्लेवर चा केक आहे. हे पदार्थ येइपरेन्त लेज मसाला चिप्स खाल्ल्या व त्यानेच पोट भरले. मग एक स्लाइस केकच खाल्ला. आता ती येइल तेव्हा बिर्याणी गरम करून देइन. पण मला भूक लागली आfunction at() { [native code] }ताच. बिर्याणी बरोबर आलेले कांद्याचे काप भाजून घेउन आमटीत वापरेन.
रेसीपीत खसखस आहे पण माह्याकडे नशेचे काहीच पदार्थ नाहीत. नाहीतर व्हीट ग्रास बरोबरीने चुकून पॉपीची पण शेती व्हायची. ख्या ख्या.
आळ स आला किंवा आमटी बिघडली तर मेतकुट भात झिंदाबाद.
छान.
छान.
https://youtu.be/9MevB28aHFc
https://youtu.be/9MevB28aHFc
{रेसीपीत खसखस आहे पण
{रेसीपीत खसखस आहे पण माह्याकडे नशेचे काहीच पदार्थ नाहीत. नाहीतर व्हीट ग्रास बरोबरीने चुकून पॉपीची पण शेती व्हायची. ख्या ख्या.}
खिरीचे गहू वेगळे असतात!
खिरीचे गहू वेगळे असतात! आमच्याकडे त्यांना खपली गहू म्हणतात. आता सध्या गव्हाची खिरीची रेसीपी वेगळी असेल तर कायकी...
आता सध्या गव्हाची खिरीची
आता सध्या गव्हाची खिरीची रेसीपी वेगळी असेल तर कायकी...>> मला काहीच माहीत नाही अहो. तुम्हीच लिहा की रेसीपी.
छान आहे रेसिपी सोपी वाटतेय
छान आहे रेसिपी
सोपी वाटतेय
मस्त रेस्पी.
मस्त रेस्पी.
मेतकूटाचं तोंडीलावणं पण फार सुरेख होतं. विहिणीच्या पंगतीचा पदार्थ आहे हा!
हे तयार मेतकूट ४-५ चमचे, आंबट दही, मीठ आणि अगदी चिमूटभर साखर असं एकत्र कालवायचं (भज्यांच्या पिठाची कंन्सिट्न्सी हवी). यावर आता मोहोरी - हिंग घालून केलेली चळचळीत फोडणी ओतायची. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अन पुन्हा एकदा कालवून घ्यायचं. पोळी - भाकरी सोबत तोंडीलावणं म्हणून उत्तम!
- यामध्ये फोडणीत कढिपत्ता पण चांगला लागतो.
- बारीक चिरलेला कांदाही रंग जमवतो पण तो अगदी वाढतेवेळी कालवायचा (कारण नंतर त्याला पाणी सुटतं) आणि कांदा वापरणार असलात तर लाल तिखटाची चिमटी वाढवायची.
- दही आंबट नसेल तर दह्यासोबत थोडा लिंबाचा रस वापरायचा.
सही! मी कधी केलेलं नाही, आईच
सही! मी कधी केलेलं नाही, आईच करून देते.
मऊभात आणि मेतकूट आणि तूप + दही माझ्या लेकीलाही आवडतं तब्येत नरमगरम असली की. 'मेक दॅट मुशी राइस विथ यलो पाऊडर!'
फोडणीभात, कांदेपोहे यातही मेतकूट छान लागतं.
मी करते कधीतरी घरी मेतकूट.
मी करते कधीतरी घरी मेतकूट. आमच्या घरी भरपूर खप आहे मेतकुटाचा! एकदोनदा आईला विचारून केलं होतं. बाकी वेळेस हमखास पाकसिद्धी या पुस्तकातून बघून. माझी मामीपण मस्त करते मेतकूट. आजीही छान करायची. प्रत्येकीच्या हातची चव थोडी थोडी वेगळी.
छान होतं घरी केलेलं. फक्त मिक्सर गरम होतो, चाळून घ्यायला लागतं वगैरे. त्यामुळे कंटाळा येतो. शिवाय इथल्या जवळच्या एका दुकानात चांगलं मिळतं. थोडी चव वेगळी असते. पण चालतं. कन्नडमधेही मेंथ्या हिट्टू असंच म्हणतात. हिट्टू म्हणजे पीठ. (पहिल्यांदा तिथून घेताना मी हे भातावर घेण्याचंच मेतकूट आहे याची खात्री करण्यासाठी त्यांना घटक पदार्थ विचारत होते तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक ज्ये.ना. संधी साधून मला सांगायला लागले की हे अतिशय हेल्दी असतं, मुलांसाठी अगदी चांगलं वगैरे वगैरे.. मी मनात म्हटलं मी पिढ्यानपिढ्या मेतकूट खात आलेली आहे )
बाजूला उभे असलेले एक ज्ये.ना.
बाजूला उभे असलेले एक ज्ये.ना. संधी साधून मला सांगायला लागले की हे अतिशय हेल्दी असतं, मुलांसाठी अगदी चांगलं वगैरे वगैरे.. मी मनात म्हटलं मी पिढ्यानपिढ्या मेतकूट खात आलेली आहे Wink ) >> वावे , हा हा हा
'मेक दॅट मुशी राइस विथ यलो पाऊडर!' Happy >> कोणाला वाटेल काय भारी पदार्थ असेल
रेसिपी मस्त , मी अजून एकदा ही केलं नाहीये पण आवडत खूप. आजारी असले की तूप मेतकूट भात आणि फार फार तर लिंबाचं लोणचं ...
मेतकूटाचं तोंडीलावणं पण फार
मेतकूटाचं तोंडीलावणं पण फार सुरेख होतं>> येस ! अगदी याच रेसिपीने परवा केल होत, कान्दा मस्ट आहे यात.
मन्जुताई सान्गितलेला पराठाही ट्राय केला, आमच्याकडे मेतकुट मनापासुन आवडणारी मी एकटिच त्यामुळे देशावरुन येणारी बेगमी निट पुरते(बाकिच्याना आवडत नाही ते बरच आहे).
वरच्या रेसिपीने आता घरी करुन पाहते.
गहू हे नव्यानेच ऐकतेय असं
गहू हे नव्यानेच ऐकतेय असं वाटतंय. नेहमी फक्त डाळीच असतात असं वाटायचं.
ती मधुरा तिच्या फूड चॅनलमधून ब्रेक घेतेय. तात्पुरता की कसा ते लक्षात आलं नाही. पण तिचा स्टुडिओ बंद केला तिने.
ती मधुरा तिच्या फूड चॅनलमधून
ती मधुरा तिच्या फूड चॅनलमधून ब्रेक घेतेय. तात्पुरता की कसा ते लक्षात आलं नाही. पण तिचा स्टुडिओ बंद केला तिने. >>>>.
मसाल्यांचा खप वाढलाय वाटते .
झीच्या आम्ही सारे
झीच्या आम्ही सारे खवय्येमध्येही होती ना ती?
काही कल्पना नाही.
काही कल्पना नाही.
छान पाककृती. मी मधुराची पाकृ
छान पाककृती. मी मधुराची पाकृ पाहून ठेवली होती. अजून करायचा मुहूर्त यायचाय.
शेवटचा पॅरा वाचताना अमा़ंच्या डायनि़ंग टेबलाशी बसल्यासारखे वाटले.>> +1