तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

तांत्रिक माहिती चिकित्सेसाठी.

१८० ml.
व्होडका, व्हिस्की मध्ये किती ग्राम अल्कोहोल असते>>>

25 UP किंवा 75℅ proof असे लिहलेले मद्य असल्यास त्यात ४२.८% V/V इतके मद्यार्कचे प्रमाण असते १८० मिली ह्या बाटलीला निप हा शब्द (पिणारे क्वार्टर म्हणतात), ह्यात ७०.०४ मिली शुद्ध मद्य असते. मद्यर्काची घनता लक्षात घेता ते साधारण ६०.७८ ग्राम इतके होते.
हाफ साईझ (ह्याला तांत्रिक भाषेत पाइण्ट म्हणतात) 375 मिली. फुल/ खम्बा ( तांत्रिक भाषेत क्वार्टज) ७५० मिली.
ह्यांचे हिशोब करा कुणी एक वेळी किती ग्राम मद्यार्क घेतले.

<< 75℅ proof असे लिहलेले मद्य असल्यास त्यात ४२.८% V/V इतके मद्यार्कचे प्रमाण असते. >>

अल्कोहोलचे प्रमाण % proof किंवा ABV अश्या २ प्रकारात सांगितले जाते. इतर देशांचे माहीत नाही, पण अमेरिकेत ABV (alcohol-by-volume) हे % proof च्या निम्मे असते. उदा. ९०% proof म्हणजे ४५% abv. याचा अर्थ १०० मिली. दारुमध्ये ४५ मिली. अल्कोहोल असेल. कायद्यानुसार abv लिहावेच लागते, पण बरेचदा % proof सुद्धा लिहिलेले असते.

पूर्वी कोणे एकेकाळी १००% proof बेसिस निवडले गेले. A scale was created in which the number 100 was chosen as the “proof” at which a spirit would burn. Anything lower was exempt from the elevated tax.

आपण घेतोय त्यात शुद्ध अल्कोहोल किती असते याचा फॉर्म्युला :
Pure alcohol in ml = alcohol by volume in percentage X drink size in ml / १००

For example -
मी १८० मिली रम घेतली. त्यात अल्कोहोल by volume (ABV) ४०% होतं.
मी प्यालो शुद्ध अल्कोहोल = ४० X १८० / १०० = ७२ मिली

Pure alcohol किती या basis वर "standard drink" define करतात. पण एका Standard drink मधे किती pure alcohol याची definition वेगवेगळ्या देशात वेगळी आहे.

अमेरिका :
एक स्टँडर्ड ड्रिंक = साधारणपणे १८ मिली शुद्ध अल्कोहोल (more precisely, १७.७ ml of pure alcohol)
कॅनडा :
एक स्टँडर्ड ड्रिंक = १७.०५ मिली शुद्ध अल्कोहोल
ऑस्ट्रेलिया :
एक स्टँडर्ड ड्रिंक = १२.५ मिली शुद्ध अल्कोहोल
युनायटेड किंग्डम :
एक अल्कोहोल युनिट = १० मिली शुद्ध अल्कोहोल (युके मधे अल्कोहोल युनिट नावाचा कन्सेप्ट वापरतात)

एका आठवड्यात जास्तीत जास्त किती 'स्टँडर्ड ड्रिंक' किंवा ब्रिटीश युनिट घ्यावेत याचे recommendation देशांप्रमाणे बदलते. परत बऱ्याच देशात पुरुष आणि बायकांना safe consumption चे आकडे वेगळे आहेत.

तुषार नातू यांनी एका केस बद्दल लिहिलं होतं . एक यशस्वी व्यावसायिक , समाजात प्रतिष्ठा असलेले गृहस्थ अनेक वर्षं दर शनिवार रविवार मर्यादित प्रमाणात दारू घ्यायचे , कधीही दारूच्या नशेत गैरवर्तन वगैरे प्रकार नाही , घरी काही त्रास देणे नाही . व्यसन त्यांच्या ताब्यात असलेलं .

त्यांच्या मुलाच्या 21 व्या वर्षीच्या वाढदिवशी त्यांनी स्वतः त्याला दारू पाजली . आता तू मोठा झालास वगैरे सांगून , सेलिब्रेशन म्हणून . जसा आपल्या दारूमुळे आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला नाही तसाच मुलाच्याही येण्याचं काही कारण नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटलं होतं .

मुलगा तेव्हापासून अधूनमधून पिऊ लागला आणि काही दिवसात पक्का दारुबाज झाला .. झिंगून घरी येण्यापासून नशेत राडे करण्यापर्यंत प्रकार करून झाले .. दारू सुटावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याची वेळ आली . त्यावेळी त्याचे वडील म्हणाले की मी इतकी वर्षं पितो आहे , माझ्यावर असा परिणाम झाला नाही कधीच , कंट्रोलच्या बाहेर कधी गेलो नव्हतो मी .

त्यावेळी तुषार नातू यांनी दारू ही प्रत्येक माणसावर सारखाच परिणाम करेल असं नाही आणि प्रत्येक माणसाची व्यसन पचवण्याची क्षमता वेगवेगळी असते वगैरे वगैरे त्यांना सांगितलं . एक जण आहारी न जाता सहज राहू शकेल , कोणी महिनोन महिने न पिता राहू शकेल तर कोणी त्याच्या पार आधीन होऊन जाईल .

एरवी मर्यादेत किंवा क्वचित पिणारे आयुष्यात काही संकट किंवा टेन्शनची परिस्थिती आली की पिण्याकडे खेचले जाण्याची शक्यताही असतेच .

असो . ज्यांचा स्वतःच्या कंट्रोलच्या क्षमतेवर दांडगा विश्वास आहे त्यांचे ते स्वतंत्र आहेतच प्यायला .

वडील फक्त विकेंड्सना ड्रिंक घेतात , आई सांगते त्यांना ऑफिसमध्ये टेन्शन असतं ना म्हणून ते पितात . दहावीच्या परीक्षेच्या वेळी मुलगा विचार करतो , आपल्यालाही टेन्शन आहे तर पिऊन बघायची का ... पण धीर होत नाही . पण कॉलेजमध्ये गेल्यावर आधी सिगरेट मग त्यातून चरस वगैरे ओढून पाहण्याचे प्रयोग आणि पक्का नशेबाज होणं मग पुढे खूप प्रयत्नांनी व्यसनातून बाहेर पडणं अशी उदाहरणं अनिल अवचटांच्या मुक्तांगणबद्दलच्या पुस्तकात आहेत .

न पिणाऱ्यांची मुलं पितच नाहीत असं नाही पण आकडेवारी पाहिली तर ज्या घरी पिणारे वडील किंवा नातेवाईक असतात अशी मुलं दारू आणि इतर व्यसनांना ट्राय करून पाहण्याचं प्रमाण जास्त आहे असंही ते म्हणतात .

अलीकडे फेसबुकवर लिहित्या असणाऱ्या एका गृहस्थांना जबरदस्तीने उचलून मुक्तांगणमध्ये की दुसऱ्या कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रात नेल्याचं कळलं , हरहुन्नरी - बुद्धिमान मनुष्य , ह्यांनी लिहिलेलं वाचण्यासाठी यांना फेसबुकवर फॉलो करणारे काही हजार लोक होते .

धंद्यात खोट आल्याचं निमित्त झालं की यांचं पिणं वाढत गेलं , निर्णय चुकले आणि धंद्यात खोट आली माहीत नाही . असो , हेच सद्गृहस्थ वर्ष दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक समुपदेशन वगैरे सुरू करण्याचा प्लॅन करत होते , आपण नुसते सल्ले देऊन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकू असा कॉन्फिडन्स यांना होता... पिण्या बिण्याच्या आधीन होणारे आपण नव्हे असाही कॉन्फिडन्स असेल कदाचित ..

तरीही पिणाऱ्यांना एकत्र येऊन त्यातल्या आनंदावर चर्चा करावीशी वाटली तर त्यावर बोलूच नका असं म्हणणंही त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं वाटतं . इथलं सुरेख लज्जतदार वगैरे वर्णन वाचून एखादा न पिणारा प्यायला लागेल आणि व्यसनी होईल अशी शक्यता फार नसावी .. उद्या एखाद्या चरस कोकेन मर्यादेत घेणाऱ्याने त्याच्या लज्जतीचा आणि येणाऱ्या अवर्णनीय आनंदाचं वर्णन करणारा धागा काढला तर दारू पिण्याच्या लज्जतीचं वर्णन करणारे चिडतील की आपण हे ट्राय करून बघितलं पाहिजे एकदा तरी असं त्यांना वाटेल ? देवच जाणे .

अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्ट या पुस्तकातून -

आणखी एक घटक राहिलाच. मुलं. त्यांच्यावर तर वडलांच्या व्यसनाचा सर्वांत वाईट परिणाम होत असावा. बायकोला कसं, त्रास आहे, पण तो माहेरच्यांशी, मित्र-मैत्रिणींशी बोलता येतो. त्याचं ओझं कमी होऊ शकतं. इथं ही मुले म्हणजे मुके प्राणी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यांच्याकडे बघूनच पोर आपली वाढ करून घेत असते. एक वेळ वडील नसते तरी ते बरं वाढलं असतं. पण दारू पिऊन घराबाहेर धिंगाणा करणारे, हात उगारणारे, मारणारे वडील...त्या पोराच्या कोवळ्या मनाचा कसा कुस्करा होत असेल!
अशा मुलांसाठी काही तरी करायचं ठरवलं.

एरवी बायकांशी बोलता येतं, त्यांचं कौन्सेलिंग करता येतं. पण मुलांच्या बाबतीत? ते शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत. ते बोलून मोकळे होऊ शकत नाहीत. सोसावं तर लागतं, तेही सतत. काहींच्या मनावर उमटलेले ओरखडे जन्मभर त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन राहतात.

आम्ही पेशंट मित्रांच्या मुलांबरोबर बोलायचा प्रयत्न करू पाहत होतो. पण जे भोगलेलं, दुःसह असं काही बोलणं त्यांच्या त्या कोवळ्या मनाला झेपेल का? की मोकळं होण्याऐवजी जास्त मोडतोड, नुकसान होईल? एक मुलगा एवढंच म्हणाला होता, “मला शेजारच्यांसारखं घर का नाही मिळालं?” या एका वाक्यात त्याच्या जीवनाचं जसं दाहक सत्यच सामावलेलं. तो त्याच्या वडिलांविरुद्ध बोलू शकत नव्हता. त्या असुरक्षित भयानक रात्रींविषयी बोलायला त्याच्याकडे शब्द नव्हते. पण त्याला जाणवत होतं, जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा शेजारच्यांकडे वेगळं आहे. आपल्याकडचं जे आहे  ते असंच असायला हवं असं काही नाही. मग त्याला दिसतं ते शेजार्‍यांचं घर. त्याला हेवाही वाटत असेल त्या घरातल्या मुलांचा. ती मुलं याला खेळायला घेत असतील का? की कधी याच्या मर्माला टोचत असतील? कोण जाणे!

पहिली काही वर्षे पु. ल., सुनीताबाई मुक्तांगणच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला नेहमी यायचे. बरोबर मुख्यमंत्री शरद पवारांनाही घेऊन आलेले. त्या कार्यक्रमात एका पेशंट मित्राची छोटी मुलगी बोलली. काय बोलली ती? केवढं शहाणपण! जेमतेम दहा-बारा वर्षांची पोर ती. तिनं ‘पूर्वी आणि आता’ अशी दृश्येच उभी केली. “पूर्वी बाबांच्या व्यसनाच्या काळात मैत्रिणींना घरी बोलावू शकत नसे. आता सगळ्या आमच्याच घरी असतात. खेळायला, अभ्यास करायलाही. पूर्वी बाबा घरी येणार याची भीती वाटायची. आल्यावर काय काय होईल याची कल्पना नसायची. आता बाबांची मी वाट पाहत असते.” एवढं सांगून तिने समोर बसलेल्या आमच्या मित्रांना सांगितलं, “तुम्ही पीत असता तेव्हा तुम्हाला घरचे लोक टाकून बोलतात. तुम्हाला वाटत असेल, घरच्यांना तुम्ही आवडत नाही. पण सगळ्या काकांनो, खरं सांगू? तुम्ही आम्हाला हवे असता...”

ऐकताना पु.लं.चे डोळे डबडबले. त्या वेळच्या व्हिडिओमध्येसुद्धा ते आले आहे. नंतरही म्हणत होते, “काय रे, किती लहान पोर ती! किती शहाण्यासारखं बोलली! काय तिचा गुन्हा रे?” शरद पवार एवढे जाड त्वचेचे राजकारणी, पण तेही हलले. मला नंतर ना. धों. महानोर सांगत होते, “पुढे २-३ दिवस मी पवारसाहेबांबरोबर होतो. प्रत्येक सभेत त्यांनी त्या मुलीचं उदाहरण दिलं. आपल्या पोरांवर अशी वेळ आणू नका, असं वारंवार सांगत होते.”

__________

दारू लीगल आहे यात सरकारला लोकांचं व्यक्तीस्वातंत्र्य जपायचं आहे हे कारण नाही तर महसूल हे कारण आहे . सर्वोच्च न्यायालयाने रमी ह्या खेळातील यश हे लक ( नशिबावर ) अवलंबून नसून स्किल्स वर अवलंबून आहे , त्यामुळे तो जुगार नाही त्यावर बंदी घालता येणार नाही , असा निर्णय दिला आहे त्यामुळे ऑनलाइन रमी ही कायदेशीर आहे .

थोडा शोध घेतला तर ऑनलाइन रमी मुळे झालेल्या कर्जातून आत्महत्येच्या बातम्या सहज सापडतात . पण सरकारला फक्त कराशी देणंघेणं आहे , आपले नागरिक मरेनात का तिकडे ... अजून अफूदी ड्रग कायदेशीर करत नाहीत , तेही लोक रोषाच्या भीतीपोटी नाहीतर तेही करायला त्यांनी मागेपुढे पाहिलं नसतं . स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण हाच एक मार्ग आहे . कोणत्याही व्यसनाच्या बाबतीत . केवळ स्वतःसाठी नाही , आजूबाजूच्या लोकांना , आपल्या मुलांना एक आदर्श घालून देण्यासाठी . असो , शेवटी ज्याचं त्याचं आयुष्य आहे , प्रौढ , सुशिक्षित , सुविद्य लोक आहेत .. आपल्याला कोणाला फुकटचे सल्ले देण्याचा काय अधिकार आहे !

कोणी दारूला एक भिकार म्हटलं तर आपण शंभर भिकार म्हणायचं... मात्र आपण आपली पीत रहायची, तीच सच्या मद्यप्रेमीची निशाणी.

दारु प्रतेक व्यक्ती वर वेगळा परिणाम करते जे मात्र 100% खरे आहे.
1) काही ना थोड्या प्रमाणात पिली तरी चढते.
काही ना जास्त प्यावी लागते.

काही न चे पूर्ण स्वतःच्या हालचाली वर बोलण्या वर नियंत्रण असते,तर काही खूप बडबड करतात हिंसक होतात.
२) काही न च्या शरीरावर दारू चे घातक परिणाम होतात काही न च्या शरीरावर काही परिणाम होत नाही.
अगदी ८० वर्ष वय पण निरोगी पने जगतात.
३), काही व्यसनी होतात अगदी आहारी जातात तर काही जास्त पिणारे असेल तरी व्यसनी होत नाहीत .
मध्ये मध्ये दहा बारा दिवस नाही दारू मिळाली तर त्यांना काही फरक पडत नाही.
पण हे सर्व आपल्या शरीरावर अवलंबून असते आपल्या हातात काही नसते.
म्हणून दारू च एक ग्लास पण kadhi पिवू नये.
एकच प्याला हे नाटक बघा हवं तर

radhanisha
डोळ्यात अंजन टाकणाऱ्या पोस्ट
त्या मुलीचा किस्सा ऐकून खरेच गलबलून आले Sad मी हे जवळच्या नातेवाईकात फार अनुभवलेय. रिलेट करू शकतो. म्हणून माझेही विचार असे झालेत.

आपल्या या पोस्ट या विषयावरच्या धाग्यात कॉपीपेस्ट करू का?

धन्यवाद राधानिशा
मी जरा नंतर कामात असल्याने घाईत तुमची परवानगी येण्याआधीच केल्या तिथे पोस्ट.
नसती दिली परवानगी तर उडवल्या असत्या.
पण चांगले विचार जितके दूर पोहोचतील तितके चांगले..
सेव्ह आहेत माझ्याकडे आता त्या तुमच्या नावासह. कधी व्हॉटसप ग्रूपवरच्या चर्चेतही वापरता येतील.
धन्यवाद Happy

पाहिली पोस्ट ह्या धाग्याला स्पर्शून तरी जाते. दुसरी मुक्तांगण मधली गोष्ट इथे टाकण्याचे मात्र कारण अजिबात समजले नाही.

इथे पिणार्‍यांना - अगदी म्हणजे झिंगून रस्त्याच्या कडेला गटारात पडलेले - असेच समजतायत काही लोक.

आमच्याकडे कोणीही पित नसलं तरी. सोशल ड्रिंकिंग किंवा रिस्पॉन्सिबल ड्रिकिंग म्हणुन काही गोष्ट असते हे मला समजू शकते. पण काही लोक काहीही समजून घेण्याच्या पलिकडले वाटतायत.

आजकाल दुसर्‍याच्या विचारांचा, विचारधारेचा, आवडी-निवडींचा जो इन्टॉलरन्स झालाय - ते व्यसन अधिक घातक आहे. दारूहूनही. बुलडॉझर चालविल्यासारखं, किंवा गेंड्याच्या धडकीसारखं , आपलच मत जिथेतिथे दामटत रहाणे - हेही व्यसनच आहे.

सामो ताई , सोशल ड्रिंकिंग म्हणून सुरुवात होऊन व्यसनाधीन झालेले कितीतरी लोक आहेत . आणि झिंगून गटारात पडणे हे शेवटचं टोक झालं , मध्ये कितीतरी पायऱ्या आहेत . दारूने सद्सद्विवेक बुद्धी वरची , सबकॉन्शस मनावरची बंधनं ढिली होतात . जे शब्द माणूस शुद्धीत असताना उच्चारणार नाही ते उच्चारले जातात .. दारूसाठी घरी पैसे मागणारा पूर्ण शुद्धीत असतानाच बायकोला मारतो .. एकाने आपल्या लहान मुलाला गच्चीत नेऊन उलटं टांगलं आणि दारूसाठी पैसे दे नाहीतर याला टाकतो अशी धमकी बायकोला दिली , हे पूर्ण शुद्धीत असताना . आज दारू पूर्णपणे सुटल्यावर तो मनुष्य आपल्या बायको मुलांना अतिशय जपणारा म्हणून ओळखला जातो .

आधीच्या कमेंट मध्ये उदाहरण दिलेले गृहस्थ , त्यांचं ड्रिंकिंग सोशल ड्रिंकिंग म्हणूनच सुरुवात झाली होती , त्यानंतर ते विकेंड्सना घरात बसून दोन पेग , मग पावसाळा , सुंदर हवा अशी निमित्तं सुरू होतात , मग जरा टेन्शन आहे म्हणून , मग कधी सेलिब्रेशन म्हणून , कधी मित्र भेटलेत म्हणून .. कारणं शोधली जातात . एके ठिकाणी ते म्हणाले आहेत , कोणी त्याच्या पैशाने पाजेल म्हणून मी लोचटासारखा त्या लोकांमध्ये गप्पा बिप्पा मारत तासन तास बसायचो , चांगलं घर दार , चांगली आर्थिक परिस्थिती , उच्चशिक्षित , नोकरी करणारी बायको असणारा माणूस ..

हे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही , धरून चालू 10 पैकी दोघांच्या बाबतीतच होईल . 10 लाख सोशल पिणाऱ्यांपैकी 2 च लाख व्यसनाच्या आहारी जातील . ते दोन लाख लोक जोपर्यंत दुसऱ्याच्या घरातले असतील तोपर्यंत आपण शांतपणे बोलू शकतो , व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे ... तो नेमका आपला मुलगा , आपला भाऊ / नवरा / वडील असतील आणि त्याचे सगळे परिणाम स्वतः अनुभवावावे लागले की मग व्यक्तीस्वातंत्र्याचं समर्थन होईल असं वाटत नाही .

बरं दारू पिण्याचा फक्त त्याच्या एकट्याच्याच कुटुंबावर परिणाम होईल असंही नाही . 4 पेग पिऊन आपण नीट सोबर आहोत , झिंगलेलो बिंगलेलो अजिबात नाहीत असं समजणारा माणूस ओव्हरकॉन्फिडन्सने गाडीच्या चाकामागे बसला आणि अपघातात एखाद्याचा जीव गेला .. तो मरणारा आपल्या घरातलाही असू शकतो .

चार - चार पेग पिऊन स्वतःच्या पायावर चालणारे , अजिबात न झिंगलेले विनयभंग / रेप करणारच नाहीत याची खात्री देता येत नाही .. फार वाईट उदाहरण देते आहे , विषय ह्या वळणाला जाऊ देता नये कदाचित पण तरीही देतेच - पेपरातली बालविवाहाची एक बातमी , आजी आजोबांनी 13 वर्षांच्या नातीचं लग्न लावून दिलं , तिकडे सासरी तिला भयंकर त्रास .. बालविवाह विरोधी जागृती करणारं या संस्थेचं नाटक ह्या आजोबांनी पाहिलं आणि रडू लागले , या नाटकाच्या लोकांशी बोलताना त्यांनी नातीचं लग्न लवकर करून देण्याचं जे कारण सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे , आमचा मुलगा म्हणजे हिचा बाप दारुडा .. काय करील याची खात्री नाही म्हणून तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवून आपण ह्या चिंतेतून मोकळं व्हावं ..

म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेल्या आपल्या मुलाला ही आपली पोटची मुलगी इतकीही सद्सद्विवेकबुद्धी शिल्लक नसेल अशी भीती त्यांना वाटत होती . सगळे पिणारे अर्थातच एवढ्या खालच्या लेव्हलला जाणारे नसतात पण जी वस्तू एखाद्याचं एवढं अधःपतन करण्याचं सामर्थ्य बाळगून आहे ती बाकीच्यांचं थोड्याफार प्रमाणात अधःपतन करणारच नाही अशी खात्री देता येत नाही ...

दारूला फार लाइटली घेतलं जातं आपल्याकडे . परदेशात , जिथे ठराविक वयानंतर दारू पिणं अगदी कॉमन आहे , कोकाकोला सारखी जाऊन विकत घ्यावी आणि कुठेही बसून प्यावी , आईबाप वगैरे विचारणारे नसतातच - अशा ठिकाणीही तरुण पिढीतील काहीजण ठरवून ते ट्रायदेखील करणार नाही कारण मी कितपत आहारी जाईन माझं मला माहीत नाही आणि व्यसन सुटणं हे फार अवघड असतं त्यापेक्षा ते लागूच न देणं आपल्याला सोपं , असं ठरवून दारूच्या थेंबाला स्पर्श करून बघत नाहीत , आजूबाजूला मित्रमंडळी रेग्युलर पीत असताना .... बावळट , मागासलेला , बोरिंग अशा सगळ्या थट्टा - चेष्टेला तोंड देऊन . कारण त्यांनी व्यसनी झालेल्या आपल्याच ओळखीच्या लोकांची दुरवस्था डोळ्यांनी बघितलेली असते .

आवडीनिवडींना विरोध नको तर मग चरस गांजाला तरी विरोध कशाला ? ते का व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि आवडीनिवडींच्या कक्षेत बसत नाही ? अफूचा इतिहास बघा- चीन मध्ये अफूचा व्यापार कायदेशीर होता तेव्हाची गोष्ट - अफू दारूसारख्या कमी किमतीत कायदेशीर खरेदी करता येत असे . चीनची तरुणाई पार गर्दुल्ली झाली होती , गुन्हेगारी कितीतरी वाढली होती . अफूचा व्यापार करणारे देश हा व्यापार थांबवायला तयार नव्हते , त्यासाठी युद्ध करावं लागलं .. नाहीतर चीन रसातळाला चालला होता .

काही गोष्टींमध्ये व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे न आणलेलंच बरं असतं . ज्या कृतीने दुसऱ्या माणसाच्या हिताला , सुरक्षिततेला प्रत्यक्ष धक्का पोचण्याची शक्यता असते तिथे व्यक्तीस्वातंत्र्य कामाचं नाही .

राधानिशा आपल्या सविस्तर पोस्टकरता धन्यवाद. मला एक बाजू घेणे नेहमी कठीण जाते. दोन्हीकडे काहीतरी पटण्यासारखे असते. असो तो माझा गुणविशेष आहे. ( कधी मर्यादा ठरते तर कधी बलस्थान).
आपल आग्रह लक्षात आला मला. धन्यवाद.

धन्यवाद .. एक आठवलं म्हणून सांगते सहज .. माझी आजी तशी फार शिकलेली बाई नाही . माझ्या आत्याचं सासर आमच्या घराजवळच आहे त्यामुळे तिच्या मुलांना आजीचा सहवास भरपूर मिळाला असावा लहानपणी . माझा आतेभाऊ कॉलेजमध्ये असताना एक दिवस त्याच्या एका झिंगलेल्या मित्राला घरी सुखरूप पोहोचवायचं काम करत होता .. ते कुणी पाहिलं , आजीच्या कानावर नक्की काय आलं माहीत नाही पण त्याला बोलवून घेऊन - तू दारू कधीही पिणार नाहीस अशी माझी शपथ घे .. अशी शपथ त्याला घ्यायला लावली होती .. तो अर्थात पीत बीत नव्हताच पण आजीला कितीतरी दिवस भीती - आपला नातू त्या वाटेला जाईल की काय ..

राधनिशा, तुम्ही दिलेली उदाहरणे तुमच्या पहण्यातली असतील तुमचा परिघ अतिशय खालच्या दर्ज्याचा आहे लो स्टँडर्ड आहे. झोपडपट्टीछाप उदाहरणे आहेत सगळी. असे होतच नाही असे नाही, पण असेच होते असेही नाही. अभ्यास, आणि परिघ वाढवा इतकेच म्हणेन.

ही माझ्या पाहण्यातील उदाहरणं नाहीत , वाचनातून सगळ्या सामाजिक स्तरांमधील उदाहरणं समजतात , वेगवेगळे लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत , त्यांनी झोपडपट्टी पासून ते अतिश्रीमंत अशा सर्व सामाजिक स्तरांमधील पेशंट हाताळले आहेत .

असेच होते असं मी कुठेही म्हटलेलं नाही . पण असं होतच नाही असंही नाही हा मुद्दा मला जेवढा भयंकर वाटतो तेवढा तुम्हाला वाटत नसावा .

विशिष्ट प्रकारच्या घटना विशिष्ट सामाजिक स्तरातच घडतात , आपल्या स्तरात नाही असा समज असलेले स्वप्नांच्या जगात जगत असतात का असं अलीकडे वाटतं . वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणांना प्रत्यक्ष समोर गेलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या तोंडून स्वतःचे अनुभव लिहिले आहेत , ते वाचून हादरायला होतं , त्याला झोपडपट्टी , कनिष्ठ मध्यम वर्ग , मध्यम वर्ग , उच्च मध्यम वर्ग , श्रीमंत अशी कुठलीही एक चौकट नसल्याचं लक्षात येतं .. असो .

बाकी माझा परीघ हा मध्यमवर्गीय आहे .

ठीक.. मला तरी ह्या धाग्याचे कौतुक वाटते. एखादा तुमच्या उदाहरणातला पिणारा जर ह्या धाग्यावर आला तर पिऊन कसे वागावे, तब्येत सांभाळून कसे किती आणि काय प्यावे, व्यसन न होऊ देता पिण्याचा आणि जगण्याचा आनंद कसा घ्यावा हे तरी कळेल. मन मारून दारू सोडली तर पुन्हा येते, पण मन सांभाळून दारू प्यायली तर तीच मानसिक आधार देते. मी तर म्हणेन तुम्हीसुद्धा करा try कधीतरी.. अर्थात स्वतःवर नियंत्रण असेल तरच करा

गाड्यांचे अपघात होतात. गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे.

पण कोणती गाडी घ्यावी धाग्यावर गाड्यांच्या अपघातांची वर्णने टाकावीत असे मला वाटत नाही.
हा. कुणी गाडी वाट्टेल तशी हाणा, सीट बेल्ट बंधू नका असे म्हणत असेल तर त्यावर विरोध करणे समजते. पण केवळ गाडी ह्या विषयावर धागा आहे म्हणून अपघातांची माहिती देणे योग्य नाही वाटत.

मला वाटते आपण तह करावा.
१ या धाग्यावर 'दारूचे दुष्परिणाम' वा विषयावर लिहू नये.
२ मी तर म्हणेन तुम्हीसुद्धा करा try कधीतरी अशी वाक्ये टाळावीत.
३ पुरंदर, मावळ व जावळी तालुके सरदेशमुखी व चौथाई सह दारूविरोधकांना तोडून द्यावेत.

व्यसनाच्या आहारी जाण्याकडे कल असणं हा मानसिक - कमकुवतपणाचा म्हणा किंवा आजाराचा म्हणा - भाग आहे. कसलं व्यसन हे उपलब्धतेवर अवलंबून असतं.
उदा. जुगार/लॉटरी/ज्योतिष/बुवाबाजी/धार्मिक कर्मकांडं इत्यादींच्या आहारी जाऊन कुटुंबाची फरफट करणारे दारूचं व्यसन असणाऱ्यांपेक्षा फार निराळे म्हणता येतील का?
लागणाऱ्याला चहाचंही व्यसन (अवलंबित्व - ही गोष्ट मिळाल्याशिवाय फंक्शन करू शकणार नाही अशी धारणा वा स्थिती) लागू शकतं.
कोणीतरी कर्मकांडांच्या आहारी जाईल या भीतीने मी सहज हात जोडणं थांबवावं असं सुचवणं जितकं तर्कदुष्ट असेल, तितकंच अशा धाग्यावर दारूच्या दुष्परिणामांबद्दल प्रवचनं देणं!

“ कोणीतरी कर्मकांडांच्या आहारी जाईल या भीतीने मी सहज हात जोडणं थांबवावं असं सुचवणं जितकं तर्कदुष्ट असेल, तितकंच अशा धाग्यावर दारूच्या दुष्परिणामांबद्दल प्रवचनं देणं!” +१ … बैलाचा डोळा! Happy

टोकाचे दावे कोणी करू नयेत.
दारु मी संयम राखून पिणे हे तुमच्या हातात नाही .
ते तुमचे शरीर काय प्रकारचे आहे त्या वर आहे.
दारु ही आर्थिक,स्तर ,शिक्षण,अक्कल कही बघत नाही माणसाचे माकड ते ती करतेच.
राधा ह्यांच्या पोस्ट योग्य च आहेत.
अती श्रीमंत पण रोज दारू पिऊन माकड होतात फक्त त्या बातम्या मीडिया मध्ये येत नाहीत.
कशी प्यावी, का न प्यावी हे एकाच विषयाचे दोन भाग आहेत.
सबंध आहे दोन्ही मध्ये

व्यसनाच्या आहारी जाण्याकडे कल असणं हा मानसिक - कमकुवतपणाचा म्हणा किंवा आजाराचा म्हणा - भाग आहे
>>>>>>

@ स्वाती आंबोळे,

अहो ईतके सरळसोट नसते ओ ते. की मनाचा संयम बाळगला आणि काम झाले.
लोकांना ड्रग्सचे व्यसन लागते तेव्हा त्यांना तल्लफ आली की ड्र्ग्स हवेच असते. नाही मिळाली तर ते सैरभैर होतात. अगदी कोणाचा खूनही करायला मागेपुढे बघत नाहीत. हे काही मनाच्या कमकुवतपणामुळे होत नाही. तर तसेच घटक त्या पदार्थात असतात त्यामुळे ते असे टोकाचे आहारी जातात. कमॉन यार, व्यसनांचे समर्थन असे करू नका प्लीज.

यावर लवकरच नवीन धागा काढतो.
हा मनाचा कमकुवतपणा नसेल तर कुठलेही व्यसन लागत नाही हा फार घातक मुद्दा आहे. वेळीच खोडायला हवा.

अन्यथा अशी पोस्ट वाचून कोणी ड्र्ग्सही ट्राय करेल ईथे. घेऊन तर बघतो. मी काही कमकुवत नाही जे मला व्यसन लागेल असा विचार करून....

दारू असो वा इतर काही. अ तिरेक वाईटच.>>>> टिळकांना चहात पाव बुडवून खाल्ला ते ही मिशनर्यांच्या संगतीने म्हणुन प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. दुटांगी धोतर नेसून इराण्याच्या हॉटेल मधे चहा पिणारे त्याकाळातील वाया गेलेले तरुण साहित्यात दिसायचे.

माझी आजी, (आता असती तर 125 वर्षाची असती) स्टिलच्या पेल्यातून बीअर, व्हिस्की प्यायची Lol प्रामुख्याने दिवाळीत कानवल्यांचा (खास सीकेपी करंज्या) जामानिमा करताना ही मैफल नक्की बसे. इतकच नव्हे तिची सासूही कशी याच पद्धतीने काम करे हेही ती सांगे.
सांगायचा मुद्दा हा की गेल्या पाच पिढ्या घरात मोठी माणसं दारू पित असूनही पुढच्या पिढ्यातली एकही व्यक्ती दारुबाज झाली नाही वा दारुमुळे कोणता आजार होऊन मृत्यूमुखी पडलेली नाही. वट्ट 80-90 वर्ष टुणटुणीत जगून, जीवन छान उपभोगून, आनंदाने पुढील प्रवासास गेली.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणे, त्याचे अवडंबर न माजवणे इतके समंजस माणसास कळते. ज्याला समजत नाही त्यांच्यासाठीच तर मुक्तांगण सारख्या संस्था फार मोठे कार्य करतात. अशा संस्था आज तरी सर्वश्रुत आहेत. तेही माहित नसेल तर मग ज्याचा त्याचा दळभद्रीपणा, दुसरं काय?

“ हा स्पेशल धागा काढून दिला होता तुम्हाला, तरी इथेच का बागडायचे आहे?” - मनाचा कमकुवतपणा आणि व्यसन, दोन्ही Happy

Pages