तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

Belvedere ओके ओके आहे. उगाच महाग. तशाही सगळ्या व्होडका सारख्याच लागतात.

ग्लेन्मोरान्ज चांगली आहे.

मागच्या आठवड्यात Phraya रम तरी केली फारच स्मूथ आणि flavourful

आणि Budwiser मॅग्नम व्हिस्की। हि पण छान आहे

दोन्हीही नीट try केल्या

आयुष्यातील पहिले विचित्र पेय.
बीयर प्लस आइस प्लस पाणी.
व्हिस्की टाईप.
नालायक मित्र नी चुकीचे होत आहे हे पण नाही सांगितले.
पूर्ण बार मधील लोक माझ्याकडे बघत होती.
दुसऱ्या वेळेस .
मित्र नुकताच लष्करात भरती झाला होता आला तेव्हा.
रम घेवून आला पण पिणार कुठे आणि कस.
हा मोठा प्रश्न .अजून आम्ही लाज सोडली नव्हती.
संडास ल त्या वेळी शेतात जाव lagayache.
डब्बे भरले आणि त्या मध्येच शेतात जावून अंधारात मिक्स केली.
किती ! ह्याचा काही अंदाज आला नाही अंधारात .
पण घरात माहीत पडले आणि मार पण सर्वांना पडला

सध्या काहीच नवीन ट्राय केल नाही किंवा बनवलं नाही. खुप दिवस झाले राव.

आता तर रमचा सिजन पण संपला, आता चिल्ड बिअर झिंदाबाद

Mi ek mahinyapurvi Warka hi polish beer try keli. Atishay uttam beer. 1478 pasun bantey Poland madhye. Agadich vismaykarak history ahe Warka brewery Chi.

बीअरमधे रम नाही कधी मिक्स केली, पण जॅपनीज बीरमधे कोल्ड साके चा शॉट अ‍ॅड करून प्यायलोय. छान लागते.

इन्स्टाच्या रीलमध्ये दिसलं म्हणून एक मॉकटेल करुन पाहिले

द्राक्षे आणि पाणी एकत्र मिक्सरला लावून त्याचा जूस केला, तो गाळून घेतला, चोथ्यात पाणी घालून अगदी निपटून. मग त्यात थोडं काळं मीठ, लिंबू आणि पुदिना आणि एक चमचा मध घातला.
ग्लासाच्या कडेला लिंबू घासलं आणि उपडा ग्लास ताटलीत तिखटमिठ घालून त्यावर ठेवला. म्हणजे ग्लासच्या कडेला सगळं तिखटमीठ.
बर्फ घालून सर्व्ह केलं पण काही मजा नाही आली.
मग वाटलं यात व्होडका घालावी. घरात फक्त रोमानोव्ह होती, ती जरा कडसरच असते. ती घातल्यावर अजूनच काहीतरी चमत्कारीक झालं. पण मग थोडा चाट मसाला आणि थोडी द्राक्षे कुस्सकरुरन घातल्यावर मजा आली.

बऱ्याच दिवसांनी ब्रिझर पिली. ब्लॅकबेरी फ्लेवर होता. खूप आवडली. आता बियर ऐवजी ब्रिझरच घेणार. जमैकन पॅशन फ्लेवर सुध्दा छान आहे.

हो जमेका, क्रानबेरी, ब्लॅकबेरी आणि लेमन हे मस्त आहेत फ्लेवर
मँगो काहीतरीच आहे

ह्या विकांताले पोपटखेळ ले गेलतो, तटी एका दोस्ताने मोहाची दारू पाजली, पैली धार. सोताच्या वावरातल्या मोहाडीचे फुलंगिलं गोडा करून बनवेल होती, लैच मस्त "सुरा" म्हणा लायक ड्रिंक. नंतर मोहाडीचेच फुलं (चटनी करून) घालेल देशी कोमडा.

अहाहा out of the world

https://www.bbc.co.uk/food/articles/diet_reduce_dementia_risk?

दारू पिण्याचे फक्त वाईट परिणाम होतात असा आग्रह धरणार्यनी हे वाचायला पाहिजे.

No single food on its own reduced the risk of dementia, Shannon says. Rather, they all probably worked together.

“The data suggests that all of the components are important in their own right. It’s an amalgamation of all the different benefits of lots of different things.”

म्हणजे लिस्ट मधले जेव्ढे जास्त आय्टेम घ्याल तेवढे चान्गले.

WHO has announced that alcohol consumption in ANY QUANTITY is bad for health.

ही लेटेस्ट माहिती आहे. त्यामुळे दारू पिणे वाईट असा नवा स्टँड मी घेतोय असे जाहीर करतो.

(पण, याचा अर्थ मी दारू पिणे पूर्ण बंद करणार असा अजिबात नाही.)

WHO has announced that alcohol consumption in ANY QUANTITY is bad for health.
>>>>

जी गोष्ट आपल्याला आपले आईवडील आणि बायकापोरेही सांगू शकतात त्यासाठी WHO गाठायची काय गरज...

माय लाईफ माय चॉईस.. बिनधास्त प्या.. फक्त दारू वाईटच आहे हे ध्यानात ठेऊन प्या. आपल्या मद्यपानाचे समर्थन म्हणून दारूचे उदात्तीकरण नको.

जी गोष्ट आपल्याला आपले आईवडील आणि बायकापोरेही सांगू शकतात त्यासाठी WHO गाठायची काय गरज...>>>

बायकोच्या मैत्रिणीने गोव्यावरून मस्त एक बाटली हुराक आणून दिलीय
उन्हाळा संपता संपता आलीये पण हरकत नाही
हुराक पिणे हा एक वेगळाच मस्त अनुभव आहे

60ml हुराक, त्यात एक मिरची, थोडं मीठ, लिंबू, आणि लिम्का आणि थोडा सोडा आणि भरपूर बर्फ

अहाहा सुख च सुख Happy

दारू असो वा इतर काही. अ तिरेक वाईटच. Wink
>>>

यात दारूसोबत मग चरस गांजा हफीम ब्राऊनशुगर वगैरे जोडायलाही हरकत नाही...

बायकोच्या मैत्रिणीने गोव्यावरून मस्त एक बाटली हुराक आणून दिलीय
>>>

यासाठी माझी पोस्ट का कॉपीपेस्ट केलीत हे समजले नाही. अपवाद असतात हे दाखवायला का?

अवांतर.
अल्कोहोल चे फायदे तोटे सांगताना
ग्राम मध्ये सांगतात.
म्हणजे दिवसाला दहा ग्राम च्या वर नको.
हे काही मला कळत नाही.
१८० ml.
व्होडका, व्हिस्की मध्ये किती ग्राम अल्कोहोल असते

यासाठी माझी पोस्ट का कॉपीपेस्ट केलीत हे समजले नाही.>>> सर त्याला रिप्लाय देणे म्हणतात
दुसऱ्या धाग्यावरचा प्रतिसाद चोरून आपल्या धाग्यावर टाकणे असं नसतंय ते

सर हा धागा वरती आणतात ते एक बरंय
मला कित्येकदा ते मागून शोधून काढून पोस्ट टाकायचा कंटाळा येतो
सर हिरीरीने दारूचा प्रसार करतात म्हणून, मागे गेलेले धागे वरती आणून जास्तीत जास्त लोकांनी वाचावे यासाठी चाललेला प्रयत्न

आता सध्या अजून एक मस्त दारू मिळाली आहे
1965 आर्मी रम
स्पिरिट ऑफ व्हिक्ट्री
त्याची बाटली डिझाइन आणि कलर इतका मस्त आहे ना
मित्र म्हणाला फक्त आर्मी कँटीन मधेच मिळते
असू शकेल कारण मला तरी मार्केट मध्ये कधी दिसली नाही

आता उन्हाळा आहे म्हणून जास्त चव घेऊन राखून ठेवली आहे
स्मूद आहे एकदम, मला वाटलेलं आर्मी रम म्हणजे एकदम हार्ड असेल पण तसं नाहीये
आणि माफक प्रमाणात ऑन द रॉक्स घेता येईल इतकी सुंदर आहे

ओल्ड मंक च्या खालोखाल हीच रम आवडली आहे
बाकी ते बकर्डी ब्लॅक किंवा टू इंडिज नाही खास वाटल्या

उन्हाळा स्पेशल मी बनवते ती कोकम मार्गारिटा

प्रमाण अंदाजपंचे दाहोदरसे. Happy
टकिला (jose quero किंवा तुमचा आवडता ब्रँड), कोकम क्रश (बहुधा साखर असलेलाच मिळतो), सोडा किंवा पाणी, पुदिना पानं चुरडून

ग्लास रीम ला लिंबू लावून चाट मसालाचं कोटींग करा. आवडेल आणि झेपेल तशी टकिला, कोकम क्रश , सोडा किंवा पाणी, बर्फ चुरा. शेकर मधे मिक्स करुन घ्या. पुदीना पानं चुरडून घालू शकता. ऑप्शनल आहे.

आवडेल आणि झेपेल तशी टकिला, कोकम क्रश , सोडा किंवा पाणी >>
मार्गारिटा साठी प्रमाण: १ भाग टकिलासाठी ३ भाग मार्गारिटा मिक्स/सोडा/पाणी वगैरे.

Pages