नास्तिक (१)

Submitted by कॉमी on 29 April, 2023 - 02:29

नास्तिक म्हणजे काय ?
-नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नसणारा माणूस.

विश्वास नसणे म्हणजे काय ?
- देव आहे असे मानण्यास कसलेही कारण नाही, त्यामुळे देव आहे असा विश्वास नाही.

देवावर विश्वास नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे सत्य मानणे आहे का ?
- नाही.

पण असे कसे ? देव अस्तित्वात आहे हे मान्य नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे मान्य झाले की !
- तीन वेगवेगळी वाक्य -
१. देव अस्तित्वात आहे.
२. देव अस्तित्वात नाही.
३. देव अस्तित्वात असल्याचा अथवा नसल्याचा कोणताही पुरावा नाही.
पहिली दोन वाक्ये सोपी आहेत. तिसऱ्या वाक्यासंबंधित-
-जोपर्यंत एखादी गोष्ट अस्तित्वात आहे ह्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट अस्तित्वात आहे ह्यावर विश्वास ठेवत नाही. तसेच, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही ह्याचा पुरावा नाही म्हणून आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. युनिकॉर्न, दंतपरी, ब्रम्हराक्षस, रक्तपिपासू, ड्रॅगन ह्यांच्या अस्तित्वात असण्याचा व नसण्याचा कसलाही पुरावा नाही. आपण जनरली त्यांचे अस्तित्व मानत नाही. तिसरे वाक्य हे विश्वास नाकारणे आहे. अस्तित्वावर विश्वास नाकारणे म्हणजे अस्तित्व नाहीच ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (Rejection of a belief is not acceptance of the opposite.)
ह्याचे एक प्रात्यक्षिक उदाहरण -
राजू आणि संजू कॉलेजातले एकमेकांचे कट्टर शत्रू असतात. त्यांची दुष्मनी जगजाहीर आहे. एका दिवशी संजूच्या पालकांना सकाळी संजूच्या खोलीत त्याचा खून झालेला आढळतो. साहजिकच पोलीस राजुकडे संशयित म्हणून वळतात. पोलिसांना काय पुरावे सापडले ह्याच्या तीन केसेस पाहू.

१. राजुच्या हाताचे ठसे असणारा आणि संजुच्या रक्ताचे डाग असलेला चाकू सापडला. ह्यावरून पोलीस निष्कर्ष काढतात की राजूनेच संजूचा खून केला.

२.चाकू वैगरे काही सापडले नाही, उलट संजू ज्या रात्री मारला गेला त्या दिवशी राजू परगावी होता ह्याचा पुरावा सापडला. त्यामुळे, पोलीस निष्कर्ष काढतात की खून राजुने केले असणे अशक्य आहे, कारण तो तर ह्या गावातच नव्हता. त्यामुळे, पोलीस राजू निर्दोष आहे असा निर्वाळा देऊ शकतात.

३. पोलिसांना चाकू तर सापडत नाहीच, आणि राजूला तो कुठे होता विचारल्यावर तो सांगतो मी तर माझ्या घरीच होतो. म्हणजे पोलिसांना राजुच्या दोषी किंवा निर्दोष असण्याबद्दल कसलाही पुरावा सापडत नाही. पोलीस राजुबद्दल काहीही निष्कर्ष काढू शकत नाहीत. राजू दोषी असल्याबद्दल पुरावे नसल्याने अर्थातच त्याला काही शिक्षा झाली नाही. पण पोलिसांनी राजू निर्दोष असण्याचा निर्वाळा दिला असेही नाही.

पहिली केस म्हणजे देव अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे त्यामुळे देव आहे हे मानणे.

दुसरी केस म्हणजे देव नसण्याचा पुरावा असल्याने देव अस्तित्वात नाही हे मानणे.

तिसरी
म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा पुरावा नसण्याने देव अस्तित्वात आहे हे मान्य न करणे. इथे हे महत्वाचे आहे - देवाच्या अस्तित्वावर विश्वासाचा अभाव म्हणजे देव नाही ह्यावर विश्वास ठेवणे नव्हे. दोन भिन्न गोष्टी आहेत. इथे राजू खुनी आहे ह्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणे म्हणजे राजू निर्दोष आहे ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (ह्याचे उलटे सुद्धा खरेच आहे. राजू निर्दोष आहे हे न स्वीकारणे म्हणजे राजू दोषी आहे हे स्वीकारणे होत नाही.) तसेच, देव अस्तित्वात आहे हा विश्वास नाकारणे म्हणजे देव अस्तित्वात नाही असा विश्वास ठेवणे नाही. तसेच, देव अस्तित्वात नाही ह्यावर विश्वास ठेवणे नाकारणे म्हणजे देव आहे ह्यावर विश्वास ठेवणे नाही.

तू देवाचे अस्तित्व अशक्य आहे असे मानतोस का ?
- नाही. कारण तसा पुरावा नाही.

म्हणजे तू देवाचे अस्तित्व शक्य आहे हे मान्य करतोस का ?
- नाही. देवाचे अस्तित्व अशक्य नाही ह्याचा पुरावा नाही, तसाच देवाचे अस्तित्व शक्य आहे ह्याचाही पुरावा नाही.

असे कसे ?
- देवाचे अस्तित्व शक्य आहे असे मानायला सुध्दा कसलाही पुरावा नाही. देवाच्या अस्तित्वाची शक्यता, अशक्यता ठामपणे सांगता येईल असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पुराव्याच्या अभावे शक्य अशक्य बाबींवर कसलेही भाष्य करणे शक्य नसते. आपण एखादी बाब शक्य आहे असे तेव्हा म्हणतो (उदा.) जेव्हा आपण ती घटना प्रत्यक्ष तपासली आहे किंवा तपासू शकतो. उदा, बॅटने चेंडू सीमापार टोलवणे शक्य आहे कारण आपण तसे होताना खूपदा पाहिले आहे. पण, जर तुम्ही चेंडूचे वजन किंवा सीमेची त्रिज्या हळूहळू वाढवत गेला तर एक असा बिंदू येईल जिथे तुम्हाला म्हणावे लागेल की मला हे शक्य आहे की नाही हे माहिती नाही.


अज्ञेयवादी आणि नास्तिक ह्यामध्ये फरक काय ?

- "देवाच्या अस्तित्वाबद्दल ह्याबद्दल कोणतेही ठाम दावे करता येत नाहीत" हे वाक्य दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगितले की माणूस नास्तिक किंवा अज्ञेयवादी होतो -
देव आहे असे दाखवणारे पुरावे नसल्याने देव आहे ह्यावर मी विश्वास ठेवत नाही - नास्तिक.
देव आहे की नाही मला माहीत नाही - अज्ञेयवादी.
पण, अज्ञेयवाद असा पण आहे , की माणसाला देव असला काय आणि नसला काय, देवाच्या अस्तित्वाबद्दल खात्रीशीर माहिती मिळणे अशक्य आहे. त्या व्याख्येनुसार माणूस अज्ञेयवादी नास्तिक सुद्धा असू शकतो - असा माणूस ज्याच्या देवावर विश्वास नाही आणि ज्याला वाटते देवाच्या अस्तित्वाबद्दल काहीही माहिती मिळवणे अशक्य आहे.

थोड्या वेळ देव खरेच आहे की नाही बाजूला ठेव. पण देवावर विश्वास ठेवण्यात वाईट काय आहे ? लोकांना मानसिक शांती मिळत असेल तर देवावर विश्वास का ठेऊ नये ?
- स्वतःची फसवणूक करणे चांगले नाही. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याने मानसिक शांती मिळते, म्हणून तो विश्वास खरा होत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नास्तिक पना वर चर्चा करताना..ती श्रद्धा,, धर्म ह्या वर घसरते आणि विषय भरकटतो.
. श्रद्धा,विज्ञान वाद आणि नास्तिक पना हे परस्पर संबंधित विषय असले तरी एकमेकाशी समांतर आहेत.
त्यांना मिक्स न करणे उत्तम.
गरज ही शोधाची जननी आहे ह्या पेक्षा.
कल्पना करण्याची माणसाची जी नैसर्गिक ताकत आहे त्या मुळे अनेक शोध लागले आहेत.
हवेत उडता आले पाहिजे ही पहिली कल्पना माणसाने केली आणि विमान शोधून काढले.
विज्ञान वृत्ती कल्पना शक्ती मुळेच माणसात आहे.
माणूस असा पण मृत्यू ला,संकटाला, आजारपणं ला भित असतो.
आपल्या पेक्षा पण ताकत वान एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला वाचवू शकते ही कल्पना सुखद वाटते ...
माणसाचे मनोधैर्य वाढवते.भीती कमी करते.
वृध्द आई वडिलांचा मुलगा अमेरिकेत आहे तो काही येणार नाही हे माहीत असून पण माझा मुलगा अमेरिकेत आहे गरज पडली तर तो नक्की धावून येईल ही श्रद्धा जगण्याची उमेद देते.. .
त्यामुळे श्रधेवर हल्ला करणे चूक वाटते.
नास्तिक पना दाखवताना श्रद्धा ही टारगेट केली जाते.
मला नाही वाटत त्याची काही गरज आहे नास्तिक होण्यासाठी
भावना विरहित,फक्त व्यावहारिक विचाराने जगता येत नाही
जगण्यासाठी भावनांशील असणे खूप गरजेचे आहे.
भावनांचे विविध आविष्कार आहेत .
सुंदर फुल बघून भारावून गेले पाहिजे तिथे फुल कसे तयार झाले त्या मागचे सायन्स आठवून काही फायदा नाही..
निसर्ग ची ती सुंदर कलाकृती बघून आनंदी झाले पाहिजे.

मला असं वाटतं की जसं आस्तिक असणं म्हणजे श्रद्धा आहे कारण परमेश्वराचं अस्तित्व कोणीही पुराव्यासहीत दाखवू शकत नाही, तसंच नास्तिक असणं ही देखिल श्रद्धा आहे कारण परमेश्वर अस्तित्वात नाही हे देखिल कोणीही शाबित करून शकत नाही. agnostic अर्थात अज्ञेयवादी असणे ही जास्त योग्य पोझिशन आहे.

मामींनी मांडलेल्या मुद्द्याची या आधीच लेखात पुरेशी दखल घेतली आहे असे वाटते. त्यामुळे वेगळे उत्तर नाही.

नास्तिक असणे म्हणजे देवावरील श्रद्धेचा अभाव आहे. नास्तिक असणे ही श्रद्धा नाही.

कृष्णमिश्राच्या (अकराव्या शतकाच्या उत्तरार्ध) प्रबोधचंद्रोदय ह्या नाटकात बृहस्पती हा लोकायतदर्शनाचा संस्थापक व चार्वाक हा त्याचा पट्टशिष्य प्रमुख प्रचारक म्हणून येतो. सर्वदर्शनसंग्रहात चार्वाकाला ‘नास्तिकशिरोमणि’ म्हटले आहे. महाभारतात चार्वाक हा दुर्योधनाचा मित्र म्हणून येतो. महाभारताच्या शल्यपर्वात पराभवाने व्यथित झालेल्या दुर्योधनाला आपला संन्यासी मित्र चार्वाक ह्याची आठवण होते आणि आपला मृत्यू झाल्यास आपला वीरोचित अंत्यविधी चार्वाकच करील, असे वाटते. महाभारताच्या शांतिपर्वात तो एक राक्षस म्हणून येतो. भारतीय युद्धाच्या समाप्तीनंतर अश्वमेध यज्ञाच्या तयारीत असलेल्या युधिष्ठिराला एका परिव्राजकाच्या रूपात भेटून तो प्रश्न करतो, की ‘स्वतःच्या बांधवांना मारून मिळविलेला विजय खरा आहे काय ?’ हा दुर्योधनाचा मित्र, चार्वाकनामक राक्षस आहे, असे ब्राह्मण सांगतात. श्रीकृष्णही तेथे येतो. चार्वाक हा तपस्वी असला, तरी ब्राह्मणांचा अवमान केल्यामुळे त्याचा ब्राह्मणांकडून वध होईल असे तो सांगतो. चार्वाकाला त्यानंतर मारून टाकण्यात येते. काहींच्या मते हा राक्षस चार्वाक व लोकायतदर्शनाशी निगडित असलेला चार्वाक एकच होत.

प्रा. सदाशिव आठवले ह्यांच्या मते चार्वाक हा लोकायतदर्शनाचा संस्थापक नव्हे परंतु एक प्रभावी आचार्य असावा व इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत केव्हातरी तो होऊन गेला असावा.

मराठी विश्वकोश मधून कॉपी पेस्ट

गृहितके तुमची नाहीत. देव मानणाऱ्यांची एक चौकट आणि गृहितके आहेत. तर त्या बाहेरच्या लोकांनी आत डोकावून खटाटोप कशाला करायचा. 'त्या चौकटीत नसणाऱ्यांचा गट हा नियम कशाला हवा?
हा केवळ मी पुढे केलेला वादाचा एक मुद्दा धरा. आरोप, शत्रुत्व वगैरे अजिबात नाही.
समजा काही प्रवासी अमुक एक विमान/बोट/रेल्वे/वाहनाने जात आहेत हा एक गट. मग त्यातून न जाणारे हे फक्त त्यात जागा न मिळाल्याने पण जाण्याची इच्छा असलेले असं नसून त्यांना अजिबात जायचा विचारही नाही असेही असतील. तसे नास्तिक म्हणजे आस्तिक नसलेलेच असं धरून चालू नका.

सॉरी मामी. कृपया श्रद्धा आणि वैद्न्यानिक दृष्टीकोण ह्यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे, शास्त्रज्ञांना परमेश्वराशी देणघेण नाही. प्रेम नाही. वैर पण नाही.

शास्त्रज्ञांना परमेश्वराशी देणघेण नाही.

हे कशावरून तुम्ही निष्कर्ष काढला आहे तो पण एक माणूस आहे त्याला पण भावना आहेत .
त्यांच्या पण काही तरी श्रद्धा असतात.
त्यांची पण भावनिक गरज असते
ते पण अद्भुत विश्व बघून अचंबित होतात.
संशोधक हा नास्तिक, श्रद्धा हिन असतो हे सत्य नाही.
आणि तशी गरज पण नाही.

तसे नास्तिक म्हणजे आस्तिक नसलेलेच असं धरून चालू नका.>>>
मला वाटत होत कि आस्तिक/नास्तिक ह्या म्युचुअली एकस्क्लुसीव संज्ञा आहेत.

मला असं वाटतं की जसं आस्तिक असणं म्हणजे श्रद्धा आहे कारण परमेश्वराचं अस्तित्व कोणीही पुराव्यासहीत दाखवू शकत नाही>>
अस नाही. ह्या क्लासिक डिबेट मध्ये आस्तिक लोक अनेक मुद्दे उपस्थित करतात. "फर्स्ट कॉज" त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे "इंटलीजेंट डिझाईन" असे अनेक आहेत. जर कोणी त्याची मांडणी केली तर त्याचे खंडण करता येईल.
पण श्रद्धा हाच मुद्दा असेल तर आपली पूर्ण माघार.

इंटलीजेंट डिझाईन

हे आपल्याला वाटते.
अगदी किरकोळ गुलाबाचे फुल बघितले तरी ती कलाकृती मला खूप उच्च दर्जा ची वाटते.
ग्रह ताऱ्या मधील योग्य अंतर.
पाण्याचे विविध गुणधर्म काय आणि किती लिहावे.
निसर्गात intelegiant ठासून भरलेले आहे.

माणसाने आता लावलेले शोध म्हणजे खूप मोठ्या बुध्दीमत्ता ची उदाहरणे आहेत.
हे निसर्ग किंवा विश्वातील प्रत्येक घटकाशी तुलना केली तर .
माणसाची बुध्दीमत्ता ही अतिशय किरकोळ आहे हे सहज लक्षात येईल.
धागा त्या मार्गावर वळवू नका
यंत्र आणि तंत्र शोधले म्हणजे माणूस हा जगातील सर्वात बुध्दीमान प्राणी आहे असे पण कोणी बोलू शकत नाही.
कुत्रा स्फोटक सहज शोधून काढतात माणसाला ते जमत नाही.
मुंगी माती चे वारूळ बनवते माणूस तसे वारूळ बनवू शकत नाही.
पक्षी सुंदर घरटी बांधत माणूस तसे घरटे बांधू शकत नाहीत.
फ्लेमिंग पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून योग्य इच्छित स्थळी पोचतात.
माणसाला बिना gprs इतका प्रवास योग्य दिशेने करणे जमणार नाही.
ही फक्त अतिशय साधी निसर्गातील उदाहरणे सांगितली आहेत
अजून किचकट आणि तीव्र बुध्दीमत्ता दर्शक असणारी अनंत उदाहरणे आहेत

इतके लांब कशाला .
मानवी शरीराची रचनाच अजून पर्यंत पूर्ण समजली नाही.
मानवी शरीर हेच खुप मोठे आश्चर्य आहे उच्च Technic चे उदाहरण आहे.
मानवी शरीराचे कार्य कसे चालते हेच अजून पूर्णपणे माहीत नाही.
बाकी गोष्टी तर खूप लांबचा गोष्टी आहेत

मामी, कॉमींनी मांडलेले आहे -
>>>>>देव अस्तित्वात असल्याचा अथवा नसल्याचा कोणताही पुरावा नाही.
तिसरे वाक्य हे विश्वास नाकारणे आहे. अस्तित्वावर विश्वास नाकारणे म्हणजे अस्तित्व नाहीच ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (Rejection of a belief is not acceptance of the opposite.)

अस्तित्व नाही असा नकार द्यायला (मूळात अस्तित्व होतेच) असा पायाभूत विचार असण्याची गरजच नसते - असा त्यांचा रास्त प्रतिवाद आहे.

>>>>>>>>@सामो, श्रद्धा एक साधन मानले तर त्या साधनाचा परीघ लक्षात ठेवणे गरजेचे आहे. श्रद्धा हे मानसिक स्थैर्य, आनंद देण्यासाठी साधन असेल कदाचित पण ते कधीही सत्य काय आहे हे समजण्यासाठी वापरण्याचे साधन नाही, होऊच शकत नाही.

सत्य आहे. म्हणुनच ज्ञान योग वेगळा आणि भक्ती योग वेगळा. ज्ञान आणि कुतूहलरुपी उपकरणे सर्जिकल प्रिसिजनने वापरुन देवाचे अस्तित्व पडताळणे हा ज्ञान योग असावा. भक्ती योग - डोळे मिटून विश्वास.
शेवटी काय -
ब्रह्म मेधया
Brahman is attained through Intelligence.
मधु मेधया
Bliss is attained through Intelligence.
ब्रह्म एव मधु मेधया.
Brahman which is verily Bliss is attained through Intelligence.

Singularity ही स्टेज ही एक कल्पना आहे..
बिग बँग गृहितक कसे ही करून सिद्ध करण्यासाठी ती कल्पना केली गेली आहे
प्रयोग शाळेत सिंगुलारिटी ही स्टेज प्रयोग द्वारे कधीच proove झालेली नाही.
आज पण हा जयद्रथ हा सूर्य ह्या हिशोबाने.
कोणीच singularity ही स्टेज प्रयोग शाळेत पण सिद्ध करू शकत नाही .
तरी आपण त्या वर विश्वास ठेवतो पण देव ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही .
पाय ची किंमत ही पण काल्पनिक च आहे ..
बाकी गणिती य समीकरणे जुळावीत म्हणून .
सिगुलिरिटी विषयी पण तीच अवस्था आहे.
सिद्ध झाल्या शिवाय ते मान्य करणार नाही असे बोलणारे singularity मात्र मान्य करतात.
ती स्टेज प्रयोगातून सिद्ध झालीच नाही .

आहे ना मोठा जोक

Pages