प्रकरण १:- पास्ट इज प्रॉलोग्
निरभ्र, मोकळं, निळशार आकाश, अधून मधून डोकावणारे ढगांचे पांढरे पुंजके, दूरवर पसरलेला तो निळा-पांढरा पट्टा, मधूनच डोकावणारा एखादा चुकार सोनेरी किरण, हळूच एका इमारतीमागून दर्शन देणारा, लालबुंद झालेला, मावळतीच्या दिशेने अस्ताला जाणारा सूर्य, संध्याकाळची वेळ होत असल्याने आपापल्या घरी परतणारे एकटे दुकटे कधी थव्याने परतणारे पक्षी आणि आसमंतात भरून राहिलेली निःशब्द पण तरी हवीहवीशी शांतता ...
निलय त्या शांततेसोबत बोलत बसला होता, कधीतरीच मिळणारा हा एकांत अनुभवत निर्विचार मनःस्थिती मध्ये घराच्या टेरेस वर.... निलय... मध्यम बांधा, सरळसोट तरतरीत नाक, रुंद जबडा, हनुवटीच्या खाली पडणारा हलकासा खड्डा, दाटसर एकमेकांमध्ये अर्धवट जुळणाऱ्या भुवया, लक्ष वेधून घेणारी उंची आणि पिंगट घारी धारदार नजर... २८ - २९ वर्षाचा निलय स्वः कर्तृत्वावर पोलीस खात्यात एक एक पायरी चढत होता.
खालून आलेल्या जोरदार आरोळी ने त्याची ती संध्याकाळचे मंत्रमुग्ध वातावरण पाहताना लागलेली तंद्रि मोडली आणि डोक्याच्या मागच्या बाजूला हलकेच चापट मारत गालातल्या गालात हसत निलय जिना उतरून खाली आला.
"ए दादा, तुझा फोन कधीचा केकाटतोय बघ जरा, डोकं उठलं माझं आणि त्यात तुझी ती सेव्हनटिज् ची ट्रिंग ट्रिंग रिंगटोन... " आस्था वैतागत चिडचिडून निलयला बोलावत म्हणाली. तिच्या इरिटेट होण्यावर हसून तिच्या डोक्यात हलकेच टपली मारत त्याने फोन उचलला आणि समोरून ऐकु येणारं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले आणि कपाळावर आठ्या पाडत, " मी येतोय, एरिया सिल करा आणि मीडिया पर्यंत कमीतकमी माहिती जाईल याचा बंदोबस्त करा." आपल्या अधिकारी स्वरात सूचना केली आणि झटपट अंगावर वर्दी चढवत आपली बुलेट काढून तो घटनास्थळी जायला निघाला.
**********
"आत्ताच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार शहरात पुन्हा अजून एक बॉडी सापडली आहे... शरीरावर सरळ सरळ दिसणाऱ्या सर्जिकल ऑर्गन रिमोवल च्या खुणा सामान्य जनतेत दहशत पसरवत आहेत आणि कोणती अशी वेल एज्यूकेटेड गँग कार्यान्वित झाली आहे असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.. पोलीस प्रशासनाकडून तातडीची व कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी जोर धरत आहे... कॅमेरामन SK सह मी दीक्षा ABC news TV."
टीव्ही वरची ती वृत्त निवेदिका घसा फाडफाडून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह करत होती. निलय ने त्या तणावपूर्ण वातावरण झालेल्या खोलीत प्रवेश केला आणि कपाळावर आठ्यांच जाळं विणत वैतागून टीव्ही बंद करत रिमोट टेबलावर आपटला. त्याच्या या प्रतिक्रियेवर त्या खोलीत असणारे ते सगळेजण हलकेच हसले आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सावकाशीने चेहरे गंभीर करत त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागले...
निलयने कॉन्फरन्स रूम वर एक नजर फिरवली, आणि डोळ्यांत मिश्किल भाव ठेवून डावी भुवई हलकेच वर करत सगळ्यांना सवाल केला,"आपले गरिबांचे जेमस् बॉण्ड 'रे... सत्यजित रे' कुठं आहेत..!!??" श्री फिस् कन हसायला आणि कॉन्फरन्स रूम च दार धाडकन् उघडून रे आत यायला एकचं गाठ पडली. आणि बाकी सगळ्यांच्याच एकत्रित हसण्याने कॉन्फरन्स रूम त्या दोन क्षणांसाठी दुमदुमून गेली... झालेल्या विनोदाने ते तणावपूर्ण वातावरण थोडे निवळले... आणि सगळे का हसतायत याने अनभिज्ञ असलेला रे गोंधळलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहत राहिला..
रे... सत्यजित रे.. आपली ओळख अशी बॉण्ड स्टायिल ने करून देणारा "डॉक्टर रे.." ....सहा फुटाच्या वर आरामात जाणारी उंची, रूंद बांधा, गोरापान रंग, गडद तपकिरी रंगाचे मिश्किल, हसरे, कनवाळू डोळे; डोळ्यांवर बारीक काडीचा फ्रेमलेस चष्मा... असा हा अठ्ठाविशीचा कनवाळू डॉक्टर पेडीयाट्रीशन व्हायचा सोडून फॉरेन्सिक ऍन्थ्रोपोलॉजिस्ट कसा झाला असेल याचं कोडं त्याला जो भेटेल त्यांना सगळ्यांना पडायचं..
"ही दीक्षा आणि सुमेर, दोघे मिळून पोलीस स्टेशनला टाळं लावूनचं दम घेणारायत बहुतेक...! त्या सूमेरला डेडबॉडीज् चे असे क्लोज अप शॉट्स कसे मिळतात देव जाणे... असो, डॉ. जोशी नाही का आल्या मीटिंगला अजून?" एक दीर्घ सुस्कारा टाकत रे ने प्रश्न विचारला. निलय च्या चेहऱ्यावर सुद्धा हाच प्रश्न होता.. डाव्या भुवई वर हलकेच करंगळी ने स्क्रॅच करत, "आपण सध्या तरी आतापर्यंत च्या घटनांचा तपशील घेवूयात तोपर्यंत कदाचित डॉ. जोशींकडून पोस्टमॉरटम् रिपोर्ट्स येतील. अदरवाईज बाकी सगळी टीम इथे आहे.."
श्री..., मूर्ती लहान पण कीर्ती महान टाइप व्यक्तित्व... पाच साडेपाच फुटाच्या श्री... चास्मिष; मांजरी सारखी गर्द हिरवी नजर आणि त्या नजरेतून ओसंडून वाहणारी बुद्धिमत्ता.. टीम चा कॉम्प्युटर मधला किडा! त्याचा हात कोणत्या पण कॉम्प्युटरला लागायचा अवकाश, त्या कॉम्प्युटर ची सारी गुपित त्यांच्यासमोर उघडी पडली नाहीत तरचं नवल...! कॉम्प्युटर च्या कोणत्याही समस्या लीलया सोडवणारा... असा हा चोविशीचा पडद्याआड चा खेळाडू...
मोहन.. प्रथम दर्शनी एकदम फाटका वाटणारा, किरकोळ बांधा असलेला पंचविशीचा क्रीमिनोलॉजी मध्ये पीएचडी करणारा युवक, त्या बांध्याला शोभणारी जेमतेम उंची, पण त्या गर्द काळ्या डोळ्यात एक विलक्षण चमक जी त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसत होती.. असा हा सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळून जाणारा मोहन... कोणताही गुन्हा घडत असेल तर त्याच्या सुपरफास्ट नेटवर्क मधून माहिती काढणं म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ...
कॉ. दत्ता सावंत.. पदाने कॉन्स्टेबल पण त्या टीम मध्ये सगळ्यात सिनियर..! त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन या टीम ने बऱ्याच गुंतागुंतीच्या केसेस सोडवल्या होत्या...
आणि या सगळ्यांना एकत्र बांधणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे ईस्प. निलय... चेरी ऑन द टॉप टाइप व्यक्तित्व...
आता सध्या घडत असणाऱ्या घटना.. म्हणजे सर्जिकल कटस् असणार्या बॉडीस् सापडत असणाऱ्या घटना आणि त्यामागचा छडा लावण्यासाठी हे सगळे एकत्र जमले होते."आतापर्यंत दर महिन्याच्या रविवारी रात्री बरोबर एक वाजता एक अश्या टोटल चार आणि आज सापडलेली एक अश्या एकूण पाच बॉडीज् सापडल्या आहेत. मृतदेह कोणाचे आहेत, त्यांची ओळख पटवून देणारा कोणताही पुरावा घटनास्थळी अजूनपर्यंत तरी सापडला नाहीय, ना कोणते कपडे, ना वॉलेट, आणि मिसिंग पर्सन रिपोर्ट्स मध्ये सुद्धा यांचे कोणाचेही रेकॉर्डस् सापडले नाहीयत. प्रथम दर्शनी तरी हे सगळे व्हीक्टम्स् बेघर असलेले किंवा भिकारी, थोडक्यात ज्यांच्या गायब होण्याची दखल फारशी घेतली जाणार नाही असे आहेत. पोलीस डिपार्टमेंट च्या आधी न्यूज चॅनल्स ना घटनेची माहिती मिळतेय म्हणजे खुनी नक्कीच एक पोहचलेला खेळाडू आहे... हि'ज् चॅलेंजिंग अँड टाँटिंग दि डिपार्टमेंट... स्टे शार्प एव्हरीवन... धिस् इज नो ऑर्डीनरी केस.." निलय ने थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. आणि बाकीचे त्याच्या बोलण्यावर विचारात पडले.
त्या पिनड्रॉप शांततेमध्ये अचानक दरवाजावर टकटक ऐकू आली आणि सगळ्याचे कान टवकारले गेले अन् एका तरुणीची एन्ट्री झाली..... डॉ. ओवी जोशी... हसतमुख असणारी ही सत्ताविशीची डॉक्टर साहिबा एकदम वाक् चतुर आणि फॉरेन्सिक सायन्स एक्स्पर्ट.. चारचौघी पेक्षा जरा जास्तच उंची, घारे डोळे आणि हसताना एका गालावर पडणारी खळी... तिच्या हातात असणारा फायलींची गठ्ठा तिने टेबलावर ठेवला आणि हाशहुश करत स्वतःला आपल्या हाताने वारा घालत खुर्चीवर बसली. "अरे, डॉ. रे, तुम्ही आधीच आलात होय... मला वाटलं आपण सोबतच येऊ. मला ना जरा जुने रेकॉर्डस् शोधायला वेळ लागला ergo... मीटिंग ला सुध्दा यायला वेळ लागला."
"जुने रेकॉर्डस्??"
"पण अश्या सर्जिकल कटस् वाल्या बॉडिज मागच्या महिन्यापासूनच सापडत आहेत ना? मग जुने रेकॉर्डस्!!??" त्यांच्यात सगळयात नवीन असलेल्या मोहन आणि श्री ने एकदमच प्रश्न केला. आणि अजून एकदा पुन्हा दरवाजावर टकटक ऐकू आली. एका कॉन्स्टेबल ने १० - १२ थोड्या धुळीनें काळवंडलेल्या फाईल्स आणून ठेवल्या आणि निलय, ओवी आणि कॉ. दत्ता सावंत सोडल्यास बाकीच्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"सर, या एवढ्या जुन्या फाईल्स चा आणि आता घडणाऱ्या घटनांचा काय संबंध?" श्री ने उत्सुकता पूर्ण स्वरात निलय ला विचारणा केली... आणि कॉ. सावंत आणि ओवी सोडून बाकी सगळे डोळयात सारखाच प्रश्न घेऊन निलयकडे पाहू लागले. निलयने हलका सुस्कारा टाकत बोलायला सुरुवात केली, "कारण अशाच घटना १० वर्षांपुर्वी पण घडल्या होत्या. आणि तेंव्हा पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे केस बंद करावी लागली होती.. सो वी आर् आइदर लूकिंग ऍट सेम मर्डरर् ऑर वॉर्स वी आर् डीलींग विद् कॉपी कॅट किलर... अँड आय अम् नॉट श्योर् व्हॉट इज मोर् वर्स...!! आणि रे बोलल्याप्रमाणे, दीक्षा अन् सूमेर दोघे पण अक्षरशः आगीत तेल ओतयाच काम करतायत. तरी आपलं नशीब म्हणायचं त्यांना या जुन्या केसेस् चा अद्याप सुगावा लागला नाहीय.. नाहीतर मीडियाला चांगलंच खाद्य मिळेल..! असो, त्यावेळी माझ्या वडिलांनी म्हणजे इंस्प. अविनाश अभ्यंकर ही केस हाताळली होती, व्हीच डिडण्ट् एन्ड वेल फॉर हिम्..!!"
दोन क्षण डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन डोळ्यांत आलेले पाणी निग्रहाने परतवत निलय कन्टीन्यु करू लागला, "आणि जे काही क्लु, लिंक्स त्यांना मिळाल्या होत्या त्या या फाईल्स मध्ये आहेत.. सो डॉ. ओवी, व्हॉट डझ् दि पोस्टमॉरटम् रिपोर्ट्स सेज्??"निलय च्या बोलण्याने सगळेच विचारात पडले होते.
"कॉज् ऑफ डेथ इज् एक्सेसिव ब्लड लॉस् सीमिलर ऍज दॅट ऑफ ओल्ड केसेस् सो, काँक्लुजन...!!? डेथ बाय थाऊसंड कटस्!! जे कोणी हे मर्डरस् करतायत, ते लाईव्ह ऑर्गनस् काढून घेतायत. डॉ. रे निं त्यांच्या ऍनालिसिस नी हे कन्फर्म केलंय. आणि जे कोण हे करतायत ना, त्यांना ह्यूमन ऍनाटोमी बद्दल नक्कीच व्यवस्थित माहिती आहे.. आणि त्यांना नुसतं ऑर्गनस् हार्वेस्टिंग करून थांबायचं नाहीय."
डोळे गच्च मिटत ओवीने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतः च बोलणं कन्टीन्यु करत पुन्हा बोलू लागली, "आय स्वाबड् * दोज् कटस् आणि मास स्पेक* च्या रिझल्टस् मध्ये पॉली-डाय-मिथायल सायलॉक्सेन, लॅम्बस्किन, पॉली-आयसोप्रिन आणि प्रोपायलिन ग्लॅयकॉल चे पीक्स ओबसर्व केलेत व्हिच इंडिकेटस् काँडम कॉन्टे्ंटस् विथ ट्रेस अमाऊंट ऑफ ऍसिटाईल मोर्फिन, मॉर्फिन ग्लुकुरॉनाईड स्पेसिज् जे हेरॉईन मध्ये आढळतात.. सो मी असा निष्कर्ष काढला आहे, की काँडम मधून ड्रग तस्करी होत आहे.. ज्याला या बॉडीज् मुळे एक कॅरिअर मिळतोय... जे ओल्ड केसेस् च्या रिझल्ट्स सोबत कन्सिस्टंट आहेत.. हैवान... हे लोक हैवान आहेत खरचं.. आणि व्हीक्टम्स् मोस्टली बेघर, भिकारी, अनाथ म्हणजे थोडक्यात अश्या व्यक्ती ज्यांच्या गायब होण्याची दखल कोणी घेणार नाही असे आहेत.. कन्विनियंट फॉर देम्.., टॉक्स स्क्रीनिंग च्या ॲकॉर्डींग व्हीक्टम्स् ना सेडेटीव्ह इंजेक्ट केलं होतं, व्हीच इज ॲक्च्युअली नॉट् हाय एन्ड बट्, जे हेरॉईन स्ट्रेन स्वाब मध्ये सापडलं त्याचंच कमी कॉन्संट्रेशन वापरलयं, त्यामुळं सेडेटीव्ह च्या डिस्ट्रीब्युशन डाटा वापरून किलर्स ल ट्रेस करणं अवघड झालंय!!"डॉ. ओवीने मान नकारार्थी हलवत हळहळतं निलय च्या प्रश्नाला उत्तर दिलं.
"या खेपेस किलरस् नी त्यांचा गेम स्टेप अप केलाय, ऍकॉर्डिंग टू ओल्ड् रेकॉर्डस्, ड्रग स्मगलिंग इस् 'ईम्प्रोवमेंट' " ओवी ने सर्कॅस्टिकली ईम्प्रोवमेंट बोलताना एअर कोटस् करत आपलं बोलणं थांबवलं.आणि असा हा अमानुषपणा ऐकून कॉन्फरनस रूम मधल्या सगळ्यांनाच मनस्वी चीड आली.
"सो, इन शॉर्ट् अशी विकृती असलेली व्यक्ती आपण शोधायची आहे.. आणि या विकृतीला आळा घालण्यासाठी आपण लवकरात लवकर हालचाल करून अपराधिंना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशी व्यवस्था करायला हवीय.." मोहन ने जोशात हे कथन केले आणि रूम मधल्या सगळ्यांनीच संमतीदर्शक उच्चार काढत मोहन च्या वाक्याचे समर्थन केले.. "मी माझं नेटवर्क अक्टिव्हेट करतो आणि माहिती गोळा करायला सुरु करतो..." मोहन ने त्याचे बोलणे पूर्ण केले, आणि त्याचं वेळी श्री ची बोटे त्याच्या लॅपटॉप वर खडखड करत चालू लागली.
पीसी वर काम करता करता श्री बोलू लागला, "मी ज्या ज्या एरियात बॉडीज् सापडल्या तिथे तिथे कोणता डिजिटल क्लू मिळतोय का ते चेक करतो. थोडा वेळ लागेल कारण किलर ने जागा बऱ्यापैकी निर्मनुष्य रस्ता पाहून, सीसीटीव्ही कॅमेरे जिथे जास्त नसतील असं बघून डिस्पोस केल्यात... बट् आय'ल सी व्हॉट् आय् कॅन् डू...!!"
"तर मग आता आपण आपली मीटिंग इथचं थांबवूयात, मी पुन्हा एकदा जाऊन जुने सगळे क्राईम सिन पाहून येतो, लेट्स होप वी'ल् फायंड सम् क्लूज् टू रिच् धिस् बा**र्ड!! डिस् मिस..."
**********
*स्वाब - आपल्यापैकी बरेच जणांनी करोना टेस्ट केली असेल... तेंव्हा नेजल स्वाबिंग किंवा सलायव्हा स्वाबींग म्हणजे काय हे लक्षात आले असेल... कॉटन बड्स वापरून सँपल कलेक्शन करणं म्हणजे स्वाबिंग...
*मास स्पेक - मास स्पेक्ट्रोमेट्री... किंवा मास स्पेक्ट्रोमीटर...
इट्स अन् इन्स्ट्रुमेंट किंवा ऍनालिसिस टूल ...ज्यात सँपल मध्ये असणार्या मोलेक्युलस् चा मास टू चार्ज असा रेशो काढून कोणते कोणते कंपोनंट्स सँपल मध्ये प्रेसेंट आहेत, आणि त्यांचं मोलेक्युलार वेट काय आहे ते शोधता येतं.
व्वा. नवीन विषय. Lot of tech
व्वा. नवीन विषय. Lot of tech इन्फो. छान!
धन्यवाद @केशवकुल
धन्यवाद @केशवकुल
वाह. इंटरेस्टींग विषय…
वाह. इंटरेस्टींग विषय…
टेक्निकॅलिटीज् जरा सोप्या करून /मराठीत सांगता आल्या तर उत्तम. जनरली टेक्निकल विषयांमध्ये आपण इंग्रजीत विचार करतो त्यामुळे लिखाणही तसं होत असेल.
वाह. इंटरेस्टींग विषय…
वाह. इंटरेस्टींग विषय…
टेक्निकॅलिटीज् जरा सोप्या करून /मराठीत सांगता आल्या तर उत्तम. जनरली टेक्निकल विषयांमध्ये आपण इंग्रजीत विचार करतो त्यामुळे लिखाणही तसं होत असेल.
रोचक सुरुवात.. पुढील भागाच्या
रोचक सुरुवात.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
मी म्हणूनच तळटीप मध्ये
मी म्हणूनच तळटीप मध्ये टेक्निकल गोष्टी एक्सपलाईन केल्यात... आता काही काही केमिकल्स ची नावं मराठी मध्ये नाहीयत.. त्यामुळं थोडं जास्त टेक्निकल वाटलं असेल... I'll try to better in next part
@ MazeMan
धन्यवाद @ धनवन्ती
धन्यवाद @धनवन्ती
चांगलीच पकड घेतेय.. हिरोचे
कथा चांगलीच पकड घेतेय.. हिरोचे वडिल मूळ केस बघत होते आणि त्यात त्यांना काहीतरी झाले हा ट्विस्ट छान आहे, उत्कंठा वाढवणारा आहे.
फक्त संवाद मराठीत द्या, नाहीतर सरळ रोमनमध्ये लिहा. देवनागरीत लिहिलेले इंग्रजी संवाद मी वरवर वाचुन/ न वाचताच पुढे गेले, कठिण जातात वाचायला. बाकी टेकनिक बाबी ठिक आहेत, तुम्ही तळटिपा दिलेल्या आहेतच.
कथा एकदम रोचक वाटत आहे.
कथा एकदम रोचक वाटत आहे. पुढील भागांबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुढचे भाग नियमितपणे पोस्ट करा ही विनंती आहे.
उत्कंठा अती ताणली तर विरस होतो.
पुलेशु.
नक्की मी तुमच्या suggestion
नक्की मी तुमच्या suggestion वर प्रयत्न करेन @साधना
मी दर दोन दिवसांनी भाग पोस्ट
मी दर दोन दिवसांनी भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन @एस
मस्त आहे. पण ते मराठीतले
मस्त आहे. पण ते मराठीतले इंग्रजी शब्द वाचायला त्रास होतो आहे. पण त्याला लागू होतील असे मराठी शब्द फार बरे वाटणार नाहीत. त्या संज्ञा आहेत आणि तशाच वापरल्या तरच इफेक्टिव्ह वाटेल. कथेचा वेग चांगला आहे. तसाच ठेवा. शुभेच्छा.
धडाकेबाज सुरुवात आहे. वाचतेय
धडाकेबाज सुरुवात आहे. वाचतेय.
धन्यवाद @ मी चिन्मयी @मामी
धन्यवाद @ मी चिन्मयी @मामी
मी पुढचा पार्ट पोस्ट करायचा
मी पुढचा पार्ट पोस्ट करायचा प्रयत्न करतेय, पण पोस्ट होत नाहीय... काहीतरी एरर इन साईट असं दाखवत आहे... कोणाला कल्पना आहे का की कसं पोस्ट करायचं?? मी मघापासून ४ - ५ वेळा try करून झालंय
ईमोजी असतील लेखात तर त्या
ईमोजी असतील लेखात तर त्या काढा.
@ उपाशी बोका नाहियत ईमोजी...
@ उपाशी बोका डन ...
थॅन्क्स
संपादकाने लेखन स्वीकारले नाही
संपादकाने लेखन स्वीकारले नाही हे ऐकले होते. आता मायबोलीवर पण कुणि संपादक आहेत की काय?
"तुमचे लेखन चांगले नाही, म्हणून छापता येणार नाही" असे काहीतरी.
तसे असेल तर मायबोलीवरून ९०टक्क्याहून जास्त लिखाण काढून टाकावे लागेल!
@नन्द्या७५,
@नन्द्या७५,
अर्र.. मला इथे तो डोळ्यातून पाणी येईल इतकं हसत असलेला ईमोजी टाकायचा होता...
पण तो ईमोजी टाकला तर पोस्ट होत नाही...
आता असा संपादक असू नये म्हणजे मिळवली
इमॅजिन लाफिंग ईमोजी
सुंदर सुरुवात झालेली आहे.
सुंदर सुरुवात झालेली आहे. रोमांचक कथा.
सुंदर सुरुवात झालेली आहे.
सुंदर सुरुवात झालेली आहे. रोमांचक कथा.>>>>
धन्यवाद सामो