कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्वास ठेवावा का who वर.
स्वतःचे इन्कम सोर्स नसणाऱ्या संस्थांची हालत खूप विचित्र असते

पांढऱ्या शेपटीचे हरीण करोनाच्या विषाणूंचा भविष्यातील प्राणीजन्य साठा होऊ शकतो.
त्याच्या शरीरात या विषाणूची अजून उत्क्रांती होऊ शकते.

एका अभ्यासाचा निष्कर्ष : https://www.pnas.org/doi/10.1073/pnas.2215067120

सर्व अंदाज फसत आहेत, दावे फसत आहेत.
चीन मधील स्थिती ची रक्त रणजित खोट्या बातम्या देवून जगाला भीती मध्ये ठेवण्याचा प्रयत्न फसला आहे.
Covid ची लाट आलीच नाही.
प्लेग पासून सर्व विषाणू जिवाणू चे आजार आता होत नाहीत म्हणजे ये विषाणू,जिवाणू नष्ट झाले आहेत .
हे च अज्ञान ठरवून पसरवले जाते.
ते आज पण आहेत .
कोणत्या तरी प्राण्यांच्या शरीरात.
फक्त त्या प्राण्यांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही.
तसा covid विषाणू पण असणार.
त्या मध्ये नवीन असे काही नाही

माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून).

सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे.

निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात:

१. टोकाचे हवामान बदल
२. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप.
अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.

प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल..

या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत.

https://www.nature.com/articles/s41586-022-05506-2

https://onlinelibrary.wiley.com/doi/epdf/10.1111/ele.14007

अमेरिकेच्या department of energy यांनी कोविड विषाणू लॅब मध्ये बनवला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. इतके पुरावे समोर येऊनही चायना व WHO chief याना कोणीही जाब विचारत नाही.
त्यात अलीकडे तरुण व्यक्तीला विशेषतः पुरुषाला अचानक अटॅक/अरेस्ट होऊन मृत्यू अशा बातम्या खूप समोर येतात. त्यात मागे तरुण पत्नी, लहान मुलं असतील तर आपला संबंध नसला तरी अस्वस्थ वाटत राहतं. दीर्घ,सुप्त कोविडचा याच्याशी संबंध असेल का? एकूण सर्व प्रकरण अजूनही गूढच आहे.

**दीर्घ,सुप्त कोविडचा याच्याशी संबंध असेल का?
>>
या आजाराच्या हृदयावर होणाऱ्या घातक परिणामाबद्दल संशोधन अद्याप पूर्ण झालेले नाही.

काही रुग्णांमध्ये हृदयस्नायू पेशींचा अतिरिक्त दाह तर काही जणांमध्ये हृदयताल बिघाड दिसून येत आहेत.

या विषाणूमुळे विशेषतः हृदयपेशींच्या डीएनएला मूलभूत स्वरूपाची इजा पोचते असे एक गृहीतक मांडले गेले आहे. यावर अधिक संशोधन चालू आहे.

covid-19 उपचारांच्या यादीत आधुनिक वैद्यकातील अजून एक औषधाची भर पडली आहे. ते औषध म्हणजे Mycophenolate.
हे औषध पूर्वीपासूनच विविध ऑटो इम्युन प्रकारच्या (मूत्रपिंड ) आजारांसाठी तसेच अवयव प्रत्यारोपणानंतर सुरक्षितता म्हणून दिले जाते. या औषधाचे कोविड रुग्णांवरील संशोधन पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात झालेले आहे. संबंधित संशोधनाचा निष्कर्ष चांगला आहे. या औषधामुळे संबंधित रुग्णांचे रुग्णालयातील वास्तव्यदिन कमी झाले तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी राहिले.

या संशोधनाचा शोधनिबंध 9 फेब्रुवारी 2023 रोजी Lancet मध्ये प्रकाशित झालेला आहे
https://www.thelancet.com/journals/lansea/article/PIIS2772-3682(23)00014-8/fulltext#:~:text=Mycophenolate%20was%20well%20tolerated%20during,continue%20mycophenolate%20during%20COVID%2D19.

सदर औषध गोळी स्वरूपात द्यायचे असून त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे:
(https://www.indiamart.com/proddetail/mycophenolate-mofetil-tablets-ip-50...)

>>>त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे>>> छान.
चांगली माहिती.

धडधाकट असलेल्या व्यक्तींना अचानक आलेल्या हार्ट अ‍ॅटॅकचा संबंध काही लोक कोव्हिड लशीशी लावत आहेत. याबद्दल संशोधनही सुरू आहे.

11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 या आजाराची आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्याला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली.

काल अखेरीस ढोबळमानाने जागतिक परिस्थिती अशी आहे :
एकूण संसर्ग झालेल्या व्यक्ती : 68 कोटी
आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती : 65 कोटी
कोविड संबंधित मृत्यू : 68 लाख

https://www.worldometers.info/coronavirus/

कामाच्या ठिकाणी धडाधड लोक आजारी पडत आहेत. लवकर बरे होत नाहीत. एक आठवड्यापूर्वीच शंका आली होती की हे त्याच दैत्याचे नवीन रूप नाही ना.

https://m.timesofindia.com/city/pune/xbb-1-16-likely-behind-covid-spike-experts/articleshow/98643729.cms

ओमीक्रोन प्रमाणे हा अवतार पण फार घातक नसावा ही आशा.
H3N2 मध्ये निमोनियाची शक्यता जास्त असते का?

H3N2 >>>>
या प्रकारामुळे होणाऱ्या न्यूमोनियाचे अभ्यास तसे मर्यादित झालेले आहेत. या प्रकारात फुफ्फुसातील दाहप्रक्रिया अधिक प्रमाणात होते असे काहींना आढळले, परंतु याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

वृद्ध व्यक्ती, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्ती आणि गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीतील स्त्रियांना याचा संसर्ग झाल्यास आजार तीव्र होऊ शकतो.

हे काही नवीन नाही.
हा आजार साथीच्या आजारात बदलणार नाही.
दोन वर्षाच्या आतील मुल,६५ पुढचे ते पण सर्व नाहीत.
ज्यांना अनेक आजार आहेत असे.
गरोदर स्त्रिया.
ह्यांनी थोडी काळजी घ्यावी.
बाकी घबरण्या सारखे काही नाही

कोविडच्या दीर्घकालीन परिणामांमध्ये चेतासंस्थेचे व दृष्टीचे काही बिघाड दिसून येत आहेत.
बऱ्याच जणांमध्ये स्मरणशक्ती, अवधान आणि एकाग्रतेच्या समस्या आढळल्या आहेत.

काही मोजक्या रुग्णांमध्ये prosopagnosia या नावाची एक समस्या दिसून आली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीला तिचे कुटुंबीय किंवा नेहमीच्या परिचितांचे चेहरे ओळखू येत नाहीत.
(prosōpon = face + agnōsia = ignorance.)

अशी समस्या असलेल्या एका 28 वर्षीय तरुणीसंबंधी एक शोधनिबंध इथे प्रकाशित झालेला आहे:

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0010945223000448?via%...

एक नवा शब्द
“Novids” = Never COVID

ज्या व्यक्ती विषाणू संसर्गजन्य वातावरणात बराच काळ राहूनही पूर्णपणे या संसर्गापासून मुक्त राहिल्या त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातोय.
त्यांच्यासंबंधी विशेष अभ्यास चालू आहे :
https://www.healthline.com/health-news/is-it-luck-or-something-else-how-...

नॉर्मल आजार झाला आहे आता covid.
मानवी इतिहासातील रोगाच्या साथी ह्यांचा इतिहास आणि निसर्गाचा नियम
ह्या नुसार covid ला jababdar व्हायरस कमजोर झाला आहे.
काही त्याला गंभीर पने घेण्याची गरज नाही

भारतीय मीडिया ती पण स्वतःचे अस्तित्व नसणारे गुलाम ब्रँड chya मीडिया चा हवाला देवून मत.
बनवू नका..
स्व बुध्दी असणारा तज्ञ व्यक्ती चे मत असेल तर च स्वीकारा.
Propaganda चालवणे हे एकमेव काम भारतीय मीडिया करते.
आणि दुवा दिला आहे ..
सरकारी गुलाम अडाणी chya NDTV च
हास्यास्पद

कोविडमुळे बाधितांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम झाल्यास आढळले आहे.

या संदर्भात पुण्यातील IISER या संस्थेतील डॉ. निक्सन अब्राहम यांच्या नेतृत्वाखालील चमू आणि बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त कार्याने एक महत्त्वाचा संशोधन प्रकल्प पार पडला.

लक्षणविरहित असणाऱ्या बाधित 80 टक्के लोकांमध्ये वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आढळला. या संशोधनादरम्यान वरील चमूने वासक्षमता मोजण्याचे olfactometer हे उपकरण देखील विकसित केले.

https://www.iiserpune.ac.in/news/post/persistent-effects-on-the-sense-of...

https://twitter.com/hashtag/CRNEUR?src=hashtag_click

https://m.economictimes.com/news/india/icmr-report-on-sudden-heart-attacks-to-come-in-2-months-health-minister-mansukh-mandaviya/articleshow/99096069.cms

वाढलेले हृदयरोगाचे रुग्ण आणि कोविड यांचा काही संबंध आहे का ह्याचा रिपोर्ट २ महिन्यात येईल.

या विषाणूचे हृदयपेशी आणि मज्जातंतू यांच्यावर झालेले परिणाम अभ्यासण्यासाठी दीर्घकाळ संशोधन चालेल असे दिसते आहे.

या विषाणूचा नवा प्रकार याचा अर्थ हा आहे:
Arcturus = Omicron subvariant XBB.1.16

गेले काही महिने तो अमेरिकेत आहे आणि आता भारतात सुद्धा बऱ्यापैकी पसरला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये डोळे खाजणे आणि चिकट होणे ही लक्षणे सध्या वाढलेली दिसतात.
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/covid-cases-on-rise-among...

अद्याप त्याला आरोग्य संघटनांनी गंभीर म्हटलेले नाही, परंतु त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असा तो आहे. लहान मुले व वृद्ध व्याधीग्रस्तांची विशेष काळजी घेणे एवढे आपण करू शकतो.

कहर ,धोक्याची घंटा.
हे शब्द च खूप चुकीचे आहेत.
किती लोक नं गंभीर लक्षण आहेत,किती लोक icu मध्ये आहेत.
किती लोक ना हॉस्पिटल मध्ये admit होण्याची गरज लागत आहे.
ह्या वर आजारच गंभीर पना अवलंबून आहे..

आता उपचार आहेत.
हवेतून पसरणारा आजार असा पण रोखता येत नाही.
मग लोकांना भीती दाखवण्यात काही ही अर्थ नाही.

मुद्दा बरोबर !
विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा प्रकार आला ती सुरुवातीला तो अधिक संसर्गजन्य असतोच. त्यामुळे घबराट पसरवण्याचे कारण नाही.
लक्षणे सौम्य राहिली तर लोक लवकर बरे सुद्धा होत असतात.

ज्याना त्रास होतोय त्यांनी नेहमीची दक्षता घ्यायची इतकेच.

तरुणांना येणारा heart अटॅक ही खरी तर गंभीर समस्या आहे.
त्याचे प्रमाण हल्ली खुप च वाढले आहे.
अगदी 14/15 वर्षाच्या मुलाना पण heart attacks yet आहे.
ही खरेच गंभीर समस्या आहे.
कारणे काय हे अजून पण स्पष्ट नाही.
त्याच्या कडे who नी लक्ष दिले पाहिजे

त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये डोळे खाजणे आणि चिकट होणे ही लक्षणे सध्या वाढलेली दिसतात.>> माझ्या 4 वर्षाच्या मुलाला सद्ध्या हीच लक्षणे आहेत. 104/105 पर्यंत ताप येत होता नंतर सर्दी आणि खोकला सुरु झाला. तापासोबतच डोळ्यांतून चिकट द्रव यायला लागला. आता पण डोळे लाल होतात मध्येच आणि सतत पाणी येत राहते.
पण फक्त लहान मुलांनाच त्रास होत नसावा कारण आधी माझ्या नवऱ्याला सेम त्रास होत होता फक्त ताप नाही आला त्याला. नंतर मला एकदाच ताप आला आणि आता खूप खोकला सुरु आहे. मुलाला तर खूपच त्रास होतोय. त्याच्या डाॅक्टरांनी व्हायरल आहे म्हणूनच औषधं दिलीत.
हे वाचल्यानंतर आता मुलाची खूपच काळजी वाटू लागली आहे.

निधी
डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे सर्व औषधोपचार करा. पुरेशी विश्रांती घ्यायची. घाबरून जायचे काही कारण नाही.

डोळ्यांची लक्षणे ही करोना किंवा अन्य विषाणू अशा दोघांपैकी कशाहीमुळे असू शकतात. डॉक्टरांनी सांगितले असेल तर चाचणी करून बघायची.
गोष्टी धीराने घ्यायच्या
शुभेच्छा !

कुमार sir.
तुमच्या लक्षात आले असेल लोक कसा विचार करतात.
सर्दी,खोकला, ताप,डोळ्यातून घान येणे .
हे सर्व सामान्य लक्षण अनेक प्रकारच्या इन्फेक्शन ची आहेत.
पण त्याचा संबंध लोक कोरोना शी जोडतात.
मीडिया मधील अंत रंजीत बातम्या मुळे.
छातीत दुखायला लागले की अटॅक येईल का?
कुठे गाठ दिसली की कॅन्सर झाला काय?
किती तरी गाठी निर्माण होतात आणि त्या नष्ट पण होतात.
लक्ष नाही दिले तर माहीत पण पडणार नाही.
शरीरात असले प्रकार रोज घडतात ये रूटीन आहेत.
असा विचार लोक करत च नाहीत

धन्यवाद कुमार सर.
त्याच्या डाॅक्टरांनी कसल्याही चाचण्या सांगितल्या नाहीत. व्हायरल आहे, पाच ते सात दिवसांत कमी होईल म्हणाले. लिक्विड भरपूर द्यायला सांगितलं आहे. तेच फाॅलो करतोय आम्ही.

Pages