
शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).
हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.
अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.
सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.
* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:
* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.
उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.
2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्तदाबवाढ आणि स्नायूदुखी.
नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :
१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.
आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.
नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................
Dr Danny Altmann या
Dr Danny Altmann या नामांकित रोगप्रतिबंधक तज्ञ डॉक्टरांनी नुकतेच The Long COVID Handbook
हे पुस्तक लिहिलेले आहे
(https://www.amazon.com/Long-Covid-Handbook-Gez-Medinger/dp/1529900123).
त्यांच्या मते आज जगभरात सुमारे १० कोटी लोक दीर्घकालीन कोविडने ग्रस्त आहेत.
एकंदरीत पाहता हा नव्याने निर्माण झालेला बोजा समाजातील पूर्वीच्या हृदयविकार किंवा कर्करोगाच्या बोजा इतकाच समान आहे.
माहितीकरिता आभार डॉ !
माहितीकरिता आभार डॉ !
https://news.un.org/en/story
https://news.un.org/en/story/2023/05/1136367
WHO chief declares end to COVID-19 as a global health emergency
ठीक. म्हणजे आरोग्य आणीबाणी
ठीक. म्हणजे आरोग्य आणीबाणी आता संपली आहे.
भारतीय मीडिया तर रोज covid
भारतीय मीडिया तर रोज covid विषयी बातम्या देत असते
Covid गंभीर रूप घेत आहे असे पण तारे तोडत असते
सध्या फक्त आणीबाणीची
सध्या फक्त आणीबाणीची परिस्थिती संपली आहे. या आजाराने लोक अजून काही काळ बाधित होतच राहतील.
महासाथ समाप्तीची घोषणा करण्यासाठी काही निकष असतात. ते पूर्ण व्हायला अजून बराच वेळ जावा लागेल.
Covid १९
Covid १९
2023, ला संपला हे एकदाचे जाहीर झाले.
जवळ जवळ साडे तीन वर्ष नंतर.
इथे रोगाची सुरुवात ते आज ची स्थिती ह्या वर विविध लोकांनी, संस्थेनं, डॉक्टर नी ,तज्ञ लोकांनी व्यक्त केलेली मत आहेत.
आता त्यांचे अंदाज त्या वेळेस खरे निघाले का?,
साथ नष्ट होण्याचे श्रेय कोणाला दिले जावू शकते.
ह्याची पण सविस्तर माहीत प्रसार माध्यमातील बातम्यात असेल.
त्याचा उहापोह आता करायला हरकत नाही.
पहिल्या पासून सर्व घटनेचे साक्षीदार आपण सर्व आहोत च
>>>>Covid १९
>>>>Covid १९
2023, ला संपला हे एकदाचे जाहीर झाले. >>>
वर मी सांगितल्याप्रमाणे कृपया ही गल्लत करू नका.
" संपलेला " नाही. फक्त आणीबाणीची किंवा गंभीर परिस्थिती आता नाही.
जेव्हा महासाथ समाप्तीची घोषणा होईल त्यानंतर सगळा ऊहापोह करता येईल
तो दुवा पाहावा :
तो दुवा पाहावा :
The head of the UN World Health Organization (WHO) has declared “with great hope” an end to COVID-19 as a public health emergency, stressing that it does not mean the disease is no longer a global threat.
Omicron sub-variant XBB2
Omicron sub-variant XBB2.3
https://news-rediff-com.cdn.ampproject.org/v/news.rediff.com/amp/comment...
कोविड झालेल्या काही रुग्णांचा
कोविड झालेल्या काही रुग्णांचा आजार दीर्घकालीन स्वरूपाचा (long) झालेला दिसतो. त्या दृष्टिकोनातून चार महत्त्वाचे संशोधन प्रकल्प सध्या चालू आहेत. त्यांची थोडक्यात माहिती :
१. विषाणू दीर्घकाळ शरीरात टिकून राहिल्याने प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होत जाते. यावर उपाय म्हणून सध्याचे Paxlovid हे औषध दीर्घकाळ किती देता येईल यासंबंधीचे संशोधन.
२. आकलन आणि स्मरणशक्तीवर झालेले परिणाम भरून काढण्यासाठी BrainHQ या स्वरूपाचे एक आंतरजालीय प्रशिक्षण आहे.
३. दिवसा नको इतकी झोप येणे ही देखील एक समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून मेलाटोनिन आणि प्रकाश-उपचार यासंबंधीचे संशोधन.
४. हृदयावर झालेले विपरीत परिणाम - जसे की, जलद किंवा अनियमित नाडीचे ठोके, चक्कर येणे व खूप थकल्यासारखे वाटणे. यावर उपाय म्हणून हृदय दुर्बलतेवरील पूर्वीच्या काही औषधांचा वापर.
कोविड आणि हृदयविकार यासंबंधी
कोविड आणि हृदयविकार यासंबंधी ट्रॉपोनिन आणि अन्य एका धाग्यावर प्रश्न विचारला गेला आहे. त्या संदर्भात काही माहिती :
तीव्र कोविड झालेले जे रुग्ण रुग्णालयात दाखल झालेले होते अशांच्या बाबतीत, ते आजारातून बरे झाल्यानंतर काही हृदयसमस्या आढळल्या आहेत.
१. सुमारे 25 टक्के लोकांमध्ये हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी झाला (ischemia). या लोकांमध्ये पूर्वी या आजाराचा कोणताही इतिहास नव्हता.
२. हृदयस्नायूंचा दाह आणि ट्रॉपोनिन पातळीत वाढ.
३. हृदयताल बिघाड
४. हृदय दुर्बलता (failure) .
हे नक्की का झाले असावे यावरील संशोधन मात्र अद्याप अपुरे आहे.
दोन गृहीतके मांडली गेली आहेत :
१. कोविड विषाणूमुळे जो दाह झाला त्याचा थेट हृदयस्नायूंवर झालेला परिणाम
२. कोविड होण्यापूर्वी हृदयाला इजा असू शकेल परंतु ती वरुन दिसत/ समजत नव्हती. आता कोविडमुळे मूळचीच इजा उजेडात आली (activation).
तूर्तास हा युरोपीय संदर्भ :
https://academic.oup.com/eurheartj/article/42/19/1866/6140994?login=false
भविष्यात आपल्याला इतर देश आणि भारतातील माहिती समजावी अशी अपेक्षा आहे.
कोविड आणि हृदयविकार यासंबंधी
कोविड आणि हृदयविकार यासंबंधी ट्रॉपोनिन आणि अन्य एका धाग्यावर प्रश्न विचारला गेला आहे. त्या संदर्भात काही माहिती : >>> खूपच अभ्यासपूर्ण आणि महत्वाचे संशोधन इथे शेअर केल्याबद्दल डाॅ. कुमार यांना मनःपूर्वक धन्यवाद.
___/\___
विषाणूच्या सध्याच्या नव्या
विषाणूच्या सध्याच्या नव्या उपप्रकाराचे शास्त्रीय नाव EG.5 हे असून Eris हे टोपणनाव आहे. मुळात तो omicron कुटुंबाचाच सदस्य आहे. यातल्या पूर्वीच्या प्रकारापेक्षा यात फक्त एकच जनुकीय बदल जास्ती आहे. डब्ल्यूएचओनुसार या उपप्रकाराचा प्रसार वाढतो आहे परंतु त्याने होणारा आजार सौम्य स्वरूपाचा आहे. आता तरी घाबरायचे काही कारण नाही.
नेहमीची काळजी घेतलेली पुरे.
https://www.who.int/docs/default-source/coronaviruse/09082023eg.5_ire_fi...
Currently sick with Eris
Currently sick with Eris COVID varient.
अमा काळजी घ्या...लवकर बऱ्या
अमा काळजी घ्या...लवकर बऱ्या व्हा..
असा अचानक कसा प्रादुर्भाव झाला तुम्हाला कोविड चा?
कोविड चा नवा वेरिअंट आला आहे
कोविड चा नवा वेरिअंट आला आहे एरिस. ए आर आइ एस बहु तेक. तर तो मला झाला आहे. परवा बुधवारी हॉस्पिटल मध्ये जाउन एक इंजेक्षन
घ्यायचे होते. कॅन्सर चे जे औ ष ध आहे ते रोज घ्यायचे असते पण त्यामुळे सेल काउं ट कमी कमी होतो. तो जाग्याव र राहावा म्हणून हे इंजेक्ष न दर आठव्ड्यात एक. ते काम बरोबर फिट झाले. दहा मिनि टा त. पण तेथील बराच स्टाफ ताप सलेला होता व डोके दुखी सर्दी खोकला ची लक्षणे दा खवत होता. मी बुधवारी गेले होते. गुरुवार पासून खालील लक्षणे आली.
१) रनी नोज सारखे नाक गळ णे.
२) संध्याकाळ परएन्त ताप आला. ९९.७ पासून १००.९ पुढे दोन दिवस १०१, १०२ १०३ ( शनिवारी काल) आता परत १००.९ ला आला आज सकाळी.
३) वासाचे सेन्सेशन जाणे हे झाले असावे कारन मी गुरुवारी परफ युम लावले होते त्याचा वास कमी झालेला वाटला.
४) भूक एकदम कमी होणे व तों डाची चव आजिबात जाणे. शुक्रवारी डब्यात साखी नेलेली पण अगदी कागदा सारखीच लागली. मी शुक्रवार पिझा नाइट म्हणून पिझा मागवला व उद्या काही स्वय्पाक जमणार नाही म्हणून एक जास्तिचा मागवला. ऑफिसात मायक्रो करुन घेइन म्हणून. १४ तारखेला कंपनीत सुट्टी आहे म्हणून शनिवारी वर्किन्ग होते. घरी बसून काय करायचे म्हणून गेले. माझी रूम एकदम कोपर्यात व आयसोलेटेड आहे. कोणी येत नाही. कोणाला इन्फेशन द्यायला. थोडे थोडे झोपत काम केले तीन परेन्त. पण मग अगदी बसवेना उठवेना. पण आटो करुन घरी आले. वेदर खूपच छान होती. प्रेम ळ उन्हे. मध्येच् ढगाळ वातावर्ण.
४) कुत्रा फिरवून मग पांघ रूण घेउन बसले पण ताप कमी होउ नाही. १०३ ला पोहोचला. अ एक झोप काढ ली. कुत्र्याची नखे कापायला जायचे होते पण डॉक्टरला इन्फेक्षन नको म्हनून तिला मेसेज केला. मग डोलो घेउन पॉड कास्ट ऐकत पडले. एनर्जी एकदम कमी झालेली.
५) भूक कमी कमी होते. बेन्ने डोसा व कांचिपुरम इडली मागवली पण अर्धीच खाल्ली. तिखट तोंडाला लागू देत नाही आहे.
६) आज थकवा कमी आहे पण आता मास्क सॅनिटायझर, ओक्सिमि टर घेउन बसले आहे. आम्ही नेहमी ड्रॉइन्ग रूम मध्ये झोपतो पण काल बेड्रूम मध्ये मुक्काम हलवला आहे. गर्ज पडेल तेवढेच बाहेर जाइन.
७) ताप कमी झाला की हॅकिन्ग कफ सुरू होतो हे पन झाले आज सकाळी.
हे सर्व लक्षणे ट्विटर वर द लिव्हर डॉक ह्यांनी लिहिली आहेत ती तंतोतंत बरोबर दिसली.
१६ परेन्त ठीक व्हावे. १७ ला एक हलाल ऑडिट आहे. झिन्दाबाद. माझी दोन व्हॅक्सिनेशन झालेली आहेत कोविडची. ऑफिसात काल नेलेला पिझा खाल्लाच नाही. भाहेर एसी चालू होते व नवीन महिना असल्याने खूप एंप्लॉइ ज गावोगावुन आले होते. ( हे दुसरे छोटे ऑफिस आहे. )
त्यांना इन्फेक्षन नको म्हणून व शक्ती च नव्हती, भूकच मे लेली म्हणून तसाच परत आणला व आज टाकून दिला. फार्म हाउस पिझा बरा असतो पण डोमिनोजचा.
अपडेट.
आज वीकांतासाठी लेक घरी आल्याने ती ब्रेफा बनवून देणार आहे. मला खरेतर आत्ता इतके गळून गेल्यासारखे वाटत नाही पण काही केले नाही तर मुलांना गिल्टी वाट्ते पूअर थिंग्ज. म्हणून तिला करायला दिला आहे. दोन तीन दिवस एकदम बोअर कंफर्ट फूड. ब्रेड बटर. तू प मीठ भात.
९) सकाळी व काल रात्री घसा दुखत होता. माझे टॉन्सिलचे ऑपरेशन झाले आहे पण काही उरलेल्या ग्रंथी असतील त्या दुखत होत्या ते आता कमी आले आहे.
थोडी बहुत झोपून गेम पण खेळली.
१०) पहिल्या दोन दिवसात कळा
१०) पहिल्या दोन दिवसात कळा येउन डोके पण दुखते. लक्षणे मुदाम नोंदवून ठेवली. इग्नोअर करू नका दोन तीन दिवस आराम करा घरात.
अमा, काळजी घ्या.लवकर ठणठणीत
अमा, काळजी घ्या.लवकर ठणठणीत व्हा.लक्षणं इतक्या डिटेल मध्ये लिहिल्याबद्दल(तेही स्वतःला विश्रांती ची गरज असताना) धन्यवाद.
मी_अनु +१. लौकर बरे होण्यास
मी_अनु +१. लौकर बरे होण्यास शुभेच्छा अमा.
अमा, काळजी घ्या. लौकर बरे
अमा, काळजी घ्या. लौकर बरे वाटो.
Hi one more symptom is
Hi one more symptom is sneezing.
Just read on Instagram that new COVID variant eris cases and related hospitalizations are up in New York significantly. 824 new cases per day. Currently temperature down to 99.9 and having tomato soup. Knorr che. Ghari cup noodles soup packets theva. Lahan mulancha food stock Kara thode bahut. In case you fall sick and have on energy to shop. I was walking the dog on the ground floor and everything wa so quiet I remembered the 2020 days. Listen to that that song by PSY of gangnam style fame to get over COVID blues. It is produced by our own SUGA.
अमा, लवकर बरे वाटण्यासाठी
अमा, लवकर बरे वाटण्यासाठी शुभेच्छा! पुन्हा मास्क वापरायचे की काय ?
अमा, काळजी घ्या लवकर बऱ्या
अमा, काळजी घ्या लवकर बऱ्या व्हा
अमा टेक केअर, लवकर बरं वाटू
अमा टेक केअर, लवकर बरं वाटू दे तुम्हाला.
मी अजुनही मास्क वापरते, मी तशी बाहेर कमीच जाते पण कोपऱ्यावर काही आणायला गेले तरी लावते मास्क. हल्लीच ठरवलं आता आपण नको वापरायला पण हे वरचे वाचून, वापरूया अजून असं ठरवलं.
अमा हा नवीन कोविड कालपासून
अमा हा नवीन कोविड कालपासून मला पण झालाय बहुतेक. सगळी लक्षणं सेम आहेत. तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेतली का यावर. मी azi Ani pantop गोळी खाल्ले आणि paracitimol गोळी खातोय. कालच्या तुलनेत आज बरं वाटतंय. मेडिकल ट्रीटमेंट सध्या नको वाटते
Hi bokalat DOLO . I am taking
Hi bokalat DOLO . I am taking dolo
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/lifestyle/health-tips/eris-corona-variant-hldc-...
डॉ. प्रदीप आवटे (वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र शासन) म्हणतात :
कोविडचे हे नवे एरिस बाळ मात्र अजून तरी गुणी बाळासारखे शांत आहे, हे नक्की!
ओके अमा.
ओके अमा.
हाय आज ताप ९९.८ . व शक्ती
हाय आज ताप ९९.८ . व शक्ती थोडी बहुत परत आलेली आहे. नाक सुकले आहे. लेक ऑफिसला व मी घरी अशी जनरेशनल चेंज परिस्थिती आहे.
सकाळी गोड शिरा केला एक वाटीचा. त्यातल्या वेलदोड्याची चव कळली.
काल रात्री साडेआठ ला डो लो घेउन व व्हिक्स लाउन मोजे स्वेटर हेडस्कार्फ क्विल्ट करुन झोपले व साडेदहाला एकदम घामाघूम व्हायला झाले. ताप कमी आलेला पण तो अपडाउन होतो आहे. असे पण होते म्हणून लिहिले. आता दोन दिवस कंफर्ट फूड कंफर्ट मुव्हीज बघून जमील तितकी शक्ती गोळा करणार. आज हपिसातून साडे आठलाच फोन आलेला पण कार्पो रेट बंद व फॅक्टरी चालू अशी परिस्थिती आहे. आज जाणे म्हणजे लोकांचा जीव धोक्यात टाकणे आहे. घरीच बसा व बरे व्हा.
Pages