४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

"कोणी आता तो खरा बॅडअ‍ॅस झाला म्हणतोय.". अमितव, Rofl

मला एवढेच म्हणायचे आहे की जानेवारी ६ ला याने जो राडा घडवुन आणला व जॉर्जिया मधे याने निवडणुकीच्या निकालात जी ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला ते जास्त प्रुव्हेबल आहे व क्रिमिनल आहे. या न्युयॉर्क खटल्यात तो सही सलामत बाहेर पडु शकतो.

फारेंडने नमुद केलेले ट्रंपचे एक एक क्रिमिनल खटले वाचुन मला ट्रंप शिशुपालासारखा वाटु लगला आहे Proud

"कोणी आता तो खरा बॅडअ‍ॅस झाला म्हणतोय.". >> Lol

मला एवढेच म्हणायचे आहे की जानेवारी ६ ला याने जो राडा घडवुन आणला व जॉर्जिया मधे याने निवडणुकीच्या निकालात जी ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला ते जास्त प्रुव्हेबल आहे व क्रिमिनल आहे. >> जॉर्जिया मधल्या लोकांना काय वाटते आहे असे वाटतेय तुला मुकुंद ? Wink

“विल दीज बराज ऑफ केसेस होल्ड कँडल टु डिक्लायनिंग इकानमि, रायझिंग इन्फ्लेशन, डॉलर लूझिंग इन्फ्ल्युंस एट्सेट्रा, इन '२४ इलेक्शन्स?”

राज, खर सांगु? या सगळ्यांपेक्षा मला २४ इलेक्शन मधे उभे असलेले सगळे म्हातारे उमेदवार बघुन जास्त काळजी वाटते. माझ्या मते आपल्याला नविन उमेदीचे तरुण व ताज्या विचारांचे उमेदवार जरुरीचे आहेत.

तेच तेच घिस्यापिट्या विचारांचे व तेच तेच टुमणे लावणारे( दोन्ही पक्षांचे) उमेदवार बघुन निराशा आली आहे. दोन्ही पक्षातल्या मॉडरेट्सना एकत्र घेउन देशाला खर्‍या एकविसाव्या शतकात व भविष्यात घेउन जाउ शकणार्‍या उमेद वारांची अमेरिकेला खरी गरज आहे. नुसत्याच “ मेक अमेरिका ग्रेट अगेन“ असल्या तद्दन पोकळ घोषणबाजी करणार्‍या किंवा “ एक्सट्रिम वोक“ टाइप भोंगळ उमेदवारांना आता खरच बाद केले पाहीजे. एक्स्ट्रिम कंझर्व्हेटिझम व एक्स्ट्रिम लिबरलिझम च्या बावळट रस्सिखेचात कॉमन अमेरिकन पिचला गेला आहे. तिकडे चायना धुर्तपणे अमेरिका या अंतर्गत सामाजीक भांडाभांडीत गुंतुन बसली आहे याचा पुरेपुर फायदा उठ्वुन जगात इकॉनॉमिकली आपले स्थान बळकट करत आहे. “ मेक अमेरिका ग्रेट अगेन” किंवा एक्स्ट्रिम वोकीझम/ लिबरलिझमच्या नादाला लागुन (बरेचसे) मुर्ख अमेरिकन्स ग्लोबल प्रॉस्पेरीटीच्या व हायर एज्युकेशन मधे मागे पडत चालले आहेत.

टु मी दॅट इज मोर कन्सर्नींग!

फारेंडने नमुद केलेले ट्रंपचे एक एक क्रिमिनल खटले वाचुन मला ट्रंप शिशुपालासारखा वाटु लगला आहे >>> Happy मुकुंद, you are not alone Happy अमितने यावर तीच अ‍ॅनॉलॉजी वापरून लेख लिहीला होता
https://www.maayboli.com/node/59602

मी म्हणूनच म्हणल की हे सगळे काही DNC म्यानेज करत नाहीये त्यामुळे क्रम हवा तसा येणार नाही. >>> +१

तिकडे फॉक्स वि डॉमिनियन केस डिसमिस करायला कोर्टाने नकार दिला व केस आता ज्युरींसमोर चालेल. हे कोर्ट म्हणजे डेलावेअर स्टेट मधले जेथे खटला पहिला दाखल होतो ते कोर्ट. इथे आता ही केस उभी राहील. यानंतरची पायरी म्हणजे डेलावेअर सुप्रीम कोर्ट.

फॉक्सचे प्रयत्न इतके दिवस ही केसच उभी राहू नये याकरता होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते जे काही बकत होते ते सगळे "ओपिनियन" म्हणून "फर्स्ट अमेण्डमेण्ट" ने सुरक्षित आहे. या जज ने ते मानले नाही.

यात मुख्य मुद्दा हा असतो की नेटवर्क वर एखादे मत हे "बातमी" म्हणून सांगितले आहे की "ओपिनियन" म्हणून. न्यूज चॅनलने बातमी म्हणून एखादी गोष्ट सांगताना शहानिशा करणे अपेक्षित असते. ते फॉक्सने केले नाही. या जजने अगदी नि:संदिग्ध शब्दांत मत दिले की "फॉक्सने डोमिनियन बद्दल सांगितलेले काहीही खरे नाही असे निष्पन्न झाले आहे".

त्यावेळच्या फॉक्सवरचे प्रोग्रॅम आठवले तर ते अगदी ठोकपणे हे सगळे खरोखरच होत आहे याची माहिती असल्याप्रमाणे बोलत. "ओपिनियन" दिल्यासारखे नाही. मारिया बार्टिरोमो व इतर काहींच्या क्लिप्स उपलब्ध आहेत. डॉमिनियन वाले इतरांच्याही उकरून काढतील. जर पब्लिक डोमेन मधे सहज मिळत नसतील तरी फॉक्सला त्या उपलब्ध करून द्याव्या लागतील.

या केस मधे पुढे काहीही होवो, राजकीय दृष्टीने आणि सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने फॉक्सचा सगळा खोटेपणा पूर्ण उघडा पडला आहे. ब्रेनवॉश झालेले लोक सोडले तर बाकीच्यांना हे ऑलरेडी लक्षात आलेले होते. पण खुद्द फॉक्सवरच्या दिग्गजांचे खाजगी मेसेजेस जे गेल्या काही दिवसांत उघडकीला आले त्यातून इव्हन त्यांनाही ते खोटी माहिती प्रसारित करत आहेत हे स्पष्टपणे माहीत होते - हे ही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या खटल्यात फॉक्सची बाजू फार वीक आहे.

टकर कार्ल्सन, हॅनिटी, इनग्राम, मारिया बार्टिरोमो ई. लोकांची कोणतीही बकवास यापुढे विश्वासार्ह मानता येणार नाही. मला हट्टी लिबरल्स चा वोकनेस अजिबात आवडत नाही. पण त्याला एक रिझनेबल पर्याय या लोकांनी उभाच राहू दिलेला नाही. यांच्या खोटारडेपणामुळे त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

आणि रिपब्लिकन, कॉन्झर्वेटिव्ह लोकांचा आवाज म्हणून जी चॅनेल्स धरली जातात त्यात फॉक्स हे सर्वात सेन्सिबल चॅनेल वाटेल यावरून बाकी नगांचा अंदाज येइल Happy न्यूजमॅक्स, वन अमेरिका नेटवर्क वगैरे अगाध आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नल, नॅशनल रिव्यू हे अजूनही बर्‍यापैकी लेव्हलला आहेत. पण यांची चॅनेल्स नाहीत. तेथे जाउन पे वॉल पार करून वाचणारे फार नसतील. तात्याचे मतदार तर फारच क्वचित. जे आहेत ते या साइटसवर जे काही रिझनेबल कॉन्झर्वेटिव्ह लेख येतात त्यांना ट्रोल करतात.

>>माझ्या मते आपल्याला नविन उमेदीचे तरुण व ताज्या विचारांचे उमेदवार जरुरीचे आहेत.<<
हे विश्फुल थिंकिंग आहे रे बाबा. मूळात तरुण, टॉप टॅलंट राजकारणाकडे फिरकंत देखील नाहित. आणि काहिंनी यायचा प्रयत्न जरी केला तरी ते पार्टिलाइन्स मधे मागे पडतात. सो वि विल हॅव टु लिव विथ द ओल्ड फार्ट्स. अँड आयॅम ओके विथ दॅट, सो लाँग अ‍ॅज दे डिलिवर..

एक गोष्ट मात्र मी आवर्जुन मांडीन कि, तुझ्यासारखा विचार करण्याची सुबुद्धी भारतीय-अमेरिकन्सना मिळावी. मेजॉरिटि ऑफ फर्स्ट जनरेशन इंडियन-अमेरिकन्स आर हियर ऑन मेरिट. भारतातल्या सोशॅलिझम्स्ची झळ आपल्या पिढिला बसली आहे. आता इथेहि बर्नी-बाय्डन हॅव डेमक्रॅटिक सोशलिझम अजेंडा, इज धिस व्हॉट यु वाँट योर किड्स टु डील विथ? इट्स फ्रस्ट्रेटिंग टु सी फोक्स स्वेटिंग ऑन स्मॉल थिंग्स रादर दॅन सीइंग द बिग पिक्चर. एनिवे, डिडंट मिन टु डाय्ग्रेस..

सेकंड वर्ल्ड वॉर नंतरचे डायनॅमिक्स आता राहिलेले नाहित. आशा करुया इंडिविजुअल पार्टि अजेंडामधे हे वास्तव दुर्लक्षित केलं जात नाहि...

<<<इथेहि बर्नी-बाय्डन हॅव डेमक्रॅटिक सोशलिझम अजेंडा>>>

बायडन आणि ट्रम्प मध्ये असा काय पॉलिसी फरक आहे की B सोशलिस्ट आणि T नाही ? (खरेतर दोघेही नाहीयेत.)

<<<भारतातल्या सोशॅलिझम्स्ची झळ आपल्या पिढिला बसली आहे. आता इथेहि बर्नी-बाय्डन हॅव डेमक्रॅटिक सोशलिझम अजेंडा,>>>
कसली झळ आणि कोणता अजेंडा ?! जरा स्पेसिफिक सांगा की.

काही होणार नाही त्रंपच्या खटल्याचे. तो खटला निरनिराळ्या कारणांनी पुढे धकलत राहील, काही "डील्स" करेल, थोडे पैसे भरेल.तुरुंगात तर जाणारच नाही. पुनः २०२४ च्या निवडणुकीत उभा राहील नि निवडून येईल.

विस्कॉन्सिनच्या सुप्रिम कोर्टची सीट तब्बल १० पॉईंट्सनी फ्लिप झाली. जेन झी हे कारण म्हणत आहेत, तसं असेल तर त्यांच्या समोर म्हातार्‍या, रुढीप्रिय, इतिहासाच्या नावाने गळे काढणार्‍या रिप्सचा निभाव लागणे खरंच कठिण असेल तर फार उत्तम परिस्थिती आहे!
टेनसीच्या कॉग्रेस मध्येही जेन झी ने नाकीनऊ आणलेत.
ट्रंप आणि त्याच्यावरच्या केसेस इ. पेक्षा जेन झी चं काय करायचं हे रिप्सना सुधरत नाहीये. आयेम शुअर आता रिप्सच्या नेहेमीच्या सायकीनुसार अनेक ठिकाणच्या युनि मधली व्होटिंग सेंटर बंद कराची टूम काढतील ते.

>>>>टेनसीच्या कॉग्रेस मध्येही जेन झी ने नाकीनऊ आणलेत.

रिपबलिकन पक्षाची परिस्थिती खरच विचित्र आहे.
लोकप्रिय रीप. नेत्यांना फिस्कली काँझरव्हेतीव होता येत नाही. कारण त्या पॉलिसी कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाहीत. परवा पबलिकसमोर "आम्हाला सोशल सिक्युरिटी ला हात सुध्दा लावायचा नाही" असे ब्रॅण्डन म्हातारबांनी रीपबलीकन नेत्यांना ओरडून ओरडून म्हणायला लावले. त्यांचा सोशल सिक्युरिटी सनसेट करूया म्हणणारा नेता गडबडून गेलेला.

आणि त्यांच्या फिस्कल पॉलिष्या एकतर डेम सारख्याच आहेत किंवा अन पॉप्युलर आहेत असे असल्याने त्यांना अनेक वर्षांपासून कल्चर वॉर वर डबल काय, ट्रिपल डाऊन करावे लागले आहे. त्यात ते अनेक वर्षांपासून सपाटून मार खात आहेत तरीही.
१. They could not turn people against gay marriage.
2. They could not turn PEOPLE against abortion.
3. They could not sell the "war on Christmas" rhetoric.
4. They could not sell anti feminist rhetoric.
5. They could not sell great replacement theory (to general public).

इतके असूनही आता उठता बसता woke woke करत असतात. परवा SVB BANK बुडाली तरी ह्या काही लोकांना "बँक वोक असल्यामुळे बुडली" यापलीकडे काही बोलायला सुचले नाही. केव्हिन मकार्थी सुध्दा कपाळाला हात लावून बसला होता ह्यांच्या मूर्खपणा मुळे.
आणि woke शब्दाची व्याख्या सुध्दा किती सुरेख करतात बघा तरी !
In November, when asked under oath what “woke” meant during a court case, Ryan Newman, DeSantis' general counsel said, “Generally, the belief there are systemic injustices in American society and the need to address them.”

अमेरिकन लोकांना हे मान्य आहे ! ह्या व्याखेने बहुतांश अमेरिकन वोक आहेत !
मुद्दा काय, वरचे सगळे इश्यू आता बऱ्यापैकी सेटल झालेले आहेत. त्यावर बोलणे लोकांना पसंत नाहीये. त्यामुळे सगळ्या बंदुका ट्रान्स लोकांकडे वळवल्या आहेत. ह्यात सुध्दा ते असेच तोंडावर आपटणार आहेत ह्यात कसलीही शंका नाही. गेल्या काही निवडणूक निकालांमध्ये हे स्पष्ट दिसते आहे.

रिपबलिकन पक्षाची परिस्थिती खरच विचित्र आहे. >> सहनही होत नाही नि सांगताही येत नाही असे म्हणा Happy

त्या वरचा ५ मधे पेरीनियल फेव्हरिट असलेले - सोशॅलिसम राहिले. त्याची व्याख्या वोक सारखीच "डेम्स ने केलेले काहीही" अशी ढोबळ आहे.

गे आणि एकुणच एलजीबीटीक्यू, अबॉर्शन इ. इश्यू विकसित देशांत सेटल्ड आहेत. आणि गन्स आणि मेडिकल इन्श्युरंस सुद्धा.
आठ -दहा वर्षांपूर्वी कॅनडात कॉन्झर्वेटिव्ह सरकार असताना अमेरिकेचं बघुन अबॉर्शनवर प्रायव्हेट मेंबर बिल संसदेत आलेलं. तेव्हा कॉन्झर्वेटिव्ह पंतप्रधानाने तो इश्यू सेटल झालेला आहे, त्यात मला पडायचं नाही सांगून ते बिल बाद करुन टाकलेलं. त्याला (म्हणजे बिल ला) संसदेत किंवा बाहेर (घेटो वगळता) शून्य पाठिंबा मिळालेला. तुमच्याकडला गन चा गोंधळ बघता की इकडे कुठे गन व्हायोलंस झाला की दरवेळी नियम आणखी आणखी कठोर होतात आणि त्याला पाठिंबाच मिळत आलेला आहे.
२१ व्या शतकात तो दिवस जेव्हा कधी अमेरिकेत येईल तो सुदिन. बेबी बूमर्स जगातून नाहीसे होणे आणि जेन झी येणे हाच ट्रिगर दिसतोय. आपल्या पिढीला काही ते शक्य झालेलं नाही.

विस्कॉन्सिनच्या सुप्रिम कोर्टची सीट तब्बल १० पॉईंट्सनी फ्लिप झाली. >> न्यूज मधे याची हेडलाइन सतत येत होती पण नक्की काय आहे माहीत नव्हते. इंटरेस्टिंग.

बाकी न्यू यॉर्क मधल्या गडबडीमधे ट्रम्पविरोधातील सर्वात महत्त्वाच्या खटल्यातील घडामोडी मागे जात आहेत. त्याच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मधल्या अनेक लोकांना ६ जाने. बद्दल कोर्टात जबाब देण्याकरता जावे लागेल. "एक्झिक्युटिव्ह प्रिविलेज" वगैरे वापरून इतके दिवस हे लोक टाळत होते. आता अपील्स कोर्टाने ते त्यांना वापरता येणार नाही असा निर्णय दिला आहे. त्याच्या सत्तेच्या काळात ऐकू येणारी अनेक नावे यात आहेत.

ही केस सर्वात जास्त महत्त्वाची आहे. कारण इतर अनेक केसेस मधे गुन्हा गंभीर वाटला, तरी त्याचे कारण काहीतरी बिनडोक इगो वाले असू शकते (उदा: जस्टिस डिपार्टमेण्टने सगळी कागदपत्रे मागितल्यावर सुद्धा तात्याने काही पुन्हा बघायला मागितली. असले प्रकार केवळ आपल्याला अमर्याद अधिकार आहेत अशा कल्पनेतून होऊ शकतात). पण ६ जाने.ला कसलेही अशा प्रकारचे कारण लावता येत नाही. तेथे आपले समर्थक वापरून सत्ता टिकवून धरणे हा एकच हेतू दिसतो.

जस्टिन पिअर्सन आणि जस्टिन जोन्स दोघांची भाषणं घणाघाती आहेत. एका रात्रीत रीप्सच्या मूर्खपणा मुळे त्यांना नॅशनल स्टेजवर चमकायला मिळालं आणि काय भारी भाषणं केलीत दोघांनी! परत हे करताना आपण कोणाला दुखावत आहोत याचं त्या रीपस्ना भानच नाही.
अबोर्शन आणि गन या मुद्द्यांवर रिपब्लिकनना त्रास झाला तो ही जेन झी कडून तर मला जास्त आवडेल. Trump आणि त्याचा मूर्खपणा मागे पडलेला बघायला छान वाटतं.
टेनसी -३ इतिहासाच्या पुस्तकात जातील.

टेनसी -३ इतिहासाच्या पुस्तकात जातील. >> नक्कीच. अर्थात पॉप्युलिस्ट माठांकडून अजून काय वेगळी अपेक्षा नव्हती. जस्टिस थॉमस लाही तेच लागू होते, त्यावरचा त्याचा डिफेन्स एव्हढा हास्यास्पद आहे कि अगदी तात्या सुद्धा स्मार्ट वाटेल. तो इतरांना किती बावळट समजतो हे दिसते. शेवटी पितळ उघडे पडते आहे हे खरे.

अरे ते आपले शेंडेनक्षत्र कुठे गेले? वरील सर्व बातम्यात सत्य काय ते जाणून घ्यायला आवडेल.
त्या टेनेसीमधे काय झाले ते इतर कुणालाहि माहित नसेल ते त्यांना माहित असते.

मॅट टबिबी ह्या पत्रकाराने ट्विटर फाईल्स भाग १ लिहिला होता. मेहदी हसनने त्याची मुलाखत घेतली आणि प्रेस रिलीज पत्रकारितेचे सुरेख उदाहरण पाहायला मिळाले. कशी चेरी पीक केलेली माहिती लिहून दिशाभूल करता येते हे पहा :

१. मुद्दा १- हंटर बाईडन स्टोरी -
काय रिपोर्ट केलेले - "सरकारने बायडण स्टोरीच्या लिंक्स ट्विटर कडे उडवण्यासाठी पाठवल्या. ट्विटर ने त्यांचे म्हणणे मान्य केले."

पूर्ण सत्य -
१.तेव्हा बायडेन प्रेसिडेंट नव्हता.
२. बायदन टीमने कम्युनिकेशन करताना स्पेसिफिकली "ह्यातला कंटेंट टर्म्स ऑफ सर्व्हिस मध्ये बसतोय का हे तपासा" इतकेच सांगितले होते.
३. त्या लिंक्स मध्ये सरळ सरळ हंटर चे रिव्हेंज पॉर्न, non consensual nude pictures होते. Which is very much against the terms of service. हे लेखात उल्लेखले नव्हते.

इतका महत्वाचा context गाळणे हा सरळ सरळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.

२. मुद्दा २ - सरकारी हस्तक्षेप.
जर लेखाचा उद्दिष्ट सरकारी हस्तक्षेप दाखवणे होता तर विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी काय काय दिवे लावले ह्याचा केवळ एका वाक्यात का निकाल लावला, आणि एका माणसाचे नागडे फोटो ट्विटर वरून काढले ह्यावर इतका का बरे भर दिला ?

लेखात काय दिले ?-
"Trump ने सुद्धा टेक डाऊन रिक्वेस्ट केल्या होत्या" किंवा तत्सम वाक्यात हा मुद्दा गुंडाळून टाकला आहे. कसलेही डिटेल नाहीत.

खरे काय ? हे काँग्रेसने प्रश्न विचारून खोदून काढले. टबीबी ने इलोन मस्क ने ताटात घातले तेच फक्त फारसा विचार न करता आपला शिक्का मारून नेटवर टाकले.

Trump ने त्याच्यावर झालेले mean tweets काढायला सांगितलेले. कोणतेही ToS व्हायोलेशन नसताना. पण लेखात ह्या गोष्टीचा हार्डली उल्लेख केलाय.

३. जनरल दिशाभूल -
ट्विटर फाईल्स मध्ये एकूण आव असा होता की सरकार सांगते आणि ट्विटर ऐकते. जबरदस्ती. Not the case. ट्विटर ने सरकारच्या मेजोरिटी रिक्वेस्ट फेटाळल्या होत्या. आणि पारदर्शकतेसाठी त्यांनी स्वतः किती रिक्वेस्ट फेटाळल्या आणि किती स्वीकारल्या रिपोर्ट प्रकाशित केला होता, मस्क ने ट्विटर घेण्या आधी. त्यात दिसले की अबाऊट ४०% रिक्वेस्ट पूर्ण विचाराअंती ToS violation ठरवल्या गेल्या आणि मानल्या गेल्या. इतर ६०% रिक्वेस्ट नाही मानल्या.

४. तथ्य चुका (factual ereors)

सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही -
"इलेक्शन इंटेग्रिटी समितीने २२ मिलियन ट्विट मिसिन्फर्मेशन म्हणून फ्लॅग केले."
खरा आकडा - ३०००.
पुढे CIS ह्या खाजगी संस्थेच्या नावासमोर उगाच A (हा ए सुद्धा कंसात होता, म्हणजे जाणून बुजून.) लावून तिला CISA, सरकारी संस्था करून त्यावर कल्पनांचे इमले रचले.

एकूण काय -

आधीचे ट्विटर कसे दुष्ट होते आणि डेमॉक्रॅटिक पक्ष कसा दुष्ट आहे हे दाखवणे ईलोन मस्कचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्याने अर्धवट माहिती एका गोष्टीमध्ये थापून बसवली आणि पत्रकाराचा शिक्का मारून प्रकाशित केली. प्रेस रिलिज पत्रकारिता !

ट्विटर कडून काहीच चुका झाल्या नव्हत्या असा भाग नाही. NYPOST चे खाते उडवणे ही चूक होती आणि ती डॉर्सी ने सुद्धा कबूल केलेली. पण ट्विटर फाईल्स मध्ये चेरी पीक माहितीने दिशाभूल करायचा प्रयत्न झाला हे नक्की.

याखेरीज, डेस्टिनी ह्या स्ट्रिमर ने सुद्धा इतर काही ट्विटर फाईल्स पत्रकारांची मुलाखत घेतली होती. त्यात सुद्धा असे समोर आहे की जिथे कुठे FBI बद्दल काही दावा आहे, तिथे FBI कडून कमेंट मागणे हे साधे इथिक आहे. Corroboration हे पत्रकारितेचे अतिशय बेसिक तत्व आहे. ते सुध्दा केले नव्हते. जे ईमेल मस्कने दाखवले ते आहे तसे चिकटवले.

कॉमी - माहितीबद्दल धन्यवाद. यातल्या एक दोन गोष्टी ऐकल्या होत्या पण हे सर्व माहिती नव्हते.

मुळात तात्याचा कल्ट आहे तसा बायडेनचा नाही. उद्या हंटरच काय खुद बायडेन जरी दोषी निघाला तर होउ दे कायद्याने जे काय व्हायचे ते. आम्ही काय बायडेनला वाहून घेतलेले नाही.

पण या लोकांनी दोन वर्षे निवडणुकांच्या बाबतीत कंड्या पिकवल्यावर यांच्यावर विश्वास आधी कसा ठेवायचा? लांडगा आला रे आला सारखे झाले आहे.

क्रिकेट मधली एक अ‍ॅनॉलॉजी आहे. अनेकदा कीपर, बोलर सकट सगळे स्पॉण्टेनियस अपील करतात तेव्हा ते जेन्युइन वाटते व अंपायर्सही ते विचारात घेत असतील. पण पूर्वी मोंगिया कीपर असताना एक काळ होता जेव्हा आपले लोक उठसूठ केव्हाही जोरदार अपील करत. तेव्हा असेच एक जेन्युइन आउट वाटत असताना केलेले एक अपील अंपायरने नाकारल्यावर एक कॉमेण्टेटर म्हंटला होता "You just don't know when these guys are serious". फॉक्स व इतर मीडिया व असंख्य रिपब्लिकन्सचे तसेच झाले आहे.

फॉक्स वि. डॉमिनियन खटल्याचा बार अगदीच फुसका निघाला. एकीकडे तात्याच्या सर्वात फुटकळ केस वर मीडिया मधे चर्चा सुरू असताना ही केस या आठ्वड्यात सुरू होणार होती. पण दोन्ही पार्ट्यांनी अगदी लास्ट मिनीट सेटलमेण्ट केली व केस निकालात निघाली.

फुसका बार पैशाच्या दृष्टीने नाही. सेटलमेण्टची किंमत $७८७ मिलियन्स आहे - एखाद्या मीडिया कंपनीला करावी लागलेली आतापर्यंतची सर्वात मोठी सेटलमेन्ट आहे. फॉक्सच्या एकूण एम्पायरच्या तुलनेत हे किती आहे व पुढच्या वेळी ते असलेच प्रकार करतील का वगैरे आत्ता सांगता येत नाही. पण रक्कम तर प्रचंड आहे व बहुधा यापुढे काळजी घेतील कारण आता एक प्रीसीडण्टही तयार झाला आहे त्यामुळे पुन्हा अशीच केस उभी राहिली तर तो त्रासदायक ठरू शकतो.

पण फॉक्सने शॉन हॅनिटी, टकर कार्ल्सन, मारिया बार्टिरोमो व इतर एक दोघांच्या कार्यक्रमातून बरेच दिवस ही बकवास चालू ठेवली होती. जितक्या जाहीरपणे हा खोटेपणा केला गेला तितक्याच जाहीरपणे हा खुलासा त्याच कार्यक्रमांमधून त्यांना करायला भाग पाडायला हवे होते. कारण त्यांचा जो प्रेक्षकवर्ग आहे तो इतर चॅनेल्स्/साइटस पाहात नाही. फॉक्सने प्रेस रिलीज मधे मान्य केले आहे पण ते ही अगदी कमीत कमी दोष स्वीकारत. "काही क्लेम्स चुकीचे होते" वगैरे वगैरे. प्रत्यक्षात डॉमिनियन बद्दल ते तेव्हा खरे काय बोलले हे शोधावे लागेल. पण अगदी प्रेस रिलीज मधे पूर्ण दोष स्वीकारला असता, अगदी माफी मागितली असती, तरी ती जोपर्यंत फॉक्स स्वतःच्या चॅनेलवर प्रसारित करत नाही तोपर्यंत त्याचा फारसा उपयोग नाही. कारण जो प्रेक्षकवर्ग त्यांचे कार्यक्रम पाहून हे अजूनही धरून बसला आहे त्यांना हा खोटेपणा जाहीरपणे समोर येणे गरजेचे आहे.

इथे हे समजणे महत्त्वाचे आहे की तो प्रेक्षकवर्गही यांच्यामुळे नुकसान झालेला आहे. ६ जाने. चा खटला वगैरे मधे शिक्षा झालेले हेच लोक आहेत. २०२० च्या निकालानंतर जे त्यांच्यासमोर सतत आले ते ट्रम्प, ज्युलियानी, पॉवेल इतकेच फॉक्समुळेही आले. त्यांना हे माहीत होणे गरजेचे आहे आणि ते फक्त फॉक्सवर हा खुलासा आला तरच होऊ शकते.

हे करायला फॉक्सला या सेटलमेण्टमधे लावलेले नाही. मग हे डॉमिनियनने कसे मान्य केले? ते शोधले तर तडजोडीची अवाढव्य रक्कम हेच एक कारण दिसते.

कारण यातला जनरल पब्लिक इंटरेस्ट आणि डॉमिनियन कंपनीचा इंटरेस्ट यात प्रचंड फरक आहे. आता मुळात चांगला खटला चालवून भरपूर रक्कम वसूल करायची व खटल्यात कोर्टात डॉमिनियनची मानहानी काढणार्‍यांनाही खेचायचे हे सोडून कंपनीने तडजोड का केली असेल? तर त्याचे कारण म्हणजे इथे "मानहानी" सिद्ध होईल. ते ऑलरेडी कोर्टानेही म्हंटले होते. पण त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे बिलियन डॉ मधे आहे हे सिद्ध करणे अवघड आहे. डॉमिनियन ची मशीन्स अमेरिकेत इतरत्र काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याचा नक्की आर्थिक परिणाम किती? डॉमिनियची एकूण मार्केट व्हॅल्यू व वार्षिक उत्पन्न हा बेस धरून सहसा ते ठरवले जाईल (म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न जर ३० मिलियन असेल तर तुम्ही कोणत्या बेसिस वर १ बिलियन चे नुकसान सिद्ध करणार). त्या दृष्टीने ही तडजोडीची रक्कम कितीतरी पट जास्त आहे.

म्हणजे तुम्ही जर या कंपनीच्या बोर्डवर असाल किंवा शेअरहोल्डर असाल तर आत्ता ही रक्कम घेउन मॅटर संपवणे हे जास्त फायद्याचे आहे. हा खटला बराच काळ चालेल. त्यात फॉक्सचा खोटेपणा उघडकीस येइल वगैरे सगळे ठीक आहे - पण ते जनरल पब्लिकच्या इंटरेस्ट मधे. त्या नादात यांचाही पैसा केस मधे जाईल्/अडकून पडेल. पुन्हा या कोर्टात सिद्ध झाले, तरी फॉक्ससारखी मोठी कंपनी पुन्हा अपील करेलच. म्हणजे ४-५ वर्षे हे लांबवायचे आणि शेवटी सगळे सिद्ध झाल्यावर तुटपुंजी रक्कम घेउन समाधान मानायचे यापेक्षा कोणतीही कंपनी हे घेऊन मोकळी होईल. या दाव्यांमुळे जे आर्थिक नुकसान होऊ शकते ते या रकमेतून नक्कीच भरून निघेल.

हा खटला उभा राहिला असता तर ज्युरी/कोर्टाने कदाचित फॉक्सला जाहीर माफी मागायला लावली असती. पण तडजोडीमुळे ते त्यातून वाचले. पैसे भरपूर गेले तरी एकूण स्वस्तात सुटले. अर्थात स्मार्टमॅटिक या दुसर्‍या एका कंपनीची अशीच केसही लौकरच उभी राहील. आणि आता या केसवरून ते ही किमान इतकेच पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाहीत.

या व्यतिरिक्त रूडी ज्युलियानी, सिडनी पॉवेल ई वर वैयक्तिक मानहानीच्या केसेस डॉमिनियनने दाखल केलेल्या आहेतच. तेथे कदाचित तडजोडीची रक्कम इतकी मोठी नसेल की डॉमिनियन त्याला तयार होईल.

मी स्वतःला लिबरल समजतो पण extreme wokeness नावाची गोष्ट सुद्धा आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेस ने (भारतातील नव्हे) पास केलेले ट्रांस जेन्डर स्पोर्ट्स बिल. यावेळी रिपब्लिकन्स बरोबर आहेत व डेमोक्रॅट्स चूक. गमतीचा भाग म्हणजे मेडियाही लिबरल बायस्ड असल्याने याच्या बातम्याही एकतर्फीच आहेत व शीर्षके खोटी आहेत. उदा .

House Republicans pass transgender sports ban for schools
House approves trans athlete ban for girls and women’s teams
House passes anti-trans sports bill

वरील हेडर्स वाचून असा समज होईल की ट्रांसजेंडर्स ना बंदीच घातली आहे. वास्तव तसे नाही.

मागेही एक डी सी मध्ये गोरा विद्यार्थी केवळ स्मित हास्य करत उभा होता तर त्याला सर्व लिबरल मेडियाने फाडून खाल्ले होते. नंतर बर्‍याच नेट वर्क्स नी भ्रपाई दिली हे वेगळे.

पुरुष म्हणून जन्मलेल्या मुलाने आपले जेंडर बदलून तो मुलगी झाला तर त्याला मुलींच्या टीम मध्ये खेळायची परवानगी नाकारणे. हे सेन्सिबल आहे. पुरुष व स्त्री मध्ये नैसर्गिक फरक आहे. भारताची महिला क्रिकेट टीम वि एका राज्याची रणजी पुरुष टीम यांचा सामना झाला तर काय होईल ?

बापरे कुलकर्णी सर सांभाळून. ट्रान्स लॉबी माबोवर पण सक्रिय आहे. मी असलंच लिहिलं होतं तर माझ्यावर डूख धरून आहेत. अर्थात जिथे साक्षात जे के रोलिंगला सोडलं नाही त्यांनी तिथे इतरांचं काय...

Pages