Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ज्वारीचे डोसे फारच टेंपटींग
ज्वारीचे डोसे फारच टेंपटींग दिसत आहेत. जाळीदार काही दिसले की असे होतेच माझे...
आस्मिताचे रेस्टॉरंट लूकवाले फोटोची लाईन सुरू झाली की कोणाची पोस्ट आहे हे पहिल्या दुसऱ्या फोटोलाच समजते
सोडे भात आणि मालवणी फिश करी
सोडे भात आणि मालवणी फिश करी
काय मजा आहे बुवा अस्मिता
काय मजा आहे बुवा अस्मिता तुमच्या घरच्यांची. मेजवानी. ते ग्रिल सँड्विच कशा वर भाजले. स्पेशल ग्रिल पॅन आहे का?
जाळीदार ज्वारी डोसा पाहून आत्ताच जेवलेले असून ही भूक लागली.. डोस्यात सोडा घातलाय की नुसतेच रवा + दही?
डोस्यात सोडा....
सोडे भात आणि मालवणी फिश करी
सोडे भात आणि मालवणी फिश करी
>>>>
ओह.. पोटात खड्डा पडला..
माझे मुद्दाम फोटो काढणे होत नाही.. पण मध्यंतरी सुकट खूप खाणे झालेय.. एखादा फोटो काढला असल्यास झब्बूसाठी शोधावा लागेल
पनीर बटर मसाला - शेफ रणवीर
पनीर बटर मसाला - शेफ रणवीर ब्रारच्या रेसिपीने
डोस्यात सोडा घातलाय की नुसतेच
डोस्यात सोडा घातलाय की नुसतेच रवा + दही?
डोस्यात सोडा...<<< ज्वारी पीठ मुख्य, चिमूटभर रवा अगदी थोडस दही. सोडा नाही घालत मी.
चवीला जिरं , मिरीपूड, कांदा, कोथिंबीर आणि आलं.
खूप पातळ पीठ केलं कि ते जाळीदार होतात.
धन्यवाद
धन्यवाद
काश्मिरी दम आलू
काश्मिरी दम आलू
माझेमन, झकास दिसतंय दोन्ही.
माझेमन, झकास दिसतंय दोन्ही.
रमड, जबरदस्त. दाणा दाणा खणके टाईप राईस.
आशु, हो ग्रिल आहे.
धन्यवाद ऋ. आपल्या अशात गप्पाच झाल्या नाहीत.
धन्यवाद सर्वांना.
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
पुरी, बासुंदी, साधं वरणभात, बटाट्याची भाजी व कैरीची वाटली डाळ.
वॉव मटकवावंसं वाटत आहे सर्व
वॉव मटकवावंसं वाटत आहे सर्व
हा आमचा टिपिकल पाडवा मेनू
हा आमचा टिपिकल पाडवा मेनू
आलेले सगळे नवीन फोटो बघून
आलेले सगळे नवीन फोटो बघून तोंडात नळ सुरू, स्क्रीनमध्ये हात जातोय का बघणे वै सगळे प्रकार झाले.
ही पोचपावती.
अस्मिता आणि म्हाळसा ह्या जास्त प्रो किलर हे एक निरीक्षण नोंदवतो
ह्यांच्या घरी।पाहुणचार झोडायची देवाकडे प्रार्थना सगळ्या माबोकरासाठी
रमड >>> सोडेभात मस्त. रेसिपी
रमड >>> सोडेभात मस्त. रेसिपी द्या.
अस्मिता, ऋन्मेष >>> पाडव्याचा मेनू छान. बघूनच डोळे निवतात.
अस्मिता >>> कैरीची डाळ तिखट घालून केलीय का?
हा माझा कालचा मेन्यु
हा माझा कालचा मेन्यु एकट्यासाठी एवढे करायला २ तास लागले!
पोळी बटाटा/मटार भाजी, आमसूल गुळाचे वरण, भात, केसर, वेलची, बदामयुक्त रबडी, आणि पापड.
गुढीपाडवा विशेष
गुढीपाडवा विशेष
वरण भात, बासुंदी पुरी, श्रीखंड, छोले उसळ, उकड बटाट्याची भाजी, चटणी, लोणचं, पापड , कोथिंबीर वडी आणि ताक
सगळ्यांचे पदार्थ एकसे बढकर एक
सगळ्यांचे पदार्थ एकसे बढकर एक..
या खायला आता फुलके आणि गुत्ती ओंकाया करी (स्टफ्ड वांगं आंध्रा स्टाईल), जवसाची चटणी.
स्वान्तसुखाय, अप्रतिम दिसतेयं
ही बासुंदी चितळे बासुंदी मिक्सने केली आहे. चांगले प्रॉडक्ट आहे. एक लिटर कोमट दुधात मिसळून दोन तीन उकळ्या आल्या की बंद करायचे. तासाभरात होते, चवही आवडली. त्यात साखरही आहे. भारतात गेल्यावर पुन्हा आणणार.
धन्यवाद सर्वांना.
झकासराव, सुगरण नाही पण जिद्दी आहे.
सर्व माबोकरांना आनंदाने जेवायला बोलवेन. या सगळे.
स्वान्तसुखाय, अप्रतिम दिसतेयं.
कृष्णा, तुम्ही केलंत :टाळ्या:, मेनू सारखाच होता आपला.
ऋ, मस्त मस्त.
हो माझेमन, भरपूर तिखट घातले आहे.
मृ , वांग्याची भाजी मस्त दिसतेय.
आशु, मी चिया बिया भिजवताना MTR बदाम मिक्स घातलं होतं. त्यानं घट्टसरपणा येतो. आमच्याकडे ते कुणालाच आवडलं नाही म्हणून असं संपवतेय. त्यात साखर असते. चालत असेल तर तसं करू शकतेस.
सुकट ते पौष्टीक .
सुकट ते पौष्टीक
.
कसलं तोंपासू दिसतंय सुकट आणि
कसलं तोंपासू दिसतंय सुकट आणि चपाती.. माझं फेवरीट..
सुकट कसले तोंपासु दिसतेय.
सुकट कसले तोंपासु दिसतेय.
अस्मिता, माझेमन थँक्यू
अस्मिता, माझेमन थँक्यू
ऋन्मेष, मस्त झब्बू. खूप भारी दिसतंय सुकट.
सगळ्यांचे पाडवा मेनू दणक्यात. लगेच जेवायला बसावंसं वाटतंय
मृणाली, करी मस्त दिसतेय.
माझेमन, यावेळी झटपट कृतीने सोडे भात केला. साधा भात वेगळा शिजवून घेतला. मग तेलावर थोडी तमालपत्र, मिरी, दालचिनी टाकली. ती थोडी परतल्यावर त्यावर उभा आणि जरासा पातळ कापलेला कांदा टाकला. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यावर आलं लसूण पेस्ट घालून परतून घेतलं. मग त्यावर हळद, काश्मिरी लाल, साधं लाल तिखट, एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला आणि चिमूटभर एव्हरेस्ट गरम मसाला घातला. हे मसाले घालून अगदी अर्धं मिनीट सगळं परतलं आणि त्यावर भिजवलेले सोडे घातले. सगळं पुन्हा एकत्र परतून एक मिनीट वाफ काढून घेतली. मग मीठ घातलं, एकत्र केलं, सोडे बुडेस्तोवर पाणी घातलं आणि सगळं १५ मिनीटं छान शिजवून घेतलं. (अधेमधे चेक करायचं पाणी आटलं नाही ना ते. आटलं असेल तर पाणी थोडं वाढवायचं आणि सोडे निदान १५ मिनीटं तरी शिजवून घ्यायचे.) सोडे शिजल्यावर त्यात थोडंसं पाणी राहिलं असेल तर उत्तमच. नसेल तर अगदी १-२ टीस्पून पाणी घालायचं आणि आता त्यात शिजवलेला भात घालायचा. हलक्या हाताने सगळं नीट हलवून घ्यायचं आणि २-३ मिनीटं झाकण ठेवून चांगली दणकून वाफ आणायची. हवी असल्यास वरून थोडी कोथिंबीर घालायची. (मी घातली नाही.) झाला सोडे भात तयार!
स्वान्तसुखाय अप्रतिम ताट.
स्वान्तसुखाय अप्रतिम ताट.
अस्मिता आयडिया छाने, मी करणार ट्राय
ऋन्मेष सुकट ताट चमचमित दिसतंय ..कधी खाल्ले नाही सुकट कारण वास येतो खूप.
पाडवा ताट ही छान
जवळ्यापेक्षा लक्ष मऊ
जवळ्यापेक्षा लक्ष मऊ चपात्यांकडे जास्त गेले.
नाचणी इडली
नाचणी इडली
नाचणी इडली >>> इडली इतकी
नाचणी इडली >>> इडली इतकी परफेक्ट गोल आणि टुळटुळीत झालीये की मला ते ग्रॅनाईटचे तुकडे वाटले आधी. मस्तच !!
नाचणी इडली प्रिंट काढावी तशी
नाचणी इडली प्रिंट काढावी तशी सुबक आणि एकसारखी झालीय !!!!
या जेवायला...
या जेवायला...
आजचा मेन्यू..
टोमॅटोचे सार
लाल माठाची भाजी
वांग्याचे दहीभरीत
पापडचूरा
पोळी, भात , ताकाची कढी
नाचणी इडली प्रिंट काढावी तशी
नाचणी इडली प्रिंट काढावी तशी सुबक आणि एकसारखी झालीय !!!! >>> अगदी अगदी. फारच सुरेख दिसतेय.
स्वान्तसुखाय , मस्त मस्त जेवण.
नाचणी इडली प्रिंट काढावी तशी
नाचणी इडली प्रिंट काढावी तशी सुबक आणि एकसारखी झालीय !!!! >>+१
स्वान्तसुखाय on 24 March, 2023 - 23:06 >> काय परफेक्ट मेन्यू .लाल माठ माझी आवडती पालेभाजी आहे .
नाश्ता उपमा आणि शिरा
नाश्ता
उपमा आणि शिरा
Pages