Submitted by मेधा on 14 January, 2022 - 12:05
भाग ४ मधे देखील २००० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा पाचवा धागा सुरु केला आहे
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
आधीचे धागे
https://www.maayboli.com/node/2549
https://www.maayboli.com/node/24273
https://www.maayboli.com/node/42617
https://www.maayboli.com/node/56005
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाटण किंवा कांदा लसूण न
वाटण किंवा कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी करतात? कोणाकडे केलेली आठवत नाही, पण फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट टाकून केलेली. नक्की आठवत नाहिये.
कटाची आमटी हे सर्व न टाकता
कटाची आमटी हे सर्व न टाकता मजा आणत नाही...
पण तरी बनवायची असल्यास जिरे मोहरी हिंगाची फोडणी देऊन , मग त्यात मसाला आणि गरम मसाला , कढीपत्ता टाकून मग त्यावर कट आणि थोडं वाटलेले पुरण मिक्स करायचं... उकळू द्यायचं. मीठ घालून वरून कोथिंबीर घालायची...
आणि टेस्ट करून पहायची. जर चांगली लागली तर पिऊन टाकायची
नेहमीची मोहरी , हिंग, हळद ,
नेहमीची मोहरी , हिंग, हळद , कडीपत्ता ची फोडणी करायची . त्यात कट आणि जितकी पातळ हवी तेवढे पाणी घालायचे . मीठ , आमसूल , लाल तिखट घालायचे . छान उकळी येऊ द्यायची . हवे असल्यास फोडणीत थोडा सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा .मी अशी करते . सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी असे पण करतात . खोबऱ्याची वाटी गॅसवर ठेऊन थोडी काळी होईपर्यंत भाजून घ्यायची . ते खोबरे आणि जिरे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे . ते फोडणीत परतायचे .
कटाची आमटी आमच्याकडे
कटाची आमटी आमच्याकडे नैवेद्याला करतात त्यामुळे कांदा लसूण घालत नाहीत. पण त्याने त्याची मजा अजिबात कमी होत नाही. मी अशी करते:
कट बाजूला करून त्यात दीड दोन चमचे चिंचेचा कोळ मिक्स करून घेऊन त्याला २-३ लवंगा, ४-५ मिरी, दालचिनीचा तुकडा, तमाल पत्र, जिरे, कढिपत्ता, हळद , हिंगाची फोडणी द्यायची. वरून अजून गरम मसाला पावडर, तिखट,गूळ , मिठ इ. घालून मस्त उकळी आणायची. वरून कोथिंबीर.
मस्त चटकदार, तिखट , थोडी आंबट्गोड अशी आमटी होते.
धन्यवाद. मी नेहमी कांदा लसुण
धन्यवाद. मी नेहमी कांदा लसुण टाकून करते. पण अशी वाटणाशिवाय पहिल्यांदा खाल्ली आणि ती आंबट गोड चव प्रचंड आवडली. एकदा ट्राय करून बघते.
फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट
फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट टाकून केलेली. >>> आई फोडणीत हळद तिखट, कढीलिंब घालायची प्लस गोडा मसाला, आमसुल, शेवटी कोथिंबीर घालायची. सासरी ओलं खोबरंही घालतात .
आमच्याकडे कांदा लसूण विरहित करतात कारण पुरणपोळी असते तेव्हा करतात आणि ती सणासुदीला करतात (होळी, श्रावण महिना) आणि नैवेद्य दाखवतात. नैवेद्य असतो तेव्हा कांदा लसूण चालत नाही आमच्याकडे. मला खूप उशिरा कांदा लसूण, वाटण घालून कटाची आमटी करतात हे समजलं.
दोन्ही प्रकार आवडतात.
वर अश्विनी आणि मैत्रेयी यांची रेसिपीही छान वाटतेय.
मला खूप उशिरा कांदा लसूण,
मला खूप उशिरा कांदा लसूण, वाटण घालून कटाची आमटी करतात हे समजलं.>>> मला इथे वरच्या पोस्टस वाचुनच समजल कारण तेच पुपो म्हणजे नैवेद्य आलाच आणि नैवेद्याला कान्दा-लसुण चालत नाही.
मी कटात चिन्चेचा कोळ,गोडा मसाला, थोड कोरड खोबर भाजुन जिर्याबरोबर वाटून, तिखट्,गुळ सगळ घालुन छान उकळायच त्यावर कढिपत्त्याची फोडणी.
सेम. कटाच्या आमटीत कांदा लसुण
सेम. कटाच्या आमटीत कांदा लसुण कधी खाल्लाच नाही. आता बघेन कधी केली तर घालून.
कल्चरल शॉक पोटेन्शल.
कल्चरल शॉक पोटेन्शल.
कटाच्या आमटीत काय बाकी ही
कटाच्या आमटीत काय बाकी ही कित्येक पदार्थात कांदा लसूण घालतात हे माहीत नव्हते , हल्लीच कळलंय.
मै ने लिहिलय तशीच आम्ही ही करतो कटाची आमटी , लवंग वगैरे घालून आणि भारी लागते ती. अजून कांदा लसूण घालून करून बघितली नाहीये, पण बघितली पाहिजे, आवडेल पण कदाचित.
मी पण कधी वाटण करतच नाही.
मी पण कधी वाटण करतच नाही.
कधी कधी युट्यूबवर बघून हौसेहौसेनं तर्री किंवा चमचमीत मसाल्याच्या वाटणाची भाजी केली तरी म्हणावा तो ठसका किंवा झटकाच येत नाही त्याला. मग जाऊद्या म्हणून करणंच थांबवलंय आता.
कटाच्या आमटीत कांदा लसूण घालत
कटाच्या आमटीत कांदा लसूण घालत नाही. सणासुदीला कांदा,लसूण नसते.
पण एका शेजारणीने कांदा लसूण मसाला(हा एक वेगळा मसाला असतो) घातलेली आमटी पुपोबरोबर दिली होती.भन्नाट लागते.
आमच्या शेजारी रहातात
आमच्या शेजारी रहातात त्यांच्याकडे कटाची आमटी कां ल, वाटणाची करतात. ते देतात आम्हाला. सत्यनारायण पुजा असेल तेव्हा मेहूण म्हणून बोलावतात, त्यांच्याकडे देवाला नैवेद्य चालतो कांदा लसणीचा. आम्हीही तेच जेवतो मेहुण म्हणून.
मी कटाची आमटी चिकन / मटण
मी कटाची आमटी चिकन / मटण ग्रेव्ही स्टाईल बनवते
म्हणजे दुधाची तहान ताकावर
छान आहे की मग!
छान आहे की मग!
आता पुपो आणि कां ल वली कटाची आमटी करून खाल्ली पाहिजे.
माहेरी, दूधसाखर त्यात थोडे तूप घालून खायचे.त्यावेळी तूप आवडायचे नाही.आता तुपात भिजलेली पुपो आवडते.
भाग ४ वरचं इथे आणत आहे.
भाग ४ वरचं इथे आणत आहे.
हमखास यशस्वी शाकाहारी चायनीज सूप व चिलीपनीरची पाककृती हवी आहे. माझी चांगली होत नाही.
रणवीर ब्रार ची चांगली आहे
रणवीर ब्रार ची चांगली आहे आणि एक स्पाईस इट्सची चिली चिकनची मी वापरून बघितलेली आहे. ती पनीर बरोबर करू शकता
https://www.youtube.com/watch?v=P7ZGxWKJkX8
https://www.youtube.com/watch?v=PaOmHFjehkY
मस्त. रणवीर ब्रार ची चांगली
मस्त. रणवीर ब्रार ची चांगली असेल नक्की. पहाते. थँक्स.
पर्सनली संजोत किर ची चिकन
पर्सनली संजोत किर ची चिकन मंचोव सूप ची रेसिपी हमखास सुपरहिट झाली आहे.
व्हेज व्हर्जन हि चान्गली बनते (चिकन ऐवजी टोफू घालून).
धन्यवाद.
धन्यवाद.
राजगिऱ्याची भाजी आणली आहे,
राजगिऱ्याची भाजी आणली आहे, बहुतेक. हिरवी पानं मधे हिंट ऑफ राणी कलर. कृती हवी आहे. कुणाला माहिती आहे का ?
अस्मिता, त्यालाच इथे पोही असं
अस्मिता, त्यालाच इथे पोही असं नाव असतं ना?
लसूण फोडणीला घालून ओली मिरची+
लसूण फोडणीला घालून ओली मिरची+ कांदा तेलावर परतून घे.त्यात चिरलेली भाजी घालून शिजव.वरून ओले खोबरे घाल. ओल्या khobarya ऐवजी दाण्याचे कूट वापरले तरी चालेल.चिमूटभर साखर हवीच.
कल्पना नाही सायो, नेपाळी
कल्पना नाही सायो, नेपाळी दुकानदार राजगिऱ्याची भाजीच म्हणाला. हा फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद देवकी तै. लगेच करतेय.
मी ही भाजी अगदी साध्या
मी ही भाजी अगदी साध्या पद्धतीने करते. हिंग, मोहरीची फोडणी करून त्यावर मिरची आणि उभा चिरलेला कांदा घालते. कांदा ट्रान्स्परंट झाला की त्यावर हळद घालते. अर्धं मिनीट हळद परतून त्यावर चिरलेली भाजी घालते, नीट परतून घेते आणि एक मिनीट वाफ काढून घेते. मग त्यात मीठ घालून हलवून २-३ मिनीटं झाकण ठेवून शिजवते. २-३ मिनीटांनी झाकण काढून चेक करते - भाजीला पाणी सुटलं असेल तर ओके नाहीतर अगदी १ टेबलस्पून पाणी घालून पुन्हा २-३ मिनीटं झाकण ठेवून शिजवते. भाजी शिजली की गॅस बंद करायच्या आधी भाजीत १-२ कच्ची लसणं ठेचून घालते (मोठं लसूण असेल तर एक पुरे), मिक्स करते आणि १-२ मिनीटं झाकण ठेवून अजून एक वाफ काढते. मग गॅस बंद करते आठवणीने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अस्मिता,भिजवलेली मूगडाळ पण
अस्मिता,भिजवलेली मूगडाळ पण पालेभाजीत चांगली लागते.
ते नेहमीच करते देवकी तै,
ते नेहमीच करते देवकी तै, कंटाळा आला त्याचा आणि नेहमीच्या पातळभाजीचा. आता तुमची ही कृती नवीन वाटतेयं ती करेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रमड, सोपी आहे खरं. धन्यवाद.
माझी आवडती भाजी आहे ही. अगदी
माझी आवडती भाजी आहे ही. अगदी सिंपल पद्धतीने करायची भाजी. आधी कांदा, ठेचलेला लसूण ,हिरवी मिरच्या घालून परतते आणि मग हळद घालून वर भाजी घालून परतून घेते. मिठ , किंचित साखर( नसेल आवडत तर स्किप करा) , ऑप्शनल भरड दाण्याचा कूट. तो नसला तरी मस्त लागते ही भाजी गरम गरम खायला.
आता रमड ची पोस्ट पाहिली, साधारण तशीच आहे रेसिपी.
अरे, इकडे मी नेहमी आणते हि
अरे, इकडे मी नेहमी आणते हि भाजी..
साधीच बनवते मी, कांदा, लसूण , हिमी,हळद,शेंगदाणे कुट घालून परतून किंवा लसूण, कांदा,टमाटा,लामिपा घालून परतून.
लसूण चांगला खमंग परतून
मैत्रेयीचीच कृती मात्र लसूण चांगला खमंग परतून घ्यायचा. पीठ पेरून पण चांगली लागते. दाकुऐवजी हेम्प सीड्स घातल्या तर जास्त प्रोटीन मिळतं. चवीत अजिबात फरक पडत नाही.
झाली, तिन्ही पोस्टींचा लसावि
झाली, तिन्ही पोस्टींचा लसावि काढून केली आहे. देठही (अगदी जाड सोडून) घातली, चोरटी असल्याने फार थोडी होईल म्हणून.
![IMG-20230323-WA0005.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/IMG-20230323-WA0005.jpg)
चौघींना धन्यवाद.
चांगली झाली आहे.
शाबास पोरी! लैच फास्टात काम
शाबास पोरी!
लैच फास्टात काम
राजगिरा म्हणजे हिरवा माठ का??
राजगिरा म्हणजे हिरवा माठ का??
अस्मिता , छान बनवलेली दिसतेय.
अरे वा झाली की भाजी.
अरे वा झाली की भाजी.
मी आता पाहिला हा प्रश्न .
मी आता पाहिला हा प्रश्न . पुढच्या वेळी लाल माठ / मायाळू / किंवा ही भाजी आणल्यास कोकणी पद्धतीने करुन पहा.
अर्धी वाटी खोबरे , २-३ सुक्या मिरच्या, १/२ चमचा धणे , २-४ मिरी दाणे बारीक वाटून घ्या.
वाटी भर तूर डाळ शिजवून घ्या
जाडे देठ २ इंच लांब तुकडे करा. बाकी सर्व बारीक चिरून घ्या
थोडे मीठ घालून जाड देठ बुडतील एवढ्या पाण्यात उकळत ठेवा. देठ जरा मऊ झाले की बाकी चिरलेली भाजी पण त्यात घाला. .चिंच घाला चवी पुरती. भाजी थोडी शिजत आली की डाळ घोटून घाला. एक उकळी आली की बारीक वाटलेला मसाला घाला.
सगळे नीट ढवळून एकत्र करा आणि मंद आचेवर एक उकळी येऊ द्या. नारळाचा मसाला घातल्यावर फार ख़ळ्खळ उकळायचे नाही.
मोहरी, सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग , हळद फोडणी द्या आणि लगेच वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा
वा अस्मिता काय तोंपासू दिसतेय
वा अस्मिता काय तोंपासू दिसतेय भाजी. एक भाबडा प्रश्न..पालेभाज्या गाळ शिजवता का? असे केल्याने त्यातले पोषक तत्व मरते का?
मेधा ह्या रेसिपी चा खरंतर बाफं हवा इथे हरवून जाईल..
बटाटेवड्याची रेसिपी शोधते आहे
बटाटेवड्याची रेसिपी शोधते आहे.
इथे एक होती त्याने खूप मस्त व्हायचे.
त्यातील एक टीप आठवते आहे की, अर्धवट तळून परत तळायचे.
बाकी प्रमाण आठवत नाहीये.
कोणाला आठवते आहे का ती रेसिपी?
लालू/ लोला आयडीचा तू तळ मी
लालू/ लोला आयडीचा तू तळ मी खाणार आहे नावाने होता एक बीबी.
एकदम परफेक्ट , easy आणि हिट रेसिपी आहे इथे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/31123 ही लालूची रेसिपी . मी कधी केले नाहीत पण तिने केलेले खाल्ले आहेत बरेचदा . एकदम पर्फेक्ट होतात ( तिच्या हातचे )
मी केलेही आहेत आणि भारी
मी केलेही आहेत आणि भारी होतातच!
बेसनाच्या लाडूची रेसिपी हवी
बेसनाच्या लाडूची रेसिपी हवी आहे, साखरेच्या पाकातली. कुणी सांगू शकेल का प्लीज?
कोकणातल्या कुठल्या भागात
कोकणातल्या कुठल्या भागात भातावरचं पिठलं हा प्रकार करतात?
विष्णू मनोहर ना, मागे मी
विष्णू मनोहर ना, मागे मी बघितला हा व्हिडिओ पण माहेर संगमेश्वर तालुका, सासर देवगड तालुका या भागात तरी ऐकलं नाहीये. त्यांनी बेसन, कुळीथ दोन्ही दाखवलं आहे वेगवेगळ्या भागात. असं माहिती नव्हतं, एकदा करून बघेन म्हटलं तर लक्षात रहात नाही, भात आणि पिठलं वेगवेगळ्या भांड्यात करायची सवय असल्याने तसंच केलं जातं. मी भात बरेचदा नुसता पातेलीत करते, तरीही असं करून बघायला विसरते. कोकणात कधी बघितलं किंवा ऐकलं नाही मी असं.
Sneha1पारंपारिक बेसनाचे लाडू
Sneha1पारंपारिक बेसनाचे लाडू ची रेसिपी आहे माबोवर .पाकातलेच फक्त बेसन लाडू ची रेसिपी नाहीये बहुतेक पण पाकातले रवा बेसन लाडू ची रेसिपी ही https://www.maayboli.com/node/30046
पाकातले बेसन लाडू सहसा पाक घातला की मिश्रण लगेच कडक होते लाडू वळता येत नाहीत मी त्यामुळे मी बेसनाच्या पाकातल्या वड्या करते या युट्युब रेसिपीने https://youtu.be/X4EZ3_H71Zk?si=XW_kVnYYzLkZ3D50 यातही थोडा रवा घातलाय.
धन्यवाद सिमरन. बघते मी लिंक.
धन्यवाद सिमरन. बघते मी लिंक.
दलियाचा उपमा करायचा आहे पण
दलियाचा उपमा करायचा आहे पण कुकरमध्ये नाही तर पाण्याचे प्रमाण काय घ्यायचं? आणि दलियाची खिचडी कशी करता? धन्यवाद.
मऊसर हवा असेल तर तिप्पट पाणी.
मऊसर हवा असेल तर तिप्पट पाणी. तांदळाची करतो तशीच करते पण पातळसर करते भरपूर भाच्या घालून. एक वाटी दलियाला पाऊणवाटी मिक्स डाळी.
धन्यवाद मंजूताई. बघते करून.
धन्यवाद मंजूताई. बघते करून.
आज केला दलियाचा उपमा. मंजूताई
आज केला दलियाचा उपमा. मंजूताई, परफेक्ट झाला त्या प्रमाणात. आता खिचडी करून बघेन. परत एकदा धन्यवाद.
Pages