लेमन टी, लेमन राइस, लेमन पेपर चिकन कँडीड लेमन, लेमन केक........ तोंपासु आंबट चिंबट मसालेदार मेनु ना!! हा पुणे- मुंबईतील कोणत्यातरी फॅन्सी इन्स्टा ग्रामेबल बिस्त्रोतला नाही. कोकणातील खेड्यातील जीवन पद्धती व रेसीपी दाखविणार्या रेड सॉइल स्टोरीज ह्या युट्युब चॅनेल वरचा एक भाग आहे. अश्या चॅनेलचा एक ठरावीक प्रेक्षक वर्ग आहे. मी ही काही दिवस होते पण मग ह्यातील सारखे पणा, तोच तोच पणा व एक्सेल शीट शिस्टिम लक्षात आल्यावर हवाच गेली.
पण समजा तुम्ही बेल्जिअम, आइस लँड न्युझिलंड कुठेतरी जगाच्या कोपर्यात बर्फाळ हवेत, अजून बर्फाळ ऑफिसात बसून नीरस डेटा वर काम करत आहात, जीरा मेसेजेस नी इ मेल भरून गेलेली आहे. घरी जाउन तेच बेचव जेवण जेवायचे आहे अश्या परिस्थितीत घरी गेल्यावर हे भारतीय उन्हे, शेते त्यात टुमदार घर, फळझाडे फुलझाडे, लगबगीने काम करणारी एक स्त्री साडीच नेसलेली. नाकी डोळी नीटस पण इत की ही सुरेख नाही की पाककृतींवरचे लक्ष उडून तुम्ही तिलाच बघत बसाल. ही सुती साडी नेसून असते. कधीच कॅमेरात बघत नाही. एकतानतेने घरात फक्त आणि फक्त स्वयंपाक करत राहते. हिचा हाप्पँट घातलेला नवरा/भाउ अधून मधून येउन मदत करतो व काही पन्हे सरबत सोलकढी टाइप बनवतो सुद्धा. पोर नसते असले तर कधी मधीच दिसते व लाडाने त्याला खाउ घालतात. कोण भारतीय विरघळून जाउन बघणार नाही सांगा!! सोब त अनेक पारंपारिक पाककृती. जरी आपण उबर इट्स स्विगी झोमाटो करत असलो तरी त्या बघत बघत खायला मात्र मजा येते बाई.
ह्या सर्व चॅनेलांची आजी ली झिकीच आहे. हिच्या चॅनेल वर एक स्वतंट्र बाफ आहे तो बघून घ्या. फारच आकर्षक पद्धतीने ही मुलगी शेती व स्वयंपाक करायची. अजूनही करते. मन मोहक असे हे चिनी सरकारतर्फे बनवलेले व्हिडीओ अगदी आसूस्सून बघितले. देन केम कोविड व चीनचे खरे विदारक रूप दिसले. एकाच इन्ग्रेडिअंट चे अनेक पदार्थ हे ह्या व्हिडीओज चे व्यवच्छेदक लक्षण. बटाटा/ लसूण/ शेंगदाणे...
मग त्याचे बरेच कॉपी कॅट चॅनेल्स अल्गोरिथम डोळ्यावर आदळू लागला. ट्रॅडिशनल लाइफ/ ट्रॅडि शनल मी असली नावे असतात. अगदी श्रीलंकेतील स्वयंपाकापासून ते तमीळ तेलुगु व केरला मधील खेड्यातील जीवन बघता येउ लागले. आपल्याकडे तात्याचा मळा, व्हिलेज कुकींग, गावरान एक अस्सल चव हे फेवरिट आहेत. ते मळा वाले व गावरा न वाले खरंच शेतातच स्वयंपाक करतात. सुक्के मटन चिकन व थालिपीठे झुण के मजेशीर असतात. सर्व चॅनेल मध्ये बायकाच स्वयं पाक करतात व पतीस अगदी प्रेमाने जेवु घालतात. ( फिर प्रॉब्लेम क्या है?!) भै वा. जिस घरमे घरकी लडकिया और औरते खाना खिलाए वौही घर घर है असे संस्कारी भाईसाब म्हणूनच गेले त.
तमीळ तेलुगु वाल्या बायका काही ही रेसीपी असली की लगेच पाटा वरवंटा रुब्बु गुंडा घेउन बसतात. भांडी सुद्धा अट्टहासाने मातीचीच व चुलीवरच स्वयंपाक. लाकुड फाटा तोडण्या पासून सुरुवात. मध्येच नटी देवघरात दिवा लाव. गाईला कुरवाळ असे लाडीक आविर्भाव करत असते. वॉट्स नाट टु लाइक. कायम मान खाली व सुपात घेउन तांदूळ निवडत राहते. मध्येच उंबर ठ्यावर डोके ठेउन निजते. ब्रेक झाला की लगेच हिच्या नशिबी वरुटा( वरवंटा!!) रात्रीचे जेवण करयला कटिबद्ध!!! तमीळ बाईच्या पोळ्या जाम विनोदी आहेत. घडी नाहीच. पण नवरा आव्डीने खातो. ( पर डे वर असणार हे लोक्स) अधुन मधून हातानेच गजरा करून माळते. सर्व कसे अगदी हवे हवेसे.
सर्व व्हिडीओ इतके पॉलिश्ड प्रोडक्षन आहेत की नजर हटत नाही. काय ती स्वच्छ भांडी, चुलीवर स्वयंपाक करुनही एक डाग नाही. का कधी भांड्यांचा रगाडा घासायला नाही. खेड्यातले जीवन पण एक गटार दिसत नाही की कचरा. सारे कसे कल्पनेपेक्षाही सुंदर. मन मोहित करुन टाकते. पण एक आठवडा बघितले की सर्वातला एक्सेल शी ट टाइप तोच तो पणा जाणवतो.
कांद हयाती हे एक अझरबैजान मध्यील चॅनेल पण असेच आहे. इंट्रनॅशनल आवृत्त्ती. ह्यातले काका काकू मध्यमवयीन आहेत. व घर आउट डोअर किचन एकदम सो प्रिटी सो लव्हली. पन आजकल कौन करता यार इतना!! असे म्हणावॅसॅ वाट्ते. सर्व चॅनेल वर रेसीपीच्यामध्ये घरातील प्राणी, फिश फुले पाने फळे ह्यांचे इतके भारी शॉट्स असतात की टू बीएच के मध्ये राह णारा प्रेक्षक नक्कीच वेडा होईल व वीकेंड ला हायवेला लागून असलेल्या इको रिजोर्ट चे बुकीं ग करून टाकेल. जोडीला ट्रॅडिशनल पण मोनोटोनस संगीत.
रेड सॉइल बाई काळ्या वाटाण्याची उसळ, खोबर्याची कापा शिरवाळे बनव्ते पण आज एक परफेक्ट लेमन केक पन दिसला. श्रिलंकेतील फ्रॉक वाली मुलगी एक इतका जबरदस्त चॉकोलेट केक बनवते की थिओब्रोमा मध्ये पण मिळणे अवघड आहे लेझी बम्स ना.
इथे कधी सासू सासरे येउन छळत नाहीत. आयत्यावेळी पाव्हणे नाहीत( रेड सॉइल वाली बाई करते पण केळ वणे. - अर्धा दिवस त्या किचन मध्ये घालवून) नवरा दारू पिउन मारत नाही कि मुले फोन मध्ये डोके खुपसून बसत नाहीत. अगदी आदर्श व्यवस्था. बायकानी हाताने व जुन्या पद्धतीने स्वयंपाक करण्याचे ग्लोरिफिकेशन!!! एक प्रकारे ग्रेट इंडिअन किचनच हे. मग मी वैतागून अजय चोप्रा नाहीतर रणवीर ब्रार कांदा टोमाटो ची ग्रेवी हजारव्यांदा करताना बघते. ते नोर्थ इंडिअन बाप्ये बोलताना मध्येच हॅ हॅ करतात तेव्हा पार फुटायला होते. स्वयंपाक ही आजकाल बघायची कला झालेली आहे ह्या हजारो कुकिंग चॅनेल्स मुळे. कधी कधी एखादी अनवट रेसीपी मिळून ही जाते.
भारताला लागून असले ले पाकिस्तानातले वाळवम्टी प्रदेश व तेथील लोकांचे जीवनही असेच दाखवणा रे चॅनेल आहेत. इथे थोडा पंजाबी प्रकार आहे. मथणीने दही घुसळून ताक काढायचे व लोणी साखर ह्या व्हिडीओ वाल्या ला हातात द्यायचे की तो लगेच वा क्या टेस्ट है बुनि यादी जायका म्हनत बोटे चाट णार. रेड सॉइल स्टोरी मधली बाई आंबोळीचे पीठ दळायला जात्यावरच डिरेक्ट व ओव्या गात गात स्वप्नातच हरवली.
तर पाकिस्ता नी खेड्यातली बाई ह्यांना पराठे करून घालायचे तरी पार जात्यावर पीठ दळ ण्या पासून सुरुवात. पण भातात घालायला फूड कलर असतात!!! मग अर्धा दिवस चुलीवर खटपट करून चार मोठे पराठे व हंड्यात शिजवलेले साग बनवून वाढणार चार बाप्यांना. ते काचेच्या प्लेटीत. तेही लाजत लाजत.
हाइट म्हणजे परवा असे च सर्फ करताना एक सिमिलर भोज पुरी चॅनेल दिसले. ती बाई गावाकडे चिली पनीर बनवत होती. ऐसा भी होता है.
म्हणून मी अग्निहोत्र लावले. ( हीच पंचलाइन आहे.)
स्मिता, सहमत
स्मिता, सहमत
स्मिता मॅडम तुमच्या मताशी
स्मिता मॅडम तुमच्या मताशी पूर्ण सहमत.
त्यांच्या व्हिडिओ मुळे कोणाचेच जीवन धोक्यात येत नाही.
त्यांच्या व्हिडिओ मुळे कोणाचीच फसवणूक होत नाही.
मग उगाचच त्या व्हिडिओ वर लेख लिहण्याची काही गरज नाही.
ते पण असू ध्या.
पण ज्यांनी लेख लिहला आहे त्यांस भारतीय खेड्यांची पूर्ण माहिती पण नाही.
स्वतःलाच आज ची खेडी माहीत नाहीत त्यांनी त्या वर लेख लिहणे खरे तर अयोग्य आहे.
स्पष्ट मत हेच आहे माझे.
पेरु, जग किती लहान आहे ना.
पेरु, जग किती लहान आहे ना. आंबोलीसारख्या लहान गावातुन ॲास्ट्रेलीयात कायम राहायला गेलेले दोघे आहेत. एक
सावंत कुटुंब दुसरे राऊत असावेत बहुतेक. राऊतांना भेटले}लेय. माझी भाचीपण आता तिकडे गेलीय.
स्मिता श्रीपाद, सहमत. इथे
स्मिता श्रीपाद, सहमत. इथे मझ्या गावातही एक व्लोगर आहे, तो सतत ह्यातच बिझि असतो.
त्याचे लाइक्स वाढवा प्लिज, आणि जे दाखवले ते खरे आहे. सेटप नाही.
https://youtu.be/7HmtnOxl0zM
साधना जी नी जो व्हिडिओ पाठवलं
साधना जी नी जो व्हिडिओ पाठवलं आहे त्या वरून अंदाज आला असेल गाव पण हल्ली हायटेक झाली आहेत>>>>>>
कुठलेच अंदाज बांधताना पुर्ण परिस्थिती लक्षात घ्या आणि अंदाज बांधा.
माझ्या गावात १२ वाड्या आहेत, त्यापैकी फक्त ३ वाड्यांमध्ये २४ तास ४ जी इन्टरनेट मिळते. काही वाड्यांवर २/३ जी मिळते. काही वाड्यांवर कुठलेही नेट्वर्क मिळत नाही. आणि लॅपटोपसाठी ४जीच लागते.
४ जी असलेल्या वाडीत मी राहात असल्यामुळे मला २४ तास हव्या त्या स्पिड्ने नेट आहे. म्हणुन मी इथे राहु शकतेय. आज शेती व ऑफिस दोन्ही करतेय ते केवळ नेटच्या जीवावर.
माझे शेत दुसर्या वाडीत आहे जिथे ४जी नेट खुप विक आहे. त्यामुळे तिथे बसुन ऑफिस करता येत नाही. ऑफिसच्या कामाला जास्त प्राधान्य द्यावे लागते, त्यामुळे शेत ते घर अशा फेर्या मारण्यात पेट्रोल खर्च वाढतो.
इतर वाड्यातिल वर्क फ्रॉम होम करणारी मंडळी आमच्या वाड्यांमध्ये दिवस्भर येऊन कोणाकडेतरी बसतात. गावाला असे चालते. चौकुळ गावातही लॅपटॉप चालेल असे नेट नाही, तिथले काहीजण ऑन्लाईन कामासाठी आंबोलीत येऊन बसतात.
सांगणे इतकेच की सर्वत्र सारखी परिस्थिती नाही. मला परवडते म्हणुन मी १४०० रु वाला खासगी गॅस वापरते. गावातील माझ्या चुलत भावंडांच्या घरी ११०० रु वाला सरकारी गॅस असला तरी रोजचा पुर्ण सैपाक चुलींवरच होतो. घाईत काय करायचे असेल तर, चुलीवर आधीचे काही शिजत असेल तरच गॅस वापरतात, कारण परवडत नाही. लाकडे रानात जाऊन आणतात, ती फु़कट मिळतात, आणायचेच काय ते श्रम.
वरवर जे चित्र दिसते त्यावरुन पुर्ण चित्र असेच असेल हा अंदाज बहुतांश खोटा ठरतो.
साधना,
साधना,
खरंच वास्तवदर्शी चित्र.दोन्ही टोकाची परिस्थिती असेल इंटरनेट असलेल्या आणि नसलेल्या कोपऱ्यात.
स्मिता +1
स्मिता +1
आम्ही पूर्ण फॅमिली जेव्हा
आम्ही पूर्ण फॅमिली जेव्हा एकत्र गावी असतो तेव्हा.
बंबात च आंघोळी चे पाणी गरम करतो.
(बंब म्हणजे तांब्याचे एक भांडे त्याच्या मधोमध एक पोकळ hole असते त्या मध्ये लाकड पेटवली जातात.)
गॅस वापरत नाही.
घराच्या मागे बाफळी ची मोठी तीन चार झाडे आहे.
वर्ष आड त्याच्या फांद्या तोडव्याच लागतात.
खुप लाकड उपलब्ध असतात.
त्याचा वापर होतो.
पण मस्त वाटते सकाळी उठून अंगणात तो उद्योग करायला
तिला एखाद्या व्हिडीओत तुला
तिला एखाद्या व्हिडीओत तुला हॅलो करायला सांगते थांब. >>> अग नको, मी काही लाईक सबस्क्राईब करत नाही कोणाला त्यामुळे ते ऑड होईल. असंच सहज बघितले जातात मग काही बघते. ती फार गोड आहे मात्र. छान आहे फॅमिली.
मी अशी चॅनल्स पहात नाही पण
मी अशी चॅनल्स पहात नाही पण स्मिताचा प्रतिसाद पटला.
चाकोरी बद्ध जीवना चे आकर्षण
चाकोरी बद्ध जीवना चे आकर्षण अबाधित आहे असे दिसते. ग्रेट इंडिअन किचनचेच मोठे स्वरूप आहे हा मुद्दा निसटलेला आहे. असो.
काल मधुराज रेसीपी बघून मेतकूट बनवले. खूप खूप खूप खूप छान झाले आहे व एकदम खूप खूप खूप सोपीच रेसीपी आहे. मजा आली.
कोणाला मेत कुट व डांगर हवे असल्यास संपर्क करा.
लेख आणि प्रतिसाद वाचनीय.
लेख आणि प्रतिसाद वाचनीय.
गावाकडे खरोखर चुलीवर बनवलेलं
गावाकडे खरोखर चुलीवर बनवलेलं जेवण किंवा पारंपरिक पदार्थांच्या खऱ्या गृहिणीने बनवलेल्या रेसिपीजचेही विडिओ काहीवेळा युट्यूब वर दिसतात पण त्यांना 200 - 400 असे व्यूज असतात . कारण खरं किचन यांच्या सेट एवढं देखणं नसतं , बाई रेखीव नसते , अधिक करून कळकटच असते , साधा कॅमेरा असतो , चिरणे कापणे यात नजाकत नाही , स्वच्छ उजेड नाही , सिनेमॅटोग्राफीचा तर कुठे लवलेशही नसतो . त्यामुळे ते सगळं डोळ्यांना देखणं दिसत नाही , मनाला रिलॅक्सिंग आणि आकर्षक वाटत नाही .
विलेज कुकिंगच्या लाखात सबस्क्रायबर्स असलेल्या चॅनेलवरच्या विडिओज वरच्या लोकांच्या कमेंट्स पाहिल्या तर - मला असंच रिलॅक्सिंग , शांत आयुष्य जगायला आवडेल असा सूर आढळतो . एक देखणी पण अजिबात खरी नसलेली कलाकृती बनवून ठेवली आहे त्याला लाखो लोक फसतात हे आश्चर्य वाटायला लावतं .
50 - 60 वर्षांपूर्वी मिक्सर वीज गॅस येण्यापूर्वी चुलीवर स्वयंपाक बनवला जाई , तेव्हाही बायकांचं आयुष्य रिलॅक्सिंग असणं शक्य नाही .
माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो पण आपण जे समोर कौशल्याने दाखवलं जातं त्याला फसतो , ते कुठलीही शंका न घेता खरं मानतो याचं हे विडिओज हे उत्तम उदाहरण आहे .
अगदी खरं राधानिशा.
अगदी खरं राधानिशा.
Yess.
Yess.
छान पोस्ट राधानिशा
छान पोस्ट राधानिशा
Perfect!!
Perfect!!
Pages