खेड्यातील जीवन व जेवण!!

Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2023 - 09:22

लेमन टी, लेमन राइस, लेमन पेपर चिकन कँडीड लेमन, लेमन केक........ तोंपासु आंबट चिंबट मसालेदार मेनु ना!! हा पुणे- मुंबईतील कोणत्यातरी फॅन्सी इन्स्टा ग्रामेबल बिस्त्रोतला नाही. कोकणातील खेड्यातील जीवन पद्धती व रेसीपी दाखविणार्‍या रेड सॉइल स्टोरीज ह्या युट्युब चॅनेल वरचा एक भाग आहे. अश्या चॅनेलचा एक ठरावीक प्रेक्षक वर्ग आहे. मी ही काही दिवस होते पण मग ह्यातील सारखे पणा, तोच तोच पणा व एक्सेल शीट शिस्टिम लक्षात आल्यावर हवाच गेली.

पण समजा तुम्ही बेल्जिअम, आइस लँड न्युझिलंड कुठेतरी जगाच्या कोपर्‍यात बर्फाळ हवेत, अजून बर्फाळ ऑफिसात बसून नीरस डेटा वर काम करत आहात, जीरा मेसेजेस नी इ मेल भरून गेलेली आहे. घरी जाउन तेच बेचव जेवण जेवायचे आहे अश्या परिस्थितीत घरी गेल्यावर हे भारतीय उन्हे, शेते त्यात टुमदार घर, फळझाडे फुलझाडे, लगबगीने काम करणारी एक स्त्री साडीच नेसलेली. नाकी डोळी नीटस पण इत की ही सुरेख नाही की पाककृतींवरचे लक्ष उडून तुम्ही तिलाच बघत बसाल. ही सुती साडी नेसून असते. कधीच कॅमेरात बघत नाही. एकतानतेने घरात फक्त आणि फक्त स्वयंपाक करत राहते. हिचा हाप्पँट घातलेला नवरा/भाउ अधून मधून येउन मदत करतो व काही पन्हे सरबत सोलकढी टाइप बनवतो सुद्धा. पोर नसते असले तर कधी मधीच दिसते व लाडाने त्याला खाउ घालतात. कोण भारतीय विरघळून जाउन बघणार नाही सांगा!! सोब त अनेक पारंपारिक पाककृती. जरी आपण उबर इट्स स्विगी झोमाटो करत असलो तरी त्या बघत बघत खायला मात्र मजा येते बाई.

ह्या सर्व चॅनेलांची आजी ली झिकीच आहे. हिच्या चॅनेल वर एक स्वतंट्र बाफ आहे तो बघून घ्या. फारच आकर्षक पद्धतीने ही मुलगी शेती व स्वयंपाक करायची. अजूनही करते. मन मोहक असे हे चिनी सरकारतर्फे बनवलेले व्हिडीओ अगदी आसूस्सून बघितले. देन केम कोविड व चीनचे खरे विदारक रूप दिसले. एकाच इन्ग्रेडिअंट चे अनेक पदार्थ हे ह्या व्हिडीओज चे व्यवच्छेदक लक्षण. बटाटा/ लसूण/ शेंगदाणे...

मग त्याचे बरेच कॉपी कॅट चॅनेल्स अल्गोरिथम डोळ्यावर आदळू लागला. ट्रॅडिशनल लाइफ/ ट्रॅडि शनल मी असली नावे असतात. अगदी श्रीलंकेतील स्वयंपाकापासून ते तमीळ तेलुगु व केरला मधील खेड्यातील जीवन बघता येउ लागले. आपल्याकडे तात्याचा मळा, व्हिलेज कुकींग, गावरान एक अस्सल चव हे फेवरिट आहेत. ते मळा वाले व गावरा न वाले खरंच शेतातच स्वयंपाक करतात. सुक्के मटन चिकन व थालिपीठे झुण के मजेशीर असतात. सर्व चॅनेल मध्ये बायकाच स्वयं पाक करतात व पतीस अगदी प्रेमाने जेवु घालतात. ( फिर प्रॉब्लेम क्या है?!) भै वा. जिस घरमे घरकी लडकिया और औरते खाना खिलाए वौही घर घर है असे संस्कारी भाईसाब म्हणूनच गेले त.

तमीळ तेलुगु वाल्या बायका काही ही रेसीपी असली की लगेच पाटा वरवंटा रुब्बु गुंडा घेउन बसतात. भांडी सुद्धा अट्टहासाने मातीचीच व चुलीवरच स्वयंपाक. लाकुड फाटा तोडण्या पासून सुरुवात. मध्येच नटी देवघरात दिवा लाव. गाईला कुरवाळ असे लाडीक आविर्भाव करत असते. वॉट्स नाट टु लाइक. कायम मान खाली व सुपात घेउन तांदूळ निवडत राहते. मध्येच उंबर ठ्यावर डोके ठेउन निजते. ब्रेक झाला की लगेच हिच्या नशिबी वरुटा( वरवंटा!!) रात्रीचे जेवण करयला कटिबद्ध!!! तमीळ बाईच्या पोळ्या जाम विनोदी आहेत. घडी नाहीच. पण नवरा आव्डीने खातो. ( पर डे वर असणार हे लोक्स) अधुन मधून हातानेच गजरा करून माळते. सर्व कसे अगदी हवे हवेसे.

सर्व व्हिडीओ इतके पॉलिश्ड प्रोडक्षन आहेत की नजर हटत नाही. काय ती स्वच्छ भांडी, चुलीवर स्वयंपाक करुनही एक डाग नाही. का कधी भांड्यांचा रगाडा घासायला नाही. खेड्यातले जीवन पण एक गटार दिसत नाही की कचरा. सारे कसे कल्पनेपेक्षाही सुंदर. मन मोहित करुन टाकते. पण एक आठवडा बघितले की सर्वातला एक्सेल शी ट टाइप तोच तो पणा जाणवतो.

कांद हयाती हे एक अझरबैजान मध्यील चॅनेल पण असेच आहे. इंट्रनॅशनल आवृत्त्ती. ह्यातले काका काकू मध्यमवयीन आहेत. व घर आउट डोअर किचन एकदम सो प्रिटी सो लव्हली. पन आजकल कौन करता यार इतना!! असे म्हणावॅसॅ वाट्ते. सर्व चॅनेल वर रेसीपीच्यामध्ये घरातील प्राणी, फिश फुले पाने फळे ह्यांचे इतके भारी शॉट्स असतात की टू बीएच के मध्ये राह णारा प्रेक्षक नक्कीच वेडा होईल व वीकेंड ला हायवेला लागून असलेल्या इको रिजोर्ट चे बुकीं ग करून टाकेल. जोडीला ट्रॅडिशनल पण मोनोटोनस संगीत.

रेड सॉइल बाई काळ्या वाटाण्याची उसळ, खोबर्‍याची कापा शिरवाळे बनव्ते पण आज एक परफेक्ट लेमन केक पन दिसला. श्रिलंकेतील फ्रॉक वाली मुलगी एक इतका जबरदस्त चॉकोलेट केक बनवते की थिओब्रोमा मध्ये पण मिळणे अवघड आहे लेझी बम्स ना.

इथे कधी सासू सासरे येउन छळत नाहीत. आयत्यावेळी पाव्हणे नाहीत( रेड सॉइल वाली बाई करते पण केळ वणे. - अर्धा दिवस त्या किचन मध्ये घालवून) नवरा दारू पिउन मारत नाही कि मुले फोन मध्ये डोके खुपसून बसत नाहीत. अगदी आदर्श व्यवस्था. बायकानी हाताने व जुन्या पद्धतीने स्वयंपाक करण्याचे ग्लोरिफिकेशन!!! एक प्रकारे ग्रेट इंडिअन किचनच हे. मग मी वैतागून अजय चोप्रा नाहीतर रणवीर ब्रार कांदा टोमाटो ची ग्रेवी हजारव्यांदा करताना बघते. ते नोर्थ इंडिअन बाप्ये बोलताना मध्येच हॅ हॅ करतात तेव्हा पार फुटायला होते. स्वयंपाक ही आजकाल बघायची कला झालेली आहे ह्या हजारो कुकिंग चॅनेल्स मुळे. कधी कधी एखादी अनवट रेसीपी मिळून ही जाते.

भारताला लागून असले ले पाकिस्तानातले वाळवम्टी प्रदेश व तेथील लोकांचे जीवनही असेच दाखवणा रे चॅनेल आहेत. इथे थोडा पंजाबी प्रकार आहे. मथणीने दही घुसळून ताक काढायचे व लोणी साखर ह्या व्हिडीओ वाल्या ला हातात द्यायचे की तो लगेच वा क्या टेस्ट है बुनि यादी जायका म्हनत बोटे चाट णार. रेड सॉइल स्टोरी मधली बाई आंबोळीचे पीठ दळायला जात्यावरच डिरेक्ट व ओव्या गात गात स्वप्नातच हरवली.
तर पाकिस्ता नी खेड्यातली बाई ह्यांना पराठे करून घालायचे तरी पार जात्यावर पीठ दळ ण्या पासून सुरुवात. पण भातात घालायला फूड कलर असतात!!! मग अर्धा दिवस चुलीवर खटपट करून चार मोठे पराठे व हंड्यात शिजवलेले साग बनवून वाढणार चार बाप्यांना. ते काचेच्या प्लेटीत. तेही लाजत लाजत.

हाइट म्हणजे परवा असे च सर्फ करताना एक सिमिलर भोज पुरी चॅनेल दिसले. ती बाई गावाकडे चिली पनीर बनवत होती. ऐसा भी होता है.
म्हणून मी अग्निहोत्र लावले. ( हीच पंचलाइन आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०२२, ला ३०५.५ मिलियन म्हणजे ३०.५ करोड lpg connections भारतात होती.
एका घरात चार माणसे पकडली तरी .
१२० करोड लोक गॅस वर चेच जेवण जेवतात.

हेमंत यांचे प्रतिसाद पटले.
शहरातल्या लोकांनी गॅस, मिक्सर, फ्रिज विकून गावात जाऊन रहावं आणि बायकोला रोज चुलीवर स्वैपाक करायला लावून आपण हाफपॅंटीत पडून रहावं असं सांगतात का त्या व्हिडिओजमध्ये?
काही लोकांना जंगलात जावून रात्र तिकडेच टेन्ट मध्ये काढावी असे वाटते.>> हो मला आवडतं. कोकणात जाण्याचं नशिबी नाही पण वर्षातून एकदा तरी कॅम्प ठोकून चूल नाही पण कोळसे पेटवून जे काही अर्धं कच्चं बनतं ते खायला मजा येते. त्याउलट काही लोकांना मॉल्स, आयफोन, फेसबुक, आजचं लेटेस्ट मीम यात मिळतो तो आनंद पुरेसा असतो. To each his own.

खुप चांगला व्यवसाय चालतो हा.
खुप लोकांस गावातील वातावरणात जावून दोन चार दिवस एन्जॉय करायला आवडत .
शहरातील रोज च्या जीवनाला कंटाळा येतो .
तेच ट्रॅफिक जाम, तेच प्रतेक ठिकाणी लाईन, घराची भिंत संपली की बाजूला दुसरे कुटुंब.
मोकळ्या जागेचा अभाव.
ह्याचा पण कंटाळा येतो .
.
प्रदूषित हवा, गोंगाट, हे पण नको वाटतं
मागे पुढे मोकळी जागा असणारे बंगले शहरात किती टक्के लोकांकडे आहेत.
गर्दी,गोंगाट पासून शांत जागी घर शहरात किती लोकांची आहेत.
अगदी नगण्य.
त्यांना वाटत ना .
वेगळ्या वातावरणात जावून काही दिवस तरी मनसोक्त राहावे

दुसरं म्हणजे गावाकडचं घर, अंगण, चुलीवरचं जेवण हे ज्यांनी पूर्वी स्वतः अनुभवलं आहे, त्यांना त्याची जी गोडी वाटते, ती कदाचित ज्यांचं संपूर्ण आयुष्य शहरात गेलंय त्यांना पूर्णपणे समजणार नाही. याबरोबर हेही आहे की ज्या माऊलीने चूल फुंकण्यात आयुष्य घालवलंय, तिला त्या गोडीपेक्षा गॅसवर स्वैपाक करण्याची सोय जास्त आवडेल.<<<< एकदम खर

चुलीवरचा स्वयंपाक <<< खूप लोकं कौतुक करतात, कदाचित चव / स्वाद छान येत ही असेल
पण त्या माउलीचे डोळे , तिची फुफ्फुस याचाही विचार व्हावा

लाकूड जाळणे <<< किती पर्यावरण विर्दी आहे याचाही विचार व्हावा

कधीतरी वर्षांतून एखाद्या वेळी सगळ्यांनी मिळून जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी, अनुभवण्यासाठी करणे ह्यात मजा आहे , असेल

पण चुलीवरचा स्वयंपाक, जात्यावरचे दळण, पाटयावरचे वाटण , खलबत्त्यातला कूट, विहिरीतलं रहाटाने काढायचं पाणी हे एक नॉस्टॅलजिया म्हणूनच छान आहे.

हे व्हिडिओस वाले लोकांच्या भावनांचा छान वापर करून घेतात ह अगदी खरं !
मी सगळे व्हिडिओ नाही बघितले, पण त वरून ताकभात.
हा धागा एकदम मस्त !

आणि लाकडे भार्‍यावर मिळतात, किलोवर नाही. गेल्या वर्षी दिडशे रु भारा होता. १०-१५ लांबलचक लाकडे असतात एका भार्‍यात. मला भारा उचलताही येत नाही, गावच्या स्त्रिया डोक्यावर घेऊन जंगलातुन येतात, त्या मेहनतीला १५०
खरेतर कमी आहेत. डोक्यावर वजन घेऊन चालणे शहरी लोकांना जमणार नाही. डोके सुन्न होते<<<< Sad Sad Sad

डोक्यावरून, कमरेवरून मैलोन्मैल बायकांना पाणी आणावं लागतं <<< त्याचंही ग्लोरिफिकेशन करून दाखवतील Sad Sad Sad

कोकण किंवा कुठलंही खेडेगाव तिथली कामं पर्यटक म्हणून अनुभवणे छान मजेचं असतं, तिथे कायम राहायचं तर कठीण त्यामुळे आता आधुनिक सोयी असताना चॉईस तिथे राहणाऱ्या लोकांना द्यावा. माझ्या सा बा गॅस अनेक वर्ष असतानाही चुल वापरावी, लाकडे घरची फुकट वगैरे मताच्या होत्या. जाऊबाई पोळ्या, दुपारचा चहा, रात्री वन मिल डिश गॅसवर करायच्या मताच्या होत्या. बरोबर होतं त्यांचं. सकाळी आंघोळीचे पाणी बाहेर चुलीवर तापवतात. गुरगुरीत भात, आमटी भात चुलीवर होतो.

सकाळी आंघोळीचे पाणी बाहेर चुलीवर तापवतात. <<<< आमच्या कडे पण गावाला. नारळाच्या पडलेल्या सुक्या झावळ्या, काथ्या, सुक्या फांद्या वापरतात .

मिक्सर मध्ये तयार केलेला मसाला आणि पाटा वरवंटा वापरून तयार केलेला मसाला ह्या मध्ये चवीत खूप फरक असतो.
Cooker मध्ये तयार केलेला भात आणि टोपात तयार केलेला भात.
चवीत खूप फरक असतो.
तंदुरी साठी तंदूर च लागतो .
ज्या मध्ये कोळसा वापरतात.
गॅस वर तंदुरी रोटी त्या दर्जा ची बनत नाही.
सोयी सुविधा खेडेगावात पण आहेत.
पण काही पारंपरिक पदार्थ हे उत्तम च असतात.
निराश, नीरस कसलेच छंद नसणारे बोअर लोकांसाठी .
ते व्हिडिओ यूट्यूब वर नसतात.
त्यांनी त्या व्हिडिओ च्या नादाला नाही लागायचं.

कुठल्या तरी दुर्गम भागात असणाऱ्या आदिवासी पड्याचे दृष्य डोळ्या समोर आणायचे आणि खेडे गाव आता अशीच आहेत असा भ्रम निर्माण करून घ्यायचा.
30 ते 40 वर्ष गावाशी संबंध च न ठेवणे .
त्या मुळे आज ची स्थिती खूप लोकांना माहीत नाही.
माझे गाव पण खेडेगाव च आहे.
पूर्ण गावात डांबरी रस्ता आहे.
घरात नळाने पाणी येते आणि फुल फोर्स नी दोन तीन तास असते.

आणी प्रतेक घरात आड पण आहेत .
वीज,टीव्ही, freeze आहे.
जवळ जवळ सर्व घरे rcc मध्ये आहेत.
घरटी बाईक आहे.
खुप मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्या आहेत.
क्लिनिक आहेत.
प्रतेक घरातील व्यक्ती कडे मोबाईल आहे.
तुम्ही कोणत्या दुनियेत आहात की तीस वर्ष पूर्वी जशी गाव होती तशी आज पण आहेत.
कोणी लाकडे तोडून,गोळा करून आणत नाही.

चूल, त्यातून येत राहाणारा मंद धूर, गोवऱ्या, सरपण, विहीर, रहाट, महिलांच्या डोक्यावरचे हंडे, कंबरेवरची गगरिया, पनिया भरन, गोठा, हंबरणाऱ्या गायी, घुंगुरवाली गुरे, धारोष्ण दूध ही सर्व पुरुषांच्या मनातली सुप्त स्वप्ने असावीत का? "सपीत मन के दुराए ( वराए, बराए) राखूं जो जा के पाऊं पिया की पतिया"!

मला पण अशी स्त्री घरात कायम कामे करत राहिलेली आवडेलच की. त्यात ती सुखी पण दाखवलेली आहे. ग्रेट इंडिअन किचनचाच युट्युब अवतार आहे. ग्लोरिफिकेशन. घरात एक पुस्तक नाही का तिला एक मैत्रीण नाही की काही ब्रेक नाही.

डिस्क्लेमरः बोडी किंवा कसलेही शेमिन्ग नव्हे वैयक्ति क मत लिहिले आहे.

मास्टर रेसी पी विषणू बुवांचा गुढी पाडवा थाली स्पेशल बघा. रेसीपी छानच आहेत. त्याबद्दल काहीच तक्रार नाही. पण नैवेद्याच्या पानात मीठ वाढत नाहीत. आमच्याकडे तरी पुण्याला मी ही कामे केलेली आहेत :-नैवेद्याचे ताट वाढणे नैवेद्य दाखवणे . त्यामुळे माहित आहे. आमच्या विदर्भात विदर्भात म्हणत पुरण पोळी साजूक तुपात चक्क तळली आहे. खरंच इतके हाय केलरी खातात लोक्स? असतील बापडे. पण बुवांचे ड्रेसिन्ग बघा. व स्टायलिन्ग एकदम मिड लाइफ क्रायसिस स्टँपड ऑल ओव्हर इट. शेफचा ड्रेस पण तोही जीन्स चा. किचन मध्ये एकदम निरुपयोगी. घाम येइल असा जाड आहे तो ड्रेस. व कॉलरला चक्क एक पट्टा आहे. ( मग लीश काढून ठेवली वाटते असा खोचक रिमार्क आला डोक्यात हलके घ्या फॅन्स.) व एका हातात ती रेड इंडिअन चेहर्‍याची मोठी अंग्ठी. दुसर्‍या हातात भले मोठे जाड कडे. व अजून एक अंग्ठी.
माझे काय म्हणणे तुम्ही कणीक वगैरे भिजवता ना तर त्या अंगठया नाही पाहिजे. व हाताचे - आर्म्स बोटे- केस काढलेले पाहिजे . क्लोजप मध्ये अगदीच इउ दिसते. थोडे नाजू क अ‍ॅक्सेसरीज दागिने घातले तर ओव्हरऑल इंपॅक्ट थोडा सॉफि स्टिकेटेड होईल. हे मा वै म. जिमिन ची होप ची जेवेलरी बघा एकदा. ह्यांच्या च्यानेल वर एक बाई पण येते डोक्यावर केसांची गाठ बांधलेली. हिचे स्टायलिन्ग पण अगदी गावाकड चे दिसते.
जरा टोन डाउन करता येइल. हे पण् पारंपारिक रेसीपी पारंपारिक भांड्यात करतात व फ्राय पावडर वगैरे केमिकल्स वापरतात. त्या बद्दल काही एक्स्प्लनेशन देत नाहीत. मी वि चारलेले होते एक दा.

आणी प्रतेक घरात आड पण आहेत .
वीज,टीव्ही, freeze आहे.
जवळ जवळ सर्व घरे rcc मध्ये आहेत.
घरटी बाईक आहे.
खुप मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्या आहेत.
क्लिनिक आहेत.
प्रतेक घरातील व्यक्ती कडे मोबाईल आहे.
तुम्ही कोणत्या दुनियेत आहात की तीस वर्ष पूर्वी जशी गाव होती तशी आज पण आहेत.
कोणी लाकडे तोडून,गोळा करून आणत नाही.
>>>>
हेमंत, तुम्ही सुखवस्तू, मध्यम वर्गाची गोष्ट करताहात. त्या पलीकडे एक वर्ग आहे ज्यांना गॅस परवडत नाही म्हणून चूल वापरावी लागते. चुलीसाठी लाकडे गोळा करणे, पावसाळ्यात ओल्या लाकडांमुळे धूर होणे वगैरे त्रास असतो. आणि जंगलात वणवा लागला की लाकडे भरमसाठ दराने विकत घ्यावी लागतात. डोंगरावर चढावर घर आहे म्हणून गावात नळ असला तरी हंडे भरून वहावे लागतात. त्या बायकांना उन्हाळ्यात चुलीवरचे जेवण म्हणजे वैताग असतो.
शहरी मध्यम वर्गाची फँटसि म्हणून ठीक आहे. जेवणाला स्मोकी फ्लेवरमुळे चांगली चवही येत असेल. पण नेहमीसाठी नकोच.

ममो, तो बोलताना लिस्पिंग करतो, त्यामुळे तो घोळवुन बोलतो असे तुला वाटले असावे. हा एक दोष आहे, उपाय बहुतेक नसावा किंवा तो करण्याची तातडीची गरज वाटत नसावी. >> ohhh, साधना , असं आहे होय ...

बाकी मला हेमंत यांचे प्रतिसाद पटले आहेत. गावाकडच्या सगळ्या लोकांची life style सगळ्या फ्रंटवर खूप बदलली आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ते मला आवडत नाहीये किंवा त्यांनी कायम पाट्यावर वाटावे कंदिलाच्या प्रकाशात रात्री काढाव्यात असे मला अजिबातच वाटत नाही पण मी खूप वेळा गावाला जात असल्याने बदल दरवेळी जाणवतातच.

>> गावाकडच्या सगळ्या लोकांची life style सगळ्या फ्रंटवर खूप बदलली आहे ही वस्तुस्थिती आहे. >> असणारच. शहरं किती बदलली आहेत. आमच्याकडे कोकणात खूप वर्ष चुलीवर सगळा स्वैपाक व्हायचा. पण सगळे मुंबईकर उठून जात असल्याने कुणालाच फार सवय नव्हती चुलीवरची. मग हळूहळू गॅस आला. मग शेणाच्या जमिनी जाऊन टाईल्स आल्या, मिक्सर आले. सोयी होणारच. आपल्याला चुलीवरच्या जेवणाची चव आवडत म्हणून किती वर्ष तेच शक्य आहे?

मला ही तेच वाटतय सायो जे तू लिहिलं आहेस. मी वर ही लिहिलं आहेच.
म्हणजे ते मला आवडत नाहीये किंवा त्यांनी कायम पाट्यावर वाटावे कंदिलाच्या प्रकाशात रात्री काढाव्यात असे मला अजिबातच वाटत नाही पण मी खूप वेळा गावाला जात असल्याने बदल दरवेळी जाणवतातच. >> मी फक्त बदल झालेत एवढंच म्हणतेय.

ममो, मी तुमच्या पोस्टच्या अनुषंगाने लिहिलं आहे, तुम्हांला उद्देशून नव्हे. गैरसमज नसावा. कालच लिहिणार होते पण जमलं नाही.

मुंबई ची स्थिती कशी बदलत गेली ते पण बघितले आहे .
८८/८९ च काळ.
१), जेवण स्टीव्ह वर बनवले जात असे.
तेव्हा गावात चुलीवर,कोळसा किंवा भाताच्या kondya च्या शेगडीवर,stove वर.
२), रेशन दुकान समोर मुंबई मध्ये सकाळी लवकर उठून लाईन लावायला लागायची,दूध फक्त सकाळी च दूध केंद्रावर मिळे
३) मुंबई मध्ये लहान लहान रूम च होत्या ,१०० पासून २२५ वर्ग फूट च्या त्या मध्ये दहा बारा माणसं हीच स्थिती होती.
गावी कच्ची घर होती.
मातीच्या भिंती, कौल मातीची, जमीन शेणाची .
दर वर्षी छत शेखरावे लागायचे पावूस सुरु होण्या अगोदर.
गायी ,म्हशी अगदी घरात च असतं.
४) मुंबई मध्ये ज्यांची लग्न झाली नाहीत ते बाहेर गटार वर khat टाकून झोपायचे.
वरून डास खालून उंदीर .
५) आता मुंबई मध्ये मोठ्या घरात लोक राहतात.
दहा माणसाचे कुटुंब लहान होवून तीन चार माणसाचे झाले.
सर्व सुख सोयी आल्या.
बदल तर खूप झाला.
६), त्या प्रमाणे गाव पण बदलली, जुनी माती ची घर जावून पक्की घर आली
चूल जावून गॅस आला.
गाड्या आल्या.
७), पण पूर्ण च शहर बदलली का ?
तर नाही.
आज पण मुंबई मध्ये झोपड्या आहेत.
अगदी खाडी मध्ये,वाहणाऱ्या गटार जवळ.
बिलकुल स्थिती न बदलेली लोक मुंबई मध्ये पण अजून शिल्लक आहेत
तशी गावात पण काही कुटुंब अजून जुन्या स्थिती मध्येच राहत आहेत.
पण सर्रास दिसणारी ती स्थिती आज नाही.

आपण मायबोलीवर फुकटात कळफलक बडवंती करत बसलोय आणि तिकडे पोरे कळफलक बडवंती करुन म्हैन्याचे अडिज लाख काडुन राहिले की वो..

https://youtu.be/9UsVyVaYQuY

रच्याकने, हेमंत ३३३ हा आइडी कुठच्या आयव्हरी टॉवरवर बसलाय याचे सतत औत्सुक्य वाटते. भारी उंच असणार हा टॉवर, तिथुन समग्र जगाच्या उंटावरुन शेळ्या आय मिन समग्र जगाचे ज्ञान मिळते.

तुम्ही आंबोली ना. आत्ता सहज youtube वर मूळचे आंबोलीचे श्री आणि संजीवनी सावंत यांचा ऑस्ट्रेलियातला vlog बघण्यात आला, त्यांनी आंबोलीचे ते सांगितलं आणि साधना मला पटकन तुम्ही आठवलात. त्यांना कोकणातील काहीजणांचे vlogs बघून vlogs करावेसे वाटले >>> ही माझी मैत्रिण आहे अन्जुताई.

धागा वाचत होते..मी फक्त रानमाणूस पाहिले आहे १-२ एपिसोड्स. बडेजाव न करता साधेपणाने शूट केलेला व्लॉग वाटला.
घरात एक पुस्तक नाही का तिला एक मैत्रिण नाही की काही ब्रेक नाही>>> हे जास्त होतंय असं मला वाटतंय.. मुळ उद्देश जर फूड व्लॉगिंग आहे तर तिचा पर्सनल आराम, मैत्रिणी किंवा छंद कशाला दाखवत बसतिल ते लोक?? हे कन्क्लुजन काढणं जास्त नाही का होत?

ती जर मिक्सर वापरायला लागली तर तिच्यात आणि आपल्यात काय तो फरक? मग तिचे चॅनेल कसे चालेल? Happy

अरे वा पेरू, मला पर्थ म्हटल्यावर तू आठवली होतीस, म्हटलं कधीतरी दिसशीलही, तू आणि ट्विन्स महाराष्ट्र मंडळ वगैरे ठिकाणी, अजून फार नाही बघितले.

काल त्या रेड सॉईलचा श्रीखंडाचा व्हिडिओ यूट्यूबवर सजेशनमधे आला. व्हिडिओग्राफी छान वाटली. पण लिझीकीची कॉपी असावी असं लगेचच वाटलं. लाकडी ट्रेमधून वस्तू आणून ठेवणं,शेतातून चालतानाची दृश्यं, कुत्रा वगैरे दाखवणं हे अगदी लिझीकीची आठवण करून देणारं. सगळा नाही बघितला, पण लिझीकी ती लिझीकी.
लिझीकी काय किंवा रेड सॉईल किंवा तत्सम लोक काय, नेत्रसुख म्हणूनच त्यांचे व्हिडिओ बघायचे. त्यात बघून पाककृती करण्यासाठी ते नाहीच. तिने चक्का करण्यासाठी दही फडक्यात बांधून तसंच ओट्यावर ठेवलं तेव्हा माझ्या मनात लगेचच 'आता इथे भरपूर केंबरं (चिलटं) जमा होणार' हाच विचार आला. Lol

मी नाही दिसायची गं शक्यतो तिच्या व्हिडीओत. ती बाकिच्या युट्युबर सारखी जिकडे तिकडे रेकॉर्ड करत बसत नाही ती. तिला एखाद्या व्हिडीओत तुला हॅलो करायला सांगते थांब.

<<<लिझीकी काय किंवा रेड सॉईल किंवा तत्सम लोक काय, नेत्रसुख म्हणूनच त्यांचे व्हिडिओ बघायचे. त्यात बघून पाककृती करण्यासाठी ते नाहीच>>>

एकदम सहमत ..

एखाद्याला ट्रोल करणं किती सोपं आहे नाई आजकाल ?
नाही आवडत व्हिडीओ तर नका ना बघु. पण तो व्हिडिओ किंवा चॅनेल कसा बकवास हे इतका मोठा लेख लिहुन क्रीटीसाईज करत बसायची खरच गरज आहे का ? बर गंमत म्हणुन लेख लिहिला इथवर ठीक आहे पण त्या बाई ला मैत्रिणीच कशा नाहित, ती पुस्तक बिस्तक वाचते का नाही हे जरा पर्सनल वाटले. ५-७ मिनिटात ती बाई आणी तिचा नवरा दिवसातले २४ तास काय करतात हे कसं दाखवतील ? बरं असं दाखवत बसलं तरी तुम्ही म्हणणार की फुड चॅनेल आहे तर हे काय भलतच दाखवत बसलेत. एकंदर काय तर आवडत नाही तर बघु नका.

३० सेकंदाचे रील बनवायला काय आणि किती कष्ट लागता ते एखाद्या ईंस्टा युजर ला विचारा. मग एक अख्खा पदार्थ बनवायचा, ते सगळं रेकॉर्ड करायचं, एडीट करायचं यात किती कष्ट असतील जरा विचार करुयात.

Pages