खेड्यातील जीवन व जेवण!!

Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2023 - 09:22

लेमन टी, लेमन राइस, लेमन पेपर चिकन कँडीड लेमन, लेमन केक........ तोंपासु आंबट चिंबट मसालेदार मेनु ना!! हा पुणे- मुंबईतील कोणत्यातरी फॅन्सी इन्स्टा ग्रामेबल बिस्त्रोतला नाही. कोकणातील खेड्यातील जीवन पद्धती व रेसीपी दाखविणार्‍या रेड सॉइल स्टोरीज ह्या युट्युब चॅनेल वरचा एक भाग आहे. अश्या चॅनेलचा एक ठरावीक प्रेक्षक वर्ग आहे. मी ही काही दिवस होते पण मग ह्यातील सारखे पणा, तोच तोच पणा व एक्सेल शीट शिस्टिम लक्षात आल्यावर हवाच गेली.

पण समजा तुम्ही बेल्जिअम, आइस लँड न्युझिलंड कुठेतरी जगाच्या कोपर्‍यात बर्फाळ हवेत, अजून बर्फाळ ऑफिसात बसून नीरस डेटा वर काम करत आहात, जीरा मेसेजेस नी इ मेल भरून गेलेली आहे. घरी जाउन तेच बेचव जेवण जेवायचे आहे अश्या परिस्थितीत घरी गेल्यावर हे भारतीय उन्हे, शेते त्यात टुमदार घर, फळझाडे फुलझाडे, लगबगीने काम करणारी एक स्त्री साडीच नेसलेली. नाकी डोळी नीटस पण इत की ही सुरेख नाही की पाककृतींवरचे लक्ष उडून तुम्ही तिलाच बघत बसाल. ही सुती साडी नेसून असते. कधीच कॅमेरात बघत नाही. एकतानतेने घरात फक्त आणि फक्त स्वयंपाक करत राहते. हिचा हाप्पँट घातलेला नवरा/भाउ अधून मधून येउन मदत करतो व काही पन्हे सरबत सोलकढी टाइप बनवतो सुद्धा. पोर नसते असले तर कधी मधीच दिसते व लाडाने त्याला खाउ घालतात. कोण भारतीय विरघळून जाउन बघणार नाही सांगा!! सोब त अनेक पारंपारिक पाककृती. जरी आपण उबर इट्स स्विगी झोमाटो करत असलो तरी त्या बघत बघत खायला मात्र मजा येते बाई.

ह्या सर्व चॅनेलांची आजी ली झिकीच आहे. हिच्या चॅनेल वर एक स्वतंट्र बाफ आहे तो बघून घ्या. फारच आकर्षक पद्धतीने ही मुलगी शेती व स्वयंपाक करायची. अजूनही करते. मन मोहक असे हे चिनी सरकारतर्फे बनवलेले व्हिडीओ अगदी आसूस्सून बघितले. देन केम कोविड व चीनचे खरे विदारक रूप दिसले. एकाच इन्ग्रेडिअंट चे अनेक पदार्थ हे ह्या व्हिडीओज चे व्यवच्छेदक लक्षण. बटाटा/ लसूण/ शेंगदाणे...

मग त्याचे बरेच कॉपी कॅट चॅनेल्स अल्गोरिथम डोळ्यावर आदळू लागला. ट्रॅडिशनल लाइफ/ ट्रॅडि शनल मी असली नावे असतात. अगदी श्रीलंकेतील स्वयंपाकापासून ते तमीळ तेलुगु व केरला मधील खेड्यातील जीवन बघता येउ लागले. आपल्याकडे तात्याचा मळा, व्हिलेज कुकींग, गावरान एक अस्सल चव हे फेवरिट आहेत. ते मळा वाले व गावरा न वाले खरंच शेतातच स्वयंपाक करतात. सुक्के मटन चिकन व थालिपीठे झुण के मजेशीर असतात. सर्व चॅनेल मध्ये बायकाच स्वयं पाक करतात व पतीस अगदी प्रेमाने जेवु घालतात. ( फिर प्रॉब्लेम क्या है?!) भै वा. जिस घरमे घरकी लडकिया और औरते खाना खिलाए वौही घर घर है असे संस्कारी भाईसाब म्हणूनच गेले त.

तमीळ तेलुगु वाल्या बायका काही ही रेसीपी असली की लगेच पाटा वरवंटा रुब्बु गुंडा घेउन बसतात. भांडी सुद्धा अट्टहासाने मातीचीच व चुलीवरच स्वयंपाक. लाकुड फाटा तोडण्या पासून सुरुवात. मध्येच नटी देवघरात दिवा लाव. गाईला कुरवाळ असे लाडीक आविर्भाव करत असते. वॉट्स नाट टु लाइक. कायम मान खाली व सुपात घेउन तांदूळ निवडत राहते. मध्येच उंबर ठ्यावर डोके ठेउन निजते. ब्रेक झाला की लगेच हिच्या नशिबी वरुटा( वरवंटा!!) रात्रीचे जेवण करयला कटिबद्ध!!! तमीळ बाईच्या पोळ्या जाम विनोदी आहेत. घडी नाहीच. पण नवरा आव्डीने खातो. ( पर डे वर असणार हे लोक्स) अधुन मधून हातानेच गजरा करून माळते. सर्व कसे अगदी हवे हवेसे.

सर्व व्हिडीओ इतके पॉलिश्ड प्रोडक्षन आहेत की नजर हटत नाही. काय ती स्वच्छ भांडी, चुलीवर स्वयंपाक करुनही एक डाग नाही. का कधी भांड्यांचा रगाडा घासायला नाही. खेड्यातले जीवन पण एक गटार दिसत नाही की कचरा. सारे कसे कल्पनेपेक्षाही सुंदर. मन मोहित करुन टाकते. पण एक आठवडा बघितले की सर्वातला एक्सेल शी ट टाइप तोच तो पणा जाणवतो.

कांद हयाती हे एक अझरबैजान मध्यील चॅनेल पण असेच आहे. इंट्रनॅशनल आवृत्त्ती. ह्यातले काका काकू मध्यमवयीन आहेत. व घर आउट डोअर किचन एकदम सो प्रिटी सो लव्हली. पन आजकल कौन करता यार इतना!! असे म्हणावॅसॅ वाट्ते. सर्व चॅनेल वर रेसीपीच्यामध्ये घरातील प्राणी, फिश फुले पाने फळे ह्यांचे इतके भारी शॉट्स असतात की टू बीएच के मध्ये राह णारा प्रेक्षक नक्कीच वेडा होईल व वीकेंड ला हायवेला लागून असलेल्या इको रिजोर्ट चे बुकीं ग करून टाकेल. जोडीला ट्रॅडिशनल पण मोनोटोनस संगीत.

रेड सॉइल बाई काळ्या वाटाण्याची उसळ, खोबर्‍याची कापा शिरवाळे बनव्ते पण आज एक परफेक्ट लेमन केक पन दिसला. श्रिलंकेतील फ्रॉक वाली मुलगी एक इतका जबरदस्त चॉकोलेट केक बनवते की थिओब्रोमा मध्ये पण मिळणे अवघड आहे लेझी बम्स ना.

इथे कधी सासू सासरे येउन छळत नाहीत. आयत्यावेळी पाव्हणे नाहीत( रेड सॉइल वाली बाई करते पण केळ वणे. - अर्धा दिवस त्या किचन मध्ये घालवून) नवरा दारू पिउन मारत नाही कि मुले फोन मध्ये डोके खुपसून बसत नाहीत. अगदी आदर्श व्यवस्था. बायकानी हाताने व जुन्या पद्धतीने स्वयंपाक करण्याचे ग्लोरिफिकेशन!!! एक प्रकारे ग्रेट इंडिअन किचनच हे. मग मी वैतागून अजय चोप्रा नाहीतर रणवीर ब्रार कांदा टोमाटो ची ग्रेवी हजारव्यांदा करताना बघते. ते नोर्थ इंडिअन बाप्ये बोलताना मध्येच हॅ हॅ करतात तेव्हा पार फुटायला होते. स्वयंपाक ही आजकाल बघायची कला झालेली आहे ह्या हजारो कुकिंग चॅनेल्स मुळे. कधी कधी एखादी अनवट रेसीपी मिळून ही जाते.

भारताला लागून असले ले पाकिस्तानातले वाळवम्टी प्रदेश व तेथील लोकांचे जीवनही असेच दाखवणा रे चॅनेल आहेत. इथे थोडा पंजाबी प्रकार आहे. मथणीने दही घुसळून ताक काढायचे व लोणी साखर ह्या व्हिडीओ वाल्या ला हातात द्यायचे की तो लगेच वा क्या टेस्ट है बुनि यादी जायका म्हनत बोटे चाट णार. रेड सॉइल स्टोरी मधली बाई आंबोळीचे पीठ दळायला जात्यावरच डिरेक्ट व ओव्या गात गात स्वप्नातच हरवली.
तर पाकिस्ता नी खेड्यातली बाई ह्यांना पराठे करून घालायचे तरी पार जात्यावर पीठ दळ ण्या पासून सुरुवात. पण भातात घालायला फूड कलर असतात!!! मग अर्धा दिवस चुलीवर खटपट करून चार मोठे पराठे व हंड्यात शिजवलेले साग बनवून वाढणार चार बाप्यांना. ते काचेच्या प्लेटीत. तेही लाजत लाजत.

हाइट म्हणजे परवा असे च सर्फ करताना एक सिमिलर भोज पुरी चॅनेल दिसले. ती बाई गावाकडे चिली पनीर बनवत होती. ऐसा भी होता है.
म्हणून मी अग्निहोत्र लावले. ( हीच पंचलाइन आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोंकणाची topography सगळीकडे समान नाही. खालाटीची वेगळी, वलाटीची वेगळी, समुद्रकिनारी समुद्रपातळीवरची वेगळी, समुद्रापासून थोडे पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी तळकोंकणातली वेगळी. उत्तर कोकण वेगळे, मध्य कोंकण वेगळे, दक्षिण कोकण वेगळे. भाताच्या जाती वेगवेगळ्या, शिजवलेल्या भाताच्या चवी वेगळ्या, भाजीपाला आणि त्याच्या चवी वेगळ्या. फळांच्या जाती आणि चवी वेगळ्या. स्वयंपाकाच्या पद्धती वेगळ्या. मात्र जवळपास ८०-९०% लोक मिश्राहारी, त्यातूनही मत्स्याहारी असतात. वलाटीत कोंबडी जराशी अधिक खाल्ली जाते तर खालाटीत मासेच अधिक. खाडीकिनारी शेल फिश अधिक. उत्तरेकडे चिंच अधिक तर दक्षिणेकडे सोलें अधिक, त्रिफळे अधिक. किनारपट्टीत आणि खालाटीत अळू, केळी, नारळ पोफळी अशा जास्त पाणी लागणाऱ्या वनस्पती अधिक. सह्याद्रीत उंचावर ( निचऱ्याच्या जमिनीत) भुईमूग, ऊससुद्धा होतो. सपाटीवरचे, डोंगरातले , कातळातले आंबे वेगवेगळे. उत्तरेकडे ठाणे आणि पालघरमध्ये बागायती फुलशेती आणि भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात होतो. चिकू, लिची, जांब, ताड गोळे ह्यांना मुंबई हे मोठे मार्केट असते. अगदी ओले शिंगाडेसुद्धा. पपई, केळी, अलकोल,गवार, चवळीच्या बिया, वांगी, वाल ( करंजीसारख्या चपट्या शेंगा - एका कुशीवर सरळ), जांभळट वाल (मेरढ ?) अबई, उन्हाळी सफेद कांदा वगैरे. अलीकडे इकडे प्रयोगशीलतेतून poly houses, pillar farming खूप झाली आहेत.
तर असे पुष्कळ वैविध्य आहे. मातीच वेगळी, मग पिके, माणसे वेगळीच असणार!
मात्र एक समान दुवा किंवा फॅक्टर म्हणजे मत्स्य Happy

@हीरा >>> पोस्ट फारच आवडली. कोकणी स्वयंपाक म्हटले की लोकांना एकतर उकडीचे मोदक किंवा एकदम मालवणी जेवण आठवतं.
पालघर, मुंबई (ओरिजिनल रहिवासी), रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील खाद्य संस्कृती (नारळ, तांदूळ, मासे (मांसाहारी लोकांसाठी) हे कॉमन फॅक्टर सोडल्यास ) एकमेकापासून वेगळी आहे. .
तुम्ही ते नेमकं सांगितलेत.

हिरा मस्त पोस्ट.

परत त्यात प्रत्येक समाजाची खाद्यसंस्कृती वेगळी, मसाले वेगळे. एकाच गावात राहणाऱ्या भिन्न समाजाची पद्धत सर्व बाबतीत वेगवेगळी असते. हयात त्या कोकणातला अमुक भाग म्हणजे असं, नाही. त्यातही अमुक समाज म्हणजे कोकणात सर्व सारखं असं नाही. माझं माहेर संगमेश्वर तालुका, सासर देवगड तालुका (सेम जात) पण काही पद्धतीत साम्य तर काही बराच फरक, सणासुदीला नैवेद्य मात्र कांदा लसणीचा दोन्ही कडे नसतो, उपास सोडतानाही कांदालसूण विरहित स्वयंपाक असतो. वाटण घाटण फक्त गरम मसाला आमटी करतो तेव्हाच असतं.

कोकणी रानमाणूस मात्र खरोखर मातीशी निगडीत जगतो असं वाटलं. त्याचं स्वयंपाकघर, चुल, तिथे वापरतात ती मातीची नसलेली भांडी, अंगणात बसून भाजीसाठी चिरलेला फणस हा माहोल अजुनही कोकणात आहे. सेटअप नाही वाटत. सासरी अश्याप्रकारेच दोन तीन जण अंगणात (खळ्यात) विळीवर फणसाची कुयरी चिरायला बसतात.

अंजू, सहमत.
बाकी कोंकणी माणसाच्या किंबहुना प्रत्येकाच्याच मनात लहानपणचं एक अंगण बागडत असतं. आणि कोंकण किंवा कोणताही जन्मप्रदेश तेवढ्यापुरताच म्हणजे ते अंगण किंवा त्या मळ्यापुरताच त्याला आठवत असतो. आणि तोच कुरवाळावा
असं त्याला वाटत असतं.. अगदी साहजिक आहे हे.
'मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे' असे म्हणणारा प्रतिभावंत विरळाच.

हीरा, छानच लिहिलं आहे.

गावाकडचें जेवण आणि जीवन हा विषय आणि हीरा यांचा प्रतिसाद वाचून बोरकरांची 'मासळीचा सेवित स्वाद दुणा ... इतुक्या लौकर येइं न मरणा' हे शब्द असलेली कविता आठवली.

ओह! कॉ-रा मुक्त असावे, पण खात्री नाही, त्यामुळे काढतो. वेळेत लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

कोकणी रान माणूस फार जड भाषेत बोलतो त्यामुळे नाटकी वाटतो मला. नेहमी वापरात नसलेले बोजड इंग्रजी शब्द उदा सस्टेनेबल ग्रोथ ही फारच वापरतो तो जे ऐकवत नाही. प्लस तो बोलतो ही तोंडात जीभ घोळवत घोळवत. म्हणून कोकणी रान माणूस वर माझी फुली.

मी फार नाही बघितलं त्याचं, काल एक बघितला. त्याने रेड सॉईलला प्रमोट केलं तो रेड सॉईल वाल्यांचा एपिसोड बघितलेला मागे.

आय मीन जस्ट किती भावनिक कढ त्या कोकणातील लाल माती, खापरोळी, शिरवाळ्या... ओके वी गेट इट. पुढे चला. लोक्स रामेन खाउन राहिलेत

तिथली बरीच लोकं त्यात अडकलेली असतात मात्र. सा बा आमच्या इथे आल्या की मला ढोकळा कर, ठेपले कर सांगायच्या. तिथे कोणी मला करायला सांगितलं तर म्हणायच्या इथे कोकणचे पदार्थ खा, तेच करायचे. अर्थात आता मोठे दिर सगळे आधुनिक पदार्थ करतात, करु देतात, अर्थात ते अनेक वर्ष मुंबईत होते म्हणून असेल पण मागच्या पिढीला तिथे फार नुडल्स, पास्ता आवडत नाही. नवीन मुलं एन्जॉय करतात पण त्यांचे आईवडील नाही. शहरात मात्र मागची पिढीही, निदान काही जण तरी हे एन्जॉय करताना दिसतात.

एनिवे पण तिकडे जास्त मजा येते फणसाची भाजी, आंब्याच्या रसाच्या पोळ्या, आंबा फणस सांदण (मी गोड फार नाही खात) काही टीपिकल खायला. मी मात्र काही दिवसच रमते तिथे, जास्त शहरात आवडतं. रातांबे फोडणं, साटं घालणं (हल्ली काही वर्ष मिक्सरवर आंब्याचा रस करतो यासाठी) अशी टीपिकला कामं लहानपणासून करायला आवडतात मात्र.

अवांतर मी आणि नवरा पास्ता पिझ्झा नुडल्स वगैरे वगैरे जाम एन्जॉय करतो, लेकरु तोंडात घेत नाही. त्याला आम्ही कोकणी भातबोकणी असं मजेने चिडवतो, रोज एकदा गुरगुरीत भात हवाच त्याला. एकंदरीत आमच्याकडे उलटी गंगा वाहते, हाहाहा.

समाजातील प्रत्येक घटकाा मध्ये बदल झाला आहे.
फक्त शहर च बदलली नाहीत तर गाव सुध्धा बादली आहेत.
शहरात जागेचा अभाव आणि प्रचंड गर्दी ह्या मुळे .
खुप मोठी मोकळी जागा, शांत वातावरण, वेगळ्या पद्धतीचा आहार ह्याचे आकर्षण आहे.
यूट्यूब वर त्याचेच मार्केटिंग केले जाते .सरळ आहे सेट पण असू शकतो,आकर्षक पना निर्माण व्हावा म्हणून थोडा मसाला पण टाकावा लागतो.
म्हणून ते व्हिडिओ चेश्टचे व्हिडिओ होवू शकत नाहीत.
प्रदेश नुसार आहार पद्धती बदलते हे सत्य च आहे.
पण मोकळी हवा,शांत वातावरण, हे च मूळ आकर्षण असते .
ते बदलत नाही.
चुलीवर चे जेवण,वाटून बनवलेले मसाले, निवास स्थान भोवती झाडी, असे वातावरण मात्र सर्व ठिकाणी असते.
व्यवसाय आहे तो .
तिथे असे वातावरण आहे म्हणजे पूर्ण गावात तासेच असेल असे समजणे हा भाभडे पना झाला.
वीज,मिक्सर,टीव्ही,गॅस,मोटुर गाड्या,हे गावागावात उपलब्ध आहे.
Ac,internet, सर्व काही उपलब्ध आहे.

ते खेड्यातल्या जीवनाचे वर्णन वाचून मला असं वाटतंय की मी पूर्णपणे शहरी झाले आहे, मला चुलीवरला स्वयंपाक करायला लावला तर मी दिवसभर किरकिर करेन. अजिबात कौतुक वाटत नाही त्या जीवनपद्धतीचं किंवा जेवणाचं. पुन्हा मागे जायचे नाही रे बाबा..! दस्तऐवज म्हणून वाचायला छान वाटतं इतकंच. (पैसे देऊनही) दुसऱ्या कुणी सुद्धा माझ्यासाठी चुलीवर करावं हेही पटत नाही. कारण स्वतः लागेल ती यंत्र आणून कमी वेळात व कमी कष्टात स्वयंपाक करायचा प्रयत्न असतो. कधीकधी बघते करमणूक म्हणून इतकंच. अशा पाककृतींचा उपयोग नसतो. बरेचदा मोठमोठ्या भांड्यात प्रमाण न देता केलेला पदार्थ असतो. किती वेळ शिजवायचे, आच कशी ठेवायची काहीच सांगितलेलं नसतं. अशा व्हिडिओंमधल्या अति नॉस्टॅल्जियाची शिसारी यायला लागलीये. गेले ते बरे झाले वाटावे अशा अनेक गोष्टीसाठी काय विव्हळतात लोक काय माहिती.!

नुसते व्हिज्यूअल बेस्ड व्हिडिओ असतात. एक रितेपणा आहे ह्या सगळ्या यूट्यूब चॅनल्समधे.
प्रतिसाद आवडले. (हीरा व अंजूताई चांगले लिहिलेय.)

आवड असते.
पावसात ताडपत्री बांधून डोंगरात जेवण करायला वेगळीच मजा येते.
त्या साठी आवड लागते.वेगळेपण ,thril ह्यावा anubhsv घेण्याचा

रिअलिटी कडे दुर्लक्ष करून प्रतिसाद देवू नका.
चुली वरचे जेवण आर्थिक बाबतीत पण परवडणार नाही.
११०० रुपयाचा गॅस तीन माणसांना दीड महिना पुरतो.
दीड महिना तीन माणसाचे जेवण चुलीवर बनवण्यासाठी खूप जास्त खर्च येईल.
लाकड कीलोवर मिळतात.
घरात वीज सवलतीत मिळते म्हणून गिझर परवडतो.
कमर्शियल विजेचा दर लावला तर गिझर चालू करायला भीती वाटेल.

Italian is so done with. Japanese and South Korean is trending. And readily available in Mumbai atleast.

नॉस्टॅल्जिया हा तोंडी लावण्यापुरताच चांगला असतो. तेच मुख्य जेवण म्हणून जेवायला लागलं तर चालणार नाही.

पूर्वी आपण काय छान छान पत्रं लिहायचो..ती मजा फोनमध्ये नाही, व्हॉट्सॲपमधे तर नाहीच..हे बरोबर आहे, पण ते तेवढंच. संपर्काची आधुनिक साधनं पूर्ण बाजूला ठेवून फक्त पत्राने संपर्क ठेवायचा म्हटलं तर ते आपल्याला आवडेल का?

दुसरं म्हणजे गावाकडचं घर, अंगण, चुलीवरचं जेवण हे ज्यांनी पूर्वी स्वतः अनुभवलं आहे, त्यांना त्याची जी गोडी वाटते, ती कदाचित ज्यांचं संपूर्ण आयुष्य शहरात गेलंय त्यांना पूर्णपणे समजणार नाही. याबरोबर हेही आहे की ज्या माऊलीने चूल फुंकण्यात आयुष्य घालवलंय, तिला त्या गोडीपेक्षा गॅसवर स्वैपाक करण्याची सोय जास्त आवडेल.

पुण्यात वाड्यातल्या दोन खोल्यांच्या घरात आपण दहाबारा जण कसे आनंदाने रहायचो, या आठवणी, 'आठवणी' म्हणूनच ठीक असतील. परत तसं रहायला लागलं तर किती दिवस आनंदाने राहू?

आवड म्हणून त्या व्हिडिओज कडे बघा.
काळ पाठीमागे कधीच जात नाही पुढे च जातो.
एक दिशा मार्ग आहे तो.
पण प्रसंगाची पूर्णार्वृती होवू शकते.
आता चूल, पाटा वरवंटा,रॉकेल चे दिवे, परत कसे येतील..

वीज पूर्ण बंद करून candle light dinner च विंचू चावतो ना लोकांना.
म्हणून त्याचा अर्थ हा थोडे आहे की त्यांस कँडल्स आवडतात.
विजेचे दिवे आवडत नाहीत

Candles light dinner, जेवणाच्या table वर फुलांच्या सजावटी.
लाकडी interior, .
जुन्या अंटिक वस्तू .
अशी आवड असणारे कमी नाहीत.
आवड असते .
प्रत्येकाची वेगळी.
काही लोकांना जंगलात जावून रात्र तिकडेच टेन्ट मध्ये काढावी असे वाटते.

कोकणी रानमाणुस साधा आहे, स्वत;चे चॅनेल प्रमोट करण्यापेक्षा त्याला कोकणाबद्दल तळमळ आणि तिथे होत असलेल्या र्‍ह्यासाबद्दल खरी तड्फड आहे. आंबोलीत खुपदा येतो, मी भेटलेय.

ममो, तो बोलताना लिस्पिंग करतो, त्यामुळे तो घोळवुन बोलतो असे तुला वाटले असावे. हा एक दोष आहे, उपाय बहुतेक नसावा किंवा तो करण्याची तातडीची गरज वाटत नसावी.

वावे, सहमत. आमच्या गावी चुली बासनात बांधुन आता सगळे गॅस वापरु पाहतात. (तरी लाकडे गोळा करायची भुक मेलेली नाही.) हायवेवर सर्वत्र चुलीवरचे अमुक / ढमुक असले बोर्ड वाचुन माझी भारी करमणुक होते. Happy

आणि लाकडे भार्‍यावर मिळतात, किलोवर नाही. गेल्या वर्षी दिडशे रु भारा होता. १०-१५ लांबलचक लाकडे असतात एका भार्‍यात. मला भारा उचलताही येत नाही, गावच्या स्त्रिया डोक्यावर घेऊन जंगलातुन येतात, त्या मेहनतीला १५०
खरेतर कमी आहेत. डोक्यावर वजन घेऊन चालणे शहरी लोकांना जमणार नाही. डोके सुन्न होते. मी गावी सगळी कामे करुन्पाहायचा प्रयत्न करते, हे करायची हिम्मत नाही. बिपि वाढुन मरेन उगिच Happy

हसावे की रडावे तेच कळत नाही.
शहरात राहतो म्हणजे खेडेगाव ही दुसऱ्या ग्रह वर वसली आहेत .
असे वाटत एक एक प्रतिसाद वाचून.

महाराष्ट्र मध्ये अगदी किरकोळ गावात लाकडे गोळा करून ते विकण्याचे काम माणसं करत असतील.
अगदी नगण्य ही संख्या आहे.
घरोघरी,ghedopadi आता गॅस आहे.

Pages