ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.
पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.
त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.
लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..
पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.
चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.
पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!
या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.
आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.
त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.
सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे )
वीएफएक्स आणि अॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली )
अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.
जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.
दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.
बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.
आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.
ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.
मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा
तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.
अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.
असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्या पब्लिकला दोन विशेष टिप्स -
१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.
२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा
धन्यवाद,
ऋन्मेष
तेरी मेहेर्बानिया शब्बीर
तेरी मेहेर्बानिया शब्बीर कुमार मुळे चालला !
विकु आले! विकुंकडे शब्बीर
विकु आले! विकुंकडे शब्बीर कुमारचा पिक्चर आला की बेल वाजते बघुतेक.
तेरी मेहरबानी या फक्त
तेरी मेहरबानी या फक्त कुत्र्या मुळे चालला.>> बरोबर बोललात सर तुम्ही. मेने प्यार किया कबुतरामुळे आणि शोले घोड्यांमुळे गाजला हे पण छुपे सत्य आहे.
चित्रपट पहिला नाही पण हिट्
चित्रपट पहिला नाही पण हिट् झाला याचा आनंद आहे.. नकारात्मतेवर सकारात्मता भारी पडली. लेखाचे टायटल अत्यंत योग्य आहे .
माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे
माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे
ते तर दिसतेच आहे नं हर्पा
ते तर दिसतेच आहे नं हर्पा
जानी दुष्मनला नंबर एक म्हणावं लागेल मगं, कारण अस्वलाने संजीव कुमारचा रोल केला होता. बाकी सगळ्यांत प्राणी हे प्राणीच होते.
(No subject)
नागिन आणि नगीना विसरलात कसे ?
नागिन आणि नगीना विसरलात कसे ? अभिनय आणि लक़बगार डान्स म्हणून जास्त मार्क द्या
आणि त्याहुन जास्त मार्क तर टारझन वन्डर कारला द्यायला हवेत त्रिमिति पलीकडे रोल केलाय म्हणून
शाखा सरांचा डीडीएलजे
शाखा सरांचा डीडीएलजे मोटरमनमुळेच हिट झाला होता अशी चर्चा होती.
टारझन वन्डर कार मधे विमल पान
टारझन वन्डर कार मधे विमल पान मसाल्या ला पण खूप मेजर रोल होता (अक्षरशः दात काळे दिसत होते)
सुप्रभात !
सुप्रभात !
Pathaan box office Day 19: Shah Rukh Khan film crosses Rs 950 crore worldwide, chases Baahubali 2’s domestic collection
हिंदी चित्रपट सृष्टी मधे हजार
हिंदी चित्रपट सृष्टी मधे हजार कोटींचा पल्ला गाठणारा पहिला चित्रपट.
३३ दिवसांत १०२० कोटी रुपये कलेक्शन, अजून विजयी घोडदौड थांबायचे चिन्ह नाहीत.
समस्त पठाण टिम साठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
Pathaan : शाहरुखची शांतीत
Pathaan : शाहरुखची शांतीत क्रांती; रिलीजच्या 50 दिवसानंतरही 800 सिनेमागृहांत प्रदर्शित होणारा 'पठाण' ठरलाय पहिलाच हिंदी सिनेमा
#pathaan #shahrukhkhan #bollywood #entertainment
धाग्याचे शीर्षक सार्थ ठरवले शाहरूखने
समस्त पठाण टिम साठी
समस्त पठाण टिम साठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
Submitted by उदय on 28 February, 2023 - 09:16
>>>
मी सुद्धा एक चाहता म्हणून आहे त्या पठाण टीम मध्ये .. ज्याने वर्षभर आधीच धागा काढला होता
ईथले सारेच मायबोलीकर शाहरूख फॅन आहेत त्या टीममध्ये... ज्यांनी त्या धाग्यावर वेळीवेळी प्रतिसाद देऊन पठाणची हवा राहील हे पाहिले होते..
आज आपल्या सर्वांच्या मेहनतीचे सार्थक झाले.. बॉलीवूडवरील संकट टळले आहे .. लव्ह यू शाहरूख.. ॲण्ड सो प्राऊड ऑफ यू .. बदाम बदाम बदाम
सर वारेमाप आणि अवाजवी कौतुक
सर वारेमाप आणि अवाजवी कौतुक करून तुम्ही स्वप्नील जोशी, सई ताम्हणकरांचा चाहता वर्ग आटवण्यात यशस्वी झालात.
पण वर्षभरापूर्वी पठाणबद्दल ओ कि ठो माहिती नसतानाही त्याचे कौतुक सुरू करूनही हा चित्रपट आपटला नाही, उलट सुपरहीट ठरला हे सुद्धा एक रेकॉर्डच आहे.
वर्षभरापूर्वी पठाणबद्दल ओ कि
वर्षभरापूर्वी पठाणबद्दल ओ कि ठो माहिती नसतानाही
>>>
सिरीअसली??
मला ओ की ठो माहीत नव्हते??
तो धागा पुन्हा चेक करता का?
कृपया ओ आणि ठो बद्दल सविस्तर
कृपया ओ आणि ठो बद्दल सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.
सिरीअसली?? >>> शिकलात कि सर !
सिरीअसली?? >>> शिकलात कि सर ! असा प्रश्न विचारणे हे सेन्सीबल आयडी क्लबात प्रवेश केल्याचे लक्षण आहे. जय माहेश्मती !
सेन्सीबल सरांचा विजय असो.
सिरीअसली?? >>> शिकलात कि सर !
सिरीअसली?? >>> शिकलात कि सर ! असा प्रश्न विचारणे हे सेन्सीबल आयडी क्लबात प्रवेश केल्याचे लक्षण आहे.
>>>
छे हो. दोनचार ईंग्लिश शब्द येतात ते वापरतो. मला कुठल्या क्लबात/ग्रूपात टाकू नका. मी आपला शेर अकेला आता है असे स्वत:चे गुणगाण गाण्यात धन्यता समजतो
कृपया ओ आणि ठो बद्दल सविस्तर
कृपया ओ आणि ठो बद्दल सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.
>>>
पठाण धाग्यात वेळोवेळी अगदी ओ येईपर्यंत अपडेटस दिले आहेत की..
उगाच का आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला का तो?
बरं. ओ बद्दल समजले नाही.
बरं. ओ बद्दल समजले नाही.
आता ठो बद्दल.
ओ = ओनली शाहरूख
ओ = ओनली शाहरूख
ठो = ठोकून काढले एकट्याने
Runmesh - lol
Runmesh - lol
सारूक् चे ओळीने दोन चार
सारूक् चे ओळीने दोन चार सिनेमे आपटले पाहिजेत
सारूक् चे ओळीने दोन चार
सारूक् चे ओळीने दोन चार सिनेमे आपटले पाहिजेत Happy
>>>>
दोनचार काय दहाबारा ओळीने आपटले तरी तो भारताचा आजवरचा सर्वात मोठा सुपर्रस्टार राहणार.
पण
निसर्गाचा समतोल साधण्यासाठी हे खरेच गरजेचे आहे.
त्यामुळे त्याच्या विरोधकांचेही दुकान चालू राहील. त्याच्या आजवरच्या यशात यांचा फार मोठा वाटा आहे. विरोधकांना आणि त्यांच्या टीकेला कसे आपल्या फायद्यासाठी वापरावे यात शाहरूखची मास्टरी आहे.
दोनचार काय दहाबारा ओळीने
दोनचार काय दहाबारा ओळीने आपटले तरी तो भारताचा आजवरचा सर्वात मोठा सुपर्रस्टार राहणार.
>>>सहमत.
पठाण हिट झाल्यामुळे आमच्या
पठाण हिट झाल्यामुळे आमच्या कोमल मनावर उमटलेले ओरखडे लै दिवस टिक्त्याल !
ऑस्कर नाही मिळाला म्हणजे पठाण
ऑस्कर नाही मिळाला म्हणजे पठाण काही दर्जेदार नव्हता.
व्यवसायिक होता फक्त.
म्हणजे पठाण उनाड पोरगा होता स्कॉलर नव्हता.
खुप कष्ट घ्यावे लागणार अजून
ये हुई ना बात!
ये हुई ना बात!
हेमंत सर आले , त्यांचे परखड़ विचार घेवून !!!
पुरोगामी
पुरोगामी
राजकारण ही आपली कर्म भूमी आहे .
तिकडे या.
तुम्ही असाल तर च राजकारणी धाग्याला जीवदान मिळते
Pages