ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.
पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.
त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.
लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..
पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.
चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.
पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!
या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.
आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.
त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.
सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे )
वीएफएक्स आणि अॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली )
अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.
जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.
दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.
बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.
आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.
ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.
मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा
तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.
अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.
असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्या पब्लिकला दोन विशेष टिप्स -
१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.
२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा
धन्यवाद,
ऋन्मेष
त्याचे सिनेमे पण दर्जा हिन च
त्याचे सिनेमे पण दर्जा हिन च असतात.
>>>
त्याचे दर्जाहिन सिनेमे चार दिवसात पाचशे करोड कमावताहेत का? (लवकरच हजार होतील)
तुम्हाला शाहरूखची स्टार वॅल्यू ईतकी भारी वाटते का जे या बॉक्स ऑफिस यशाचे सारे श्रेय चित्रप्टाला दर्जाहिन ठरवत त्यालाच देत आहात..
करोड हे काही मोजमाप नाही.किती
करोड हे काही मोजमाप नाही.किती लोक बघतात हे महत्वाचे.
तिकीट २०० रुपये पकडा.
कमीत कमी .
१ कोटी लोकांनी बघितला की २००, कोटी होतात.
लोकसंख्या चा हिशोब लावला तर एक दोन टक्के च लोक बघतात.
आणि इतक्या प्रचंड लोकसंख्या मध्ये एक दोन करोड वेडी लोक सहज असतात.
त्यांना दर्जा शी काही देणेघेणे नसत
उघडी मांडी बघायला मिळाले की ते खुश
परफेक्ट हेमंत राव !
परफेक्ट हेमंत राव !
रावन पासून सारुक चे मूव्ही दर्जाहीनच वाटतात
आश्चर्य या गोष्टीचे वाटते की सारुक चे उदो उदो करण्याच्या नादात साउथ च्या मूव्ही ना रूंमेश किंमत देत नाही .....
१ कोटी लोकांनी बघितला की २००,
१ कोटी लोकांनी बघितला की २००, कोटी होतात.
लोकसंख्या चा हिशोब लावला तर एक दोन टक्के च लोक बघतात.
>>>>>>>>>
२०० कोटी केव्हाच पार झालेत.
६०० कोटीला ३ कोटी लोकं पकडू ..
आता ही लोकं थिएटरला जाऊन बघणारे आहेत. याच्या दहापट असे असतील जे थिएटरला जात नसतील. किंवा वीसपटही असतील.. जवळपास ७० टक्के भारत शाहरूखचा चाहता आहे..
आश्चर्य या गोष्टीचे वाटते की
आश्चर्य या गोष्टीचे वाटते की सारुक चे उदो उदो करण्याच्या नादात साउथ च्या मूव्ही ना रूंमेश किंमत देत नाही .....
>>>>>>>
कुठल्या मूवी... आरारार पुष्पा कांतारा केजीएफ ?? ... यकटा शाहरूख नडला
केजीफ र्रर्रर्र आणि पुष्प
केजीफ र्रर्रर्र आणि पुष्प अत्यंत पांचट मुवि आहे... लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करू नये.. पस्तावाल ...
शरुख काय करणार.
शरुख काय करणार.
त्याचे सिनेमे पण दर्जा हिन च असतात.>> ये रहा सिक्सर.
हेमंत ह्यांच्या डिक्शनरी
हेमंत ह्यांच्या डिक्शनरी मध्ये सापेक्ष हा शब्दच नाहीये. त्यांच्या मते सिनेमा दर्जा हिन आहे ना, मग संपला विषय. सिनेमा बघणारे कोट्यवधी लोक दर्जाहीन झाले.
दर्जाहीन सिनेमा ...
दर्जाहीन सिनेमा ...
-------------------------------------------------------------------------------------
आणि इतक्या प्रचंड लोकसंख्या मध्ये एक दोन करोड वेडी लोक सहज असतात.
त्यांना दर्जा शी काही देणेघेणे नसत
उघडी मांडी बघायला मिळाले की ते खुश >>>> एकदम परफेक्ट बोललात
.
.
फास्टेस्ट ३००
जहां पठान ने 7 दिन में 300 करोड़ के क्लब में एंट्री की है, वहीं बाहुबली 2 ने 10 दिन में ये रिकॉर्ड अपने नाम किया था, केजीएफ 2 को 11 दिन, दंगल को 13 दिन, संजू को 16 दिन और पीके को 17 दिन 300 करोड़ के क्लब में आने में लगे। वॉर ने 19 दिन, बजरंगी भाईजान ने 20 दिन और सुल्तान ने 35 दिन में 300 करोड़ कमाए थे।
किती लोकांनी बघितला हा आकडा
किती लोकांनी बघितला हा आकडा देणे तसे खूप सोप आहे कलेक्शन किती झाले ह्याचे आकडे सांगणे तसे अवघड .
दोनतीन गणिती क्रिया जास्त करायला लागणार.
पण किती लोकांनी सिनेमा बघितला हा आकडा कधीच दिला जात नाही.
गोडबंगल आहे ना?
सिनेमा हाऊसफुल चालला आहे एक
सिनेमा हाऊसफुल चालला आहे एक आढवड्या च्या तिकीट बुक आहेत अशा बातम्या पसरवल्या जातात आणि थिएटर मध्ये ५० प्रेक्षक पण नसतात.
असे कलाकार नी सांगितलेले आठवत आहे .टीव्ही वर
वॉव २ सरांची जुगलबंदी
वॉव २ सरांची जुगलबंदी
पण किती लोकांनी सिनेमा बघितला
पण किती लोकांनी सिनेमा बघितला हा आकडा कधीच दिला जात नाही.
>>> हे शोधणे अवघड आहे कारण एक व्यक्ती मल्टिपल वेळा चित्रपट बघू शकतो... उदाहरणार्थ- माझ्या एका मित्राने पठाण चार वेळा पाहिला आहे... आणखी चार पाच वेळा तरी बघतील असा अंदाज आहे...
प्रत्येक धाग्यावर तेच तेच
प्रत्येक धाग्यावर तेच तेच प्रतिसाद देण्यापेक्षा मी काही मदत करू का ?
किती प्रतिसाद पाहीजेत सांगा. एकटाच नेईन तिथपर्यंत.
अॅडमिनने उडवले तर मग नाईलाज आहे.
जे जे पठाण बघितलेले ओळखीचे
जे जे पठाण बघितलेले ओळखीचे आहेत सगळे सांगत होते की थिएटर पूर्ण भरलेले होते. मला सुद्धा जाणवलेली एक गोष्ट म्हणजे जनरली थिएटर्स मध्ये हिजाब घातलेल्या स्त्रिया कधी दिसत नाहीत. म्हणजे मला तरी फार कधी दिसल्या नव्हत्या. पठाण शो मध्ये बऱ्याच दिसल्या.
मला वाटते जनरली सिनेमा न बघणाऱ्या वर्गाने सुद्धा हा सिनेमा बघितला ही आनंदाची गोष्ट आहे.
जे जे पठाण बघितलेले ओळखीचे
जे जे पठाण बघितलेले ओळखीचे आहेत सगळे सांगत होते की थिएटर पूर्ण भरलेले होते.
>>>>
+७८६
आणि शेवटच्या गाण्याला लोकं खुर्चीही सोडत नव्हते. मला फोटो काढायचा मोहही झालेला. पण मग म्हटले कोणाला कश्याला काही सिद्ध करायला हवे. कोणाला होत असेल पठाणच्या बॉक्स ऑफिस यशाचा त्रास तर होऊ द्यावे. कारण ते लोकं आता असे बोलत आहेत की शाहरूख स्वत: तिकीटे घेऊन लोकांना फुकट वाटतोय. मी विचारतोय कुठे, मला द्या, मी पुन्हा जातो तर काही उत्तर नाही...
कारण एक व्यक्ती मल्टिपल वेळा
कारण एक व्यक्ती मल्टिपल वेळा चित्रपट बघू शकतो..
>>>>
ओटीटीला आल्यावर एकूण एक व्यक्ती बघणार आहे.
काही कबूल करणार नाहीत ते सोडा.
पण काय आहे चित्रपटात हे बघायचा मोह आवरणे आणि शाहरूखला ईग्नोर करणे कठीण आहे..
किती प्रतिसाद पाहीजेत सांगा.
किती प्रतिसाद पाहीजेत सांगा. एकटाच नेईन तिथपर्यंत.
Submitted by बिरला जेवलेकर on 1 February, 2023 - 10:32
>>>
मला हवेय की तुम्ही एक नवीन धागा काढावा. जिथे आपण पठाणपुर्वीचे बॉलीवूड/भारतीय चित्रपटसृष्टी आणि पठाणनंतरचे बॉलीवूड/भारतीय चित्रपटसृष्टी यावर चर्चा करू शकतो.
@ हेमंत, चित्रपट हा व्यवसाय
@ हेमंत, चित्रपट हा व्यवसाय आहे. किंवा व्यवसाय सुद्धा आहे. कोणतीही फिल्मईंडस्ट्री वा कुठलीही ईंडस्ट्री पैश्याशिवाय नाही चालत. जे तुम्ही दर्जा दर्जा करत आहात तो राखायलाही जो पैसा लागतो तो पठाणसारखे चित्रपटच कमाऊन देतात. एकटा शाहरूख कमावत नाही तर फिल्म ईंडस्ट्रीतील सारेच कलाकार तंत्रज्ञ ज्युनिअर आर्टीस्ट ते स्पॉटबॉय कमावतात. आणि ही ईंडस्टी टिकून आहे.
सचिन तेंडुलकरबाबत जे गॉड ऑफ क्रिकेट, विराटला किंग कोहली, धोनीला कॅप्टन कूल वगैरे जे ब्रांड म्हणून ईस्टॅब्लिश केले जाते त्याचा हेतू क्रिकेटमध्ये पैसा खेचणे हेच असते. मग आम्ही हॉकीफूटबॉलप्रेमी आहोत. क्रिकेट हा काय फालतू खेळ आहे. उगाच या लोकांना डोक्यावर चढवून ठेवलेय वगैरे आगपाखड करण्यात काही अर्थ नाही.
आज शाहरूखचा पठाण चालतोय हे बघून पुर्ण बॉलीवूडने सुटकेचा निश्वास सोडला असेल. आज सगळेच खुश असतील
@ हेमंत, चित्रपट हा व्यवसाय
@ हेमंत, चित्रपट हा व्यवसाय आहे. किंवा व्यवसाय सुद्धा आहे.>>>> वाह काय प्रत्युत्तर आहे.
सॉलीड जुगलबंदी. चालुन द्यात!
नायक जीन आहे हे बघून लोक
नायक चे नाव काय आहे हे बघून लोक सिनेमा आता कोणी बघत असेल ,असे मला तरी वाटत नाही.
बाहुबली चे नायक ,नायिका कोण होत्या हे गैर तामिळी लोकांना माहीत पण नव्हते तरी लोकांनी डोक्यावर घेतला ना.
बाहुबली.
शारुखं मुळे सिनेमा चालतो,बॉलिवूड ला तोच वाचवेल हे वाक्य च चुकीचे आहे.
दिग्दर्शक,कथा लेखक, छाया चित्रण करणारे, संगीतकार .
हे काय फक्त नावांची लिस्ट वाढावी म्हणून असतात काय.
एक फटक्यात तुम्ही सर्व महत्वाचे व्यक्ती न चे महत्व कमी करत आहात.
कथा लेखक, दिग्दर्शक आणि
कथा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार बघून कोणी चित्रपट बघायला जात नाही... तो जमाना कधीच गेला....
नायक महत्वाचा... दिलीप देव राज उगाच तीस वर्षे चालले का... रजनीकांत अमिताबच्चन कमलासन , खान त्रिमूर्ती अक्षय अजय अशी किती उदाहरणे आहेत...
एक काम करा, ज्यांना हा सिनेमा
एक काम करा, ज्यांना हा सिनेमा आवडला त्यांचा एक सर्व्हे घ्या, हाच सिनेमा असा च्या असा ठेवून त्यात शाहरुख ऐवजी सिद्धार्थ मल्होत्रा ला घेऊन केला तर तुम्ही जाल का पहायला?
बिंगो मै!
बिंगो मै!
मै +1
मै +1
Pathaan box office collection
Pathaan box office collection Day 8: Shah Rukh Khan’s unstoppable film grosses Rs 675 crore worldwide
ओन्ली ऋन्मेऽऽष कॅन सेव्ह
ओन्ली ऋन्मेऽऽष कॅन सेव्ह मायबोली
या माणसाची मुलाखत बघायला
या माणसाची मुलाखत बघायला नेहमी मस्त वाटते..
जॉमबद्दल छान म्हटले
आणि शेवटच्या ९ च्या प्रश्नाचे ऊत्तर आवर्जून ऐका
https://www.youtube.com/watch?v=v1JI1b3RIcI
ऋन्मेश, SRK चा दोन भागांचा
ऋन्मेश, SRK चा दोन भागांचा AIB पॉडकास्ट पाहिलाय का ?
Pages