खेड्यातील जीवन व जेवण!!

Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2023 - 09:22

लेमन टी, लेमन राइस, लेमन पेपर चिकन कँडीड लेमन, लेमन केक........ तोंपासु आंबट चिंबट मसालेदार मेनु ना!! हा पुणे- मुंबईतील कोणत्यातरी फॅन्सी इन्स्टा ग्रामेबल बिस्त्रोतला नाही. कोकणातील खेड्यातील जीवन पद्धती व रेसीपी दाखविणार्‍या रेड सॉइल स्टोरीज ह्या युट्युब चॅनेल वरचा एक भाग आहे. अश्या चॅनेलचा एक ठरावीक प्रेक्षक वर्ग आहे. मी ही काही दिवस होते पण मग ह्यातील सारखे पणा, तोच तोच पणा व एक्सेल शीट शिस्टिम लक्षात आल्यावर हवाच गेली.

पण समजा तुम्ही बेल्जिअम, आइस लँड न्युझिलंड कुठेतरी जगाच्या कोपर्‍यात बर्फाळ हवेत, अजून बर्फाळ ऑफिसात बसून नीरस डेटा वर काम करत आहात, जीरा मेसेजेस नी इ मेल भरून गेलेली आहे. घरी जाउन तेच बेचव जेवण जेवायचे आहे अश्या परिस्थितीत घरी गेल्यावर हे भारतीय उन्हे, शेते त्यात टुमदार घर, फळझाडे फुलझाडे, लगबगीने काम करणारी एक स्त्री साडीच नेसलेली. नाकी डोळी नीटस पण इत की ही सुरेख नाही की पाककृतींवरचे लक्ष उडून तुम्ही तिलाच बघत बसाल. ही सुती साडी नेसून असते. कधीच कॅमेरात बघत नाही. एकतानतेने घरात फक्त आणि फक्त स्वयंपाक करत राहते. हिचा हाप्पँट घातलेला नवरा/भाउ अधून मधून येउन मदत करतो व काही पन्हे सरबत सोलकढी टाइप बनवतो सुद्धा. पोर नसते असले तर कधी मधीच दिसते व लाडाने त्याला खाउ घालतात. कोण भारतीय विरघळून जाउन बघणार नाही सांगा!! सोब त अनेक पारंपारिक पाककृती. जरी आपण उबर इट्स स्विगी झोमाटो करत असलो तरी त्या बघत बघत खायला मात्र मजा येते बाई.

ह्या सर्व चॅनेलांची आजी ली झिकीच आहे. हिच्या चॅनेल वर एक स्वतंट्र बाफ आहे तो बघून घ्या. फारच आकर्षक पद्धतीने ही मुलगी शेती व स्वयंपाक करायची. अजूनही करते. मन मोहक असे हे चिनी सरकारतर्फे बनवलेले व्हिडीओ अगदी आसूस्सून बघितले. देन केम कोविड व चीनचे खरे विदारक रूप दिसले. एकाच इन्ग्रेडिअंट चे अनेक पदार्थ हे ह्या व्हिडीओज चे व्यवच्छेदक लक्षण. बटाटा/ लसूण/ शेंगदाणे...

मग त्याचे बरेच कॉपी कॅट चॅनेल्स अल्गोरिथम डोळ्यावर आदळू लागला. ट्रॅडिशनल लाइफ/ ट्रॅडि शनल मी असली नावे असतात. अगदी श्रीलंकेतील स्वयंपाकापासून ते तमीळ तेलुगु व केरला मधील खेड्यातील जीवन बघता येउ लागले. आपल्याकडे तात्याचा मळा, व्हिलेज कुकींग, गावरान एक अस्सल चव हे फेवरिट आहेत. ते मळा वाले व गावरा न वाले खरंच शेतातच स्वयंपाक करतात. सुक्के मटन चिकन व थालिपीठे झुण के मजेशीर असतात. सर्व चॅनेल मध्ये बायकाच स्वयं पाक करतात व पतीस अगदी प्रेमाने जेवु घालतात. ( फिर प्रॉब्लेम क्या है?!) भै वा. जिस घरमे घरकी लडकिया और औरते खाना खिलाए वौही घर घर है असे संस्कारी भाईसाब म्हणूनच गेले त.

तमीळ तेलुगु वाल्या बायका काही ही रेसीपी असली की लगेच पाटा वरवंटा रुब्बु गुंडा घेउन बसतात. भांडी सुद्धा अट्टहासाने मातीचीच व चुलीवरच स्वयंपाक. लाकुड फाटा तोडण्या पासून सुरुवात. मध्येच नटी देवघरात दिवा लाव. गाईला कुरवाळ असे लाडीक आविर्भाव करत असते. वॉट्स नाट टु लाइक. कायम मान खाली व सुपात घेउन तांदूळ निवडत राहते. मध्येच उंबर ठ्यावर डोके ठेउन निजते. ब्रेक झाला की लगेच हिच्या नशिबी वरुटा( वरवंटा!!) रात्रीचे जेवण करयला कटिबद्ध!!! तमीळ बाईच्या पोळ्या जाम विनोदी आहेत. घडी नाहीच. पण नवरा आव्डीने खातो. ( पर डे वर असणार हे लोक्स) अधुन मधून हातानेच गजरा करून माळते. सर्व कसे अगदी हवे हवेसे.

सर्व व्हिडीओ इतके पॉलिश्ड प्रोडक्षन आहेत की नजर हटत नाही. काय ती स्वच्छ भांडी, चुलीवर स्वयंपाक करुनही एक डाग नाही. का कधी भांड्यांचा रगाडा घासायला नाही. खेड्यातले जीवन पण एक गटार दिसत नाही की कचरा. सारे कसे कल्पनेपेक्षाही सुंदर. मन मोहित करुन टाकते. पण एक आठवडा बघितले की सर्वातला एक्सेल शी ट टाइप तोच तो पणा जाणवतो.

कांद हयाती हे एक अझरबैजान मध्यील चॅनेल पण असेच आहे. इंट्रनॅशनल आवृत्त्ती. ह्यातले काका काकू मध्यमवयीन आहेत. व घर आउट डोअर किचन एकदम सो प्रिटी सो लव्हली. पन आजकल कौन करता यार इतना!! असे म्हणावॅसॅ वाट्ते. सर्व चॅनेल वर रेसीपीच्यामध्ये घरातील प्राणी, फिश फुले पाने फळे ह्यांचे इतके भारी शॉट्स असतात की टू बीएच के मध्ये राह णारा प्रेक्षक नक्कीच वेडा होईल व वीकेंड ला हायवेला लागून असलेल्या इको रिजोर्ट चे बुकीं ग करून टाकेल. जोडीला ट्रॅडिशनल पण मोनोटोनस संगीत.

रेड सॉइल बाई काळ्या वाटाण्याची उसळ, खोबर्‍याची कापा शिरवाळे बनव्ते पण आज एक परफेक्ट लेमन केक पन दिसला. श्रिलंकेतील फ्रॉक वाली मुलगी एक इतका जबरदस्त चॉकोलेट केक बनवते की थिओब्रोमा मध्ये पण मिळणे अवघड आहे लेझी बम्स ना.

इथे कधी सासू सासरे येउन छळत नाहीत. आयत्यावेळी पाव्हणे नाहीत( रेड सॉइल वाली बाई करते पण केळ वणे. - अर्धा दिवस त्या किचन मध्ये घालवून) नवरा दारू पिउन मारत नाही कि मुले फोन मध्ये डोके खुपसून बसत नाहीत. अगदी आदर्श व्यवस्था. बायकानी हाताने व जुन्या पद्धतीने स्वयंपाक करण्याचे ग्लोरिफिकेशन!!! एक प्रकारे ग्रेट इंडिअन किचनच हे. मग मी वैतागून अजय चोप्रा नाहीतर रणवीर ब्रार कांदा टोमाटो ची ग्रेवी हजारव्यांदा करताना बघते. ते नोर्थ इंडिअन बाप्ये बोलताना मध्येच हॅ हॅ करतात तेव्हा पार फुटायला होते. स्वयंपाक ही आजकाल बघायची कला झालेली आहे ह्या हजारो कुकिंग चॅनेल्स मुळे. कधी कधी एखादी अनवट रेसीपी मिळून ही जाते.

भारताला लागून असले ले पाकिस्तानातले वाळवम्टी प्रदेश व तेथील लोकांचे जीवनही असेच दाखवणा रे चॅनेल आहेत. इथे थोडा पंजाबी प्रकार आहे. मथणीने दही घुसळून ताक काढायचे व लोणी साखर ह्या व्हिडीओ वाल्या ला हातात द्यायचे की तो लगेच वा क्या टेस्ट है बुनि यादी जायका म्हनत बोटे चाट णार. रेड सॉइल स्टोरी मधली बाई आंबोळीचे पीठ दळायला जात्यावरच डिरेक्ट व ओव्या गात गात स्वप्नातच हरवली.
तर पाकिस्ता नी खेड्यातली बाई ह्यांना पराठे करून घालायचे तरी पार जात्यावर पीठ दळ ण्या पासून सुरुवात. पण भातात घालायला फूड कलर असतात!!! मग अर्धा दिवस चुलीवर खटपट करून चार मोठे पराठे व हंड्यात शिजवलेले साग बनवून वाढणार चार बाप्यांना. ते काचेच्या प्लेटीत. तेही लाजत लाजत.

हाइट म्हणजे परवा असे च सर्फ करताना एक सिमिलर भोज पुरी चॅनेल दिसले. ती बाई गावाकडे चिली पनीर बनवत होती. ऐसा भी होता है.
म्हणून मी अग्निहोत्र लावले. ( हीच पंचलाइन आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण लेख जरा नंतर वाचते सावकाशीने पण रेड सॉईल स्टोरीजचे काही व्हिडीओ मी ही पाहिले आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ह्या सर्वांचं इन्स्पिरेशन लिझीकीच असावी.
हल्ली ही कोकणातली युट्युबर मंडळी मातीची भांडी, लाकडाचे चमचे, झारे वगैरे वापरताना दिसतात. जशी लिझीकी वापरायची. एकूणच तोच तोच पणा जाणवतो ह्या सगळ्यांचा आणि कालांतराने इंटरेस्टही संपायला लागतो.
लिझीकीचे व्हिडीओज आता येत नाहीत ना?

लिझीकीचे व्हिडीओज आता येत नाहीत ना?>>जुने व्हिडीओज आहेत ते बघते मी कधी कधी. काम करताना साइडला लावून ठेवते.

सर्व चॅनेल हिचे पाण्याचे स्त्रोत नळ कॉपी करतात. त्यावर भाजी मासे मस्त धुवून घेतात. इतके महामूर पाणी भारतातील शेतात बघून डोळे निवले. तसेच सर्व भांडी पातेली चमचे डाव विक्रीला उपलब्ध असावेत. मोनेटाइज मोनेटाइज दॅट इज द मंत्रा.

धमाल लिहिलं आहे अमा!!
अजून कोणी आजीने चुलीवरचे व्हेज ऑग्रेतीं वगैरे नाहीये ना केले? Happy
लिझिकी हल्ली नवे व्हिडीओ नाहीत का?(गायब बियब केली की काय पोरीला कुठे?)
मी या सिरीज मध्ये फक्त लिझिकी पाहिला आहे.भांडं तापायला ठेवल्यावर अचानक आपल्याला रेसिपी आठवत नाही हे आठवावं आणि पटकन कबिताज किचन किंवा हेबबर किचन ची 3 मिनिटं पळवून दीड मिनिटात रेसिपी बघावी आणि काय जे असेल ते करावं.आयुष्य सध्या यालाच म्हणतात Happy

Lol Lol
भाहारीही!!
एका ट्रेडिशनल केरळी रेसिपीत मेयो आणि केचप घातलेलं पाहिल्याचं आठवतंय. पण अग्निहोत्राकडे वळण्यामागचा ट्रिगर तो असू शकेल हा साक्षात्कार आत्ता तुमचा लेख वाचल्यावर झाला! Lol

मस्त लिहिले आहे . सध्या red soil stories वेगवेगळ्या चॅनल्स नी हायजॅक केली आहे . चला हवा येऊ द्या मध्ये येऊन गेल्यापासून त्यातली मजाच गेली आहे . सारखे कोणत्या ना कोणत्या मालिकेचे प्रमोशन असते त्यात . त्यामुळे पहिला नैसर्गिकपणा गेलाय त्यातून . यांच्या चुलीचा कधी धूर होत नाही . नवरा तर कायम चहा पिणे आणि उगाच इकडचे तिकडचे झाडणे करत असतो . तिचे कष्ट बघूनच थकायला होते . हल्ली गावात सुद्धा सगळीकडे mixer असतात , पण हट्टाने पाटा वरवंटा दाखवणे ,चूल दाखवणे यात काय हशील ? एकीकडे बायकांचे स्वयंपाकाचे काम सोपे कसे करता येईल त्या जाहिरातीचा मारा करायचा आणि त्याच वेळेला असा अर्धा दिवस घालून स्वयंपाक दाखवायचा हे काही पटत नाही . जरी ते सगळे गुडीगुडी असले तरी अमा म्हणतात तसेच वाटते . त्यापेक्षा मी - अनु शी सहमत आहे .

तो रेड सॉइल वालीचा नवरा तिचा धाकटा भाउ वाट्तो कि नै. तिच्या चेहर्‍यावर महासुखी मी ह्यां संसारी असाभाव ठासून भरलेला असतो. लोबो टोमी केल्यावर पेशंटच्या चेहृयावर असेच भाव असतात. इस धिस रिअल वर्ल्ड.. वाला पोरगा आठवा.

भारी लिहिले आहे.. आजच रेड सोईलचा खापरोळी विडिओ पाहिला.. तांदूळ चिनी मातीच्या बरणीत ठेवलेले होते.. दाताखाली दगड आला्या सारख् वाटल.

वा ! मस्त खुसखुसीत !!
मी पण मध्यंतरी हे असले व्हिडीओज बघत होतो. सगळ्यात खतरनाक ते तमिळ शेतकरी, शेतात जेवण बनवतात आणि नंतर भुरके मारून, नळ्या ठोकून जेवण करतात. काही फॉरिनर्स त्यावर रिअ‍ॅक्ट पण होतात ! पण त्यांच्या जेवणाचे दणदणाटी सेशन सुरू झाले कि त्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. Lol
या क्षेत्रात आता राम नाही राहिला. हल्ली काही बायका स्कूटर शिकतानाचे व्हिडीओ बनवतात तसं स्वयंपाक शिकतानाचा एक चॅनल बनवला तर त्याला व्ह्यूज मिळतील का ?
भाकरी थापता येईल, अंडी तळता येतील, चहा तर येतोच, भात बनवता येईल पण चपाती गोल बनवणं जरा अवघड आहे. चपाती गोलच बनवावी असा नियम नाही ना ? या परंपरा आंधळेपणाने चालू आहेत. त्याविरोधात जागृती केली पाहीजे.

चपाती गोल करायची नसते. ती मऊ करायची असते. आपल्याला चांगली करायला जमली कि ती आपोआप गोल व्हायला लागते. Happy
मस्त लेख!
जरी आपण उबर इट्स स्विगी झोमाटो करत असलो तरी त्या बघत बघत खायला मात्र मजा येते बाई.>>>+१

च्यानले उदंड जाहली Wink तेच तेच. ग्रामीण, चुलीवरचे, पाटा-वरवंटा, खलबत्ता .... कंटाळा आला.

BTW 'इथे ग्यासवरील बाजारू जेवण मिळेल' अश्या पाट्यांना लोक भुलत असावेत का आता ?

मस्त लिहिलं आहे. तोचतोचपणा हा एकंदरीत सगळीकडेच आहे. व्हॉट्सॲप स्टेटसपासून ते यूट्यूब व्हिडिओंपर्यंत.
ठोकळेबाजपणाविरुद्ध चळवळ तिथेही आवश्यक आहे Happy
मी यातले फक्त लिझीकीचे बघितले आहेत व्हिडिओ. पण वाचून अंदाज आला हे बाकी कसे असतील याचा.

मजेदार लिहीले आहे. मी हे फारसे पाहिलेले नाही पण आता उत्सुकता आहे.

हे जेवण ग्रामीण नसून फक्त इन्स्टाग्रामीण आहे ही फाको इतर कोणी करायच्या आत करून घेतो Happy

इथे ग्यासवरील बाजारू जेवण मिळेल' अश्या पाट्यांना लोक भुलत असावेत का आता >>> Lol

Lol भारी लिहिलंय अमा. एक life in wetland नावाचा चॅनल आहे तो पण पाहून घ्या एकदा Wink
आपले आवडते चॅनल तूर्त रणवीर आणि YFL Happy

मस्त लिहिलय. मजा आली वाचायला.
स्वयंपाक ही आजकाल बघायची कला झालेली आहे ह्या हजारो कुकिंग चॅनेल्स मुळे. <<< Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol

मस्त लेख.
रेड सॉईल मध्ये लिहिलेले असते की लिझिकी हीच प्रेरणा स्रोत आहे.
कोकणातल्या vloggers ना नवे दाखवण्यासारखे काहीच उरलेले नाही. रान मेव्यासाठी, रान भाज्यांसाठी, अळंब्यांसाठी, शेवळांसाठी राने ओरबाडून झाली. खेकडे, शिंपले खुबे वगैरेसाठी खाडी किनारे खणून झाले. चाराची झाडे ( चारोळ्यांचे झाड) झोडून झाली. हे सर्व इतक्या मोठ्या प्रमाणावर चालले आहे की पुढे हे सर्व बियाण्यांसकट संपून जाईल की काय असे वाटते. त्यातल्या त्यात प्रसाद गावडेचा चॅनल बरा वाटतो आणि गोष्ट कोंकणातलीचा.
देशावरच्या चॅनल्स मध्ये वेगवेगळ्या जातीजमातींचे, भटक्या लोकांचे जीवन दिसते, कमीत कमी साधनांसह केलेले अगदी प्राथमिक स्वयंपाक दिसतात, आदिम काळातल्या जीवनाची थोडीशी झलक दिसते म्हणून ते सध्यातरी आवडतात. शिवाय पाहुणेरावणे, त्यांचे साधेसुधे आगतस्वागत पाहायला आवडते. एका व्हिडीओत बहीण राहायला आली होती, तिला निरोप देताना कोंबडी केली होती. तेव्हा तो ब्लॉगर म्हणतो की म्हायेरवाशीन सासऱ्या निघाली तर सन ( सण)
कराया पायजेच ना.
अशा सणासुदिनाच्या सुद्धा वेगळ्या कल्पना बघून गंमत वाटते. मानववंशशास्त्र थोडे थोडे उकलू लागते. म्हणून मला हे प्राथमिक स्तरावरचे विडिओ पाहावेसे वाटतात.
लेख मात्र धमाल आहे.

भांडं तापायला ठेवल्यावर अचानक आपल्याला रेसिपी आठवत नाही हे आठवावं आणि पटकन कबिताज किचन किंवा हेबबर किचन ची 3 मिनिटं पळवून दीड मिनिटात रेसिपी बघावी आणि काय जे असेल ते करावं.आयुष्य सध्या यालाच म्हणतात

एका ट्रेडिशनल केरळी रेसिपीत मेयो आणि केचप घातलेलं पाहिल्याचं आठवतंय. पण अग्निहोत्राकडे वळण्यामागचा ट्रिगर तो असू शकेल हा साक्षात्कार आत्ता तुमचा लेख वाचल्यावर झाला!

इन्स्टाग्रामीण!!
Proud Proud Proud
मी मध्ये कधीतरी गावरान - एक चव हे चॅनेल पाहिले हो. आवडले होते कारण त्या आज्जी - मी पाहिलेल्या कोल्हापूर, सांगलीकडच्या नॉर्मल आज्ज्यांसारखा होत्या, दणादण पाट्यावर वाटण वगैरे करत होत्या. एकदम माझ्या आज्ज्यांची आठवण आली. मातीची भांडी वगैरे जरा ऑडच वाटले होते. हा पण एक ट्रेंड झालाय माहित नव्हते.

खापरोळी video
Sunil D'mello चा चांगला आहे. खरं म्हणजे ते खरेखुरे विडिओ आहेत.
Mountain fairy चेही चांगले आहेत.
Bhat n' Bhat चे खूप झाले म्हणण्यापेक्षा तिकडे मंगळुरूत नसलेले पदार्थही बनवतोय आता. कोहाळ्याचा पेठा.
बाकी लेख खमंग झालाय. 'मी अग्निहोत्र लावले' चा संदर्भ मला डोक्यावरून गेला कारण सिनेमे पाहात नाही.

कुणी शुभांगी कीरचे विडिओ बघितलेत का? तसे तिचे खूप जुने चॅनेल आहे ज्यावर ती अगदी घरगुती रेसिपीस दाखवायची. व्हिडिओंचा दर्जाही सुमार असला, तरी तिचे रेसिपी बनवतानांचे प्रयत्न व बोलघेवडेपणा दिसायचा. मात्र हल्ली तिच्या पप्पू नावाच्या मुलाने चॅनेल हायजॅक केलेय. त्यावर तो काहीही दाखवत असतो, आणि सिनेमातल्या एक्सट्रासारखी बिचारी शुभांगी कीर एखाद्या कोपऱ्यात दिसते.

मी असे जंगलात केलेल्या पाककृतींचे व्हिडीओ बघायचो, एक बाप्या एकटाच जंगलात जाऊन अगदी फाईव्ह स्टार शेफ ला लाजवेल असे काय काय पदार्थ बनवतो. खळाळून वाहणाऱ्या नदीतून मासे पकडतो, तिथेच चिरून, सोलून मस्त मसाले वगैरे लावून निखार्यावर भाजतो
कधी बार्बेक्यू पण करतो, सोबत एकदम चकचकीत वुडन चमचे, भांडी, शिकारीला वापरता येईल असा भलामोठा पोलिशड चाकू
असं वाटायचं बस यार असं लाईफ पाहिजे
मग नंतर नंतर वाटायला लागलं की फारच कुटाणा आहे, हे एवढं सगळं आठवणीने सोबत घेऊन जायला पाहिजे, अरेच्या मीठ, तिखटाची डबी घरीच राहिली असं झालं की बोंबला
त्यापेक्षा रेडी टू कुक ची पाकिटे न्यावी, पोहे, उपिट पासून बिर्याणी पर्यंत सगळं मिळतं आजकाल Happy

हाहाहा.

रेड सॉईलचे काही व्लॉग्ज आवडले मला.

काही ठीकाणी कोकणात अमुक असंच ते थोडं पटलं नाही, कोकणातल्या विविध ठीकाणी विविधता आहे. एकदा मुगाचे कढण नावाचा गोड पदार्थ दाखवला, तळकोकणात करत असावेत, आमच्याकडे कढण किंवा कळण गोड नसतं. रेसिपी चांगली, वेगळी आमच्यासाठी नक्कीच होती पण तिने उपासाला असं कोकणात घरोघरी करतात सांगितलं त्याला माझा आक्षेप आहे, माहेर आणि सासर दोन्ही को़कणात असून आमच्याकडे मुग उपासाला चालत नाही त्यामुळे काही ठीकाणी कोकणात उपासाला हे करतात असं विधान हवं होतं.

गणपतीच्या नैवेद्यालाही कांदा लसणीचा नैवेद्य दाखवताना, काही ठीकाणी देवाला नैवेद्य कांदा लसूण विरहीत असतो, असं विधान हवं होतं. कोकणात सगळीकडेच असं करतात हा संदेश जाऊ नये एवढंच. खाली कमेंटस मधे हे लिहीलं आहे लोकांनी की आमच्याकडे कांदा लसूण नाही चालत.

बाकी मला त्यांची उभी चुल आवडते आणि तो सेटअप आवडतो. त्यांची मुलाखतही आवडली, तिने जे जे मधुन पदवी घेऊन ती फिल्म इंडस्ट्रीत क्रिएटीव्ह होती, तो फार्मसी प्लस एम बी ए आहे पण त्यांना कोविडमधे काम गेल्याने अडचणी आल्या आणि नंतर सॅच्युरेशन आलं आणि असं काही वेगळं करावंसं वाटलं, लिझिकीसारखं. फोटोग्राफी वगैरे छान असते पण नंतर एकंदरीत तोचतोचपणा येतो अशा सर्वच गोष्टींत.

ख्सखुशीत लिहिलंय! काही ब्रिटिश आणि अमेरिकन बाप्ये भारतीय रेसिपी करणारे आहेत. त्यांच्या लिंक्स शोधून देते. देशी लोकांचे चॅनेल्स पाहून कंटाळा आला असेल तर थोडा रुचिपालट Happy

एकाच कुकरमध्ये भाज्या, उंधियो बनवण्याचा काळ आलाय आणि हे चुली का दाखवतात? आपल्याच प्रापर्टीतला लाकुडफाटा आणायचा तर ती केवढी मोठी हवी. यांची मुलंही मोठ्या शाळेत न जाता घरीच पाटीवर अभ्यास करत असावीत.
( अगदी भीमाशंकर देवळाच्या वस्तीतली दुकानदार, व्यावसायिकांची मुले झकपक कपडे करून इंग्रजी शाळेच्या स्कूल बसने जातात तर हे विडिओ कुठून आणतात?)
श्रीलंकेत शेतीची वाट लागलीय आणि हे श्रीलंकेतले विडिओ अजबच आहेत.)

एक बाप्या एकटाच जंगलात जाऊन अगदी फाईव्ह स्टार शेफ ला लाजवेल असे . . .
साधं ट्रेकिंगसाठी प्रदेशातले लोक स्पिरिट नेतात जेवण करण्यासाठी तसं करणं इथं अजिबात शक्य नाही.

आता कोकणातही अनेक घरात गॅस आहे, चुलही असते दोन्हीचा वापर होतो. मिक्सर वापरतात. लाद्या घातलेल्या असतात, हे ही दाखवावं. माझ्या सासरी माहेरी हे असं आहे. माहेरी दोन वर्षांपुर्वीपर्यंत शेणाने सारवायची जमिन होती, आता लाद्या आहेत. गॅस दोन्हीकडे अनेक वर्ष आहे. सासरी दुपारचा चहा आणि दोन्ही वेळेच्या पोळ्या गॅसवर करतात.स़काळी सर्व चुलीवर करतात.

Pages