प्रिय कबीरा,
तुला काही कल्पना नाहीये इथे काय चाललंय , त्याने माझ्यासारख्या किती जणांचा गोंधळ होतोय. ज्यांना आत्मशोधाची जिज्ञासा आहे त्यांची दिशाभूल करायला इथे सर्वस्व वेचणारी लोक आहेत. असत्याबाबत केवढी एकनिष्ठता, आणि सत्याशी म्हणजे तुझ्या कैवल्याशी काही देणेघेणे नाही. आजकाल आस्तिक कोण नास्तिक कोण कळत नाहीये. बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे. आता महाभारत झालं तर काय नवल..! त्यांना जीव तोडून सांगायला माझ्याकडे कसलाही पुरावा नाही , माझं काय मी आज आहे उद्या नाही पण तू तर चिरंतन आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही. दिसामागून दिसं चाललेत, जे आहे त्याला साक्षात्कार का मानू मी तरी! 'तेरे बिन खाली आजा खालीपनमें' जमणं किती कठीण आहे.
कुणाला सांगू कुणाला बोलू, दशानन झालाय माझा! प्रत्येक जण वेगळ्या चेहऱ्याची ओळख लक्षात ठेवतेय. जोपर्यंत माझं काही खरं नाही तोपर्यंत तुझंही काही खरं नाही , धमकी समजं! ह्या अशा विचारांनाच कोहम्-सोहम् मानायला पाहिजे नं की विशिष्ट रंगाचे आसन अंथरून विशिष्ट दिशेला तोंड करून तुझे नाव मुखाने घेणे म्हणजे 'कोहम् सोहम्' आहे. मी मानव आहे, यंत्रमानव नाही. तू अवडंबरापुरता उरलायस! अवडंबराची नवी नवी फँसी रूपं बाजारात येतात व त्याचे नियम सांगणारे एजन्टही. अर्थशास्त्राचा नियम अध्यात्मात का नाही लावत लोक, जितकी मध्यस्थांची साखळी मोठी तितके ग्राहकांचे नुकसान अधिक. वेडे, क्रूर, नार्सिसिस्ट ,मूर्खं गोळा झालेत बघं. आधी सुरक्षा देणारे कवच, आता सोन्याच्या बेड्या झाल्यायत. धर्मात अध्यात्माचा लवलेशही राहिला नाहीये. तरीही काही जणांना दोन्ही एकच वाटतं. ध्यान त्यांना आवडत नाही , मंदीरात पहाटे उठून उपाशीपोटी अनवाणी जाणे, घरात ताटवाट्या बडवणे जास्त नैसर्गिक वाटते. मी काही तुझी एजन्ट नाही. सत्य जर सिंहासारखे असेल तर तुझी डरकाळी त्यांना का ऐकू येत नाहीये. तुला आयडेन्टिटी क्राईसेस कसे आले नाहीत अजून! तुझी नक्कीच शेळी झालीये. उठ आता !
एकदा काय झालं माहिती, रामकृष्ण परमहंसांच्या कानावर केशवचंद्रांची कीर्ति गेली. आता कीर्तिने भूरळ पडावी असे काही रामकृष्ण नव्हतेच. केशवचंद्र म्हणजे अचाट बुद्धिमत्ता आणि अभिनव अशा बंगाली लिपीचे संशोधक, ब्राह्मोसमाजाचे सर्वेसर्वा, ख्रिस्ती धर्माचे थोर अभ्यासक. सतत भद्र लोकांनी वेढलेले, लोकप्रिय. परमहंसांना जगन्मातेची आज्ञा 'केशवला भेटंच'. परमहंस म्हणाले 'अगं, ती मोठी लोकं वेगळीच भाषा बोलतात. मी काय सांगू त्यांना, आणि माझ्यासारख्या अशिक्षित खेडूताचं त्यांनी का ऐकावं. मातेनी नादचं लावला. मगं गेले तर त्यांचं ते ध्यान बघून कोणी त्यांना बोललंही नाही. असं तीनदा झाल्यावर केशवांची भेट झाली. केशवांना परमहंस आपलेच वाटले.भद्र लोकांना आत्मशोधापेक्षा ब्राह्मोसमाज व त्याची मतं महत्त्वाची होती. केशव यात अडकणाऱ्यांपैकी नव्हतेच. निर्मळ मनाचे असल्याने ते ब्राह्मोसमाजातूनच बाहेर पडले. ब्राह्मोसमाजाची झळाळीच गेली. सुरवातीला सगळेच समान ध्येयाने प्रेरित असतात पण हळूहळू बंधनं , एकमेकांचे अहं , समाजातले स्थान व लोकप्रियता या गोष्टीं ध्येयापेक्षा मोठ्या होतात आणि कळपाची निर्मिती होते. केशवांचा आपल्याच मूल्यांबाबत गोंधळ व्हावा व रामकृष्णांना परमहंस असून एकटेपणा यावा मग आमचे काय व्हावे.
हे तुला सगळं माहिती आहे , मलाही माहिती आहे. आपण काय विसरलो आहोत ह्याचेही विस्मरण झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना हे पुन्हापुन्हा वाचण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सर्वव्यापी असली की 'अतिपरिचयात अवज्ञा' ह्या उक्तीला अनुसरून काही जाणीवा बंद होतात बहुतेक !!! जिथे अर्जुनाला स्मरण करून द्यावे लागले तिथे आमच्यासारख्यांचे काय.
Integrity is doing the right thing even when no one is looking, right?! सगळी नीतिमान लोक आस्तिक व पापी लोकच खरीखुरी नास्तिक वाटतात मला आता. मी माझ्यापुरता आस्तिकत्वाचा व ईश्वराचा संबंध लावणं संपवून टाकले आहे. पण जगात वेगळ्याच कशाला तरी यश मिळतंय. हे दिसत असताना मला माझ्याकडे आता काहीच राहीलं नाही असंच वाटणार नं. इतरांच्या चुका मीही करत राहू का. जिथे माझा रस्ता संपतो तिथे मुलांचा सुरू व्हावा ना? का सगळ्यांनी एका वर्तुळातच फिरत रहायचं. ज्यांना वर्तुळ दिसत नाही त्यांचं चांगलंय, ज्यांना दिसतं ते तर बाहेर पडायचा प्रयत्न करणारचं नं. बेसिक इन्स्टिंक्ट..! भ्रमाच्या एका बुडबुड्यातून दुसऱ्या बुडबुड्यामधे जाणे म्हणजे प्रगती नाही हे मला चांगले ठाऊक आहे. तू हरवला आहेस, मी नाही. मला सगळं स्पष्टं दिसतं, शब्दांचा पाऊस पडतोय. फक्त मिळतेजुळते शब्द वेचायचा अवकाश असतो, म्हणून हा पत्रप्रपंच!
तुझी 'अस्मिता'
प्रेरणा :--
मोको कहाँ ढूंढें रे बन्दे, मैं तो तेरे पास में ।
नम्रतेमुळेच अनेक दैवी गुण
नम्रतेमुळेच अनेक दैवी गुण अंगी येण्याची शक्यता वाढते.
आपण सूचित करता तसा अहं आड येतो.
>>>>> हे सेलेक्टिव्ह मॅनिप्यूलेशन आहे. I would rather be rude than unauthentic, thanks but no thanks !!
पियानो बडवत 'नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर' गाऊ का आता !
धन्यवाद सर्वांना .
इथे लिहिणं कितपत बरोबर माहित
इथे लिहिणं कितपत बरोबर माहित नाही.
पण अहं हरवला तर जगण्याला काय अर्थ आहे अशा मताचा मी तरी आहे. कोणाच्या पाया पडणे यात पर-से मला काहीच गैर वाटत नाही, कारण तेच संस्कार झाले ... प.ण. .... पण तो सर्वस्वी पाय पडणार्याचा निर्णय असावा. त्यात एकदा एक्सपेक्टेशन, पीअर प्रेशर इ. आलं की त्यापासून चार हात लांब राहिलेले श्रेयस्कर. भले काय ते मी कोण ते ज्ञान न होईल, आत्मज्ञान न होईल, काय ते जन्ममरणाचे फेरे का काय असतील चालू रहातील, सद्गती मिळणार नाही... पण अॅट द कॉस्ट ऑफ अहम! नो वे! असे सद्गुरू नकोच.
अहंकार वाईटच. पण म्हणून तो जाळायला बेशरमी, फुकटची नम्रता नको (सॉरी नम्रता). अहम आणि अहंकार वेगळे असतात.
सिलेक्टिव्ह मॅन्युप्युलेशन अगदी चपखल शब्द आहे. एकदा पाया पडण्याची अपेक्षा केली की तो स्लिपरी स्लोपच आहे.
असो.
अस्मिता.ला अनुमोदन या बाबतीत.
अस्मिता.ला अनुमोदन या बाबतीत.
'तुझ्या अंगी नम्रता बाणावी म्हणून माझ्या पाया पड' म्हणणार्या गुरूबद्दल मला शंकाच येईल.
नम्रता आणि समर्पण यांचं स्तोम का माजवलं जातं हे मला कळलेलं नाही. देवाने काय आणि गुरूने काय, शिष्याला सबल/सक्षम करायचं की आधी त्याचा कणा मोडायचा?
एकंदरीत सर्वांचे सल्ले अंगी
एकंदरीत सर्वांचे सल्ले अंगी बाणवून नास्तिकतेचा पाईक होण्यात हयगय होऊ नये यासाठी काळभैरवाला कोंबडं कापून तळ्यातल्या गणपतीला शंभर मोदक रोज वाहण्याचा संकल्प केलेला आहे. या जगात आत्म्याचं अस्तित्व नाही हे सांगणारं अध्यात्म स्विकारतानाच सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन त्यांच्या चमत्काराच्या दर्शनाने डोळ्यातून अश्रू घळघळ वाहतानाचा आनंद लुटायचा आहे. निर्गुण, निराकाराचे तत्त्व बुद्धीने स्विकारलेय आणि त्याच वेळी चराचरातले त्याचे अस्तित्व मान्य करत "किसी कि मुस्कराहटों पे हो निसार" म्हणत पानावर किडा उचलून बाजूला ठेवण्याची बुद्धी देव देवो आणि नाठाळाला अद्दल घडवण्यासाठी माझा अंहं दिव्य तेजाने तळपत राहो हीच त्या निर्मिकाच्या चरणी प्रार्थना !
साहेबांचे धोरण हाच सद्गुगुरू मंत्र म्हणत मुख्यमंत्र्यांना पाठिंबा पण भाजपला नाही त्याच चालीवर अध्यात्मास पाठिंबा आस्तिकतेस नाही हा जगण्याचा मूलमंत्र आज याठिकाणी जाहीर करत आहोत.
>>>>>>>>पण अहं हरवला तर
>>>>>>>>पण अहं हरवला तर जगण्याला काय अर्थ आहे अशा मताचा मी तरी आहे.
डिट्टो. बाउन्ड्रीजच जर विरघळल्या , आयडेन्टिटीच हरवली तर मनुष्य विस्कळीत होइल. तेव्हा अहं हा हवाच. माझेही हेच मत आहे.
अजुन एक नम्रता भित्र्या किंवा
अजुन एक नम्रता भित्र्या किंवा दुबळ्या लोकांवर दुर्दैवी वाटते. शोभणं तर दूरच कीव येते. तेव्हा नम्रता हा ओव्हरएस्टिमेटेड गुण आहे याबद्दल मला शंका नाही.
हां मात्र वैकुंठवासी गुरु आवडतील पण तिथेही चंचलता आड येते. एकाच शिकवणीवरती मन एकाग्र होत नाही. काहीतरी मिसिंग आहे असे वाटत रहाते. म्हणजे आपल्या अपरोक्ष काहीतरी महत्वाचे घडत आहे, पार्टी चालली आहे टाइप्स
देव न मानणाऱ्या अनेकांपैकी मी
देव न मानणाऱ्या अनेकांपैकी मी एक आहे. कारण देव ही संकल्पना मानवनिर्मित आहे. पण मला माहीत आहे की माझ्या मनातले प्रश्न मी एकट्याने सोडवण्याची क्षमता माझ्याकडे नाहीं. अनेक ग्रंथमहात्म्यांमध्ये संतचरित्रांमध्ये, अध्यात्मग्रंथांमध्ये D I Y प्रकारच्या पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. पण त्या आचरणात आणणे कठीण असते. कोणी मार्गदर्शक असला की ते सोपे होते. अर्थात त्या मार्गदर्शकावर दृढ विश्वास पाहिजे. येथेच ' मी ' चा लय होतो. आपली क्षमता वाढते. ( कारण मार्गदर्शकाची क्षमता त्यात मिसळते.) गुंतागुंत कशी सोडवायची ते कळते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया हा विनम्र भाव येतो. नक्की प्रश्न काय आहे हे जे मुळात कळलेलेच नसते, ते कळते आणि कोणतीही भ्रांती राहात नाही. बुद्धी स्थिर होते, तीक्ष्ण होते. विकारांपासून मुक्त होते. अचूक निर्णय घेतले जातात. दुःखाचे प्रसंगसुद्धा धीराने आणि सदा आनंदाने व्यतीत होतात. ( कारण सुखदुःखे समे कृत्वा अशी वृत्ती झालेली असते) सहज जाता जाता, मुद्दामहून नव्हे, आपल्या हातून परोपकार घडू लागतो.
' सर्वांप्रती आत्मीयता' वाढते ... आणि हे सर्व व्यावहारिक फायद्याचेच असते. व्यवहार आणि प्रपंच मनाला क्लेश देत नाही, उलट सुखकारक ठरतो.
वगैरे वगैरे आणि असो.
पण अहं हरवला तर जगण्याला काय
पण अहं हरवला तर जगण्याला काय अर्थ आहे अशा मताचा मी तरी आहे. >> पुढचे ऊदाहरण हास्यास्पद वाटेल पण मला ते भलते थॉट प्रोवोकिंग वाटले.
किलबिल मधला पाय मे पहिल्याने बिआट्रिक्स किडो चा अहं तोडतो. तिच्यावर शिक्षणाच्या नावाखाली अनेक खडतर शारिरिक वेदना लादलयानंतर समर्पित भावनेने गुरू म्हणून तिने आपले अस्तित्व मान्य केले आहे असे जेव्हा त्याला जाणवते त्यानंतरच तो तिला जे शिक्षण देतो ते अद्वितीय शिक्षण तो ईतर कोणालाही देत नाही. त्याला ईतरांच्यात ती तळमळ ते समर्पण दिसत नाही.
तो गुरू आणि व्यक्ती म्हणून असेलही ऊद्धट, टोकाचा दुराभिमानी पण जेव्हा तो तिला गुरू म्हणून त्याच्याकडचे देतो तेव्हा तो हातचे काहीही राखून ठेवत नाही.
ह्यातून बी च्या जगण्यातला अर्थ हरवला का? तर नाही तिचे जगणे नव्याने सुरू झाले.
दंगल मध्येही जेव्हा गीता आणि गुरूसमान वडिलांच्या मध्ये गीताचा अहं येतो तेव्हा ती त्या गुरूकडून काहीही घेण्यास पात्र ऊरत नाही. गुरू देण्यासाठी सज्ज असूनही. ती अहं सोडून जेव्हा पुन्हा गुरूकडे येते तेव्हाच तिला प्रगतीचा मार्ग सापडतो.
अश्विनी, नेमके.
अश्विनी, नेमके.
तळमळ आणि समर्पण हे दोन नेमके शब्द वापरलेत तुम्ही.
फक्त तो गुरू बाह्यात्कारी दुराभिमानी असतो. कडक असतो. जसे भीमसेन ह्यांनी गुरुगृही अपार कष्ट केले, पाण्याचे हंडे वाहून आणले तसे. त्याला व्यवहारात साधना म्हणतात. साध्य प्राप्त करून सिद्ध होण्यासाठी सन्मार्गाने केलेली धडपड म्हणजे साधना.
मी आध्यात्मिक भोंदू
मी आध्यात्मिक भोंदू गुरूंबद्दल बोलतेयं, ट्रेनर वा शिक्षकांबद्दल नाही. भ्रमज्ञानी जे स्वतःला ब्रह्मज्ञानी समजतात. गीताचा ट्रेनर स्वतःला ट्रेनरच म्हणवून घेत होता, त्यामुळे तो 'खरा' आहे. पंडितांचे गुरूही त्यांना शास्त्रीय संगीत शिकवतो म्हणून कव्वाली शिकवत नव्हते. तिथे समर्पण योग्य आहे, कारण ध्येय माहिती आहे व फसवणूकीला वाव नाही.
जे स्वतःला enlightened म्हणवून घेतात व दुसऱ्यांना जाळ्यात ओढतात त्यांच्याबद्दल लिहिले आहे. तुमच्या उदाहरणात कुणी स्वतःला जे नाही ते दाखवून स्वार्थ साधलेला नाही.
मी लेखात व प्रतिसादात दिलेल्या आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व सत्यशोधक लोकांना मानते. फक्त आता तेवढं विश्वासार्ह कुणी नाही एवढं माहिती आहे. जी के प्रधान (Towards the silver crest of Himalayas) यांच्यासारखे अनुभव पटवून घ्यायला मला काही अडचण नाही. पण तोपर्यंत मी जे पटत नाही त्याला 'हो, हो' म्हणणार नाही. मी सद्सद्विवेक बुद्धी सोडणार नाही, मी चिकित्सा सोडणार नाही. ह्याला तुम्ही अहं किंवा नम्रतेचा अभाव समजू शकता. शब्दांच्या जाळ्यात मी अडकणार नाही.
सॉरी नम्रता >>
सॉरी नम्रता >>
यावरून सहजच आठवलं, पुण्यात
यावरून सहजच आठवलं, पुण्यात मुलीचं नाव नम्रता ठेवल्याचं सहसा आढळत नाही.
रघु आचार्य, तुमचा ह्या आधीचा
रघु आचार्य, तुमचा ह्या आधीचा प्रतिसाद नुसताच धमाल नाही तर जबरदस्त आहे.
सॉरी नम्रता>>> मागे सॉरी अस्मिताही लिहिले होते.
silver crest पुस्तक चांगले
silver crest पुस्तक चांगले आहेच. आणि प्रधान हे शंकर महाराज ह्यांचे शिष्य होते. त्यांना अनेक अलौकिक अनुभव आले होते, मिळाले होते.
मी लिहिले ते सच्च्या आध्यात्मिक गुरूंविषयी लिहिले, भोंदू गुरूंविषयी नाही. फक्त व्यवहारातली उदाहरणे दिली इतकेच.
भोंदू गुरू पुष्कळ असतात याचा अर्थ सच्चे गुरू नसतात असे नाही. असो.
धन्यवाद हीरा, तुमच्यामुळे
धन्यवाद हीरा, तुमच्यामुळे मीही हिरीरीने लिहिले, तशी ऊर्मी वाटली.
धन्यवाद शशांक पुरंदरे.
(No subject)
ऊर्मी हा ऊर्जेचाच एक प्रकार आहे, फक्त उत्स्फूर्त, क्षणिक आणि किंचित भावना ' प्रधान ' !
आणि मनाशी तादात्म्य पावलेला.
आणि मनाशी तादात्म्य पावलेला. आरस्पानी. फायद्या तोट्याचा विचार न करणारा, वाक्चातुर्यात न भुलवणारा, स्वयंप्रेरणा जागृक असण्याचं प्रतिक असणारा एकच सत्य शिव सुंदर अविष्कार!
>>> Submitted by अस्मिता. on
>>> Submitted by अस्मिता. on 9 March, 2023 - 23:04
ही पोस्ट आवडली आणि पूर्ण अनुमोदन.
'मी अश्विनी', 'किल बिल'चं उदाहरण मजेशीर आहे, पण मला आठवतंय त्यानुसार ती बिलच्या सांगण्यावरून येते ना शिकायला? बिलने तिचा कणा ऑलरेडीच मोडलेला असतो लाक्षणिक अर्थाने! गुरूने शिष्याला त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी सक्षम करायचं सोडून आपली ध्येयं त्याच्यावर लादल्याचं मासलेवाइक उदाहरण! पुढचं सगळं नाट्य त्यामुळेच तर घडतं!
तुम्ही दिलेलं उदाहरण नेमकं तुमच्या मुद्द्याच्या विरुद्ध आहे ना?
धन्यवाद बाई , तुम्ही माझ्या
धन्यवाद बाई , तुम्ही माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकताहात.
'प्रधान', गुड वन हीरा
>>> तुम्ही माझ्या शब्दांच्या
>>> तुम्ही माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकताहात.
हाच तो अहं!
(No subject)
पुढचे थोडेसे अवांतर वाटेल पण
पुढचे थोडेसे अवांतर वाटेल पण गाभा ईंटॅक्ट ठेवायचा प्रयत्न केला आहे...प्रतिसादही लंब आहे त्याबद्दल क्षमस्व,
बी पेशाने अॅसॅसिन आहे, बिल तिचा बॉस आहे ज्याच्याशी ती रोमँटिकली ईन्वॉल्ड आहे. बिल तिला पाय मे कडे पुढच्या ट्रेनिंग साठी पाठवतो ते तिच्या कामाचा भाग म्हणून. तसा तो एलला सुद्धा पाठवतो. जिच्याशी त्याचे बॉस आणि एम्प्लॉयी एवढेच नाते असते. ह्यात मला बिलने बीचा किंवा एलचा कणा मोडणे असे काही दिसले नाही. ग्रीन सुद्धा त्याची एम्प्लॉयी आहे आणि ती पायमे कडे जात नाही. सो दे हॅड अ फ्री विल टू चूझ.
पाय मे ला बी, एल किंवा बिल सुद्धा काय करतो त्यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत ह्याच्याशी काही कर्तव्य नाही, तो एक लिजेंडरी कुंग फू मास्टर आहे आणि तो त्याच्या विद्यार्थांना जोखून त्यांना किती कसे आणि किती ज्ञान द्यायचे हे ठरवतो.
तो सुरूवातीलाच बीला, 'तू तुझ्या तुटपुंज्या स्कीलवर एवढी अॅरोगंट आहेस तर तू माझ्याकडे राहण्यासाठी सर्वथ नालायक आहेस' म्हणूनच सांगतो. 'पुन्हा कधी अपमान केलास तर मी टूथपिक सारखी माझ्या एका हातानेच तुझी मान मोडेन' अशा अर्थाचे सुद्धा खडसावून सांगतो. प्रतिसादासाठी साधी मान न हलवल्याने सुद्धा अपमान वाटून पायमेने साठ शाओलिन माँक्सना मारले हे सुद्धा बीला ठाऊक असते. 'तुला कॅंटोनीज येत नाही, चॉप स्टिक्स्ने खाता येत नाही तर माझ्यालेखी तुझी लायकी कुत्राएवढीच आहे आणि मी तुला तसेच वागवणार' हे सुद्धा पायमे सांगतो.
तरीही बी तिथे राहते, शिकते.
ह्या डिस्क्लेमर नंतर सर्व विद्यार्थांना अहं त्यागून कुंग फू मास्टरी शिकण्यासाठी पायमेला अपेक्षित असलेली तळमळ दाखवण्याची आणि समर्पणाची समान संधी असते. पण तो भाव फक्त बीच दाखवू शकते ज्याचे फळ तिला ईतरांपेक्षा अगदी बिलपेक्षाही कैक पटीने जास्त मिळते.
थ्री ईंच पंच शिकवतांना बी कचरते, वेदनेला घाबरते तेव्हा तो तिला म्हणतो.. Your hand belongs to me now.
बी च्या रिवेंज स्टोरीमध्ये
बी आणि एलच्या फाईटमध्ये एल तिला पायमेच्या मृत्यूबद्दल सांगते तेव्हा बी ला ते ऐकून नक्कीच वाईट वाटते आणि त्याबदल्यात ती एलला जी शिक्षा देते ती देते. ते करतांना मलातरी बीची पायमे बद्दल प्रेमभावना नाही तर गुरू म्हणून जी आदरभावना आहे तीच दिसली. शिकून झाल्यावर पाय मेबद्दल बीला 'तो एक खत्रूड म्हातारा होता ज्याने मला पिडले, मोडले, प्रचंड शारिरिक मानसिक त्रास दिला अशी' असे वाटत नसून प्रत्येक अवघड प्रसंगी पायमेच्या शिकवणी आठवून ती त्या अंमलात आणते... Its her tribute to her great teacher!!
गुरूने शिष्याला त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी सक्षम करायचं सोडून आपली ध्येयं त्याच्यावर लादल्याचं मासलेवाइक उदाहरण! >> कुंगफू मास्टरी हेच बीचे ध्येय असते, त्यासाठीच ती पायमेकडे येते. बिल पाठवतो हे खरं पण तो तिच्या कामाचा भाग म्हणून. जर पाय मेला आपल्याकडचे आर्ट देण्यासाठी बीला जोखणे जरूरी असेल तर असे जोखणे तो साध्या चर्चेतून तर करू शकत नाही. बीला तोडून मोडून आधी ज्ञानासाठी लायक बनवणे आणि फायनली ते ज्ञान देणे हेच गुरू म्हणून पायमेचे काम होते ना. बिल किंवा एलला फाईव पॉईंट पंच शिकवून त्याचे पर्यावसान (अर्थातच आपल्या सिनेमा पुरते) त्यातच झाले असते ज्यात- गुरू द्रोणांनी अश्वत्थामाला गुरूची जबाबदारी टाळून प्रेमापोटी, गुरू-शिष्य परंपरा बाजुला सारून 'आपला मुलगा ह्या ज्ञानासाठी लायक आहे की नाही हे न जोखता संहारक नारायणास्त्राचे ज्ञान देण्यात झाले.
>>>
>>>
बिल किंवा एलला फाईव पॉईंट पंच शिकवून त्याचे पर्यावसान (अर्थातच आपल्या सिनेमा पुरते) त्यातच झाले असते ज्यात- गुरू द्रोणांनी अश्वत्थामाला गुरूची जबाबदारी टाळून प्रेमापोटी, गुरू-शिष्य परंपरा बाजुला सारून 'आपला मुलगा ह्या ज्ञानासाठी लायक आहे की नाही हे न जोखता संहारक नारायणास्त्राचे ज्ञान देण्यात झाले.
<<<
ही मुद्द्यांची गल्लत आहे. कल आणि कुवत जोखणे हा निराळा भाग झाला, हिर्याला तासून पैलू पाडणे हा निराळा.
कल आणि कुवत नसेल तर नुसत्या नम्रतेने किंवा समर्पणाने गुरूला जिंकणं शक्य असेल का, आणि त्याला काही अर्थ असेल का? असो.
पण आता या चर्चेनंतर किल बिल (दोन्ही) रीव्हिजिट करणं आलं. धन्यवाद, ही आठवण काढल्याबद्दल.
अस्मिता., तुझा धागा हायजॅक करून पाय मे कडे नेल्याबद्दल क्षमस्व.
अवांतरावर अवांतर : अश्वत्थाम्याला दिलं ते ब्रह्मास्त्र की नारायणास्त्र?
होऊ द्या अवांतर.
होऊ द्या अवांतर.
अवांतरावर अवांतर : अश्वत्थाम्याला दिलं ते ब्रह्मास्त्र की नारायणास्त्र?
>>>
ब्रह्मास्त्र, हे त्याला सोडता येत होते पण परत घेता येत नव्हते. त्यात द्रौपदीची पाचही मुलं व उत्तरेचा गर्भ ह्यांची हत्या झाली. शेवटी कृष्णाने तो गर्भ कसाबसा जिवंत केला. परीक्षित राजा झाला. द्रौपदी सम्राज्ञी व युधिष्ठिर सम्राट असूनही सुभद्रा आणि अर्जुनाचा नातू हस्तिनापुराचा सम्राट झाला. कृष्णाने दिलेल्या शापामुळे अश्वत्थाम्याला तेल मागत शूलपाणीच्या जंगलात फिरावं लागतंय. युद्धपूर्व अर्जुन विषाद योग आहे तसा युद्धपश्चात युधिष्ठिर विषाद योगाचा उल्लेख ऐकला आहे.
अस्त्र म्हणजे missile व शस्त्र म्हणजे weapon असा अर्थ मी घेतेय, कारण अस्त्राने जास्त विनाश होतो. अस्त्र हे nuclear weapon/ weapons of mass destruction असू शकते. 'ब्रह्म' म्हणजे विश्वाचा केंद्रबिंदू या अर्थाने घेतले तर हे नक्कीच अण्वस्त्र असायला हवं. योगेश्वर वासुदेवाला पहिल्यांदा इतका राग आला, makes sense to me !
सुरेख चर्चा चाललीय.मी, अमितव
सुरेख चर्चा चाललीय.मी, अमितव यांच्याशी सहमत आहे.
रघू आचार्य,हीरा आणि इतरांचे प्रतिसाद जबरी आहेत.
Pages