महिलादिनानिमित्त आढळणारे स्त्री-पुरुष भेदभाव आणि मतभेद!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 March, 2023 - 18:03

महिलादिनानिमित्त आढळणारे स्त्री-पुरुष भेदभाव आणि मतभेद!

गेले काही वर्षे आमच्याकडे सातत्याने महिलादिन साजरा केला जातो.
आमच्याकडे म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये.

कार्यक्रम साधारण असा असतो.

१) महिला कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केल्या केल्या त्यांना गुलाबाचे फूल आणि भलामोठा पुष्पगुच्छ दिला जातो.

२) रिसेप्शनचा एक कोपरा छान सजवलेला असतो. जिथे त्यांचा छानसा फोटो काढला जातो.

३) भलामोठा पुषगुच्छ फोटो काढल्यावर परत घेतला जातो. परंतु गुलाबाचे फूल आपल्यासोबत नेता येते.

४) जागेवर जाताच तिथे त्यांच्यासाठी एक छानसे गिफ्ट त्यांची वाट बघत असते. त्याचे पर हेड बजेट पोरांच्या बड्डे पार्टीच्या रिटर्न गिफ्ट ईतके असते. चहा पिता पिता बायका तुला कुठला कलर आला, मला बाई ड्रेसला मॅचिंगच आला अश्या चर्चा करताना आढळतात.

५) दुपारच्या जेवणानंतर (छे. ते कंपनी देत नाही) बायकांसाठी ऑफिस कॅंटीनच्या जागेत कार्यक्रम आयोजित केले जातात. ते मला "हम आपके है कौन" ची आठवण करून देतात. कारण ते पुरुषांना बघायला सक्त मनाई असते. पुरुषांनी ऑफिसवेळेत काम करणे अपेक्षित असते.

६) कार्यक्रम धमाल असतात. बायकांच्या हसण्याखिदळण्याचे आवाज महिलादिनी काम करणाऱ्या दीनवाण्या पुरुषांच्या कानावर आदळत असतात. मध्येच टाळ्याचा कडकडाट ऐकू येतो. गेम्समध्ये जिंकलेल्या बायकांना बक्षीसे वाटली जात असतात. पाठोपाठ मचाक मचाक आवाज ऐकू येतो. सोबत दरवळणारा खमंग वास. संध्याकाळचे स्नॅक्स बायकांना फ्री असतात.

७) संध्याकाळी बायका जागेवर येतात ते कॉम्प्युटर शट डाऊन करून घरी जायला म्हणूनच..

या सर्वात पुरुष कुठेच नसतात!

त्यामुळे ते चिडतात. चरफडतात. जळतात..

पहिल्या वर्षी हे दु:ख पुरुषांनी हसत हसत पचवले.
पण हे दरवर्षीच घडू लागल्यावर तो अन्याय त्यांना खपवून घेता आला नाही.
आजच्या या पवित्र दिवशी आपल्या फेसबूक आणि व्हॉटसप स्टेटसवर स्त्रियांच्या महानतेचे गुणगाण गात आपल्या मैत्रीणींना ईम्प्रेस करणाऱ्या पुरुषांना आता मत्सराचा अग्नी जाळू लागला.

भराभर चक्रे हलली. टॉप मॅनेजमेंटला पुरुषांचीच मेजॉरीटी होती. त्यातल्या निम्म्या जणांची वृत्ती माजोरडी होती. बघता बघता महिलादिनाचे स्वरुप बदलून गेले. आता तो असा साजरा होतो.

१) फुल, पुष्पगुच्छ, फोटो, भेटवस्तू आणि दुपारनंतरचे कार्यक्रम नाहीसे झाले आहेत.

२) फुकटचा नाश्ता आता स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान आणि जागेवरच मिळतो.

३) तो खाऊन पुरुष लागलीच मुंडी खाली घालून आपल्या कामाला लागतात.

४) बायका मात्र नवे नवे छान छान कपडे घालून येतात. आपले फोटो आपणच काढतात. दिवसभर हसत खिदळत राहतात.

५) काही बायका पुरुषांनी आमचे कार्यक्रम रद्द केले म्हणून त्यांच्यावर आगपाखड करतात. तर काही पुरुषांना बायकांचे हसणेखिदळणे आजही त्रास देते.

-------------------------------------

का माहीत नाही. पण हे सारे पाहिले की महिलादिनाच्या दिवशीच मला स्त्री-पुरुष मतभेद प्रकर्षाने जाणवतात!

-------------------------------------

तळटीप - लेखाचा जॉनर डार्क ललित लेख आहे. त्यामुळे जे लेखकाला सांगायचे आहे ते प्रत्येक स्त्री-पुरुषापर्यंत पोहोचेल याची खात्री नाही.

धन्यवाद,
ऋन्मेष
(एक बायका आवडणारा पुरुष)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे हो कुढणे कसले.. (लेखाचा जॉनर वेगळा असल्याने गल्लत झाली असावी)
मला तर आवडतात असले डेज
आम्ही घरीही सेलिब्रेट केला.
हा आमचा घरी बनवलेला केक Happy

IMG-20230309-WA0000.jpg

सरकार,विविध संस्था,विविध समाज सुधारक ,अनेक पुरुष ह्यांनी स्त्रियांना समान अधिकार मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले.
जग भरात सर्व सरकार नी स्त्री ला अधिकार मिळावे म्हणून एकतर्फी कायदे बनवले .
दुःख ह्याचेच आहे तरी स्त्रिया त्याचा फायदा उचलत नाहीत.
स्त्रिया स्वतःच गुलामी च्या मानसिकता मधून बाहेर येत नाहीत.
1,) ही आहे सर्वात सुंदर आयपीएस,,/ आयएएस स्त्री अधिकारी

२) ही आहे अतिशय हॉट आणि सुंदर ::;;;;क्रिकेटर च बायको.
३) हे अभिनेत्री दिसते खूप सुंदर.
अशा बातम्या येत असतात आणि त्यांस स्त्रिया विरोध करत नाही
सुंदर ता हीच मुळी निसर्गाची देणगी आहे त्या मध्ये काहीच स्वतःचे कर्तुत्व नाही.
.
स्त्री जी विविध क्षेत्रात आहे तिच्या कर्तुत्व वाची जेव्हा सर्व
मध्यामात चर्चा होईल तेव्हा .
तेव्हाच
स्त्री नी स्वतः मध्ये बदल केला आहे असे म्हणता येईल.

शरीर दाखवण्या पेक्षा कर्तुत्व दाखवा तेव्हाच समानता येईल.
अन्यथा नाही

केक एकदम प्रो बनला आहे!! वहिनी अतिशय एक्स्पर्ट बेकर.
बाकी महिला दिन कार्यक्रम:
हे बऱ्याच कंपनीज ने बंद केले.महिला म्हणून खास कार्यक्रम इत्यादी पेक्षा आरोग्य,मानसिक आरोग्य,वर्क लाईफ बॅलन्स(हा लहान मुलांच्या सी सॉ इतका वेगाने इकडे तिकडे झुकत असतो), इतर विषयावर उपयोगी सेशन्स ठेवली जातात.ती महिला पुरुष दोन्ही वर्ग अटेंड करतात.

बाकी फुकट स्नॅक्स बंद झाल्याचे दुःख अधून मधून होतेच. Happy
मला भोवती काम करणाऱ्या मेन साठी मेन्स डे साजरा करून त्यांनाही फुलं वॉलेट इत्यादी द्यावे असं वाटतं.अर्थात हे अजून केलं नाहीये.

दुपारच्या जेवणानंतर (छे. ते कंपनी देत नाही) बायकांसाठी ऑफिस कॅंटीनच्या जागेत कार्यक्रम आयोजित केले जातात. ते मला "हम आपके है कौन" ची आठवण करून देतात. कारण ते पुरुषांना बघायला सक्त मनाई असते. पुरुषांनी ऑफिसवेळेत काम करणे अपेक्षित असते. >>> एकदम परफेक्ट...

वेगळेपण नष्ट करणे म्हणजे समानता सरळ अर्थ आहे.
पाच वर्षाच्या आत मधील mulamulit हि समानता दिसते.
नंतर का वेगळेपण निर्माण केले जाते .
कोणत्याच प्राणी ,पक्षी ह्या मध्ये नैसर्गिक वेगळी वागणूक नसते..
ती मानव मध्ये च का?
हा खरा प्रश्न आहे

लेखकाला सांगायचे आहे ते प्रत्येक स्त्री-पुरुषापर्यंत पोहोचेल याची खात्री नाही.>> पोहोचले.

हेमंत यांना अनुमोदन. शोभेची बाहुलीपण बास. कर्तुत्व गाजवण्याचा काळ आहे. मोकाभी है दस्तुर भी. अर्थात नाना क्षेत्रात संधी आहेत. हां पगार काही टक्के पुरुषांहून कमी मिळतो, भेदभावाची वागणूक दिली जाते हेही सत्य आहे. पण म्हणुन मागे पडण्यात अर्थ नाही. काल 'इला प्रसाद' यांची एक कविता माझ्या मैत्रिणींना पाठवलेली. त्याच अंश -
>>>>>>
तुमने क्या महसूसा नहीं अब तक
कि अपराध और अँधेरे का गणित
एक होता है ?

और अँधेरा घर के अन्दर भी
कुछ कम नहीं हैं
डरना ही है तो अँधेरे से डरो
घर के अन्दर रहकर
घर का अँधेरा
बनने से डरो !

वेगळे पण निसर्गात कुठे दिसत नाही मग माणसात च का!
हा खरे तर कळी चा प्रश्न आहे
वेगळेपण दाखवणे सुरू झाले की अत्याचार करणारा आणि अत्याचार ज्याच्यावर होतो तो असे दोन वर्ग निर्माण होणार च.
जातीय वेगळे पण.
धार्मिक वेगळेपण.
लिंग आधारित वेगळेपण .
जो पर्यंत आहे तो पर्यंत अन्याय करणारा आणि अन्याय ग्रस्त हे वर्ग असणार च.
स्त्री पुरुष मधील वेगळेपण जपणे म्हणजे भेदभाव कायम पुढे चालू ठेवण्यास मदत करणे ..
असा अर्थ आहे.
जातीय वेगळे पण जपणे म्हणजे जातीय भेदभाव पुढे चालू राहण्यास मदत करणे (हे उदाहरण आहे)

हेमंत सिंहाचा हारेम असतो. अनेक सिंहीणी असतात त्याच्या. आणि सिंहीणी शिकार करतात. सिंह टेरेस्ट्रिअल टेरिटोरिअल असतो म्हणजे तो गस्त घालतो, दुसर्‍या सिंहास आपल्या भागात येउ देत नाही.
प्राण्यातही वैविध्य आहे.
सी हॉर्स मध्ये नर मासा अंडी वाढवतो (का उबवतो)

सामो : कविता आवडली. 'घर का अंधेरा बनने से डरो'

फुकट स्नॅक्स बंद झाल्याचे दुःख अधून मधून होते
mi_anu >>>खरे आहे.
एका एम्प्लॉयरने (ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी) पेंटिंग सेशन ठेवले होते विमेन्स डे च्या निमित्ताने एका वर्षी. आम्ही जमेल तशी पेंटिंग्स केली. ही एक चांगली आठवण इतक्या वर्षातील.

लेखाचा वानर सामान्यांसाठी नाही हे कळवल्याने आमच्या इथे महिला दिनाला हळदीकुंकू असते हे सांगून खाली बसतो.

हेमंत सरांचे प्रतिसाद पण सामान्यांसाठी नाहीत का ?
वेगळेपण दाखवणे सुरू झाले की :- वेगळेपण आहेच ना ?
दाखवायचे नाही म्हणजे काय ? तुम्हाला स्त्रीपुरूष समानता म्हणजे सर्व स्त्रियांनी बॉयकट करून शर्टपँट घालणे, दाढी मिशा लावणे. ही अपेक्षित आहे का ?
स्त्री ला सुंदर दिसायला आवडतं, नटायला आवडत असेल तर तुम्ही आम्ही कोण तिला सांगणार ?
तिची आवड जपली तर समान संधीसाठी पात्र राहणार नाही असलं कायतरी सांगताय का ?

भेद आहे तर समानता ची मागणी .
हे काय विरुद्ध अर्थ असणारे लॉजिक आहे .
दोघांचे भेद जपून समान संधी हा अर्थ असेल तर.
संधी ही समान च असायला हवी.
मग आरक्षण एकालाच देणे .
हे कसे योग्य

अभ्यास वाढवा इतकेच सांगेन.
विद्वान लोकांचे म्हणणे मान्य नसेल, वाचायचे नसेल, पुस्तकांशी वाकडे असेल तर किमान,
मायबोलीवरच्या शहाण्या लोकांनी आधीच लिहीलं आहे. शोध घेऊन वाचावे आणि मग(च) प्रकटावे.

प्राण्यातही वैविध्य आहे.
सी हॉर्स मध्ये नर मासा अंडी वाढवतो (का उबवतो)

पण तो इमाने इतबारे ते काम करतो ना.
माझ्यावर अन्याय होत आहे म्हणून बंड करत नाही.

मी विरोधाला विरोध करत नाही.
चर्चेत सर्व मुद्धे आले पाहिजेत म्हणून थोडे विचित्र (सामान्य लोकांच्या विचार,किंवा समजुती पेक्षा वेगळे प्रतिसाद ठरवून देत आहे))
वाटणारे प्रतिसाद देत आहे ह्याची जाणीव आहे

सिंह टेरेस्ट्रिअल असतो म्हणजे तो गस्त घालतो, दुसर्‍या सिंहास आपल्या भागात येउ देत नाही.>> आपल्याला टेरिटोरिअल म्हणायचे आहे का?

आमच्या इथे पण कोविड पूर्व काळात फार धमाल असायची वर लिहिले आहे तशीच. आता काल फक्त एक वेबिनार होता काहीतरी हेल्थ व्गैरे वर
त्याला टांग मारली. गिफ्ट खाउ वगैरे काही नाही आता आमच्या इथे सेफ्टी सप्ताहच उत्साहात चालू आहे. क्वि झ, पोस्ट र बनवायची स्पर्धा वगैरे.

@ढं.टं. >> दोन तुल्यबळ मल्लांची कुस्ती चालू असेल तिथे इतरांनी बळेच घुसू नये अशा अर्थाची नोट आहे ना प्रतिसादात ? भर बाजारात दोन वळू एकमेकांना भिडतात त्यांना जगरहाटीची पर्वा असते का ?

>>>>चर्चेत सर्व मुद्धे आले पाहिजेत म्हणून थोडे विचित्र (सामान्य लोकांच्या विचार,किंवा समजुती पेक्षा वेगळे प्रतिसाद ठरवून देत आहे))
वाटणारे प्रतिसाद देत आहे ह्याची जाणीव आहे
होय आपण हे नेहमी करता. माझे निरीक्षण आहे. चांगली सवय आहे.

ज्या गोष्टींवर भरपूर चर्चा झालेली असते ती वाचण्यात सुद्धा "पुरूषार्थ" असतो. आपल्याला माहिती नसेल तर विनंती करता येते. आपल्या माहितीसाठी प्रत्येक वेळी पब्लिक डोमेन मधे उपलब्ध असलेल्या गोष्टी चर्चेच्या नावाखाली कुणी तरी आयत्या आणून देण्यात काय अर्थ आहे ? लोक एकदा तुम्हाला डोकं देतील, दोनदा देतील , तिसर्‍यांदा करत असतील तर त्यांचे त्यांना तसे करणे चुकीचे वाटते.

इथेच जुन्या चर्चा शोधून वाचण्यात अडचण काय आहे ?

स्त्री पुरूष यांच्यात भेद आहेत तरीही समानता का ? असा प्रश्न मागच्या शतकातल्या लोकांना पडत होता. सहस्त्रकच म्हणायला पाहीजे. इंटरनेट, सोशल मीडीया मुळे माहितीचा विस्फोट होऊन आता असे प्रश्न पडत नाहीत. तरीही ही शंका असेल तर सरळ विचारायची.
इथे सरकारी साईटवर थोडक्यात माहिती आहे. ही शंका असेल तर बेसिक कन्स्पेट्स दुरूस्त करून घ्याव्या लागतील. त्यासाठी हळूहळू वाचनाची सवय ठेवायला पाहीजे. इथे कुणीलातरी चर्चेच्या बुरख्याखाली कामाला लावणे अयोग्य आहे.
https://www.vic.gov.au/gender-equality-what-it-and-why-do-we-need-it

मानवी अधिकार अधिकृत वेबसाईट
https://www.humanrightscareers.com/issues/10-reasons-why-gender-equality...

लिंगाधिष्ठित समता का ?
https://www.un.org/sustainabledevelopment/wp-content/uploads/2018/09/Goa...

युनिसेफ
https://www.unicef.org/india/what-we-do/gender-equality

संयुक्त राष्ट्रसंघ
https://unglobalcompact.org/what-is-gc/our-work/social/gender-equality

प्रयत्न केला तर मराठीत सुद्धा चांगला कंटेट सापडेल. न वाचताच पूर्वग्रहदूषित प्रश्न विचारत राहणे ही चांगली सवय नाही. जर आपल्याला चांगल्या रितीने ठाऊक असेल आणि चर्चा घडवून आणायची असेल तर प्रश्नपत्रिका काढण्याऐवजी सरळ उत्तरपरिका लिहावी.

डार्क ललितलेख म्हणजे काय.

ललितलेख महितेय. डार्क ह्युमर असतो तसा प्रकार का हा, डार्क ललितलेख.

बाकी केक मस्त आहे.

पुरुषांनी ऑफिसवेळेत काम करणे अपेक्षित असते. >> हे वाचून उगाच आपला सर मायबोली मधे काम करतात का असा प्रश्न मनाला चाटून गेला. Lol

बारा वर्षांपूर्वी आमच्याकडे सगळे दिवस ऑफिसात साजरे व्हायचे पण कधी महिला दिन झाल्याचे आठवत नाही. FB आणि व्हाट्सअँप बोकाळल्यावरच बरेच डे ज आणि ट्रॅडीशन्स बोकाळल्या असं माझं निरीक्षण आहे.

पण स्त्री पुरुष समानता काही खरी नाही (सामान हक्क म्हणायचं का ?), म्हणजे बायका त्यांच्या स्वभावानुसार चटचट काम करतात (अपवाद असतीलच ) , multiprocessing त्यांना लीलया जमते, हे झालं साधारण गृहीतक.
घरी म्हणाल तर बाबांपेक्षा आईशी थोडं जवळकीच नातं असतं, आजोबानाधी आजीची माया मोठं झाल्यावरही आठवते, मावशी आणि आत्या त्यांच्यासाठी पण एक कोपरा असतोच.

मला वाटतं महिला दिन हा आतापर्यंत महिलांचं पिढ्यान्पिढया जे शोषण होत होतं, त्यावर मात करून आज त्या प्रत्येक क्षेत्रात उज्वल कामगिरी कर्ततायत त्याचा सन्मान करायच एक निमित्त आहे किंवा असावं.
आणि भविष्यात ते इतकं सामान्य वाटेल कि महिला दिन वेगळा साजरा करावा अशी गरजच उरणार नाही.

FB आणि व्हाट्सअँप बोकाळल्यावरच बरेच डे ज आणि ट्रॅडीशन्स बोकाळल्या असं माझं निरीक्षण आहे.
>>>>

काल एका मैत्रीणीशी चर्चा करत असताना मी हेच निरीक्षण नोंदवले. सेलिब्रेट करा आणि शेअर करा हे कल्चर बोकाळले आहे. किती जण केवळ मिरवण्यासाठी सेलिब्रेट करतात आणि किती जणांना तसे मनापासून काही सेलिब्रेट करावे असे वाटते हा संशोधनाचा विषय ठरेल.
पण तरीही एक गोष्ट मात्र चांगली आहे की जागरूकता वाढते.

हे वाचून उगाच आपला सर मायबोली मधे काम करतात का
>>>
मायबोली हा छंद आहे. त्यासाठी वेळ काढावा लागतो. माझे टाईम मॅनेजमेंट पर्रफेक्ट आहे. तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. तरी माझ्या पोस्ट तुम्हाला दिवसा ऑफिसटाईमला फार कमी दिसतील. मी रात्रीच जास्त जागा असतो हे आढळून येईल. हा धागाही बघाल तर रात्र संपून पहाट जिथे सुरू होते तिथे काढलेला आढळेल.

Pages