महिलादिनानिमित्त आढळणारे स्त्री-पुरुष भेदभाव आणि मतभेद!
गेले काही वर्षे आमच्याकडे सातत्याने महिलादिन साजरा केला जातो.
आमच्याकडे म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये.
कार्यक्रम साधारण असा असतो.
१) महिला कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केल्या केल्या त्यांना गुलाबाचे फूल आणि भलामोठा पुष्पगुच्छ दिला जातो.
२) रिसेप्शनचा एक कोपरा छान सजवलेला असतो. जिथे त्यांचा छानसा फोटो काढला जातो.
३) भलामोठा पुषगुच्छ फोटो काढल्यावर परत घेतला जातो. परंतु गुलाबाचे फूल आपल्यासोबत नेता येते.
४) जागेवर जाताच तिथे त्यांच्यासाठी एक छानसे गिफ्ट त्यांची वाट बघत असते. त्याचे पर हेड बजेट पोरांच्या बड्डे पार्टीच्या रिटर्न गिफ्ट ईतके असते. चहा पिता पिता बायका तुला कुठला कलर आला, मला बाई ड्रेसला मॅचिंगच आला अश्या चर्चा करताना आढळतात.
५) दुपारच्या जेवणानंतर (छे. ते कंपनी देत नाही) बायकांसाठी ऑफिस कॅंटीनच्या जागेत कार्यक्रम आयोजित केले जातात. ते मला "हम आपके है कौन" ची आठवण करून देतात. कारण ते पुरुषांना बघायला सक्त मनाई असते. पुरुषांनी ऑफिसवेळेत काम करणे अपेक्षित असते.
६) कार्यक्रम धमाल असतात. बायकांच्या हसण्याखिदळण्याचे आवाज महिलादिनी काम करणाऱ्या दीनवाण्या पुरुषांच्या कानावर आदळत असतात. मध्येच टाळ्याचा कडकडाट ऐकू येतो. गेम्समध्ये जिंकलेल्या बायकांना बक्षीसे वाटली जात असतात. पाठोपाठ मचाक मचाक आवाज ऐकू येतो. सोबत दरवळणारा खमंग वास. संध्याकाळचे स्नॅक्स बायकांना फ्री असतात.
७) संध्याकाळी बायका जागेवर येतात ते कॉम्प्युटर शट डाऊन करून घरी जायला म्हणूनच..
या सर्वात पुरुष कुठेच नसतात!
त्यामुळे ते चिडतात. चरफडतात. जळतात..
पहिल्या वर्षी हे दु:ख पुरुषांनी हसत हसत पचवले.
पण हे दरवर्षीच घडू लागल्यावर तो अन्याय त्यांना खपवून घेता आला नाही.
आजच्या या पवित्र दिवशी आपल्या फेसबूक आणि व्हॉटसप स्टेटसवर स्त्रियांच्या महानतेचे गुणगाण गात आपल्या मैत्रीणींना ईम्प्रेस करणाऱ्या पुरुषांना आता मत्सराचा अग्नी जाळू लागला.
भराभर चक्रे हलली. टॉप मॅनेजमेंटला पुरुषांचीच मेजॉरीटी होती. त्यातल्या निम्म्या जणांची वृत्ती माजोरडी होती. बघता बघता महिलादिनाचे स्वरुप बदलून गेले. आता तो असा साजरा होतो.
१) फुल, पुष्पगुच्छ, फोटो, भेटवस्तू आणि दुपारनंतरचे कार्यक्रम नाहीसे झाले आहेत.
२) फुकटचा नाश्ता आता स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान आणि जागेवरच मिळतो.
३) तो खाऊन पुरुष लागलीच मुंडी खाली घालून आपल्या कामाला लागतात.
४) बायका मात्र नवे नवे छान छान कपडे घालून येतात. आपले फोटो आपणच काढतात. दिवसभर हसत खिदळत राहतात.
५) काही बायका पुरुषांनी आमचे कार्यक्रम रद्द केले म्हणून त्यांच्यावर आगपाखड करतात. तर काही पुरुषांना बायकांचे हसणेखिदळणे आजही त्रास देते.
-------------------------------------
का माहीत नाही. पण हे सारे पाहिले की महिलादिनाच्या दिवशीच मला स्त्री-पुरुष मतभेद प्रकर्षाने जाणवतात!
-------------------------------------
तळटीप - लेखाचा जॉनर डार्क ललित लेख आहे. त्यामुळे जे लेखकाला सांगायचे आहे ते प्रत्येक स्त्री-पुरुषापर्यंत पोहोचेल याची खात्री नाही.
धन्यवाद,
ऋन्मेष
(एक बायका आवडणारा पुरुष)
केक एकदम प्रो बनला आहे!!
केक एकदम प्रो बनला आहे!! वहिनी अतिशय एक्स्पर्ट बेकर.
>>>
@ मी अनू, धन्यवाद. आणि हो, तिचा केक बनवायचा व्यवसाय देखील आहे.
वरचा केक सोसायटीच्या वूमन्स डे सेलिब्रेशन कम किटी पार्टीसाठी बनवला होता.
शरीर दाखवण्या पेक्षा कर्तुत्व
शरीर दाखवण्या पेक्षा कर्तुत्व दाखवा >>>> दाखवण्यासारखे शरीर कमावणे कर्तृत्व आहे आजकाल.
Submitted by शामली- on 9 March, 2023 - 15:40
>>>>.
+७८६ अनुमोदन. ही चर्चा मिसलेली..
पुरुष कलाकारही हे कर्तुत्व दाखवू लागलेत. एखादा जॉनच नाही तर जात्याच देखण्या असलेल्या हृतिक रोशनला वा ईतर कलागुणांवर सुपर्रस्टार म्हणून मिरवणाऱ्या शाहरूखलाही हे कर्तुत्व दाखवावेसे वाटू लागलेय यातच महत्व अधोरेखित होते.
मुळात शरीर सौंदर्य ही गॉड गिफ्ट आहे. त्यात काय कर्तुत्व असते. नुसते शोभेची बाहुली. असा एक ढोबळमानाने विचार असतो. हा विचार खरे तर पुरुष दाखवतात तेच खरे कर्तुत्व आणि बायका आयते देवाने दिलेले सौंदर्य मिरवतात त्यात काय एवढे अश्या मानसिकतेतून आला आहे.
एखादा गायक मग ती पुरुष असो वा स्त्री, त्यांना गोड सुरेल गळ्याची गॉड गिफ्टच असते. पण त्यानंतर ते शिकून, मेहनत घेऊन, सराव करून तयार होतात. हेच सौंदर्यालाही लागू. जे जन्मजात मिळालेय तितकेच पुरेसे नसते. जर त्या सौंदर्याची निगा नाही राखली. फिटनेस आणि फिगरवर मेहनत नाही घेतली. तर त्याचाही भोपळाच होईल. नुसते सुंदर जन्माला येणे पुरेसे नसते.
एखादी आकर्षक ललना समोर आली तर केवळ शोभेची बाहुली म्हणून नेत्रसुख घेण्याआधी तिने त्यामागे घेतलेल्या मेहनतीची कदर करावी असा विचार मनात यायला हवा.
घर भेदी,राष्ट्र भेदी तसा .
घर भेदी,राष्ट्र भेदी तसा .
ऋनमेष चा प्रतिसाद पुरुष भेदी.
ऋनमेष.
तुम्ही पहिले हे सांगा .
तुम्ही आमच्यात आहात की त्यांच्यात
तुम्ही आमच्यात आहात की
तुम्ही आमच्यात आहात की त्यांच्यात
>>>
लेख पुर्ण वाचा रे माझे
शेवटच्या ओळीत लिहीले आहे
पुरुष भेदी. >>> ऐवजी
पुरुष भेदी. >>> ऐवजी लिंगभेदी असा शब्द समर्पक राहील जो कुठल्याही लिंगाच्या व्यक्तीस लागू होईल.
लेख पुर्ण वाचा रे माझे >>
लेख पुर्ण वाचा रे माझे >> लोक शीर्षक आणि थेट प्रतिसाद वाचायला येतात याची ही पावतीच म्हणायची.
लिंगभेदी >> लिंगं छिदन्ति शस्त्राणि असे अपेक्षित आहे का ?
लिंगभेदी असा शब्द समर्पक
लिंगभेदी असा शब्द समर्पक राहील >>>>>>
गगनभेदी म्हणजे गगन भेदून जाणारा.
घरचा भेदी = घर भेदी
वर्णभेदी हा शब्द खरे तर वर्णद्वेष्टा असा आहे. वर्णावरून द्वेष करणारा.
लिंगभेदी हा लिंगाधारीत द्वेष किंवा भेद असा असायला पाहीजे.
लिंगाचा भेदी किंवा लिंगाचा द्वेष्टा असे दोन्ही शब्द गोंधळ उडवतात.
घरभेदी .
घरभेदी .
म्हणजे घरा चे हित,घराशी शी संबंध तोडून पुढे जाणे.घराचे
अहित करणे.
क्रॉस boundary लाईन.
तसे .
पुरुष भेदी
म्हणजे पुरुषत्व चा त्याग करून पुढे जाणे.(,,पुढे म्हणजे कुठे स्त्रीत्व कडे)
पुरुष जातीचे अहित करणे.
काय ते ठरवा आणि मला कळवा
काय ते ठरवा आणि मला कळवा
मी माझा बायोडेटा तसा अपडेट करतो
हॉस्टेजेस ची सुटका होते
हॉस्टेजेस ची सुटका होते त्यातही आधी स्त्रिया-मुलांना सोडतात. पुरुषांवरती एक प्रकारे अन्याय आहेच.
जगण्याचा अधिकार प्रत्येकाला
जगण्याचा अधिकार प्रत्येकाला समान असला तरी पुढची मदत येईपर्यंत आहे त्या परिस्थितीत तग धरून राहण्याची गरज पाहता फिजिकल फिटनेस निकष लावून मुले, वृद्ध, अपंग त्यानंतर स्त्रिया आणि सरतेशेवटी धडधाकट बाप्यें हा क्रम तसा योग्यच आहे.
तुझं नाव काय?
तुझं नाव काय?
मला आवडला. ठीक आहे असं होण्याची शक्यता कमी असते पण बघताना लॉजिकल वाटलं. 35 मिनिटात संपला हे सर्वात जास्त आवडलं. आवडलं तर आवडलं. Can't help.
रानभूली, या चित्रपटाची पोस्ट
रानभूली, या चित्रपटाची पोस्ट या धाग्यावर का?
विषयाशी संबधित आहे का?
>>> विषयाशी संबधित आहे का?
>>> विषयाशी संबधित आहे का?
कोण, कोणास, कुठे, का व केव्हा म्हणाले या स्वरूपाचा व कोणत्याही धाग्यावर योग्य ठरू शकेल असा प्रश्न विचारण्याचे अभूतपूर्व धाडस केल्याबद्दल अभिनंदन
शप्पथ ! बायकांविषयी तसं बोललं
*मायबोली हा छंद आहे. * - खरंय. कोण , कां व कसं इथे लिहिल, हे सांगणं कठीण ! -
शप्पथ ! बायकांविषयी तसं बोललं की माबोवरच्या पुरुषवर्गात जरा भाव वाढतो, केवळ म्हणून मी तसं बोललो !!
कहासे आते है ये पुरुष ज्याना
कहासे आते है ये पुरुष ज्याना पुरुषवर्गातच भाव वाढवायचा असतो
बेफ़िकीर, धन्यवाद
बेफ़िकीर, धन्यवाद
धागा का वर आला समजत नाहीये..
आणि आता इथून कुठे जाणार ते देखील..
*...ज्याना पुरुषवर्गातच भाव
*...ज्याना पुरुषवर्गातच भाव वाढवायचा असतो ..* -
पुरुषवर्गातच
नव्हे, पुरुषवर्गातही !
गुगल सर्च करताना मायबोलीवरचा
गुगल सर्च करताना मायबोलीवरचा धागा त्यात दिसला म्हणून क्लिक केलेलं.
व्हॉटस अॅप ग्रुपवर कमेण्ट करताना ती इकडे पडली. लक्ष रस्त्यावर असल्याने पोस्ट झाली. इथे कमेण्ट पोस्ट झाली आहे हे आता नवीन वर क्लिक झाल्यावर कळलं. चार तास होऊन गेलेत. अॅडमिन उडवू शकतात कमेण्ट. या धाग्यावर लिहीण्याची बिल्कुल इच्छा नव्हती हे नम्रपणे नमूद केलं तर चालेल ?
अनेक जुने धागे वर येत असतात त्यामुळं त्याबद्दल प्रश्न (कुणालाही) का पडावा ?
Pages