या विभागातील हा माझा पहिलाच धागा. या विभागाचे सदस्यत्वही आजच ताजेताजे घेतले आहे.
एका सुंदर जागी गेल्याने काही सुंदर फोटो काढायचा योग आला म्हणून धागा काढण्याची संधी घेतोय.
जागेचे नाव आहे - माळशेज घाट
नशीबवान आहेत ते लोकं ज्यांच्या गावाला जायचा रस्ता माळशेज घाटातून जातो.
आजवर कधी गेले नसल्यास आवर्जून भेट द्या..
खालीलपैकी कुठले छायाचित्र आवडले हे देखील आवर्जून कळवा.
काही फोटो मित्रांनी काढलेले आहेत, त्यांचे आवडल्यास त्यांना कळवतो.
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
धन्यवाद
ऋन्मेष
जर येथील विडिओ बघावासा वाटला तर खालील लिंकवर बघू शकता
Dosti Lakewood Resort, Malshej Ghat - https://www.youtube.com/watch?v=Gl08p985q2U
जर या सहलीचे वर्णन वाचायचे असेल तर खालील लिंकवर वाचू शकता
एका माणूसघाण्याची पिकनिक - https://www.maayboli.com/node/79682
पुन्हा एकदा,
धन्यवाद
ऋन्मेष
माळशेज ईथे मार्चच्या एंडला
माळशेज ईथे मार्चच्या एंडला जायचे झाल्यास मजा असते का तिथे? आणि काय बघण्यासारखे असते या सीजनला? जर कुटुंबासमवेत दोन दिवस दोन रात्र राहायचे ठरवले तर काय आणि कसे प्लान करता येईल?
प्लीज जाणकारांनी सुचवा..
माळशेज ला मार्च एन्ड ला धबधबे
माळशेज ला मार्च एन्ड ला धबधबे अजिबात नसतात.
आणि काय बघण्यासारखे असते >
आणि काय बघण्यासारखे असते >
जाळण्यासारखे म्हणायचेय का ?
मुंबईहून आम्ही माळशेजला
मुंबईहून आम्ही माळशेजला कितीदा कितीदा जात असू. तेही मित्रमैत्रिणींबरोबर.
आहेच ती जागा सुंदर.
आहेच ती जागा सुंदर.
चिडकू धबधबे नसतील मार्चला हे
चिडकू धबधबे नसतील मार्चला हे गृहीत धरलेय. त्याजागी स्विमिंगपूल असलेले रिसॉर्टवर तहान भागवून घेऊ.
पण बाकीचे क्लायमेट आणि निसर्गसौंदर्य कसे असते या सीजनला. या आधी पावसाळ्याव्यतीरीक्त तिथे कधी जाणे झालेच नाहीये.
जाळण्यासारखे म्हणायचेय का?>>>
जाळण्यासारखे म्हणायचेय का?>>> हा हा... नाही. एकदा एक डोंगर जाळला तो पुरे. लोकांना ते ही खोटे वाटते ईथे. त्यामुळे आता पुन्हा तेच करायची ईच्छा राहिली नाही.
सामो, नशीबवान आहात
तालीश म्हणून नाणेघाटात एक
तालीश म्हणून नाणेघाटात एक कड्यावर रिसॉर्ट आहे ते चांगले वाटले होते. नाणेघाटात सूर्यास्त चांगला दिसतो. माळशेज मध्ये एमटीडीसी चे पण रिसॉर्ट आहे. तिथे जवळ पिंपळगाव जोगा धरणात फ्लेमिंगो किंवा बाकी पक्षी दिसू शकतात. सध्या द्राक्षांचा सिझन असल्याने तिथे कुठे तोडणी चालू असेल तर खायला विकत घेऊ शकता. धोंडकर वाडी जवळ एका शेतकऱ्याने १०० प्रकारच्या शेवंती लावल्यात. नाव लक्षात नाही पण विचारल्यास सांगतील. ट्युलिप्स सारखे त्याचे लांब वाफे छान दिसतात. बाकी लेणी वगैरे खूप आहेत जुन्नर तालुक्यात. चिल्हेवाडी धरणाचा टॉप व्हिव छान आहे पण तो कधी उन्हाळ्यात पहिला नाही पाणी कमी झालेले असू शकते. तिकडे जायचे असल्यास उदापुरवरून फाटा आहे. तिथेच पुढे एक निमंत्रण म्हणून थाळी हॉटेल चांगले आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही चांगल्या आहेत. मासवाडी म्हणून लोकल व्हेज डिश आहे. मस्ट ट्राय प्रकारात. मढ गावात गेलात तर तिथे मोठे जम्बो प्रॉन्स मिळतात. तिथे एक धरणाच्या कडेला हर्ष म्हणून हॉटेल होते तो देत होता प्रॉन्स फ्राय करून. बाकी बरच आहे. जशी आवड असेल तसे अजून शोधू शकता.
चिडकू ग्रेट.. छान माहिती दिली
चिडकू ग्रेट.. छान माहिती दिली.. नोंदवून ठेवतो.
काल मी सहज फिरता फिरता
.
सुरेख नयनमनोहर फोटोज !
सुरेख नयनमनोहर फोटोज !
पहिल्याच वाक्याला टडोपा आलं.
पहिल्याच वाक्याला टडोपा आलं.
फोटोज सुंदर.
या घाटात शाळेत असताना जीपने फिरलो. रेस्ट हाऊस वर राहिलेलो. आदिवासी पाड्यात जेवण पण केलेलं.
नेहमी दरड कोसळायची त्या वेळी. आताचं माहिती नाही. बिबळ्याचा वावर आहे.
त्या ट्रीपनंतर जवळपास पंधरा वर्षांनी आंबेगाव तालुक्यातल्या एका गावात रात्री राहिलो होतो. शाळेत मुक्काम केला.
सकाळी समजलं कि आम्ही ज्या शाळेत उतरलेलो तिथे एक रात्र आधी बिबळ्याची मादी मुक्काम करून गेलेली.
औषधी वनस्पतींची खाण आहे माळशेज घाट.
पहिल्याच वाक्याला टडोपा आलं.
पहिल्याच वाक्याला टडोपा आलं.
फोटोज सुंदर.
>>>
हा हा धन्यवाद
आपल्या आठवणीही छान
दोन फोटोमध्ये कृत्रिम हिरवळ
दोन फोटोमध्ये कृत्रिम हिरवळ दिसली.
...... अन काळजात चर्र झालं !
.रिसॉर्टच्या पॅसेजमधील
.रिसॉर्टच्या पॅसेजमधील कार्पेट आहे ते ..
Pages