![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/02/27/Slide1_1.jpg)
मराठी भाषा गौरव दिन २०२३
खेळ शब्दांचा - ५ - प्रसिद्ध मराठी व्यक्तींची नावे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आखलेल्या अनेक खेळांपैकी हा खेळ आहे शब्दांचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण सगळ्यांनी तासनतास पत्ते झोडले असतीलच. त्यातल्या त्यात बराच वेळ चालणारा आणि आवडीचा खेळ म्हणजे झब्बू. आता आपण खेळणार आहेत शब्दांचा झब्बू.
शब्दांच्या या खेळात आपल्याला गायक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, प्रशासक अशा प्रसिद्ध मराठी व्यक्ती ओळखावयाच्या आहेत.
महत्त्वाची सूचना - याआधी मायबोलीवर अशाच प्रकारचा खेळ साहित्यिकांच्या नावांवरून आपण खेळलो आहोत. त्यामुळे या वर्षी साहित्यिकांव्यतिरिक्त अन्य प्रसिद्ध व्यक्तींवरच कोडी घालावीत.
सूचना नाही, पण जमले तर - अभिनेते, क्रिकेटपटू यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. या क्षेत्रांशिवाय अन्य क्षेत्रांतल्या मराठी कर्तबगार व्यक्तींना आठवण्याचा प्रयत्न करूया.
नियम :
१) संयोजक पहिले कोडे देतील.
२) कोड्याचे रूप - व्यक्तीच्या नावातील अक्षरांची संख्या दर्शवणार्या रेषा किंवा फुल्या , नावातील एक अक्षर त्याच्या जागी आणि व्यक्तीबद्दलची काही माहिती देणारा संकेत.
३) ही माहिती वापरून आपल्याला कोडे सोडवायचे आहे.
४) कोडे विचारणार्याने आपल्या कोड्याचे बरोबर उत्तर आले की तसे लगेच सांगावे.
५) जो सभासद सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील त्याने पुढचे कोडे द्यावे.
अशा प्रकारे हा खेळ साखळी पद्धतीने चालेल.
उदाहरण म्हणून सुरुवात एका सोप्या संकेतापासून करू.
पहिले कोडे:
सात अक्षरे - _ _ _ _ _ क _ : भारताची गानकोकिळा
चला तर मग, या खेळायला!
लता मंगेशकर
लता मंगेशकर
बरोबर. तुम्ही पुढला प्रश्न
बरोबर. तुम्ही पुढला प्रश्न विचारा.
विज्ञान शाखेत महिलांचे
विज्ञान शाखेत महिलांचे सबलीकरण या मंचाच्या संस्थापक आणि प्राध्यापक
(नाव) (आडनाव)
(* * *) ( * ड * *)
रोहिणी गोडबोले
रोहिणी गोडबोले
बरोबर
बरोबर
पद्मविभुषण, टेम्पलटन (१९९७
पद्मविभुषण, टेम्पलटन (१९९७)आणि मॅगसेसे पुरस्कार (१९९६) विजेते तत्वज्ञ व विचारवंत
(***ग**) (***ले)
पांडुरंग आठवले
पांडुरंग आठवले
बरोबर
बरोबर
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण मिळवणारे आणि हळद,बासमतीच्या पेटंटसाठी यशस्वी लढा देणारे मराठी संशोधक/शास्त्रज्ञ.
_ _ ना_ _ _ ल _ र
रघुनाथ माशेलकर
रघुनाथ माशेलकर
रघुनाथ माशेलकर!
रघुनाथ माशेलकर!
बरोबर समजून पुढचे देतो.
बरोबर समजून पुढचे देतो.
...
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विशेष राष्ट्रीय मानांकन मिळालेली व्यक्ती
(* * ना * ) ( * ल * र)
एकनाथ सोलकर बसते आहे, पण
एकनाथ सोलकर बसते आहे, पण त्यांचा याच्याशी काही संबंध नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एकनाथ च्या ऐवजी तसेच दुसरं
एकनाथ च्या ऐवजी तसेच दुसरं काहीतरी बघा बरं
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाथ च पण एकाचा नाही.
उत्तर सांगुन पुढे जाऊया. चार
उत्तर सांगुन पुढे जाऊया. चार तास झाले कोणाला येत नाहीये.
दिनानाथ खोलकर
दिनानाथ खोलकर
बरोब्बर!
बरोब्बर!
....
Analytics इंडिया या नियतकालिकाच्या वतीने दरवर्षी AI क्षेत्रातल्या 50 नामवंतांची यादी जाहीर होते. 2021 मध्ये या यादीत यांचा समावेश झालेला आहे.
पुढचं कोडं द्या अश्विनी.
पुढचं कोडं द्या अश्विनी.
हिमालय सुxx xxण
हिमालय
सुxx xxण
सुरेंद्र चव्हाण का.
सुरेंद्र चव्हाण का.
बरोबर
बरोबर
प्रसिद्ध जेष्ठ लेखिकेची
प्रसिद्ध जेष्ठ लेखिकेची वैद्यानिक बहीण
- म- - -नी .
सहा अक्षरी नाव आहे. तीन अक्षरी नाव आणि तीन अक्षरी आडनांव.
कमल सोहोनी
कमला सोहोनी
बरोबर.
बरोबर.
सव्वा लाख सुनांची सासू
सव्वा लाख सुनांची सासू
_म___ _ग_ (५,३)
कमलाबाई ओगले
कमलाबाई ओगले
बरोबर
बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक अनेक xxना xxगx
एक अनेक
xxना xxगx
क्लु द्या अजून
क्लु द्या अजून
साधना सरगम
साधना सरगम
Pages