मराठी भाषा गौरव दिन २०२३
खेळ शब्दांचा - ५ - प्रसिद्ध मराठी व्यक्तींची नावे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आखलेल्या अनेक खेळांपैकी हा खेळ आहे शब्दांचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण सगळ्यांनी तासनतास पत्ते झोडले असतीलच. त्यातल्या त्यात बराच वेळ चालणारा आणि आवडीचा खेळ म्हणजे झब्बू. आता आपण खेळणार आहेत शब्दांचा झब्बू.
शब्दांच्या या खेळात आपल्याला गायक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, प्रशासक अशा प्रसिद्ध मराठी व्यक्ती ओळखावयाच्या आहेत.
महत्त्वाची सूचना - याआधी मायबोलीवर अशाच प्रकारचा खेळ साहित्यिकांच्या नावांवरून आपण खेळलो आहोत. त्यामुळे या वर्षी साहित्यिकांव्यतिरिक्त अन्य प्रसिद्ध व्यक्तींवरच कोडी घालावीत.
सूचना नाही, पण जमले तर - अभिनेते, क्रिकेटपटू यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. या क्षेत्रांशिवाय अन्य क्षेत्रांतल्या मराठी कर्तबगार व्यक्तींना आठवण्याचा प्रयत्न करूया.
नियम :
१) संयोजक पहिले कोडे देतील.
२) कोड्याचे रूप - व्यक्तीच्या नावातील अक्षरांची संख्या दर्शवणार्या रेषा किंवा फुल्या , नावातील एक अक्षर त्याच्या जागी आणि व्यक्तीबद्दलची काही माहिती देणारा संकेत.
३) ही माहिती वापरून आपल्याला कोडे सोडवायचे आहे.
४) कोडे विचारणार्याने आपल्या कोड्याचे बरोबर उत्तर आले की तसे लगेच सांगावे.
५) जो सभासद सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील त्याने पुढचे कोडे द्यावे.
अशा प्रकारे हा खेळ साखळी पद्धतीने चालेल.
उदाहरण म्हणून सुरुवात एका सोप्या संकेतापासून करू.
पहिले कोडे:
सात अक्षरे - _ _ _ _ _ क _ : भारताची गानकोकिळा
चला तर मग, या खेळायला!
बरोब्बर
बरोब्बर
मातृका पु _ _गे
मातृका
पु _ _गे
पु शि रेगे
पु शि रेगे
बरोबर
बरोबर
गांधीवादी सामाजिक
गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या
पद्मभूषण --ना -न-
क्लू देते.
क्लू देते.
त्यांनी बरीच वर्षे बालग्राम, महाराष्ट्र बरोबर काम केले आहे.
शोभना रानडे
शोभना रानडे
बरोबर
बरोबर
हा खेळ सुरू असल्याचं माहितीच
हा खेळ सुरू असल्याचं माहितीच नाही पडलं. आत्ता समारोपाच्या धाग्यावर उल्लेख पाहिला तेव्हां कळलं.
पुढचं कोडं
पुढचं कोडं
ती फुलराणी, नटसम्राट:
_ _ श _ _षी
सतीश दुभाषी
सतीश दुभाषी
धागा वर काढून उत्तम काम केलेस
मस्त! पुढचा खो देऊन टाक.
मस्त! पुढचा खो देऊन टाक.
टप्प्याच्या आपलं पट्ट्याच्या.
टप्प्याच्या आपलं पट्ट्याच्या.. नाही नाही.. पट्टीच्या गाणाऱ्या
- लि - / - - र- -
मालिनी राजूरकर
मालिनी राजूरकर
द्या पुढचं, कुमार!
द्या पुढचं, कुमार!
त्या टप्प्याच्या पण गायिका
त्या टप्प्याच्या पण गायिका आहेतच की. 'लालवाला जोबन' टप्पा आठवतो त्यांचं नाव ऐकलं की.
न - - /- - - - - - र
न - - /- - - - - - र (३, ७ )
मराठी भाषेसंबंधी महत्त्वाचे कार्य
नरेंद्र चपळगावकर?
नरेंद्र चपळगावकर?
दे टाळी! आधी लालावला जोबन हाच क्लू लिहिणार होतो.
बरोबर
बरोबर
पहिले देशी गवर्नर
पहिले देशी गवर्नर
_ / _/ - - - ख
सी डी देशमुख
सी डी देशमुख
जीव रंगला अ__ - __ल
जीव रंगला
अ__ - __ल
जीव रंगला
जीव रंगला
अ__ - __ल
>>> अजय-अतुल
Pages