वाचूच न शकलेली पुस्तकं

Submitted by हर्ट on 6 November, 2008 - 22:25

वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!

पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.

मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'नाथ हा माझा' >>> कोणाचय ?

मागल्या भारत वारीत तब्बल १३ रुपये देऊन चांदोबा खरेदी केलं Happy पण आता त्याची quality इतकी खराब वाटली. व्याकरणाच्या असंख्य चूका, निर्थक गोष्टींनी भरलेला होता तो अंक तरी. ठेउन दिला तसाच. बॅगमधेच होता, तो इथे आलाय.

कांचन घाणेकर - काशीनाथ घाणेकरांची बायको. सुलोचनाची मुलगी.

नाथ हा माझा महा रटाळ पुस्तक आहे. "कधी वाचूच नये असे पुस्तक" Happy मला ते काशीनाथ घाणेकर उगीच स्त्रीलंपट वाटतात. कदाचित खरही नसेल पण त्यांचे डोळे "त्या" बाबतीत बोलायचे.

बी आणि ट्यु ला हरकत नसेल तर ट्यु चे पोस्ट ह्या बाफ च्या सुरुवातीला टाकावे (असे मला वाटते) Happy

ग्रिनस्पॅन तिचा फालॉअर होता हे माहीत न्हवत. Happy

त्या लेखाकाने थेअरीचा संबध लावला पण तो हे विसरला की हे सायकल पुर्ण होण्यासाठी लोकांनी कर्ज वापस करने पण महत्वाचे होते, त्याबद्दल लेखक काही लिहीत नाही. ग्रिनस्पॅनचे नंतर चुकले तो बाहुल बनला. त्याने २००१ नंतर इकॉनॉमी खुप चांगली वर आणली होती पण २००६ ते ७ मध्ये थोडा कंट्रोल लावायला पाहीजे होता.

मी स्वत देखील वेगळा संबध लावला पण पॅकेज चे ऐकल्यावर. त्यामूळे तिकडे मी हे लोक चुक करत आहेत असे लिहील. माझ्या स्वतवर रॅन्डचा (आणि डॅग्नीचा) खुप प्रभाव आहे मात्र हे मला मान्य करावे लागेल. Happy

Loss of Inheritance मलाही काही कळलं नाही. अर्धवट वाचून झाल्यावर विचार केला काहीच कळत नाही. मग परत करून दिलं. नंतर वाईटही वाटलं की पुरस्कार प्राप्त पुस्तक आपल्याला झेपले नाही. नक्कीच चांगले असेल पण कळणार्‍यासाठी.

'नाथ हा माझा'पण असंच भंपक आणि थिल्लर वाटलं होतं मला >> अगदि अगदि !!

सिलेक्टीव मेमरीज - जेमतेम ४० पानं वाचली नंतर इच्छाच झाली नाही वाचायची Sad

काय मस्त बा.फ. आहे हा. सगळ्यांचे अभिप्राय वाचले.
शोनू- सुटेबल बॉय मी आत्ता दुस-यांदा वाचते आहे. आवडतय. मग सविस्तरपणे लिहीन.
चाफा- God of Small Things >> हे अजिबात न आवडलेले पुस्तक. पण भाषेबद्दल ब-याच अंशी सहमत. Happy
शांताराम- Overrated पण एकदा वाचावेच.
ययाति मी पूर्ण केलं, पण त्याला ज्ञानपीठ का मिळालं असेल ते कारण 'आत्ता सापडेल, मग सापडेल..' असं म्हणत केलं! >> स्वाती ययाती बद्दल अगदी सहमत. ते वाचल्यावर पुन्हा कधी खांडेकर वाचले नाहीत. (त्या आधीच बरेच खांडेकर वाचले होते म्हणा) Happy
माझी एक मैत्रीण शोभा डे ची फॅन आहे. आयुष्यात हेवा करावा अशी मैत्री आमची गेले १ तप चांगली टिकून आहे आणि राहील- पण म्हणून शोभा डे ????????????????????????? (माझ्या दृष्टीने शोभा डे वाचण्यापेक्षा मी एका टोकाला सुमती क्षेत्रमाडे, सुवासिनी/माहेर/गृहशोभा वगैरे पण वाचायला तयार आहे- ते जुन्या साड्यांचे झूळझूळीत पडदे आपल्या हातानी शिवून नव-याची वाट बघणारी प्रेमविभोर नायिका वगैरे. {याचा अर्थ आणि दर्द असले वाचणा-यालाच कळेल} कारण त्याच्यात आव तरी नस्तो. ते लोकं प्रामाणिकपणे तसले लिहायचे आणि कदाचीत तोच त्यांचा खरा जीवनविषयक दृष्टीकोन होता आणि दुसरे टोकाचे वाचायचे असल्यास एरिका जॉन्ग पण वाचायला तयार आहे. कारण तेच No pretense. अगदी प्युअर गॉसीप साठी पण शोभा डे वाचवत नाही. )
या मैत्रीमूळे माणसे त्रिमीत असतात हा मौलिक शोध मला लागला. Don't judge a book by its cover तसेच Don't Judge a person by what he/she reads.

सुटेबल बॉय म्हणजे तेच ना कलकत्त्याच्या टी हाऊसचं वगैरे वर्णन त्यात आहे. नायिकेचं नाव लता आहे. ठीक आहे एकदा वाचायलाच.
मध्यंतरी कॉस्टकोत 'the splendor of silence by Indu sundaresan' हे पुस्तक दिसलं म्हणून उचललं पण अजिबात वाचू नये. महा बोअर आहे.

व्वा! छान वाटले वाचुन! मी पण मधे एक आमिताव घोष यान्चे The Hungry Tide वाचायला घेतले होते पन २०-३० पानेच वाचु शकले. कोणी वाचले आहे का? खुप छान आहे असे मी ऐकले आहे.
आणि पौलो कोएलो ची बरीच पुस्तके रटाळ वाटतात वाचताना...

गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज.... मला अजून कळल नाही...

मी वाचू न शकलेली पुस्तके:
१. नातिचरामी - दोन पानात क्लीन बोल्ड
२. The Glass Palace by Amitava Ghosh : ब्रम्हदेशचा राजा थिबा याच्या रत्नागिरि वास्तव्याच्या पार्श्वभूमीवर गुम्फलेली काल्पनिक कथा... एक विशिष्ट प्रकरण वाचल्यानंतर मला वाटले की ही कदंबरी इथेच संपली पाहिजे... परिणामी मी पुढचे वाचूच शकले नाही Happy
३.मीना प्रभू यांचे दक्षिण अमेरीकेवरील प्रवास वर्णन (नाव आठवत नाही).
४. Bride & prejudice चा मराठि अनुवादः अतिशय वाईट..... अनुवाद वाईट होता की पुस्तकच वाईट आहे, हे अजून कळले नाही.

>>पानिपत वाचुन frustration येतं त्यामुळे वाचवत नाही आता... <<

मला बारोमास वाचून फ्रस्ट्रेशन आले होते ... मधेच सोडून दिले

मी उत्साहाने विकत घेतलेले 'शांताराम' कसे तरी खिंड लढवत लढवत ३ महीने वाचले पण शेवटची १०० पाने वाचायचे धाडस मात्र अजून होत नाहीये. पण अशा जाडजूड पुस्तकांमुळे मी गाढा वाचक आहे असा लोकांचा समज होतो, ते बर वाटतं.

गाढा वाचक
>>>

शब्द बरोबर आहे ना? Proud

******************************************************ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

मी P.G.WoodHouse ची पुस्तके वाचायचा प्रयत्न केला. पन काहिच कळाले नाही.सोडून द्यावं लागलं.मला विनोद कळाला नाहि

तरुण तेजपाल यांचे 'THE ALCHEMY OF DESIRE' कुणी कधी वाचु नये. असं काहीतरी का लिहितात माहित नाही. मला तसे व. पु ही फारशे पटत नाहीत.

मी P.G.WoodHouse ची पुस्तके वाचायचा प्रयत्न केला. पन काहिच कळाले नाही.सोडून द्यावं लागलं.मला विनोद कळाला नाहि

अरेरे अतिशय वाईट वाटले हे वाचुन... मी वुडहाऊसची पुस्तके अनेकदा वाचली आहेत. the clicking of cuthbert तर अनेकदा वाचलेय... कैलास, धिर सोडु नका.. वाचत रहा. मलाही सुरवातीला खुप उथळ वाटलेले, पण नंतर जे काय प्रेमात पडले ते पड्लेच...

माझ्या अनुभवावरून तरी सांगतो की किमान २-३ पुस्तके (एकाच कॅरेक्टरची वाचलेली बरी - जीव्हज आणि वूस्टर बेस्ट) तरी वाचावी लागतात वुडहाउस ची. सुरूवातीला अजिबात विनोद झेपत नाही, पण हळुहळू सगळे समजू लागते आणि मग जी धमाल येते त्याला तोड नाही!

पुलंच्या पुस्तकातील त्याच्याबद्दल चा लेख वाचून मी वाचू लागलो. जुन्या मायबोलीवर खालच्या लिंक वर कोठेतरी त्याबद्दल बीबी उघडला होता - आता सापडत नाही. बहुधा इतर भाषांतील साहित्यिक असे नाव होते.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/103385.html?1144958365

हळुहळू सगळे समजू लागते आणि मग जी धमाल येते त्याला तोड नाही!
सेम हियर..... मला तर आताच उतारे आठवुन हसायला येतेय.. Happy

पुलंच्या पुस्तकातील त्याच्याबद्दल चा लेख वाचून मी वाचू लागलो. येस... मी ही पुलंचाच लेख वाचुन खुद्द पुल ज्याचे भक्त आहेत असा महापुरूष कोण म्हणुन वुडहाऊस कडे वळले. आता माझी मुलगीही त्याची फॅन आहे.

>हळुहळू सगळे समजू लागते आणि मग जी धमाल येते त्याला तोड नाही!
सेम हियर पण.
कधीही उदास वाटू लागले की एखादे वूडहाउस चे पुस्तक वाचायला घ्यावे. पुढचा जन्म बर्टीचा मिळावा असे मला नेहेमी वाटते.
"Seven habits of highly effective people" हे पुस्तक मला तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी भेट म्हणून दिले. अक्षरशः नेट लावूनही जेमतेम दहाच पाने वाचू शकलो.

विकु सेम हिअर. ही साली मॅनेजमेन्टची पुस्तके लै बोअर अस्तेत. मध्ये पॉवर आणले वाचवत नाही. बरे प्रॅक्टिकली त्यात काहीही इम्प्लिमेन्ट करता येत नाही... त्यात पुन्हा ह्युमन इलेमेन्ट असतो. अन भारतात तोच महत्वाचा असतो. मुळातच भारतीय माणसाला काम करायाला नको असते ,कसले मोटिव्हेशन टेक्निक अन कसले काय....

तो चार Quadrant चा कन्सेप्ट त्यातलाच आहे ना? तो मात्र जाम आवडला आणि नेहमीच्या वापरात प्रचंड फायदेशीर आहे. बाकी पूर्ण पुस्तक मी अजूनही वाचले नाही.

बहुतेक मॅनेजमेन्टची पुस्तके पाश्चात्य वातावरण, मूल्ये, मनोवृत्ती , सर्वेक्षणे, डाटा यावर आधारित असतात. भारतीय वातावरणात त्यातील बाबी लागू करणे फारच कठीण. सर्वच स्तरावर कामचुकारपणा.सारवजनिक जीवनात तर मूल्ये पाळायचीच नाहीत असे आपण ठरवूनच टाकले आहे....
मी बँकेत असताना युनिअन्सची फार दादागिरी असे. काम न करून , कमी करून, तांत्रिक खोडे उपस्थित करून मॅनेजमेन्टला अडचणीत आणणे हा युनिअनचा धन्दा. मग मॅनेजरने यांची दाढी धरायची. त्या बदल्यात युनिअन पदाधिकायानी टोळासारखे उन्डारत फिरायचे. एखादा प्रामाणिक कर्मचरी सिन्सिअरली काम करत असेल तर ते त्याला काम करू द्यायचे नाही. चमचा म्हणून हिणवणार. कामे पेंडिंग ठेवण्याचे युनिअनचे अलिखित आदेश असत. काय मॅनेजमेन्टची पुस्तके बोम्ब मारणार... ?

वूडहाउस चे पुस्तक परत वाचेन........ झाडाझडती ...सुन्न करणारा अनूभव्...वाचवत नाहि......

Pages